छत्रपतींच्या राज्याभिषेकात दडलंय काय?
डाॅ. ह. नि. सोनकांबळे
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी शुद्र पूर्वी कोण होते? या ग्रंथाचा शेवटचा भाग, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर लिहला तर हा ग्रंथ त्यांनी महात्मा फुले यांना अर्पण केला आणि या देशातील बहुजनांना ऐक्याचे सुत्र दिले. पण हे सूत्र आजच्या राजकीय पार्श्वभूमीवर आम्ही समजून घेणार आहोत का?
हू अॅम आय? हा प्रश्न जेव्हा आम्ही स्वतःला विचारतो तेंव्हा अडीच हजार वर्षापुर्वीचा इतिहास आम्हाला आठवायला लागतो जो इतिहास डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शुद्र पुर्वी कोण होते? या प्रचंड संशोधन करुन लिहलेल्या ग्रंथाकडे घेवून जातो. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना हे संशोधन करुण हा ग्रंथ लिहण्याची गरज का भासली असावी असा एक प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. त्याचे उत्तर देखिल डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनीच दिले आहे. ते म्हणतात, जे लोक आपला इतिहास विसरतात ते लोक इतिहास घडवू शकत नाहीत. याचा अर्थ डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याकडून एका नव्या इतिहासाची आपेक्षा होती. परंतु आजूनही आम्ही आमचा इतिहास समजून घेतला नाही आणि जरी घेतला असेल तर त्या इतिहासाचे मूळ घेऊन नवीन इतिहास घडवण्यासाठी आम्ही पेटून कधीच उठलो नाही. .
खरे तर नवा इतिहास घडवायचा असेल तर आपल्याला आपल्या पुर्वजांचा इतिहास माहित असणे आवश्यक असते. म्हणून शुद्र पुर्वी कोण होते या ग्रंथाच्या माध्यमातून आमचा इतिहास आमच्या समोर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवला. परंतु त्याच्या पुढची अॅक्शन आम्ही आजूनही घेतली नाही. आपल्या नंतर अमेरिकेतल्या ब्लॅक लोकांना त्यांचा इतिहास माहित झाला आणि त्यांनी इतिहासाचे धडे घेवून नवीन इतिहासही घडवला. जी क्रांती डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘शुद्र पुर्वी कोण होते? या ग्रंथाच्या माध्यमातून भारतात अपेक्षीत होती. त्याच स्वरुपाची क्रांती अमेरिकेत ‘रुटस’ या ग्रंथाने झाली. कारण अमेरिकन लोकांनी जो दृष्टीकोण ठेवून ‘रुटस’ हा ग्रंथ वाचला ती दृष्टी घेवून ‘शुद्र पुर्वी कोण होते?’ हा ग्रंथ आम्ही भारतीयांनी वाचला नाही.
अॅलेक्स हॅले या अमेरिकन संशोधकाने दक्षिण आफ्रिकेत जाऊन सतत तेरा वर्श संशोन केले आणि 1976 साली ‘रुटस्: द सागा आॅफ अॅन अमेरिकन फॅमिली’ नावाचे एक पुस्तक प्रकाशीत केले. या पुस्तकात त्यांनी ब्लॅक लोकांचा म्हणजेच निग्रांेचा वास्तव इतिहास कुंटा किंटे या पात्राच्या रुपाने मांडला आणि त्यांच्यासोबत इतिहासात गोऱ्या लोकांनी कसा व्यवहार केला याचे वास्तव आणि पुराव्यासह चित्र मांडले. ब्लॅक लोकांना गुलाम बनवून त्यांची कशा प्रकारे विक्री केली जायची याचे वास्तव त्यांनी या पुस्तकात मांडले. एका देशातून दुसऱ्या देशांत गुलाम घेऊन जात असताना ते सर्व गुलाम एका बोटीवर भरले जायचे. समुद्र मार्गे प्रवास करत असताना ज्या देशात हे गुलाम विकायचे आहेत त्या देशात पोहचायला महिना दोन महिने लागायचे आणि याच दरम्यान या गुलामांना मारहाण व्हायची, त्यांना खायला मिळायचे नाही, बोटीवर उपाशिपोटी काम करावे लागायचे अशा अनंत यातना सहन करत ते दुसऱ्या। देशात पोहचायचे आणि तिथे गेल्यावर यांच्या विक्रीचा प्रचंड मोठा व्यवहार व्हायचा.
जर एका देशातून ही बोट दोनशे गुलाम घेवून निघाली तर दुसऱ्या देशात केवळ शंभर ते एकशे विस गुलाम पोहचायचे. कारण महिना दोन महिने प्रवास करत असताना कोणी आजारी पडून, कोणी उपाशी पोटी असल्याने, तर कोणी काम करता करता असेच मरायचे. या आजारी पडलेल्यांना, मेलेल्यांना आणि कामासाठी योग्य नसलेल्या गुलामांना या बोटीतला व्यापारी जाता जाता समुद्रातच फेकुन द्यायचा म्हणून दोनशेपैकी केवळ शंभर ते एकशे विसच गुलाम तिथपर्यंत पोहचायचे. हा सर्व इतिहस अॅलेक्स हॅले यांनी शोधून काढला आणि 1976 साली ‘रुटस्ः द सागा आॅफ अॅन अमेरिकन फॅमिली’ या पुस्तक रुपाने प्रकाषित केला आणि अमेरिकन लोकांनी तो झपाटल्यासारखा वाचला.
अॅलेक्स हॅले च्या हे लक्षात आले की, काही अशिक्षीत लोकांना हा इतिहास वाचता येत नाही. त्यांच्यासाठी त्याने या पुस्तकावर आधारीत आठ भागाची एक टिव्ही मालिका तयार केली आणि त्या माध्यमातून ब्लॅक लोकांना त्यांचा इतिहास माहित करुन देण्यात आला. असे म्हणतात की, जेव्हा ही मालीका टीव्ही वर दाखवली जायची तेव्हा अमेरिकेतल्या शहरातल्या रस्त्यावरची सत्तर टक्के वाहतूक कमी व्हायची. इतका जाणीवपूर्वक इतिहास तिथल्या लोकांनी जाणून घेतला. पुढे याच पुस्तकाने नवी क्रांती केली. आपला संपुर्ण इतिहास या लोकांना माहित झाल्याने हे लोक काळया आणि गोऱ्या या भेदभावाच्या वरोधात संघटीत व्हायला लागले. सतत्यांने पंचवीस वर्ष केवळ संघटन आणि संघटनच त्यांनी केले आणि पंचेविस वर्षानंतर त्यांनी अमेरिकेत क्रांती घडवून आणली ‘बराक ओबामा’ नावाच्या एका ब्लॅक मानसाला त्यांनी अमेरिकेचे राश्ट्राध्यक्ष केले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘शुद्र पुर्वी कोण होते?’ या पुस्तकाच्या माध्यमातून अशीच क्रांती आपेक्षित होती. परंतु आम्ही आजूनही डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या गभीरपणे समजून घेत नाही. ज्या प्रमाणात अॅलेक्स हॅले च्या पुस्तकाला अमेरिकेतील ब्लॅक लोकांनी समजून घेतले. त्यांच्याप्रमाणे आम्ही इतिहास वाचून त्यांच्याप्रमाणे अमपानाच्या विरोधात उभेच राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या वेळी दिलेली वर्तणुक, राजर्शी शाहू महाराजांचे वेदोक्त प्रकरण, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना दिलेली वर्तणुक आणि त्यांना फेकुण मारलेल्या शेणाचा अर्थ आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची या सर्व इतिहास संषोधनामागची भूमिका आणि त्यांना दिलेली वर्तणुक याचा अन्वयार्थ अजूनही आम्ही लावला नाही.
खरे तर शुद्र पुर्वी कोण होते? या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले यांच्या वारसदारांना एकत्र आणण्याचे सुत्र आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी शुद्र पूर्वी कोण होते? या ग्रंथाचा शेवटचा भाग, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर लिहला तर हा ग्रंथ त्यांनी महात्मा फुले यांना अर्पण केला आणि या देशातील बहुजनांना ऐक्याचे सुत्र दिले. पण हे सूत्र आजच्या राजकीय पाश्र्वभूमीवर आम्ही (मराठा-ओबीसी-एसी) समजून घेणार आहोत का? हा खरा प्रश्न आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !
हेही वाचा
राजीव सातव : तांडवी राजकारणातला सायलेंट नेता
चीन सध्या काय करतोय?
ऍड. बाळासाहेब आंबेडकर : वंचितांचा मसिहा