UNO : प्रोफेसर डूबाॅईस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातला पत्रव्यवहार
1950 साली डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृशयांची कैफियत संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क मंडळासमोर माडण्याचे ठरवले होते. या सबंधीचा वृत्तांत 27 में 1950 च्या जनता मध्येही आपल्याला सापडतो. परंतु याच्या आगोदरचा तपशील पाहिल्यावर याची तयारी संविधान निर्मितीपुर्वीच डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी केल्याचे आढळून येते, 1913 ते 1916 या काळात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात षिक्षण घेत होते. षिक्षण घेत असतानाच त्यांनी अमेरिकेच्या समाजरचनेचाही अभ्यास केला होता. भारतात ज्याप्रामाणे जातीभेद आहे तसाच काळा आणि गोरा हा वर्णभेद अमेरिकेत आहे याचा अभ्यास त्यांनी वयाच्या तेविस-चोविसाव्या वर्शीच केला होता. म्हणूनच ते आयुश्यभर या प्रष्नावर लढत राहीले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिकेतील वर्णभेदाच्या विरुद्ध चालू असलेल्या चळवळीचा अभ्यास भारतात आल्यावरही चालूच ठेवला होता. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर जेंव्हा संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली तेंव्हा अमेरिकेतील ‘नॅशनल असोसिएशन फाॅर द अडव्हान्समेंट आॅफ कलर पिपल’ या संघटनेने वर्णभेद संपविण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेची मदत घेण्याचे ठरवले होते आणि एक याचिका दाखल करण्याची तयारी केली होती.
ही बाब डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यासात आली तेंव्हा त्यांनीही भारतातील परिस्थिती पाहून अस्पृश्यतेचा प्रश्न याच पद्धतीने सोडविण्याचा विचार केला होता आणि त्यांनी अमेंरिकेतील वर्णभेदाच्या चळवळीत सक्रीय असलेले प्रा/यापक डूबाॅईस यांना पत्र पाठवून त्यांनी तयार केलेल्या याचिकेची एक प्रत मागविली होती.
या पत्रात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,
प्रिय प्रोफेसर डूबाॅईस,
मी तुम्हाला प्रत्यक्षात व्यक्तीषः कधी भेटलो नाही, तरीही मी पिढीत लोकांना मुक्त करण्याासाठीच्या चळवळीत कार्यरत असल्याने मी तुम्हाला नावानिषी ओळखतो. तुम्ही कदाचित माझे नाव ऐकलेही असेल मी अस्पृश्य वर्गातील आहे. मी निग्रोच्या समस्यांचा अभ्यासक आहे आणि तुमचे संपुर्ण लेखन वाचले आहे, भारतातील अस्पृष्यांची स्थिती व अमेरिकेतील निग्रोची स्थिती यात फार साम्य आहे. अमेरिकेतील निग्रोनचा अभ्यास करणे फक्त सहाजीकच नाही तर गरजेचे देखिल आहे.
अमेरिकेतील निग्रोंनी संयुक्त राष्ट्र संघटनेकडे (युनोत) दाखल केलेली याचीका वाचण्यास मी फार उत्सुक होतो. भारतातील अस्पृष्य सुद्धा अशी याचिका दाखल करण्याच्या विचारात आहेत. आपण नैतीक होवून माझ्यासाठी या याचिकेचे लिखित दोन-तीन नमुने मिळवावेत व माझ्या पत्यावर पाठवावेत. या संदर्भात तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल मी माझी कृतज्ञता शब्दात व्यक्त करु शकत नाही.
डॉ. बी. आर. आंबेडकर
या प्रत्राला डूबाॅईस यांनी 31 जुलै 1946 रोजी उत्तर पाठविले आहे. या उत्तरात डूबाॅईस म्हणतात.
माझे प्रिय मि. आंबेडकर,
माझ्याकडे तुमचे अमेरिकेचे निग्रो आणि भारतातील अस्पृश यांच्या स्थिती संदर्भातील संयुक्त राष्ट्र संघटनेसाठीचे पत्र आले आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे अमेरिकन निग्रोंचे लहान संघटन, अमेरिकन निग्रो काॅेग्रेसने या आधिच मांडलेले वास्तव व स्पष्टीकरण जे की मी या पत्रासोबत देत आहे. तरी सुद्धा मला वाटते शेवटी जो अहवाल अधिक सुलिखित समावेशक वास्तव घडामोडी बद्दल ‘नॅशनल असोसिएशन फाॅर दि अॅडव्हांसमेंट आॅफ कलर्स पिपल’ कडून संयुक्त राष्ट्रसंघात काळजीपुर्वक ठेवला जाईल. जर असे केले तर तुम्हाला त्याची एक प्रत पाठविण्यास आनंद होईल.
मी वारंवार तुमचे नाव व सेवा कार्याबद्दल ऐकतो आहे. भारताच्या अस्पृश्याबद्दल सहानुभूती व्यक्त करतो आणि भविष्यात शक्य असेल तेवढी मदत करु शकतो.
डू बाॅईस
(ही दोन्ही पत्रे इंग्रजी भाषेतील आहेत त्याचा मराठी अनुवाद करण्यात आलेलेा आहे.)
डाॅ. ह. नि. सोनकांबळे
टीप: लेखातील कोणताही मजकूर कोठेही कॉपी पेस्ट करू नये. शेअर करावासा वाटल्यास केवळ लिंक शेअर करावी.
आपल्याला माझे लेख आवडत असल्यास उर उजव्या बाजूला असलेल्या Follow या बटनावर click करायला विसरू नका.