Thursday, April 29, 2021

रोबोट आता निवडणूक लढवणार ?




 रोबोट पाॅलीटीशन अॅन्ड अॅक्टिव्हीस्ट

डॉ. ह. नि. सोनकांबळे

 

रोबोट ला जात, धर्म आणि कोणत्याही भावना नसातात त्यामूळे, जातीच्या, धर्माच्या आणि भावनेच्या राजकारणाला आळा बसेल असे ‘रोबोट पाॅलीटीशन’ या संकल्पनेच्या अभ्यासकांना वाटते. पण कोणत्याही रोबोट मध्ये आगोदर प्रोग्राम फिक्स करावा लागतो. तो करत असतानाच भारतात त्याच्या डोक्यात जात आणि धर्म नावाचा ‘प्रोग्राम फिक्स केला तर .....!



गेल्या अनेक दशकापासून जगभरातील राजकारणात नव-नव्या संकल्पना अभ्यासाला आल्या आहेत. यातच भर म्हणून रोबोट पाॅलीटीशन अॅन्ड अॅक्टिव्हीस्ट नावाची सकल्पना इथून पुढे राज्यशास्त्राच्या विद्याथ्र्यांना शिकवावी लागणार आहे. कारण अनेक देशाच्या राजकाणात अशा प्रकारच्या अॅक्टिव्हिस्टची आवश्यकता जाणवू लागली आहे.



इंग्लंडमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार तेथील दोन तृतीयांश नगारीकांना असे वाटते की, येणाऱ्या विस वर्षात रोबोट संसदेत काम करतील तर 16 टक्के नागरीकांना हा बदल एक ते दोन वर्षातच दिसेल असे वाटत आहे. महत्वाचे म्हणजे या सर्वोत भाग घेतलेल्या चार पैकी एका नागरीकाला असे वाटते की, हे रोबाट त्यांच्या निवडूण दिलेल्या प्रतिनिधींपेक्षाही चांगले काम करतील. तर 16 टक्के नागरीकांना असे वाटते की, हे रोबोट कमी चूका करतील आणि चांगले निर्णय घेतील. 



हे सर्व झाले जागासाठी पण भारतात जर असे रोबाट आले तर.....? तूर्तास भारतात रोबोट पोलिटीशन्स ची आवश्यकता नसली तरी रोबोट ऍक्टिव्हिस्ट ची मात्र आवश्यकता जाणवेल आणि त्याच्याही डोक्यात जात, धर्म याला अनुसरुनच प्रोगाम फिक्स केला जाईल. यात तिळमात्र शंका नाही आणि याला रोबोट स्वतःहून विरोधही करु शकणार नाही. कारण ‘रोबोट’ हा त्याचे जास्तीचे डोके चालवत नाही. त्याच्यामध्ये जेवढा प्रोग्राम फिक्स केला जातो तेवढयाच कृती तो करत असतो. राजकारणात सध्या अशाच कार्यकर्यांची आवश्यकता भासत आहे. जो जास्तीचे डोके न वापरता आपल्या पक्षाच्या कार्यक्रमावर फोकस करेल. काय चूक? काय बरोबर? याची चर्चा त्याने कुठेही करु नये, जेवढे पक्षाने आदेश दिले आहेत तेवढेच काम करायवे. हीच आपेक्षा सर्वच पक्षश्रेष्ठींची असते. त्या दृष्टीकोणतून कार्यकत्र्यांची निवड सर्वच पक्षात केली जात आहे. 

तसं पाहिलं तर रोबोट पाॅलीटीशन अॅन्ड अॅक्टिव्हीस्ट  या तंत्रज्ञानाची कल्पना भारतातच पहिल्यादा ‘कल्पिली गेली’ असे म्हणावयास हरकत नाही. म्हणूनच काही दिवसापूर्वी एक मोठे राजकीय पुढारी असे म्हणाले होते की, ‘राजकारणात येताना आपला जास्तीचा मेंदू घरीच ठेवून यावा, त्याची राजकारणात काहीच आवश्यकता नसते.’ याचा अर्थ, कार्यकर्ता हा ‘रोबाट’ सारखा असावा असाच होतो. जो की पक्षश्रेष्ठीच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करेल. आपल्या पक्षाने घेतलेला कोणताही निर्णय बरोबर आहे की चुकीचा आहे? याचा त्यानी अजिबात विचार करु नये. पक्षाने जर त्याच्या मेमरी मध्ये एखादा निर्णय ‘बरोबर’ आहे किंवा ‘चूक’ आहे असे फिक्स केले तर, त्या निर्णयात कोणाच्याच सांगण्याहून किंवा पटवून देण्याहून त्याने बदल करु नये.

महत्वाचे म्हणजे अशा कार्यकत्र्यांला कोणत्याही भावना असणार नाहीत. याचेही परिक्षण पक्ष स्तरावर घेतले जाते. तुम्ही रजणीकांतचा ‘रोबोट’ हा चित्रपट बघितला असेल त्यात तो त्या रोबोट मघ्ये प्रचंड मेमरी आणि उर्जा भरतो पण त्यात कोणत्याही ‘संवेदना’ तो भरत नाही. त्यामूळे त्याच्यात जेवढा प्रोग्राम फिक्स करतो तेवढयाच गोष्टीवर तो काम करतो. अगदी अशाच प्रकारचे कार्यकर्ते राजकारणात घडविण्याचे काम केले जात आहे. याच संकल्पनेकडे आता ‘रोबोट पाॅलीटीकल अॅक्टिव्हीस्ट’ म्हणून बघितले जात आहे. महत्वाचे म्हणजे अशा कार्यकत्र्याकडे देशाचे नागरिकत्व आणि मतदारनाचा अधिकार असणार आहे. 

  अशा प्रकारचा रोबोट हाॅगकाॅंग च्या ‘हॅन्सन रोबोटीक्स’ या कंपनीने बनवला आहे ज्याचे नाव ‘सोफिया’ आहे. हा रोबोट नागरीकत्व मिळवणारा पहिला रोबोट ठरला आहे. 2017 मध्ये सौदी अरेबियाने या ‘हयुमनाॅइड रोबोट’ला  नागरीकत्व देवून त्यांच्या देशातल्या महिलांपेक्षाही अधिकचे अधिकार दिले आहेत. जिथे नागरीकत्वाची गोष्ट येते तिथे मतदानाच्या अधिकाराची देखिल गोष्ट येते. हा रोबोट एखाद्या पक्षाचा प्रचार देखिल करु शकतो. हा रोबोट लोकांना आकर्षीत करण्यासाठी, त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आपल्या चेह$याचे हावभाव देखिल बदलू शकतो. त्याच्याम/ये अशा प्रकारचे प्रोग्राम फिक्स करण्यात आलेले आहेत. एखाद्या पक्षाचा प्रचार, सभेचे नियोजन, भाषण, भाषणाचे लिखान आणि आवश्यकता वाटल्यास मारामारी आणि दंगली घडवणे अशा अनेक कामात हा रोबोट मदत करु शकतो. अशा प्रकाचे सर्व प्रोगाम यात फिक्स केले जावू शकतात. 

येणाऱ्या काळात अशा रोबोटची आवश्यकता अनेक पक्षांना लागणार आहे. त्यामूळे याची मागणी सर्वत्र वाढणार आहे. असे ‘रोबोट कार्यकर्ते’ जर पक्षाला मिळाले तर येणाऱ्या  काळात राजकारणातल्या चांगल्या आणि वाईट गोष्टीची चर्चा मात्र थांबणाार आहे. महत्वाचे म्हणजे याचा अनुभव गेल्या काही वर्षापासून भारताच्या राजकारकडे बघितल्यावर येवू लागला आहे. भारतात असे अनेक ‘रोबोट पाॅलीटीकल अॅक्टिव्हीस्ट’ सर्वत्र पहायला मिळत आहेत. जे की, गॅस चे भाव वाढले, पॅट्रोलचे भाव वाढले, महागाई वाढली तरी हे सर्व योग्य आहे असेच म्हणतात कारण त्यांच्यात पक्षाकडून तसा ‘प्रोग्राम फिक्स’ केलेला आहे. त्यामूळे ते त्यांचे उत्तर त्यांच्या मनाने बदलू शकत नाहीत कारण ते विचार करु शकत नाहीत किंवा ते ‘संवेदन’शून्य असल्याने त्यांच्या भावना देखिल व्यक्त करु शकत नाही. 

सौदी अरेबियाने जरी 2017 मध्ये अशा प्रकारच्या रोबोट ला नागरिकत्व दिले असले तरी यापूर्वीच भारताने अशा ‘रोबोट पाॅलीटीकल अॅक्टिव्हीस्ट’ चा अनुभव घेतलेला आहे आणि सध्याही घेत आहे. फक्त त्याचे मराठी व हिंदीतले नाव ‘भक्त’ असे ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. 

पण एक गोष्ट  मात्र नक्की आहे की, येणाऱ्या काळात अशा भक्तांची जागा रोबोट घेतील आणि भारताच्याही राजकारणात  ‘रोबोट पाॅलीटीकल अॅक्टिव्हिस्ट’ ही संकल्पना उदयास येईल. तोपर्यंत आपल्या आजूबाजूला असलेले अनेक पक्षाच्या व नेत्यांच्या भक्तांकडे लक्षपर्वक बघा ते ‘रोबोट पाॅलीटीकल अॅक्टिव्हिस्ट’ सारखेच वाटतील.


ब्लॉग ला Follow करायला विसरू नका. 

हेही वाचा; 

रिझर्व्ह बँक, लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर


....हे मुख्यमंत्री लिहणार होते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र


ग्रॅज्युएट खिचडी आणि निर्लज्ज व्यवस्था

कृपया लेख कॉपी पेस्ट करू नये. 

1 comment:

  1. छान आणि महत्वाचे विश्लेषण केले आहे सर

    ReplyDelete