Thursday, March 4, 2021

व्हायोलिन : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अनोखा छंद


व्हायोलिन वाजवणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अनोखा छंद

डॉ.  ह. नि. सोनकांबळे 

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्याचा संपूर्ण वेळ वाचन, लेखन आणि भाषणे यात खर्ची केला आहे. त्यांचे नाव जगभरातील विद्वानांत प्रथम स्थानी घेतले जाते. असं म्हणतात की, विद्वान व्यक्तीला पुस्तकाशिवाय दुसरे काही छंद नसतात. 


पण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तीमत्व असे आहे की, त्यांच्या खोलात आपण जीतके जाउ तीतके नवीन काही तरी आपल्याला सापडत जाते. त्यांच्या छांदाचा विचार केला तर त्यातही ते कमी नव्हते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक छंद जोपासले होते. 


त्यापैकीच एक म्हणजे, त्यांना व्हायोलीन वाजविण्याचा छंद होता. नानकचंद रत्तू सांगतात की डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेले की त्यांना खूप आनंद व्हायचा आणि ते अशावेळी व्हायोलीन वाजवायचे. त्यांनी दिल्लीत असताना व्हायोलीन खरेदी केले होते.


1950 मध्ये संविधानाचे कामकाज पूर्ण झाल्यावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईला काही दिवसासासाठी आले हाते. तेव्हा त्यांचे ग्रंथपाल शा. शं. रेगे यांनी व्हायोलीन वादक साठे बंधू जे की, बळवंत साठे ज्यांना बाळ साठे म्हणूनही ओळखले जायचे त्यंाची व त्यांचे बंधू नाना साठे यांची ओळख करुन दिली. 



साठे बंधूंची सुरुवातीलाच डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी परिक्षा घेतली व व्हायोलीन वर वेगवेगळया प्राण्यांचे आवाज काढायला सांगीतले. त्यांनंतर त्या दोघांची व्हायोलीन शिकण्यास डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली. 


पुढे काही दिवसानंतर ते पुन्हा दिल्लीला गेले व कामात व्यस्त झाले. पण त्यांनी आपला छंद सोडला नाही. तिथेही त्यांनी आपला छंद जोपासण्यासाठी व व्हायोलीन शिकण्यासाठी श्री. मुखर्जी यांची मदत घेतली. पण आपला छंद सोडला नाही. 


डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे असेच अनेक छंद जाणून घ्यायचे असतील तर या ब्लाॅग पेज ला फाॅलो करायला व शेअर करायला विसरु नका.

आपल्याला माझे लेख आवडत असल्यास उर उजव्या बाजूला असलेल्या Follow या बटनावर click करायला विसरू नका. 

टीप: लेखातील कोणताही मजकूर कोठेही कॉपी पेस्ट करू नये. शेअर करावासा वाटल्यास केवळ लिंक शेअर करावी. 

No comments:

Post a Comment