Monday, March 15, 2021

IPL चा बौद्ध धम्माशी पुन्हा खोडसाळपणा



IPL चा बौद्ध धम्माशी पुन्हा खोडसाळपणा 

डॉ. ह. नि. सोनकांबळे

IPL किंवा स्पोर्टस् टीव्ही यांना नेहमीच बौद्ध धर्मातील प्रतीकांचा वापर का करावा वाटतो. तोही चुकीच्या पद्धतीने. यावर्षीच्या जाहिरातीत देखील त्यांनी "लालच" अर्थातच "तृष्णा" चांगली आहे असे सांगितले आहे. बौद्ध धम्मात बुद्धाने तृष्णा हे दुःखाचे कारण आहे असे सांगितले आहे. पण तृष्णा ही गोष्ट स्पोर्ट्स टीव्हीने आयपीएलची जाहिरात करत असताना ती चांगली आहे असे सांगून बौद्ध धर्मातील मूल्यांनाच सरळ-सरळ चॅलेंज केले आहे. यापूर्वीही आयपीएल ची जाहिरात करत असताना बौद्ध धर्माच्या बाबतीत असाच खोडसाळ प्रकार घडला होता. जनतेच्या प्रचंड विरोधानंतर ती जाहिरात मागे घेण्यात आली होती यातही बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानाला खोडण्याचे काम या जाहिरातीत करण्यात आले आहे. 

गेली काही दिवसापासून महेंद्रसिंह धोनीचा (भिुक्षच्या) मार्शल आर्ट गुरू वेशातील फोटो व्हायरल होतो आहे. बौद्ध धर्माशी नाते सांगणाऱ्या अनेकांनी हा फोटो मिम्सच्या रुपात सोशल मिडीयावर शेअर केला आहे. त्यावर अनेक काॅमेंट केल्या गेल्या आहेत. 



महेंद्रसिंह धोनी ने बौद्ध धर्म स्विकारला आहे. 

शेवटी महेंद्रसिंह धोनीला बौद्ध व्हावे लागले. 

मानसाने कितीही कमावले तरी बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही. 

माणूस काय घेवून आला होता आणि काय घेवून जाणार 



असे विविध स्लोगन या फोटावर तयार करण्यात आले आहेत. कोणी कोणी तर यावर जय भीम असे संबोधून हो फोटो शेअर केला आहे. 

अनेक लोकांना या फोटोमागचे वास्तव कळालेले दिसत नाही. ते या फोटोला वास्तव समजून शेअर करत आहेत. परंतु शेअर करण्यापूर्वी या फाटोमागचे रहस्य जाणून घेणे आपले कर्तव्य आहे. अनेकांनी ते जाणून घेतले व फोटो डिलीट करण्याची विनंती आपल्या सोशल मिडीयावरील मित्रांनाही केली.

खरे तर सोशल मिडीयावरच्या कोणत्याही गोष्टीच्या खोलात जावून जाणून न घेता शेअर करणे धोक्याचे असते. परंतु आपण अनेक बाबींच्या खोलात जात नाही. आपल्या मित्राने शेअर केले आहे म्हणून आपणही शेअर करतो आणि ते व्हायरल होत जाते. 

महेंद्रसिंह धोनीच्या या फोटोच्या बाबतीतही तेच झाले आहे. अनेकांनी या फोटाच्या खोलात जावून वास्तव जाणून घेण्याची तसदी घेतल्याचे दिसत नाही. म्हणूनच हो फोटो सोशल मिडीयावरच्या बौद्ध आणि आंबेडकरी कार्यकर्त्याच्या ग्रुपवर जास्त व्हायरल होतो आहे. पण या फोटोमगाचे खरे वास्तव आपण जाणून घेतले पाहिजे. 

काय आहे या फोटो मागचे सत्य. 

9 एप्रिल पसून IPL 2021 सुरु होणार आहे. याचा प्रोमो स्टार स्पोर्टस या चॅनेल कडून रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमो मध्ये महेंद्रसिंह धोनी एका मार्शल आर्ट च्या गुरुच्या वेशात दिसतो आहे. तो आपल्या शिष्याला काहीतरी ज्ञान देतो आणि या माध्यमातून तो IPL ची जाहीरात करतो. 

ही जाहीरात सध्या सर्वच टीव्ही चॅनेल वर दाखवली जात आहे. परंतु बरेच जण ही एक जाहीरात आहे. हे समजून न घेताच धोनीला वेगवेगळया मिम्स च्या माध्यमातून शेअर करत आहेत. 

या पूर्वीही IPL ने एका सिझन ला अशाच बौद्ध भिख्खुच्या माध्यमातून प्रमोट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रश्न असा आहे की, आयपीएल किंवा स्पोर्टस टीव्ही यांना नेहमीच बौद्ध धर्मातील प्रतीकांचा वापर का करावा वाटतो. तोही चुकीच्या पद्धतीने. यातही बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानाला खोडण्याचे काम या जाहिरातीत करण्यात आले आहे. हे थांबविणे गरजेचे आहे परंतु आपण धोनीकडे त्याची वेशभूषा बघून आकर्षीत होत आहोत. कोणताही तत्वज्ञानात्मक विचार न करता ते पसरवत आहोत. हे पसरविणे तर आपण थांविले पाहिजेच. शिवाय ही जाहिरात देखील स्पोर्ट्स टीव्ही ने रद्द केली पाहिजे. 


पूर्ण जाहिरात बघण्यासाठी 👇इथे क्लिक करा. 

VIVO IPL 2021 / Dhoni/ Advt. Star Sports


टीप: लेखातील कोणताही मजकूर कोठेही कॉपी पेस्ट करू नये. शेअर करावासा वाटल्यास केवळ लिंक शेअर करावी. 


आपल्याला माझे लेख आवडत असल्यास उर उजव्या बाजूला असलेल्या Follow या बटनावर click करायला विसरू नका. 



1 comment:

  1. समझ समझ मे आयी साहब तो समझकर कोई शेयर नहीं करता, पर यहाँ समझनेवाला कोन है

    ReplyDelete