तांडवी राजकारणातला सायलेंट नेता
डॉ. ह. नि. सोनकांबळे
कुठलेतरी वादग्रस्त व्टिट करुन, भंपक डायलाूगबाजी करुन, जाती-जाती आणि धर्मा-धर्मा मध्ये तेढ निर्माण करुन राजकरणात यशस्वी होवू पाहणाऱ्यांनी राजीव सातव या व्यक्तमत्वाचा अभ्यास केला पाहिजे. शातता राखून, संयममाने, अभ्यासपूर्वक राजकारणात कसं यायचे आणि जाती-जातील आणि धर्मा-धर्मातील कोणत्याही वादाला थारा न देता सर्व समावेशक राजकारण करुन लोकांच्या हृदयात कसं घर करता येतं याचं उदाहरण ठरलेल्या राजीव सातव यांनी केवळ जनतेच्याच नाही तर, एका वर्षातच सोनिया गांधी, राहूल गांधी आणि केंद्रतील अनेकांच्या हृदयात घर केलं होतं. आजच्या नव्याने राजकारणात येणाऱ्यातरुणांना हे जमेल का?
काही दिवसापूर्वी माझे विद्यार्थी अमित कुटे दिल्लीला गेले होते. मी त्यांना सहज फोन केला आणि दिल्लीत कुठे थांबलात असं विचारलं. त्यावर अमित म्हणाला सर राजीव भाउ कडे थांबलोय आणि हो आज त्यांनी आम्हाला संपूर्ण संसद स्वतः फिरुन दाखवली. अनेक नेत्यांच्या ओळखी करुन दिल्या. सर तुम्ही एकदा भाउ ला भेटा आणि लोकशाहीतला शांत, संयमी आणि अभ्यासू नेता कसा असावा हे अनुभवा. अमित त्यांच्याबददल जे काही सांगत होता त्यावरुन माझा त्यांच्याबददलचा अभ्यास आणि आकर्षण वाढत होतं. मी अमितला म्हणालो, एकदा हा कोरोणाचा काळ संपला की आपण नक्कीच त्यांची भेट घेउ. परंतु कोरोनाने या भेटीची आस कायमची संपुष्टात आली.
अवघ्या कमी वयात आणि कमी कालावधीत दिल्लीच्या राजकारणात आणि सोनीया गांधी आणि राहूल गांधी यांच्या काळजात घर केलेला हा नेता तसा प्रसिद्धीपासून कोसो दूर राहण्यातच धन्यता मानायचा. कुठलीही प्रसिद्धी, भंपकबाजी, टिंगल टवाळी किंवा कोणवरतरी चिखलफेक न करता देखिल राजकारणात यशस्वी होता येवू शकते याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे राजीव सातव. आजच्या तांडवी राजकारणात प्रत्येक नेता तोल सोडून बोलत असताना आणि खालच्या पातळीवर जावून एकमेकावर टीका करत असताना राजीव सातव यांनी कधीच आपला तोल जावू दिला नाही.
मागच्या गुजरात विधानसभेच्या निवडणूकीत अनेक नेते गुजरात मध्ये जावून खालच्या पातळीवर टिका करत होते. या निवडण्ूाकीत राजीव सातव यांनी पक्षाची प्रभारी पदाची धुरा सांभाळली होती. केंद्रातले अनेक नेते येवून एकमेकांवर चिखलफेक करुन जात होते मात्र अशा नेत्यांना कसल्याही प्रकारची भिक न घालता किंवा त्यांना खालच्या पातळीवरुन प्रतिउत्तर न देता सातत्याने कामात व्यस्त राहून काॅंग्रेसला विजयाच्या दिशेने खेचून नेले. खरे तर देशाच्या पंतप्रधानाचे हे राज्य होते. तिथे काॅंग्रेस टिकणारच नाही असे सर्वांनाचा वाटत होते. अशा परिस्थितीत राजीव सातव यांनी आपले पाॅलीटीकल मॅनेजमेंट केले आणि 77 जागां निवडूण आणत सत्ताधा$यांना चांगलाच घाम फोडला. खरे तर या विजयाचे पूर्ण श्रेय राजीव सातव यांनाच द्यावं लागतं. कारण नरेंद्र मोदी यांच्या झंझावादामूळे हाताश झालेल्या काॅंग्रेसला त्यांच्याच राज्यात पुन्हा एकदा उर्जा मिळवून देण्याचे काम राजीव सातव यांनी केले आणि काॅंग्रेस पुन्हा एकदा नव्या उमेदिनी कामाला सुद्धा लागली.
पक्ष जो जबाबदारी देईल ती अगदी शांतपणे पार पाडण्याची तयारी असलेला हा नेता. हिंगोली जिल्हयातून ते 2009 मध्ये जातीपातीच्या राजकारणाचे सर्व बंध तोडून हा चेहरा राज्याच्या विधानसभेत पोहचला. त्यांच्यातली युवा उर्जा ओळखून काॅंग्रेस ने त्यांना 2010 म/ये युकव काॅंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले. याच संधीचे सोने करत त्यांनी 2014 च्या निवडणूकीत विजय मिळवून राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. 2014 म/ये असलेल्या मोदींच्या लाटेत देखिल त्यांनी विजय खेचून आणला आणि पुन्हा एकदा हा चेहरा दिल्लीत चर्चेचा विषय ठरला. 2019 मध्ये त्यांनी पूर्ण वेळ पक्ष बांधणीसाठी निवडणूक न लढवता पक्ष बांधणीसाठी काम करण्याचे ठरवले परंतु काॅग्रेस ने त्यांना 2020 मध्ये राज्यसभेवर पाठविले.
आज देशाच्या राजकारणात अशा तरुणांची गरज असतानाच त्यांची एक्झीट हा चर्चेचा नाही तर चिंतेंचा विषय आहे. खरे तर आजच्या तांडवी राजकारणात अशा शांत संयमी, अभ्यासू अर्थात सायलेंट नेत्याची खरे तर देशाला गरज आहे. त्यांना अजपर्यंत 4 वेळेस संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांची संसदेतली उपस्थितीत देखिल 81 टक्के इतकी होती. त्यांनी संसदेत विक्रमी 1075 प्रश्न विचारले होते. काही महिन्यापूर्वी शेतकरी कायद्याला विरोध करत असताना त्यांना निलंबीत केले गेले. याचा निषेध करत त्यांनी एक रात्र संसदेच्या बाहेरील लाॅन वर निशेध आंदोलन केले आणि तेथील लाॅन वर झोपून काढले. कसल्याही प्रकारे शेतकऱ्यावर अन्याय करणारे विधेयक मंजूर होता कामा नये. याच भूमिकेत ते शेवटपर्यंत राहिले. त्यांची ही लढाई अपूर्णच राहीली.
राजकारणात नव्याने येणार तरुण वर्ग त्यांना कदापिही विसरणार नाही. कारण त्यांच्यासाठी राजीव सातव म्हणजे एक सक्सेस स्टोरी तर आहेच शिवाय नेता कसा असावा याचा आदर्शही आहे.
अशा या शांत संयमी, अभ्यासू सायलेंट नेत्याला विनम्र अभिवादन!
हेही वाचा
विलासराव देशमुख : विरोधकांच्या हृदयावर राज्य करणारा नेता
No comments:
Post a Comment