बोधिधर्मन आणि कोरोना : हा चित्रपट एकदा बघाच
साउथचे अनेक चित्रपट आपल्याला विचार करायला भाग पाडतात. असाच एक चित्रपट काही दिवसापूर्वी बघण्यात आला होता. जो कोरोनामुळे निर्माण झालेल्या आजच्या परिस्थितीवर भाष्य करायला भाग पाडतो. या चित्रपटाचे नाव नेमेकपणाने सांगता येत नाही. कारण युटयुबला हा चित्रपट वेगवेगळया नावाने अपलोड करण्यात आला आहे. मुळात हा चित्रपट मल्याळम भाषेतला असावा. या भाषेतला हा चित्रपट 7th sense surya या नावाने आहे तर हिंदी मध्ये या चित्रपटाला शाओलीन टेंम्पल असे नाव देण्यात आले आहे.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच बोधीधर्मन या भारतातील 6 व्या शतकातील एका विदवानाबद्दल एक निवेदन करण्यात आले आहे. हे निवदेन ऐकून आपण लागलीच गुगल सर्च करुन बघीतल्यावर याची पुन्हा उत्सुकता वाढते. हे बोधीधर्मन नेमके कोण होते? ते चिन मध्ये कसे काय पोहचले? त्यांचे चिनमध्ये पुतळे का बसविले जातात? आणि चिनचे लोक त्यांची पुजा का करतात? याचा विचार आपल्याला करण्यास हा चित्रपट भाग पाडतो.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, हा चित्रपट आपण आपले प्राचिन वैभग हरवून बसलो आहोत का? याचाही विचार करायला प्रवृत्त करतो. जर पुन्हा हे वैभग आपल्याला मिळवायचे असेल तर आपण काय करायला पाहिजे? यावर आपण स्वतःच चिंतन करु लागतो.
सगळयात महत्वाचं म्हणजे आपलं जे प्राचिन वैभव आहे ते चिनसारख्या देशाने स्विकारलं आहे आणि त्याचा वाईट उपयोग जगावर करतो आहे की काय? याची शंका आपल्या मनात येते. आज कोरोनामुळे जगभरात निर्माण झालेली परिस्थिती आपल्याला यावर विचार करायला भाग पाडते. नव्हे कोरोना नेमकं काय आहे? हे एका वेगळया अर्थाने समजून घेण्यास हा चित्रपट आपल्याला मदत करतो. चित्रपटातली अनेक दृष्य जसे की, चिनची पाॅलीसी, व्हायरस, कुत्रे, हाॅस्पिटलमधली परिस्थिती आपल्याला आजच्या कोरोनाच्या परिस्थितीची तुलना करायला लावणारी आहे.
हा चित्रपट एका रिसर्चवर अवलुबुन आहे. इतिहास आणि विज्ञान याची सांगड घालून या चित्रपटाची निर्मीती करण्यात आलेली आहे. बौद्ध कालखंडातच भारताने विज्ञानात किती प्रगती केली होती याची जाणीव हा चित्रपट आपल्याला करुन देतो. जग आता बायो वार कडे कसे वळले आहे. हे सांगायला देखिल हा चित्रपट कुठे कमी पडत नाही.
चित्रपटाच्या शेवटी यातला नायक आम्हाला हेच सांगतो की, आम्ही आपला इतिहास विसरतो आहोत. परिणामी आम्हाला नवा इतिहास घडवता येत नाही. त्यामूळे इतिहास वाचने आणि ते पुढच्या पिढीला समाजून सांगणे आवश्यक आहे. असे निवेदन नायक करतो.
चित्रपट पाहण्यासाठी खाली👇क्लिक करा.
शाओलिन टेम्पल : हिंदी डब मुव्ही
हा चित्रपट बघितल्यावर आपल्याला नक्की काही प्रश्न पडलेच असतील. माझ्या मनात निर्माण झालेले प्रश्न सांगितले आहेत. तुम्हीही कळवा.
अशाच नवनवीन माहिती करिता ब्लॉग ला follow करायला विसरू नका.
No comments:
Post a Comment