डॉ. ह. नि. सोनकांबळे
गेली 75 वर्षात जगभरातील अनेक देशांनी शस्त्रास्त्रे निर्माण केली आणि युद्धासाठी तयारही झाले, पण ही सर्व शस्त्रास्त्रे आजच्या युद्धात निकामी ठरत आहेत. आम्ही माणसे मारण्याची शस्त्रास्त्रे उभी केली माणसे वाचवण्याची नाही. आज याच शस्त्रास्त्रांची गरज आहे. जो देश इथून पुढे माणसे वाचविण्याची शस्त्रास्त्रे आणि यंत्रणा उभी करेल तोच देश हे युद्ध जिंकेल.
गेली काही दिवसांपासून जग तिसरं महायुद्ध लढत आहे. हे महायुद्ध आहे कोरोना विरुद्ध जग. साधारण पाच वर्षापिर्वी चीन मध्ये एका शास्त्रज्ञाने अशी घोषणाच केली होती की तिसरे महायुद्ध हे शस्त्रास्त्रांचे नसेल तर व्हायरसचे असेल. सुरुवात अर्थातच तिथूनच झाली. चिननेच हा व्हायरस तयार केला असल्याचे सांगितले जात आहे. चीनच्या राष्ट्राध्यक्षबरोबर यावर चर्चा करून वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न जेव्हा UNO ने केला तेव्हा चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी साफ नकार दिला.
खरोखरच हा व्हायरस चीनने तयार केला असेल का?
चीनच्या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्याचा दावा
चीनच्या गुप्तचर यंत्रणेच्या एका अधिकाऱ्याने हा व्हायरस एका प्रयोगशाळेत तयार करण्यात आल्याचे सांगून मी त्याचा साक्षीदार आहे असे सांगितले. हा व्हायरस तयार करण्याच्या पाठीमागे चिनचा वेगळा उद्देश असल्याचेही सांगत असताना तो अधिकारी म्हणतो 'हा व्हायरस हॉंकाँग मध्ये सुरु असलेल्या चिनी सरकारच्या विरोधातल्या बंडाच्या आंदोलनात वापरला जाणारा होता.
दोन शास्त्रज्ञांचा दावा
शास्त्रज्ञ बोताओ शाओ आणि ली शाओ
या दोन शात्रज्ञांनी असा दावा केला आहे की, चायना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीनुसार, हुबेई प्रातांत वुहान सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (WHDC)ने या व्हायरसची निर्मिती केली असावी. काही दिवसांपूर्वी या प्रयोगशाळेत संसर्गजन्य रोग पसरवू शकतील अशा काही प्राणी ठेवण्यात आले होते. यात ६०५ वटवाघळे होती. यातील एका वटवाघळाने एका संशोधकावर हल्ला केला. त्यावेळी वटवाघळाचे रक्त त्या संशोधकाच्या शरिरात गेले असल्याचा दावा या शास्त्रज्ञांनी केला असल्याचे वृत्त 'डेली मेल'ने दिले आहे.
डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांनी या व्हायरसला सरळ चिनी व्हायरस असे म्हटले आणि चीनचा तिळपापड झाला. त्यांनी जगभरातील नेत्यांना असे आवाहन केले की या व्हायरस ला चिनी व्हायरस म्हटल्याने चीनची बदनामी होत आहे त्यामुळे या व्हायरस ला चिनी व्हायरस म्हणू नये.
एकूणच हे चित्र पाहता असे स्पष्ट होते की, हा व्हायरस चीनने मुद्दाम तयार केला आहे आणि या व्हायरसने जगाचे नुकसान केले आहे. जगाची अशा प्रकारची कोणती हानी होऊ नये म्हणून जागतिक स्तरावर 1920 पासून राष्ट्र संघ व पुढे दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघ यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. तिसरं महायुद्ध होणार नाही याची विशेष काळजी UNO ने आतापर्यंत घेतली होती. पण असे युद्ध होईल याची जाणीव UNO किंवा WHO ला नव्हती.
पुढे काय?
आज संपूर्ण जग हे युद्ध लढत आहे. जगाणे आजपर्यंत शस्त्रास्त्र निर्माण करून युद्धाची तयारी केली होती. कोण कोण कोणाच्या विरोधात लढेल हे निश्चित नव्हते पण तयारीत सर्व जण होते. पण या सर्वांना हि सर्व शस्त्रास्त्रे बाजूला ठेवावी लागली आहेत. त्याऐवजी माणसाला वाचविणारी शस्त्रे निर्माण करण्याचा संदेश या युद्धाने दिला आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतर जगाचे कोणतेही नुकसान होऊ नये, शांतता नांदावी याची काळजी घेण्यासाठीच जगाणे UNO ची स्थापना केली होती. पण आज अशी वेळ जगावर आली आहे की पुन्हा एकदा UNO ला या वेगळ्या युद्धपासून जगाला वाचविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. माणसे मारणारी शस्त्रास्त्रे गेली 75 वर्षात अनेक देशांनी तयार केली आहेत पण आज जगाला माणसे वाचविणारी शस्त्रास्त्रे निर्माण करण्याची वेळ आली आहे.
UNO, WHO आणि जगभरातील सर्वच देश याचा नक्की विचार करतील आणि UNO सारखीच एखादी संघटना स्थापन करून भविष्यातल्या अशा युद्धाला देखील रोखण्यासाठी सर्वच देश एकत्र येतील. जर येत नसतील तर अशा युद्धाला नेहमीच तोंड देत बसावे लागेल.
★लेखक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात अध्यापनाचे कार्य करतात.
★लेखक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात अध्यापनाचे कार्य करतात.
बरोबर आहे सर
ReplyDeleteNice sir
ReplyDeleteसुंदर विचार व वास्तविक सर्वसामान्य माणसांना कळविणे समजावणे गरजेचे आहे. डॉक्टर आपण थोडक्यात व छान मांडणी केली आहे
ReplyDelete