मेक्सिकोच्या खासदाराचे संसदेत अर्धनग्न अवस्थेत भाषण
डॉ. ह. नि. सोनकांबळे
नुकतेच मेक्सिकोच्या संसदेने ऊर्जा खासगीकरण विधेयक संसदेत मांडले त्याला विरोध करताना डाव्या लोकशाही क्रांती पक्षाचे सदस्य अँटोनियो गार्सिया कोनेजॉ यांनी आपला निषेध व्यक्त केला. हा निषेध व्यक्त करताना त्यांनी आपल्या अंगावरचे सर्व कपडे काढून टाकले व सभागृहात केवळ अंडरवेअर वर उभे राहून आपले निषेधाचे भाषण केले.
असे खासगीकरण करणे म्हणजे "राष्ट्राची लूट" आहे असे त्यांनि आपल्या भाषणात आपली भावना व्यक्ती केली. सरकारच्या ताब्यात असलेली ऊर्जा साधने खासगी कंपन्यांच्या ताब्यात देऊन सरकार काय नफा मिळवणार आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
जन्म भूमी चे रक्षण करणे हे सरकारचे काम असते, पण त्याच जन्मभूमीची सरकार विक्री करू पाहत आहे. असा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.
भारतालाही अशाच परिस्थितीने ग्रासले आहे. अँटोनियो गार्सिया कोनेजॉ यांनी ज्या प्रकारे विवेचन केले आहे तीच परिस्थिती भारताची देखील झाली आहे. देश आणि देशातील जनता अशीच नागडी होत चालली आहे. पण लाज कोणालाच वाटत नाही. ज्यांच्या अंगावर कपडे आहेत त्यांना या नागड्यांची काळजी नाही आणि त्यांना असेही वाटत आहे की, आपले कपडे कोणीच काढू शकत नाही. पण एक गोस्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा देशच नागडा होतो तेव्हा काही लोकांच्या अंगावर कपडे असण्याला काहीच अर्थ असत नाही.
तेव्हा आपण देशाला नागडे होण्यापासून वाचवले पाहिजे म्हणजे आपल्या अंगावर थोडे फार कपडे शिल्लक राहतील. आज आपल्या देशातही प्रत्येक गोष्टीचे खासगीकरण होत आहे आणि देश एकप्रकारे नागडा होत आहे. परिणामी देशात गरिबी आणि बेरोजगारीचे सावट पसरत चालले आहे. असे होत राहिले तर येणार काळ या देशातील जनतेलाही नागडा केल्याशिवाय राहणार नाही.
आणि यापासून आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही कारण आपल्यासाठी भांडणारा एकही अँटोनियो गार्सिया कोनेजॉ आपल्या देशात नाही. हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.



वस्तुस्थितीला तंतोतंत लागू खूप सुंदर विश्लेषण सर💐💐💐
ReplyDeleteKhup chhan mandni keli sir
ReplyDelete