"जातीसाठी माती" न खाणारा राजा
डॉ. ह. नि. सोनकांबळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकवेळेस गांधीजींना म्हणाले हिते कि, गांधीजी लेखणीच्या एका फाटकाऱ्याने कोणताही समाज बदलता येत नाही. (प्रा. डॉ. श्रीराम निकम लिखित "गांधी-आंबेडकर अस्पृश्यता मुक्ती संघर्ष" या पुस्तकात या घटनेचे वर्णन खूप विस्ताराने आले आहे. ) कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहास डोळ्यांनी बघितला होता आणि त्याचे चिंतनही केले होते. कितीही कडक कायदे केले तरी लोक जातीसाठी माती खतातच हे त्यांना माहीतच होते. पण शाहू महाराज हे जातीसाठी माती खाणारे राजे नाहीत हि बाबच शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मैत्री घनिष्ठ करत गेली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर शाहू महाराजांनी 1919 ला केलेला अस्पृश्यता बंदीचा कायदा होता. हा कायदा होऊनही सार्वजनिक विहिरीचे पाणी बाटवले म्हणून "गंगाराम कांबळे" यांना मारहाण झाली. पण शाहू महाराजांनी जातीसाठी माती कधीच खाल्ली नाही. ज्या लोकांनी गंगाराम कांबळे यांना मारहाण केली त्या लोकांना दरबारात पकडून आणले आणि त्यांना चाबकाने सोलून काढले.
गंगाराम कांबळे याला बोलावून घेतले आणि त्याला व्यवसाय करण्याचा सल्ला शाहू महाराजांनी दिला. आज जे लोक तुला अस्पृश्य समजत आहेत तेच लोक उद्या तुझ्या हॉटेल ला येऊन तुझ्या हातचा चहा पितील. असा ठाम विश्वास त्यांनी गंगाराम कांबळे यांना दिला.
शाहू महाराजांनी त्यांना सहकार्य केले, प्रेरणा दिली. एवढेच नाही तर ते फेरफटका मारायला गेल्यावर त्या हॉटेल मध्ये जाऊन आपल्या सोबत फिरणाऱ्या इतर जातीच्या लोकांना सोबत घेऊन त्या हॉटेल वर बसून चहा पिऊ लागले. हि घटना इतिहासात जरी शाहू महाराजांनी अस्पृश्यांना व्यवसाय सुरु करुन दिले एवढ्यापुरती मर्यादित नाही किंवा अस्पृश्याच्या हातचा चहा शाहू महाराज पित असत एवढयापूरतीही मर्यादित नाही.
हि घटना आपल्याला राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा देते. शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे सारख्या प्रवाहाच्या बाहेरच्या व्यक्तीला प्रवाहात आणले. जो पर्यंत प्रत्येक व्यक्ती प्रवाहात येत नाही तोपर्यंत या देशाचे आपल्याला राष्ट्र उभे करता येणार नाही याची जणीव शाहू महाराजांना होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील हाच मुद्दा उपस्थित करून या देशाला "राष्ट्र" म्हणता येणार नाही असे स्पष्ट पणे सांगितले होते. कारण हा देश जाती जाती मध्ये विभागलेला असून प्रत्येक एक जात हि स्वतःला "राष्ट्र" समजते, त्यामुळे ते कधीच एक होऊ शकत नाहीत. तर, जो पर्यंत लोक एकमय होत नाहीत तोपर्यंत आपल्याला कोणत्याही देशाला राष्ट्र म्हणता येणार नाही असे महात्मा फुले म्हणतात.
भारतातील लोकांना एकमय होऊ न देण्यासाठी "जात" आडवी येते त्यामुळे तीला कायमचे नष्ट करणे आवश्यक आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाटते. जातीला संपवायचे असेल तर आपापसात व्यवहार होणे तितकेच आवश्यक आहे याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही ते सांगतात. शाहू महाराजांनी 1917 ला आंतरजातीय विवाहाचा कायदा करून आणि गंगाराम कांबळे यांना हॉटेलचा व्यवसाय सुरु करण्याची प्रेरणा देऊन जाती-जाती मधील व्यवहारालाच प्रोत्साहन दिले. महात्मा फुले ज्यापद्धतीने सांगतात की, लोक एकमय झाले पाहिजेत, त्याच दिशेने शाहू महाराज पावले टाकताना दिसतात. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्या कृतिकार्यक्रमाला पुढे घेऊन जातात आणि आपल्याला या देशाचे "राष्ट्र" निर्माण करायचे आहे असे पुढच्या पिढीला सांगतात.
पण आजही असे अनेक लोक आहेत जे फुले, शाहू आणि आंबेडकरांचा हा विचार सोडून जातीसाठी माती खायला निघतात. पण त्यांनी किमान, "जातीसाठी माती खावी पण कुठली खावी याचेही भान ठेवावे."
हेही वाचा
T to translated by Google for English reader.
King who does not eat "soil for caste"
Dr. H. N. Sonakamble
Dr. Babasaheb Ambed Ambedkar kar once said to Gandhiji that no society can be changed by a single piece of Gandhiji's writing.(This incident is described in great detail in the book "Gandhi-Ambedkar Untouchability Liberation Struggle" written by Prof. Dr. Shriram Nikam.) Because Dr.Babasaheb Ambedkar had seen history with his own eyes and had also thought about it. No matter how strict the laws were, they knew that people were only cultivating the soil for the caste. But Shahu Maharaj is not a king who eats soil for the sake of caste. Babasaheb Ambedkar's friendship grew closer.
Dr. In front of Babasaheb Ambedkar, Shahu Maharaj's Untouchability Act of 1919 was a law. Despite this law, "Gangaram Kamble" was beaten up for distributing water from public wells. But Shahu Maharaj never ate soil for caste.The people who had beaten Gangaram Kamble were caught in the court and whipped.
Gangaram Kamble called him and Shahu Maharaj advised him to do business. The same people who consider you untouchable today will come to your hotel tomorrow and drink your handful of tea.He gave such firm faith to Gangaram Kamble.
Shahu Maharaj supported and inspired him. Not only that, when he went for a walk, he went to the hotel and sat down at the hotel and drank tea with the people of other castes who were walking with him.This incident is not limited to the history in which Shahu Maharaj started a business for the untouchables or the tea in the hands of the untouchables was drunk by Shahu Maharaj.
This incident inspires us to build a nation.Shahu Maharaj brought an out-of-stream person like Gangaram Kamble into the stream. Shahu Maharaj was aware that we cannot build a nation of this country unless every person comes into the stream. Dr. Babasaheb Ambedkar also raised the same issue and made it clear that this country cannot be called a "nation". Because this country is divided into castes and each caste considers itself a "nation", so they can never be one.So, Mahatma Phule says that no country can be called a nation unless the people are united.
The "caste" is horizontal in order to prevent the people of India from uniting, so it needs to be eradicated forever.Babasaheb Ambedkar thinks. He also said that if caste is to be eradicated, it is necessary to make efforts for mutual treatment. Shahu Maharaj encouraged inter-caste marriage by enacting the Inter-caste Marriage Act in 1917 and inspiring Gangaram Kamble to start a hotel business. Shahu Maharaj is seen taking steps in the same direction as Mahatma Phule says that people should be united.Next Dr. Babasaheb Ambedkar takes the work of both of them forward and tells the next generation that we want to create a "nation" of this country.
But even today, there are many people who abandon the idea of Phule, Shahu and Ambedkar and go out to eat soil for the sake of caste. But he should at least say, "Eat soil for caste but also be aware of what to eat."
सर अभिनंदन,
ReplyDeleteफारच सुंदर विवेचन. "जाती" राष्ट्रद्रोही असून तो भारताच्या राष्ट्र निर्मिती समोरील मोठा अडसर आहे. हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत दि 25 नोव्हेंबर 1949 ला प्रतिपादन केले होते. बाबासाहेब यांच्या या विचारास म फुले व राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा नक्कीच वारसा आहे.
ब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.
Deleteयेणाऱ्या काळात असेच ब्लॉग वाचण्यासाठी ब्लॉग पेज ला follow कराल हीच अपेक्षा!
धन्यवाद sir
सर आज आडाणी लोकांपेक्षा तथाकथित शिकलेल्या ज्यांना पांढरपेशा व्रु्तीची माणसे सगळ कळत असूनही जातीचा उदोउदो करतांना दिसतात.हे आजच्या समाजाच मोठ दुदैव आहे... छान विवेचन केले सर..
ReplyDeleteब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.
Deleteयेणाऱ्या काळात असेच ब्लॉग वाचण्यासाठी ब्लॉग पेज ला follow कराल हीच अपेक्षा!
धन्यवाद