Tuesday, June 30, 2020

रोमँटिक हिटलर




कट्टर धार्मिक, हिंसक, क्रूर अशी कायम ओळख आपल्या मनात निर्माण करणारा हिटलर अतिषय भित्रा, प्रेमळ, कवी मनाचा "रोमँटिक" होता असे म्हटले तर लोक आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत.




 पण हे खरे आहे की, तारुण्याच्या काळात हिटलर नेमका असाच होता. ऐन तारुण्यात तो स्टेफन नावाच्या तरुणीवर एकतर्फी प्रेम करायचा. हिंदी चित्रपटातील नायकाने आपल्या प्रेयसीच्या घराच्या भोवती चकरा माराव्यात तसा तो नेहमी तिच्या भोवती फिरायचा. 



1969 च्या "प्यार हि प्यार" चित्रपटात धर्मेंद्र जसा वैजयंतीमाला ला पाहून म्हणतो की, मै कहीं कवी ना बन जाऊ तेरे प्यार मे ए कविता, किंवा "बॉबी" चित्रपटात ऋषी कपूर डिंपल कापडियाला म्हणतो, मै शायर तो नहीं... अगदी तशीच अवस्था या हिटलरची स्टेफन ला बघून झाली होती. 



तो तिच्यावर एवढे प्रेम करायचा कि त्याने नंतर तिच्यावर कविताही केल्या. पण प्रेमळ असलेला हिटलर भित्राही होता. त्यांनी तिच्यावर लिहलेली एकही कविता तिच्यापर्यंत पोहचवली नाही. त्याचे प्रेम शेवटपर्यंत एकतर्फी राहिले. 


तो जितका प्रेमळ होता तितकाच तो विश्वासूही होता. पुढे ब्राऊन नावाच्या तरुणीशी त्याचे 10 वर्ष प्रेम संबंध राहिले. त्याने तिला लग्नाचे आश्वासनही दिले होते. पण तसा काही योग येतच नव्हता. जेव्हा त्याला असे कळले की, आपले आयुष्य आता संपणार आहे त्याच्या एक दिवस आगोदर त्याने ब्राऊनशी विवाह केला आणि तिला दिलेला शब्दही पाळला. 


1919 मध्ये केवळ 111 लोकांच्या समोर हिटलरने पहिले 30 मिनिटांचे भाषण केले आणि त्याला त्यांच्यातले नेतृत्वगुण समजले. अशा या हिटलरने जगाला मोठे हादरे दिले. हिटलर ची सुरुवातीची ओळख नंतरच्या काळात मात्र राहिली नाही. 

No comments:

Post a Comment