मुन्नाभाई चित्रपटात मुन्नाभाई रेडिओवरील म. गांधी यांच्यावर असलेल्या एका क्विझ मध्ये भाग घेतो. पण त्याला म. गांधी बद्दल काहीच माहित नसते. तो सर्किटला आपल्याला हे क्विझ जिंकण्यासाठी काय करता येईल असे विचारतो. मग काय सर्किट चार पाच प्राध्यापकांना किडनॅप करतो आणि तो मुन्नाभाईच्या वाॅर रुम मध्ये आणून ठेवतो. तो त्या प्राध्यापकांना काही आमिश देखिल दाखतो. एक उत्तर बरोबर आले की, एक वस्तू मिळेल असे तो सांगतो. त्यातला एक प्राध्यापक याला विरोध करतो. हे चुकीचं आहे असे सांगतो. पण त्याच कोणी ऐकत नाही. सर्किट त्यांला दोन ठेवून देतो आणि पाण्याच्या टाकीत त्याचे तोंड बुडवून शांत रहायला सांगतो.
तिकडून रेडिओवर जान्हवी काही प्रश्न विचारते आणि इकडे मुन्नाभाई या किडनॅप करुन आणलेल्या प्राध्यापकांच्या भरोशावर उत्तरे देत असतो. जान्हवी ला हा विद्यार्थी खूपच हुशार वाटतो. आणि जान्हवी अशा हुशार विद्यार्थ्याला आपल्या हृदयात संशोधनाची संधी देते. हा प्रकार तुम्हाला लाईव्ह बघायचा असेल तर लवकरच तुमची ही इच्छा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पूर्ण करणार आहे.
हा सर्व प्रकार बघून, ज्यांना हसू येईल त्यांनी बिनधास्त हसावं,
ज्यांना रडू येईल त्यांनी बिनधास्त रडावं,
ज्यांना काहीच वाटत नसेल तर यात आमचा दोष नाही, तुम्ही औरंगाबाद च्या कादरी हाॅस्पिटल मध्ये ट्रिटमेंट घेवू शकता.
पात्र समजून घ्या,
यातला मुन्नाभाई म्हणजेेे पेट परिक्षा देणारे विद्यार्थी आहेत.
यातला सर्किट म्हणजे सिनेट आणि व्यवस्थापन परिषद सदस्य आहेत. (काही मोजकेे)
यातले प्राध्यापक म्हणजे विद्यापीठात शिकवणारे मार्गदर्शक गाईड आहेत.
प्रश्न विचारणारी जान्हवी म्हणजे आपले कुलगुरु आणि त्याचा परिक्षा विभाग आहे.
काल एका मित्राचा फोन आला,
तो: अरे मी तुमच्या विद्यापीठाची पेट परिक्षा देतोय.
मी: अरे वा, छान, अभिनंदन.
तो. थॅंक्यु, पण एक प्राॅब्लेम आहे यार,
मीः हां बोल ना,
तोः ही परिक्षा आॅनलाईन आहे, मी तुझ्या घरी येवून देवू का? मला मदत कर थोडी.
मीः तुला तर माहीत आहे, मी निकम सरांचा विद्यार्थी आहे. आणि हो तुला मदत हवी असेल तर एक काम कर, आमच्या विद्यापीठाच्या काही सिनेट आणि व्यवस्थापन परिषद सदस्यांना हे काम सांग. सध्या तेच याचे काॅन्ट्रॅंक्ट घेत आहेत. असं मी ऐकलं आहे. (काही मोजके)
तोः यातल्या एखाद्याचा नं. मला दे ना.
मीः हे बघ मी अशा लोकांच्या संपर्कात राहत नाही. आणि ेज्यांच्या संपर्कात मी आहे. ते असे धंदे करत नाहीत.
तोः म्हणूनच तू आजपर्यंत पर्मनंट झाला नाहीस. तु जर आपल्या मित्रासाठी आणि जातीतल्या मानणसांसाठी एवढं करु शकत नाही तर मग तुझा विद्यापीठात राहून समाजाला काय उपयोग आहे.
मीः हे बघ, मी त्या विद्यापीठात काम करतो ज्या विद्यापीठाला जगातल्या सर्वात विव्दान व्यक्तीचे अर्थात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आहे.
तोः तु पण काहीही विचार करत बसतोच. अशानेच तर आपला समाज मागे राहिला आहे.
मीः तो कितीही मागे गेला तरी चालेल पण मी बाबासाहेबांच्या नावाला माझ्यामुळे कलंक लागेल असे कोणतेही वर्तन करणार नाही. या कामासाठी तु दुसरं कोणालाही शोध. पण मला आता फोन नको करु.
तोः ठीक आहे. ठेव.
पब्जी गेम मध्ये आपल्या पार्टनरला मदत मागावी तशी मदत सध्या पेट परिक्षा देणारे विद्यार्थी प्राध्यापकांना मागत आहेत. ही वेळ विद्यापीठावर आणि विद्यापीठातल्या प्राध्यापकावर का यावी? हाच खरा प्रश्न आहे. उठसुठ आम्ही डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि त्यांच्या नावाला जगभरात बदनाम करायचं. असं का केलं जात आहे? असा प्रकार महाराष्ट्रातल्या इतर विद्यापीठात का घडत नाही? याच विद्यापीठात असे का घडवून आणले जात आहे? काणती राजकीय शक्ती याच्या पाठीशी आहे? कोण आहे या सिनेट आणि व्यवस्थापन परिशदेच्या अशा सदस्यांचा नेता? शिक्षण क्षेत्रातली सर्वोच्च पदवी अशि मिळवली जावू शकते का? असे कितीतरी प्रश्न आहेत. पण ते विचारायचे कोणाला. विचारलेच तर याचे उत्तर मिळणार आहे का?
महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याच विद्यापीठात असे घडताना दिसत नाही. मग ज्या विद्यापीठाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विव्दान महापुरुषाचे नाव आहे त्याच विद्यापीठात असे का घडत आहे. हा खरा कळीचा प्रश्न आहे. याच्या पाठीमागे डाॅ. बाबासोहब आंबेडकरांच्या नावाला आणि लौकिकाला बदनाम करण्याचे तर षडयंत्र नाही ना? दिवसेंदिवस हे विद्यापीठ नॅशनल रॅंकिंगच्या दिशेने पावले टाकत आहे. अशातच हा नवा खेळ का खेळला जातोय? असा प्रश्न मराठवाडयातील त्या जनतेला पडतो आहे ज्या जनतेने 17 वर्ष संघर्ष करुन या विद्यापीठाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले आहे. त्यांच्यासारखेच विद्वान विद्यार्थी इथून घडावेत अशी अपेक्षा असताना या निच खेळाचा मास्टर माईंड कोण याची विचारणा केली जात आहे. कारण पीएच. डी. च्या पदवीची गुणवत्ताच आता इतक्या खालच्या स्तराला जाणार आहे की, उद्या या विद्यापीठातून, ही पदवी घेवून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्याला कोणीच मुलाखतीच्या रांगेत देखिल उभे करणार नाही. जे विद्यार्थी आतापर्यंत गुणवत्तेच्या आधारावर ही सन्मानाची पदवी घेवून बाहेर पडले आहेत त्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.
पण एक गोष्ट खरी आहे की, यातला मास्टर मांईंड आम्हाला शोधावा लागेल. जो डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे नावच जागतीक पटलावर बदनाम करायला निघाला आहे. शेवटी मुन्नभाई तर पास होणारच आहे आणि तो डाॅ. लावून आपल्या आई, बाप, सासू, सासरे, बायको आणि मुलांच्या समोर तर मिरवणारच आहे. पण यातल्या कोणाचीच जखम तो दुरुस्त करु शकणार नाही. कारण तो शेवटी डाॅ. मुन्नाभाई आहे.
पण प्रश्न एवढाच आहे की? विद्यीठाच्या कमानीवर असलेल्या विव्दान महापुरुषाच्या नावाचे काय?
डॉ. ह. नि. सोनकांबळे
ब्लॉग पेजला follow करायला विसरू नका.
टीप: लेखातील कोणताही मजकूर कोठेही कॉपी पेस्ट करू नये. शेअर करावासा वाटल्यास केवळ खलील लिंक कॉपी करून शेअर करावी.
https://drhanisonkamble.blogspot.com/2021/03/pet.html
Absolutely Right sir
ReplyDeleteमस्त चिरफाड 👌👌👌
ReplyDeleteछान सर,फारच मार्मिक आणि सडेतोड
ReplyDeleteआजचा हा गुंता फार घातक आहे.मनातली घालमेल तुमच्या शब्दात उतरली.कुणालाही विचार करायला लावेल.
ReplyDeleteवास्तव
ReplyDeleteIt's fact sir...
ReplyDeleteResearch should be quality but our Vice-Chancellor and the Senate do not want it. They are trying to tarnish the image of Dr. Babasaheb Ambedkar globally.
विद्यापीठातील जे जवाबदार अधिकारी व राजकारणी आहेत त्यांनी हा लेख वाचल्यास आग लागेल हे मात्र नक्की..
ReplyDeleteहनि वास्तव आहे.आंबेडकरीनिष्ठा असलेले सदस्य विद्यापीठात नाहित जे आहेत ते कोणत्यातरी राजकीय पक्षाचे काम करतात.
Delete