Friday, June 19, 2020

"मिलिंद विद्यापीठ" का झाले नाही ?





सर सय्यद अहमद खान यांनी 1875  ला स्थापन केलेल्या मुस्लिम अँग्लो ओरियन्टल कॉलेज चे रूपांतर 1920 मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठात झाले. तर अँनि बेझन्ट व मदन मोहन मालवीय यांनी 1898 मध्ये स्थापन केलेल्या सेंट्रल हिंदू महाविद्यालयाचे रूपांतर नंतर हिंदू बनारस विद्यापीठात झाले. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन संस्थेचे किंवा मिलींद महाविद्यालयाचे रूपांतर नंतर मिलिंद विद्यापीठात होऊ शकले नाही. 

एकीकडे मुस्लिम विद्यापीठ तर दुसरीकडे हिंदू विद्यापीठाची स्थापना होत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या लोकांचा विचार करत होते. जर शैक्षणिक संस्था अशा धर्माच्या नावावर उभ्या राहत असतील तर भारतातल्या लोकांचे काय होईल हि चिंता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होती. भारतातील "लोक" आणि त्यांचे कल्याण हा विषय त्यांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू होता. म्हणून त्यांनी "लोक" हि संकल्पना लक्षात घेऊन "पीपल्स" एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. कदाचित बाबासाहेबांना या देशात कोणत्याही धर्माच्या नावाने शिक्षण संस्था असाव्यात हि संकल्पनाच मान्य नसावी म्हणूनच त्यांनी भविष्यात "पीपल्स युनिव्हर्सिटी" स्थापन व्हाव्यात या दृष्टीकोनातून संस्था स्थापन केल्या. या देशाच्या भूमीत जे विद्वान लोक जन्माला आले त्यांची नावे विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना असावीत असे त्यांना वाटत होते. म्हणूनच त्यांनी विद्वान असलेल्या राजा मिलिंद चे नाव महाविद्यालयाला दिले. कोणत्याही संस्था, विद्यापीठे जातीच्या आणि धर्माच्या नावाने न ओळखता त्यातील शिक्षकांच्या  आणि विद्यार्थ्यांच्या नावाने ओळखली जावीत असा त्यांचा निश्चय होता. त्यासाठीच त्यांनी आपल्या संस्थेला नागसेन आणि मिलिंद या गुरु शिष्याचा वारसा सांगितला. इथून पुढेही हा वारसा निर्माण होत राहील हीच त्यांची अपेक्षा होती. 

खरे तर आजपर्यंत हे संस्थान एक मोठे विद्यापीठ होणे अपेक्षित होते पण ते झाले नाही. त्यानंतर अनेक संस्था उदयास आल्या आणि त्यांची विद्यापीठे निर्माण झाली पण संस्थेच्या ट्रस्टींनी त्या दृष्टीने पाऊले टाकली नाहीत. आजही संस्थेचा मालक कोण? यावर वाद सुरू आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळातही या संस्थेची वाटचाल कशी राहील हा चिंतेचा विषय आहे. 

मुळात या संस्थेचा वारस कोण? यावर मोठे वाद सुरु आहेत. अनेकांचे म्हणणे असे आहे की, " माझ्या संस्थेवर माझ्या रक्ताचा कोणीही वारस असणार नाही." अशी अपेक्षा बाबासाहेबांची होती.  याच वाक्यावरून  ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांना दूर ठेवण्यात येत आहे. मुळात प्रश्न असा आहे की,  "जर उद्या एखाद्याला  संस्थेचा सदस्य म्हणून नेमायचे असेल तर त्याच्याकडून बॉण्ड वर असे लिहून घ्यायचे का कि, "मी बाबासाहेबांच्या रक्ताचा वारस नाही." असा कोणता अनुयायी असेल की तो असे लिहून देईल. आणि असे लिहून देणारा संस्थेचा काय विकास करू शकेल. त्यामुळे अशा बाबींचा अडथळा पुढे न करता सरळ ऍड. बाळासाहेब आंबेडकरांचा मार्ग मोकळा करून संस्थेचा ताबा त्यांना देण्यात यावा व सर्व सदस्यांनी या संस्थेच्या विकासाचा श्वास मोकळा करावा. 

महाराष्ट्राच्या विकासात या संस्थेचे योगदान सुरुवातीपासूनच मोठे राहिलेले आहे. त्यामुळे असे अनेक हात आहेत की ते या संस्थेच्या मदतीस धावून येतील. महाराष्ट्रातील लोक, राज्यसरकार आणि केंद्रसरकार यातील कोणीही या संस्थेच्या विकासास अडथळा निर्माण करणार नाही. आजपर्यंत सरकारची भूमिका देखील सकारात्मक राहिलेली आहे. अनेक लोक या संस्थेला मदत करायला तयार आहेत. मागे 12 जानेवारी 2017 ला माझी भेट मा. खा. सुप्रिया ताई सुळे यांच्यासोबत झाली होती. संस्थेच्या बाबतीत त्यांनी सहज विचारलं. विद्यार्थ्यांची कशी सोय आहे हे हि विचारलं. वसतिगृहाची अवस्था बिकट आहे, खूप पडझड झाली आहे. यावर चर्चा झाली. मला वाटलं सहज विचारलं असेल. पुढे दोन दिवसानंतर म्हणजेच 14 जानेवारी 2017 ला त्यांनी मिलिंद कॅम्पस चा दौरा केला आणि वसतिगृहाची पाहणी केली. वसतिगृहाची अवस्था बघून विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांच्या लक्षात आले. संस्थेत वाद सुरू असल्याने वसतीगृहाचा विकास करता येत नाही हि बाब लक्षात घेऊन  त्यांनी "यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान" कडून दीड कोटी ची मदत जाहीर केली. पुढे तोच प्रश्न मध्ये आला संस्थेचा वाद. 

असे किती तरी लोक आहेत जे या संस्थेचा विकास करू पाहत आहेत पण जोपर्यंत संस्थेचा वाद संपुष्टात येणार नाही तो पर्यंत विकासाचा रथ अडून राहणार आहे. त्यामुळे ज्या लोकांना केंद्र म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हि संस्था उभी केली त्याच लोकांनी आता नव्याने काही पाऊले उचलने आवश्यक आहे. जोपर्यंत एखादी खंबीर व्यक्ती इथे येणार नाही तोपर्यंत लोकांचं अर्थात "मिलिंद विद्यापीठ" स्थापन होणार नाही. 

14 comments:

  1. अगदी बरोबर आहे सर संस्थेचा ताबा आदरणीय ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या कडेच द्यायला हवा तेंव्हाच संस्थेची प्रगती होऊ शकेल.

    ReplyDelete
    Replies
    1. तसे होऊ शकत नाही परिवारातील सदस्य संस्थे मधे पद भुष्वू शकत नाही

      Delete
  2. पण सर जर बाळासाहेब आंबेडकर यांना सदस्य म्हणून नेमले तर ते त्यांचीच माणसे भरणार नाही हे आपण नाही सांगू शकत. कारण आज खूप जण महामानवांच्या विचारला धरून चालत नाही असे दिसते. नवीन वाचायला मिळाले.

    ReplyDelete
  3. आम्ही करू 'मिलिंद विद्यापीठ'....!

    जय भीम,
    आपल्या नागसेन वन परिसरा पासून पाच-सहा किलोमीटर अंतरावर औरंगाबादेत एक 'डिम्ड विद्यापीठ 'चा दर्जा असलेली संस्था आहे. सदर संस्था हि अॅड मो.क. गांधी नावाने आहे. सदर संस्था अध्यक्ष हा एका विचारधारेला घेऊन 'शिक्षण' क्षेत्रात काम करतो पण 'सत्ता' नावाचं शहाणपण हे त्याच्या डोक्यावर हात ठेवतं... तुम्ही जे पवार सांगतात तेच शरद पवार 'नामविस्तार' करण्यासाठी संघर्ष करायला लावतात पण हेच अंकुश कदम च्या संस्थेसाठी लागू होत नाही.
    'सत्तेचं शहाणपण' महाराष्ट्रात आंबेडकरवादी समाजाला आले नाही. उत्तर प्रदेशात तेच 'सत्तेचं शहाणपण' आज देखील साक्ष देत आहे. आपण बाबासाहेब वाचतो पण काम करत नाही हिच खरी शोकांतिका आहे..!

    ReplyDelete
    Replies
    1. मी पण तुमच्या सोबत आहे सर

      Delete
  4. अत्यंत महत्वाच्या विषयावर लिखाण केले सर,परिस्थितीला समर्पक लिखाण आहे बाकी संस्थे chya उद्धारासाठी करावे तेवढे लिखाण कमी आहे

    ReplyDelete
    Replies
    1. ब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.
      येणाऱ्या काळात असेच ब्लॉग वाचण्यासाठी ब्लॉग पेज ला follow कराल हीच अपेक्षा!
      धन्यवाद

      Delete
  5. आपल्या समाज मनातील विचार आपण मांडला सर जी बहोत बडीया

    ReplyDelete
    Replies
    1. ब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.
      येणाऱ्या काळात असेच ब्लॉग वाचण्यासाठी ब्लॉग पेज ला follow कराल हीच अपेक्षा!
      धन्यवाद

      Delete
  6. शिलाशिवाय विद्या फुकाची आहे, असे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर सांगत राहिले आणि संस्थेचे पदाधिकारी हे शीलचं हरवून बसले आहेत. संस्थेतील बहुतांश अप्रमाणिक लोक आहेत. स्वार्थांध आहेत. आपणाकडून खुप छान वाचायला मिळाले आहे. सर, आम्ही आपल्या सोबत आहोत.🙏

    ReplyDelete
    Replies
    1. ब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.
      येणाऱ्या काळात असेच ब्लॉग वाचण्यासाठी ब्लॉग पेज ला follow कराल हीच अपेक्षा!
      धन्यवाद

      Delete
  7. ब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.

    धन्यवाद

    ReplyDelete
  8. ब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.
    येणाऱ्या काळात असेच ब्लॉग वाचण्यासाठी ब्लॉग पेज ला follow कराल हीच अपेक्षा!
    धन्यवाद

    ReplyDelete
  9. खरंच विचार करण्यायोग्य मुद्दा आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांसारख्या खंबीर नेतृत्वाकडे या संस्थेची नेतृत्व देऊन मिलिंदविद्यापीठ कसे होईल यासाठी सर्व आंबेडकर अनुयायांनी जनरेटा वाढवून हे कसे मिलिंद विद्यापीठ होईल यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे

    ReplyDelete