अॅड. बाळासाहेब आंबेडकर : वंचितांचा मसिहा
डॉ. ह. नि. सोनकांबळे
प्रवाहाबाहेर फेकल्या गेलेल्या समूहाला अर्थातच बहिष्कृतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
असे ठणकावून सांगितले. लोक जागृत झाले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गावर जाऊन सत्तेतही यायला लागले. पण बाबासाहेब गेल्यानंतर त्यांना कोणीही "तुम्ही सत्तेत येऊ शकता" हे सांगितलं नाही. पण आज पुन्हा एकदा त्यांचा नातू वंचितांचा मासिह होऊन या समूहाला याची जाणीव करून देतो आहे आणि सत्तेतही बसवतो आहे.
अॅड. बाळासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला अकोला आणि किनवट पॅटर्न तसा महाराष्ट्राच्या सामाजिक अभियांत्रीकिचा चर्चेचा विषय. तो इतर पक्षात फक्त चर्चीला गेला परंतु कोणताही पक्ष तो निर्माण करु शकला नाही. कारण इतर सर्वच पक्षाला घराणेशाहीने घेरले आहे. त्यातून मूक्त होवून असा एखादा पॅटर्न भविष्यात एखादा पक्ष निर्माण करु शकेल ही बाब तशी विचारात न घेतलेलीच बरी. लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, अभिव्यक्ती धोक्यात आहे अशा बऱ्याच वलगना सर्वच राजकीय पक्ष करत असले तरी ठाम भूमिका आणि कृतीकार्यक्रम राबविण्यात राष्ट्रीय पक्षदेखिल कमी पडत आहेत. याचे कारणच हे आहे की, जो तो ज्याचा त्याचा गड शाबूत ठेवण्यासाठी तडजोडी करत आहे. गेली पन्नास वर्ष जे सत्तेत आहेत, एकाच मतदारसंघावर आपला कब्जा करुन बसलेले आहेत ते लोकशाही, संविधानाच्या संरक्षणासाठी पुढे येत नाहीत आणि येणारही नाहीत. मात्र चळवळीतल्या लोकांनी पुढे यावे आणि याचे संरक्षण करावे आणि त्यांनी एकदा संरक्षण केले की, आम्ही आहोतच राज्य करायला अशी भावना या लोकांची होवून बसली आहे. रस्त्यावरच्या लोकांनी रस्त्यावरच्या लढाया लढत राहायचं आणि आम्ही सत्तेत राहून आमचा गड, किल्ले आणि संपत्ती दुप्पट करुन घ्यायची एवढाच एक कार्यक्रम जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी राबविला आहे.
परंतु एखादा कार्यकर्ता खूप गरीब आहे. जो वर्षानुवर्ष पक्षाला आपला पूर्णवेळ देत आला आहे त्याला कुठेतरी पुढे आणले पाहिजे याचा अजेंडा कोणत्याही पक्षाकडे नाही. महाराष्ट्रात, चव्हाण, देशमुख, पाटील हे घराने अशी कोही मोजकी घराने राजकारणात 1950 पासून आजपर्यंत सक्रिय राहिले.
गोपीनाथ मुंडे गेले, पंकजाताई, प्रितम मुंडे पुढे आल्या, विलासाराव गेले, अमित, धिरच देशमुख पुढे आले, छगन भूजबळांनी समिर भूजबळांना पुढे आणले, शिवाजीराव निलंगेकरांनी तर 1960 पासून 2019 पर्यंत आपला मतदारसंघ घराबाहेर जावूच दिला नाही. पवार कुटंुबांनी राहित पवरांपर्यंत वारसा आणला, पदमसिंह पाटील, एकनाथ खडसे, एकनाथ गायकवाड, सुशिलकुमार शिंदे, अंकुशराव टापे, बाळासाहेब ठाकरे, सुनिल दत्त, प्रमोद महाजन, रावसाहेब दानवे, नारायण राणे अशा दिडशेहून अधिक लोकांनी आपले वारसदार राजकारणात आणले आणि त्यांना व्यवस्थित महाराष्ट्राच्या राजकारणात आणि काहींनीतर केंद्रातही व्यवस्थीत शटल केले.
अशी अनेक उदाहरणे महाराष्ट्राच्या जिल्हया-जिल्हयात आपल्याला सापडतात. पण कार्यकर्त्याचा पोरगा बापासारखाच कार्यकर्ता म्हणून राहून मेला. त्याचा विचार त्याच्या साहेबांनी कधीच केला नाही.
पण गेली दोन दशकापासून मला जसे थोडे-थोडे राजकारण कळू लागले तेव्हापासून व त्याच्यापूर्वीच्या काही वर्षाचा अभ्यास केल्यास एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, सामान्या कार्यकर्त्याचा विचार करणारा आणि तु देखिल देशाच्या सत्तेत येवू शकतो आणि तुही चांगला राज्यकारभार करु शकतो असे ठामपणे सांगणार आणि
कोणी बांगडया विकत होतं, कोणाची चहाची टपरी होती, कोणी मजुरी करत होतं तर कोण स्वच्छतेची कामे करत हातं अशा लोकांना अॅड. बाळासाहेब आंबेडकरांनी जागृत केलं आणि त्यांच्या हातात सत्तेच्या चाव्या दिल्या.
नुकत्याच लोकसभेच्या, विधानसभेच्या आणि ग्रामपंचायतीच्याही निवडणूका पार पडल्या या सर्वच निवडणूकांत त्यांनी अशा लोकांना उमेदवाऱ्या दिल्या ज्यांनी कधीच स्वप्नातही राजकारण हा शब्द पाहिला नसेल.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत तर चक्क तृतीय पंथी उमेदवार उभे केले आणि त्यांना निवडूणही आणले. खरे तर देशात तृतीय पंथीयांची मतदार नोंदणी केवळ 29 हजाराच्या आसपास आहे. स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष होत आले तरी यांच्या सामाजिक हक्काचा विचार कोणी केला नाही. त्यांच्या राजकीय हक्काचा विचार तर खूप दूरची गोष्ट आहे. अॅड. बाळासाहेब आंबेडकरांनी अशा तृतीयपंथीयांना देखिल पक्षाचे प्रवक्तेपद दिले आणि काहींना तर तिकिटे देवून निवडूणही आणले.
खऱ्या अर्थाने शाहू महाराजांना हवी असलेली सामाजिक लोकशाही आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांना अपेक्षीत असलेले कल्याणकारी राज्य ही संकल्पना घेवून राजकारण करणारा हा माणूस स्वच्छ चारित्र्याचा एखादा वारकरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा जेव्हा व्यक्त करतो तेव्हा संत तुकामराम महाराजांच्या काही ओळी आठवायला लागतात. ‘बुडती हे जन, न देखवे या डोळा, येत असे कळवळा म्हणूनीया.’
ही तळमळ घेवून महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांनी काम केले तर ना संविधान धोक्यात असेल ना लोकशाही. पण असे केले तर आपल्याला आपला गड सोडावा लागतो. जे सोडणे कोणालाही शक्य नाही. आपला गड शाबूत ठेवून या लोकांनी पुन्हा एकदा आपली संस्थाने उभी केली आहेत. जी संस्थाने पं. नेहरु, सरदार पटेल, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात विलीन करुन घेतली होती. त्याच संस्थानाचा दुसरा प्रकार सऱ्या देशभरात सुरु झाला असून आपापली संस्थाने शाबूत ठेवण्यासाठी जो तो आपापल्या स्तरावर तडजोडी करत आहे.
अशाच अनेक भानगडीत गंुतलेल्या कोणत्याही पक्षाकडे सामान्य माणूस, सामान्य कार्यकर्ता यांच्या कल्याणाचा कार्यक्रम नाही. पण गेली 75 वर्षापासून जे वंचित राहिले त्यांना कुठे तरी संधी दिली पाहिजे या आपेक्षेणे अॅड. बाळासाहेब आंबेडकरांनी या वंचितांसाठी वेगळाच कार्यक्रम राबवल्याचे दिसते आहे. अकोला, किनवट पॅटर्न इथपर्यंत तर आपल्याला माहितच आहे. पण तृतीय पंथीयांचा देखिल एक निराळाच पॅटर्न त्यांनी समोर आणला आहे. आपल्या बापजादयापासून राष्ट्रीय पक्षाचा कार्यर्ता असलेल्या तरुणांनी याचा विचार करायला हवा की, तृतीय पंथी देखिल सत्तेत येवू लागले आहेत आणि आपण मात्र घोषणा देण्यात आणि सतरंज्या उचलण्यात आपल्या पिढया बर्बाद करतो आहोत. कुठेतरी आपण सरंज्या उचलून झाल्यावर थोडा वेळ काढून या वंचितांचा पॅटर्न देखिल समजून घेतला पाहिजे. एवढीच आपेक्षा.
नाही तर, पक्ष राष्ट्रीय अन कार्यकर्ता वंचितच. अशी गत होऊन जाईल.
आज ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना सम्यक शुभेच्छा!
डॉ. ह. नि. सोनकांबळे
हेही वाचा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मांडणार होते UNO मध्ये अस्पृश्यतेचा प्रश्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा जाहीरनामा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि LIC चे राष्ट्रीयकरण
टीप: लेखातील कोणताही मजकूर कोठेही कॉपी पेस्ट करू नये. शेअर करावासा वाटल्यास केवळ लिंक शेअर करावी.
आपल्याला माझे लेख आवडत असल्यास, अथवा नवनवीन लेख वाचायला आवडत असतील तर, वर उजव्या बाजूला असलेल्या Follow या बटनावर click करायला विसरू नका.
सर
ReplyDeleteजय भिम
खूपच छान .💐
तुमच्या पुढील लेखास शुभेच्छा....💐
ब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.
Deleteयेणाऱ्या काळात असेच ब्लॉग वाचण्यासाठी ब्लॉग पेज ला follow कराल हीच अपेक्षा!
धन्यवाद
अप्रतिम सर पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा
ReplyDeleteब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.
Deleteयेणाऱ्या काळात असेच ब्लॉग वाचण्यासाठी ब्लॉग पेज ला follow कराल हीच अपेक्षा!
धन्यवाद
जयभीम.खुप छान सर.
ReplyDeleteब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.
Deleteयेणाऱ्या काळात असेच ब्लॉग वाचण्यासाठी ब्लॉग पेज ला follow कराल हीच अपेक्षा!
धन्यवाद
Sir भारी लेख आहे
ReplyDeleteब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.
Deleteयेणाऱ्या काळात असेच ब्लॉग वाचण्यासाठी ब्लॉग पेज ला follow कराल हीच अपेक्षा!
धन्यवाद