Saturday, April 3, 2021

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रकाशन समिती वादात - ज. वि. पवरांचा आक्षेप



डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रकाशन समिती वादात - ज. वि. पवरांचा आक्षेप 

नुकतीच 30 मार्च रोजी महाराष्ट्र शासनाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती पुनर्गठीत केली असून त्या समितीवर सध्या आक्षेपांचा पाउस पडत आहे. आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ विचारवंत व लेखक ज. वि. पवार यांनी थेट उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. 



या समतिचे सचिव पद योग्य व्यक्तीला मिळणे अपेक्षीत होते परंतु साहित्य किंवा वैचारिक क्षेत्रात कसलेच योगदान नसलेले डाॅ. कृष्णा कांबळे यांना देण्यात आले आहे. मी साहित्य, लेखन व चळवळीत दिर्घ काळ काम केले असून हे कृष्णा कांबळे कोण आहेत असा सवाल त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्याला केला आहे. 

शिवाय समितीत अशी काही नावे आहेत ज्यांची नावे मी प्रथमतः ऐकत आहे असेही ज. वि. पवार यांनी म्हटले आहे. त्यांचे आंबेडकरी चळवळ, साहित्य वा त्यांच्या चरित्राच्या अनुषंगाने काही विशेष योगदान असल्यास त्याची मला कल्पना नाही. पण आपण निवडल असल्याने आपल्याला त्याची माहिती असेलच, असल्यास ती मला देण्यात यावी असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.




शिवाय समितीच्या महत्वाच्या पदावर नियुक्त  करण्यात आलेली व्यक्ती डाॅ. कृष्णा कांबळे कोण आहेत? असा प्रश्न उपस्थित करुन त्यांच्या साहित्याबददल कोणाला काही माहिती असल्यास ती आपल्याला द्यावी असे अवाहनही पवार यांनी आपल्या पत्रात केले आहे. 

समितीतील सर्व सदस्यांपेकी आपण जेष्ठ सदस्य असताना देखील केवळ सदस्य म्हणून आपली निवड झाली आहे यावर पवार यांनी नाराजी व्यक्त करुन साहित्याच्या क्षेत्रात कसलेही योगदान नसलेल्या व्यक्तीसोबत आपल्याला काम करण्यास कोणताही रस नाही, जर आपल्याला सचिवपद दिले व समितीचे पुन्हा एकदा पुनर्गठण केले तरच आपण या समितीत काम करु असेही ज. वि. पवार यांनी म्हटले आहे. 

मागील अनेक वर्षापासून समितीचे कामकाज बंद असल्याने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित होत नाही. त्यामूळे आता समितीचे गठण झाले आहे. आता तरी बाबासाहेबांचे साहित्य वाचायला मिळेल या आपेक्षेने वाट बघणाऱ्या लोकांचा पुन्हा एकदा आपेक्षाभंग झाला आहे. 

यापूर्वी समितीच्या सचिव पदावर मा. वसंत मून, मा. दत्ता भगत, मा. अविनाश डोळस अशा अभ्यासू आणि तज्ञ व्यक्तीची निवड झाली होती. या समितीत मात्र सचिव तर सोडाच अनेक सदस्य हे आंबेडकरी चळवळीत, साहित्यात व वैचारिक क्षेत्रात कसल्याही प्रकारचे योगदान नसलेले लोक निवडण्यात आले आहेत. त्यामूळे ही समिती केवळ नावापूरतीच असल्याचे दिसते आहे. आंबेडकरी चळवळीतील लोकांनी या समितीच्या पुर्नगठणाची मागणी लावून धरली तरच भविष्यात चांगले साहित्य प्रकाशित होईल अन्यथा ही समिती केवळ नावापूरतीच राहील.


विनंती : 

आपल्याला माझे लेख / ब्लॉग आवडत असल्यास वर उजव्या बाजूला असलेल्या Follow या बटनावर click करायला विसरू नका. 

टीप: लेखातील कोणताही मजकूर कोठेही कॉपी पेस्ट करू नये. शेअर करावासा वाटल्यास केवळ लिंक शेअर करावी. 

4 comments:

  1. नावे बदलली पाहिजेत.

    ReplyDelete
  2. ज . वि पवार सरांची सुचना अगदी योग्य आहे .

    ReplyDelete
  3. ब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.
    येणाऱ्या काळात असेच ब्लॉग वाचण्यासाठी ब्लॉग पेज ला follow कराल हीच अपेक्षा!
    धन्यवाद

    ReplyDelete