Thursday, March 14, 2019

आता हंगेरीत ‘जय भीम’




आता हंगेरीत ‘जय भीम’ 

डॉ. ह. नि. सोनकांबळे 


हंगेरी मध्ये ‘ जय भीम नेटवर्क’ या संस्थेची स्थापना केली. आणि या नेटवर्कच्या माध्यमातून ससोकाझा, ओझा आणि हेगीमेग या तिन गावामध्ये तीन शाळा सरु केल्या. या शाळेचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या शाळेला ‘डाॅ. आंबेडकर स्कुल’ असे नाव देण्यात आले आहे. ही भारतासाठी आणि भारतातील जनतेसाठी अभिमानाची बाब आहे.


युरोपात जावून जय भीम केला तरी आता तुमच्याकडे कोणी आश्चर्याने  पाहणार नाही किंवा असे म्हटल्याने भारतातील लोकांनाही नवल वाटायला नको. कारण गेली अनेक वर्षांपासून जय भीम चा नारा भारतात घुमु लागला असला तरी हा नारा आता जगभरात पोहचला आहे. एखादया व्यक्तीच्या नावाने केला जाणारा हा जगाच्या पाठीवरचा एकमेव जयघोष आहे. हा फक्त जयघोषच नाही तर करोडो लोकांचा स्वाभिमान आणि त्यांच्या जगण्याची प्रेरणा झाला आहे. हाच नारा आता युरोपातल्या हंगेरी या राज्यातही गेली दहा बारा वर्षांपासून घुमु लागला आहे त्या विषयी थोडेसे...

हेही वाचा: अमेरिका, भारतीय संविधान आणि स्त्रिया

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव भारताच्या खेडयात आणि वाडी तांडयापर्यंत पोहचले आहे, या मातीतल्या बौध्द अनुयायांची सकाळच जय भीम च्या जयघोषाने होते असे आपण म्हणत असलो तरी आता हे शब्द आपल्याला बदलावे लागणार आहेत. कारण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर फक्त भारताच्याच खेडयापाडयापर्यंत पोहचले असे नाही आणि केवळ भारतातल्याच लोकांची सकाळ जय भीम च्या जयघोषाने होते असे नाही तर अशीच सकाळ युरोपातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची देखिल होउ लागली आहे. आज 21 व्या शतकात युरोपातील अनेक आदिवासी जाती जमाती आणि निग्रोच्या शोषणमुक्तीच्या लढयाचे नेतृत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर उभे असल्याचे आपल्याला दिसून येते. दक्षिण आफ्रिकेतील विटवाटर्सरॅंन्ड या विद्यापीठात वर्णभेदाच्या लढयाचे जनक असलेले नेल्सन मंडेला आणि अस्पृष्यमुक्तीच्या लढयाचे प्रेरणास्थान असलेले डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषाची जयंती एकत्रीततपणे साजरी केली जाते. त्याचबरोबर दक्षिणआफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष थाबो एम्बोकी यांनी दक्षिण आफ्रिकेच्या संसदेत 2008 साली डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या देशाला कसे लागू पडतात याविषयी भाषणही केले होते. याचा अर्थ जगभरातील अनेक लोक डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी भारावलेले आपल्याला दिसतात. म्हणूनच जगभरातील अनेक शहरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठया थाटामाटात साजरी होत असते अशीच जयंती आणि धर्मांतराचा सोहळा युरोपातल्या हंगेरी या राज्यतही दरवर्षी साजरा होतो.



हंगेरी हे युरोपातलं छोटंसं राज्य, जेमतेम लोकसंख्या दहा कोटीच्या आसपास, 9 मोठी व 23 छोटी शहरे आणि बरीच खेडी या राज्यात आहेत. असे असले तरी जगातल्या प्रमुख तीस लोकप्रिय पर्यटन स्थळापैकी एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणूनही या राज्याची ओळख जगभरात आहे. दर वर्षी  9 लाख पर्यटक या देशाला भेट देतात. या देशाने 1989 ला संसदीय लोकशाहीचा स्विकार केला आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पेरणी इथे सुरु झाली असेच म्हणावे लागेल कारण जगाच्या पाठीवर जिथे जिथे संसदीय लोकशाहीचा विषय असतो तिथे तिथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव असतेच. इथेही अनेक पुस्तकांच्या माध्यमातून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पसरले आहेत. 

(इच्छुकांनी जगभरातील माहितीसाठी लेखकाचा खालील ग्रंथ नक्की वाचावा)

युरोपातल्या या हंगेरी राज्यात प्रामुख्याने रोमा आणि जिप्सी या दोन आदिवासी जमाती राहतात. या जमाती अनेक वर्षापासून काळे आणि गोरे या भेदभावाच्या कचाटयात सापडल्या आहेत. भारतात  जी अस्पृश्यांची परिस्थिती होती तशीच  परिस्थिती या जमातींची युरोपात आहे. सामाजिक आणि शैक्षणिक जीवनात यांनीही अस्पृष्यता भोगली आहे. शिक्षण घेत असताना यांनाही शाळेच्या एका वेगळया बाजूला जागा दिली जात असे. परंतु डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रेरणा घेवून हे राष्ट्र  आता परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करु लागले आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन व कार्याचा अभ्यास केल्यावर, त्यांची जगभरात प्रकाशित  होणारी पुस्तके वाचल्यावर रोमा आणि जिप्सी या दोन जमातीचे नेते दडॅक टिबाॅर आणि आॅरसाॅस याॅनाॅस यांना या आदिवासींच्या शोषणमुक्तीची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी शोषणमुक्तीच्या लढयाला सरुवात केली.
रोमा आणि जिप्सी या दोन आदिवासी जमातीचे नेते दडॅक आणि आॅरसाॅस याॅनाॅस यांनी 2005 आणि 2007 साली महाराष्ट्राला  भेट देवून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शोषणमुक्तीच्या चळवळीचा अभ्यास केला आणि ते भारावून गेले. जेंव्हा ते भारतातून हंगेरीला परत गेले तेंव्हा त्यांनी हंगेरी मध्ये ‘ जय भीम नेटवर्क’ या संस्थेची स्थापना केली. आणि या नेटवर्कच्या माध्यमातून ससोकाझा, ओझा आणि हेगीमेग या तिन गावामध्ये तीन शाळा सरु केल्या. या शाळेचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या शाळेला ‘डाॅ. आंबेडकर स्कुल’ असे नाव देण्यात आले आहे. ही भारतासाठी आणि भारतातील जनतेसाठी अभिमानाची बाब आहे. आज या शाळेमध्ये कसल्याच प्रकारचा भेदभाव नाही. शिक्षणाच्या प्रवाहापासून बाहेर फेकल्या गेलेल्या अनेक लहान मुलांना आज या शाळेत सन्मानाने शिक्षण दिले जात आहे. विषेश म्हणजे याशाळेत आज डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे धडे गिरवले जाउ लागले आहेत. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी या शाळेच्या भिंती रंगवल्या गेल्या आहेत. डाॅ. बाबासोहब आंबेडकरांचे आणि तथागत गौतम बुध्दांचेच सुविचार या शाळेच्या भिंतीवर लिहले गेले आहेत. लहान मुलांचे डोेके हे काही भांडे नाही ज्यमध्ये काहीही भरले जाउ शकते त्यांना खरी गरज विचाराच्या प्रकाशाची आहे असे दडॅक आणि आॅरसाॅस याॅनाॅस नेहमी सांगत असतात. बुध्द तत्वज्ञानाची शिकवण देउन समतेचा विचार इथे पेरला जाउ लागला आहे. याच प्रेरणेतून 11 आॅक्टोबर 2009 रोजी रोमाचे 1500 नेते एकत्र येवून त्यांनी बुडापेस्ट इथे एक मोर्चा काढून सर्वच क्षेत्रातील  भेदभाव मिटविण्याची मागणी केली. या मोर्चाची प्रेरणाच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर होते.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराचा लढाही या देशात पोहचला आहे. म्हणूनच बौध्द तत्वज्ञानाचे धडे या शाळेत गिरवले जाउ लागले आहेत. 14 आॅक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दिक्षा भूमीवर झालेल्या धर्मांतराचा 56 वा वर्धापन दिन हंगेरीमध्येही साजरा केला गेला. 12 आॅक्टोबर 2013 रोजी अल्सोझोल्का येथे हा सोहळा पार पडला.

‘जय भीम नेटवर्क’ हंगेरी च्या आज स्वतंत्र  वेबसाईट आहेत. www.dzsajbhim.hu, www.ambedkar.eu, www.jaibhim.hu  या संकेतस्थळावर गेल्यावर आपल्याला या नेटवर्कच्या कार्याची माहिती मिळते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे, लेख व या नेटवर्कच्या कार्याची माहिती आपल्याला पहावयास मिळते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने आणि कार्याने भारावलेले अनेक लोक या नेटवर्कशी जोडले गेले आहेत. या नेटवर्कच्या माध्यमातून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रकाश आज जगभरात पसरु लागला आहे. म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर केवळ भारतीय घटनेचे शिल्पकार, दलितांचे नेते एवढयापुरतेच मर्यादित राहिले नाहीत तर त्यांच्या विचारांनी आणि कर्तुत्वाने आज जगभरात झेप घेतली आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आणि कार्य जरी 20 व्या शतकातले असले तरी त्यांचे कार्य आज 21 व्या शतकातही सतत प्रेरणा देत आहेत. हीच प्रेरणा घेवून  जय भीम नेटवर्कचे अध्यक्ष आॅरसाॅस याॅनाॅस यांनी अम्नेस्टी इंटरनॅशनल च्या सदस्यत्वाची निवडणूक लढवली आणि ते निवडूणही आले. 


लेख आवडल्यास शेअर आणि कंमेंट करायला विसरु नका

11 comments:

  1. Replies
    1. ब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.
      येणाऱ्या काळात असेच ब्लॉग वाचण्यासाठी ब्लॉग पेज ला follow कराल हीच अपेक्षा!
      धन्यवाद

      Delete
  2. Replies
    1. ब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.
      येणाऱ्या काळात असेच ब्लॉग वाचण्यासाठी ब्लॉग पेज ला follow कराल हीच अपेक्षा!
      धन्यवाद

      Delete
  3. सोनकांबळे साहेब आपले लेख केवळ वाचनीयच नाही तर प्रबोधानात्मक आणि संशोधनात्मक असतात मी आपले लेख लक्षपूर्वक वाचत असतो ...( डॉ.दिनेश मोरे )

    ReplyDelete
    Replies
    1. ब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.
      येणाऱ्या काळात असेच ब्लॉग वाचण्यासाठी ब्लॉग पेज ला follow कराल हीच अपेक्षा!
      धन्यवाद

      Delete
  4. सूर्याचा प्रकाश पोहोचेल विशवामधये
    डॉक्टर आंबेडकराचे कार्य पोहोचेल कणा कणा मध्ये

    ReplyDelete
    Replies
    1. ब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.
      येणाऱ्या काळात असेच ब्लॉग वाचण्यासाठी ब्लॉग पेज ला follow कराल हीच अपेक्षा!
      धन्यवाद

      Delete
  5. वाह..... फारच नविन माहिती मिळाली.डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याच देशातील लोक अनुसरतात असे नसुन इतर अनेक देशांमध्ये त्यांना मार्गदर्शक,प्रेरणास्थान,अन्यायाचे मुक्तीदाते अशा विविध प्रेरणास्रोताचे जनक समजले जाते.त्यांचीच प्रेरणा घेऊन हंगेरी देशातील दोन नेते महाराष्ट्रात येऊन बाबासाहेबांचा अभ्यास करुन त्यांच्या गावांमध्ये बाबासाहेबांच्या नावाची शाळा काढुन अनु.जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे यापेक्षा मोठे पुण्य नाही, व बाबासाहेबांचे नावाची किर्ती सर्व जगात अशीच वाढत राहील व असे भविष्यात घडतच राहील. कारण तथागत बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग,तत्व जगाच्या कल्याणासाठीच आहे, हे निर्विवाद सत्य इतरांना सद्धा पटत आहे.....
    NAMOBUDDHAY... JAIBHIM....JAI SANVIDHAN.....🙏🌺🌿

    ReplyDelete
    Replies
    1. ब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.
      येणाऱ्या काळात असेच ब्लॉग वाचण्यासाठी ब्लॉग पेज ला follow कराल हीच अपेक्षा!
      धन्यवाद

      Delete
  6. ब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.
    येणाऱ्या काळात असेच ब्लॉग वाचण्यासाठी ब्लॉग पेज ला follow कराल हीच अपेक्षा!
    धन्यवाद

    ReplyDelete