Saturday, May 16, 2020

सोशल जस्टीस इन ट्रॅफीक जॅम




डॉ. ह. नि. सोनकांबळे


राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा. धनंजय मुढे यांनी परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना क्रिमिलेअर (लोकसत्ता च्या बातमी वरून, GR मध्ये उल्लेख नाही) ची अट लागू केली आहे. या निर्णयाच्या समर्थनार्थ आणि विरोधात दोन गट निर्माण झाले आहेत. समर्थनार्थ नसलेला गट नक्कीच या निर्णयाच्या विरोधात आहे हे वेगळं सांगायला नको. कारण त्यांच्या मुलांना आता परदेशात शिक्षणासाठी स्वखर्चाने जावे लागणार आहे. तर जे गरीब अर्थात जे BPL मध्ये आहेत त्यांची मुले आता सहज परदेशात शिक्षणासाठी जाणार आहेत तेही शासनाच्या पैशाच्या आधारावर. आजपर्यंत हे विद्यार्थी साधे नांदेड, औरंगाबाद, जळगाव किंवा इतर कुठल्याही ग्रामीण विद्यापीठात शिक्षणासाठी जाऊ शकत नव्हते ते थेट परदेशात जातील.

पण जो वर्ग या निर्णयाला विरोध करतो आहे. तो वर्ग मात्र नाराज आहे कारण त्यांच्या खिशातला (अर्थात साठवून ठेवलेला) पैसा आता मुलांना परदेशात शिक्षणासाठी खर्च करावा लागणार आहे. जे त्यांना मुळीच आवडणार (झेपणार नाही असे नाही.) नाही. कारण त्या पैशात आणखी एखादी गाडी किंवा एखादा फ्लॅट घेता येऊ शकतो. कदाचित याच नियोजनही झालेलं असेल.

आजपर्यंत एखादी अशी योजना आली की ती झोपडीत पोहचतच नाही. एखादा असा विद्यार्थी असतो जो मोठ्या संघर्षाने हि योजना मिळवतो पण शेवटी वशिल्यात कमीच पडतो. अन्यथा सर्व योजना APL धारकच खाऊन घेतात. मागच्या वेळेस नाही का त्या मंत्र्यांच्या मुलीने या शिष्यवृत्तीतून परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा प्रयत्न केला होता अगदी तसा. मग कसं काय झोपडीतलं लेकरू परदेशात जाईल.

मागच्या दोन तीन वर्षात किती विद्यार्थी असे आहेत की जे BPL मध्ये आहेत आणि परदेशात शिक्षणासाठी गेलेले आहेत.  या निर्णयामुळे BPL च्या विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. जर आपल्याला असे वाटत असेल की, कोणताही BPL धारक परदेशात गेला नाही पाहिजे तर आंदोलनाला तयार राहा.

मोठे वशिले, मोठे श्रीमंत लोकच आजपर्यंत याचा लाभ घेत आलेले आहेत. एका प्राध्यापकांच्या 3 मुलांनी फेलोशिप घेतली ज्यांचे उत्पन्न वर्षाला 22 ते 25 लाख आहे. कदाचीय त्यांनी नियमाचे पालन केले असते तर सामाजिक न्यायाचा प्रवाह खाली तिघांकडे आला असता पण तो प्राध्यापक मोहोदयांच्या घरीच आडला. आणि हेच प्राध्यापक महोदय भाषण ठोकून सांगत होते की, गरिबांच्या मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे, बाबसाहेबांसारखं परदेशात गेलं पाहिजे. कसे जातील हो सर, जर त्यांचा प्रवाहच आपण अडवला असेल तर. सामाजिक नायाच्या नावावर सर्व काही येत आणि श्रीमंतांच्या ट्रॅफीक मध्ये ते जॅम होऊन जातं. गरिबांची सायकल शेवटी पायवटेनेच ढकलावी लागते. ती वाटेतच पम्चर होते, तिची चैन पडते, चालवणाऱ्याचे पायही थकतात आणि शेवटी तो त्याच पायवाटेवर निपचित पडतो. त्या मार्गाने कधीच श्रीमंतांची गाडी जात नाही आणि कोणताही श्रीमंत त्याच्यावर दया दाखवून त्याला गाडीत बसवून विद्यापीठात घेऊन जात नाही.



मा. सामाजिक नाय मंत्री धनंजय मुंढे यांनी या गरिबांची सायकल सुसाट वेगाने धावेल यासाठी स्वतंत्र रस्ता तयार केला. पण तिथेही त्याचे वरिष्ठ बांधव (जे बाबासाहेबांमुळे शिकले, श्रीमंत झाले आणि गडयात फिरू लागले) काटे टाकून सायकल पमचर करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अनेक दिवसांपासून हि सायकल सामाजिक न्यायाच्या ट्रॅफीक मध्ये अडकली होती जिला रस्ताच नव्हता ती सुसाट निघतेय याचा आनंद आम्हाला होणे अपेक्षित होते. पण कसा काय होईल गरीब, शोषित, वंचित घटकांचे अश्रू पुसण्यासाठी समाजात बाबासाहेब जन्मालाच आले नाहीत. जे आमच्या बोटाला धरून विद्यापीठात घेऊन जातील.



असो मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व मा. धनंजय मुंढे साहेबांचे खूप खूप अभिनंदन आणि विरोधकांच्या आंदोलनाला झोपडपट्टी वाशियांच्या खूप खुप शुभेच्छा! 

टीप: या निर्णयाच्या विरोधात आंदोलनासाठी गरज भासल्यास आम्हा झोपडपट्टी वाशियांना नक्की बोलवा कारण आंदोलनात आमचीच ज्यास्त गरज असते. आंदोलन करणे AC वाल्यांचे काम नाही. 




8 comments:

  1. नक्कीच तुम्ही म्हणता तसे आहे . जे श्रीमंत आहेत त्यांनीच याचा लाभ घेतला आहे. मी तर नाव सुद्धा सांगू शकतो या लाभ धारकांची. आणि हेच समाजाच्या कल्याणाची होळी करून स्वतःची पोळी भाजून घेतात यात शंका नाही.पण जर नॉन क्रीम लयेर आली तर अनुसूचित जाती आणि जमाती चे आरक्षण ला सुद्धा ही लागू होईल भविष्यात... धोरणासाठी निर्णय घेतला असेल तर ठीक पण याचेच जर पुढे ही लागू केले तर मग मात्र अवघड होईल...यात शंका नाही...कारण कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी सामाजिक मानसिकता जाणून घेऊन मग त्याच संदर्भात मोठा निर्णय घेतला जातो याही बाबी कडे आपण लक्ष ठेवले पाहिजे.म्हणून हा निर्णय कितपत योग्य आहे संविधानिक रित्या हे तपासून पाहिले पाहिजे...कारण मी जरी श्रीमंत असलो तरी लोक काही मला उच्च जातीचा समजत नाहीत..हे ही तितकंच खरं आहे...सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय या दोन्ही बाबी वेगळ्या आहेत.. पण आर्थिक न्याय शिवाय सामाजिक न्याय मिळविणे हे अशक्य प्राय बाब आहे हे विसरता कामा नये....बाकी कोणता निर्णय योग्य जे न पहाता त्याची निष्पक्ष अमलबजावणीसाठी जे लोक सत्तेत आहेत हे त्यांच्या मानसिकतेवर आहे... आणि अगोदरच परदेशी शिक्षण घेण्यासाठी ज्या अटी व शर्ती आहेत त्यात हे आहे..मग हा निर्णय अश्या लॉक डाऊन मध्ये घेणं काय गरजेचं होत आणि तसही शैक्षणिक आजुन संपायची वेळ ठरवून दिली नाही मग का निर्णय घेतला.या मागची मानसिकता ही लक्षात घेतली पाहिजे...शेवटी घटना आणि धोरण कितीही स्पष्ट असेल तरी ते राबवणारे जर योग्य आहेत तर मग आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या अथायोग्य न्याय मिळेल....यात शंका नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. सरजी,
      आरक्षणाला लागू होणार नाही, कारण आरक्षण
      आणि अर्थसहाय्य या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत हे आपल्याला न्यातच आहे. पण याला आरक्षणाची जोड देऊन आपल्यातला वरचा वर्ग पुन्हा एकदा खालच्या वर्गाकडे येणार प्रवाह रोखण्याचे काम करत आहे. आणि तेही झोपडीतल्या कार्यकर्त्यांच्या भरोषावर, ज्यांची मुले आजही इंग्रजी शाळेत प्रवेश घेऊ शकत नाहीत.

      आजपर्यंत आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टाचे 12 जजमेंट आले पण पण यातला कोणीच बोलला नाही. आज जेव्हा त्यांच्या साठवलेल्या पैशाला झळ लागण्याची वेळ आली तेव्हा मात्र रस्त्यावर येण्याची भाषा होते आहे आणि आमचे गरीब, वंचित मुले याला पुन्हा भाळली जात आहेत.

      Delete
    2. हो ना गरीब चे लेकर शिकले तर वांधे होतात . म्हणून त्यांना संधीचा फायदाच घेऊ द्यायचा नाही .

      Delete
    3. आपणच आपल्या गरीब लोकांना वर येऊ देत नाही.

      Delete
  2. भविष्यात आरक्षणा साठी देखील हा निर्णय घेण्यात येवू शकतो.मग त्याचे काय?आर्थीक मागास प्रवर्गासाठी आरक्षण का मग तर आरक्षणाचे सर्व निकष च बदलतील.

    ReplyDelete
    Replies
    1. आरक्षणाला लागू होणार नाही, कारण आरक्षण
      आणि अर्थसहाय्य या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत हे आपल्याला न्यातच आहे. पण याला आरक्षणाची जोड देऊन आपल्यातला वरचा वर्ग पुन्हा एकदा खालच्या वर्गाकडे येणार प्रवाह रोखण्याचे काम करत आहे.

      Delete
  3. या अभ्यासपूर्ण लेखामुळे आमची यासंबधी ची कॉन्सेप्ट क्लिअर झाली सर

    ReplyDelete