बिनधास्त लाच घ्या; आता निलंबन नाही?
डॉ. ह. नि. सोनकांबळे
सरकारी अधिकाऱ्यांसाठी ही खुश खबर आहे. आता लाच स्वीकारताना तुम्हाला जरी "रंगेहाथ" पकडले तरीही तुम्हाला कोणीही निलंबित करू शकणार नाही. महाविकास आघाडी सरकारने हा नवा अलिखित नियम तयार करून लाच घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचार्यांना या सरकारने अच्छे दिन आणले आहेत. आपल्याला जर लाचलुचपत विभागाने पकडले तर अवघ्या 48 तासाच्या आत तुम्ही पुन्हा आपल्या कामावर रुजू होऊ शकता आणि बिनधास्त भ्रष्टाचारही करू शकता. ही ऑफर 2020 पासूनच लागू झाली आहे. कालच एक आरटीओ आधिकऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्याला अटक होऊ नये, गुन्हा दाखल होऊ नये म्हणून सरकारी यंत्रणा कमला लागली. 15 तासानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला तर 48 तासाच्या आत तो पुन्हा कामावरही रुजू झाला. शिवाय 2020 मध्ये अडीचशेहून अधिक अधिकाऱ्यावर तर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे तुम्हीही बिनधास्त राहा आणि महाविकास आघाडी सरकारच्या या ऑफर चा फायदा घ्या.
सविस्तर माहितीसाठी आजच्या दिव्या मराठीची ही बातमी वाचा.
हे वाचून तुम्हाला अश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे. खुद एसीबी नेच हे सांगितले आहे की, आम्ही जरी सापळा रचून एखाद्या अधिकाऱ्याला लाच घेताना पकडत असलो तरी त्यांच्यावर पुढे कोणतीही कार्यवाही होत नाही. मागच्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये जवळपास 238 अधिकाऱ्यांना मोठया रकमेची लाच घेताना एसीबी ने (रंगेहात) पकडले होते परंतु त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही किंवा त्यांचे निलंबनही झाले नाही. उलट यातल्या अनेक अधिका$यांना बढती देखिल मिळाली आहे. तर चालू वर्षात म्हणजे 2021 मध्ये वर्ग एकच्या 19, वर्ग दोन च्या 17, वर्ग तीन च्या 99, वर्ग चार च्या 6, व इतर 63 अशा एकूण 204 अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाच घेताना (रंगेहात) पकडले होते परंतु त्यांच्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. ही आकडेवारी परिक्षेत्रनिहाय अशी आहे. मुंबई 17, ठाणे 27, पुणे 12, नाशिक 2, नागपूर 55, अमरावती 26, औरंगाबाद 19 तर नांदेड 46 अशी आहे.
तुम्ही म्हणत असाल कोरोनामुळे यांच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसेल. परंतु कोरोना भारतात येण्यापूर्वी देखिल असेच होत आले आहे. अशा लाचखोर अधिकारी व कर्मचारी यांच्यावर बहुतांष वेळा कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. हे सर्व अधिकारी वरिष्ठांच्या, मंत्रयाच्या व नेत्यांच्या संपर्कातले किंवा त्यांच्या जवळचे नातेवाईक असल्याचे समाजते. काही जण पालकमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाप्ते देखिल देतात, शिवाय यातले अनेक अधिकारी पक्षाला फंडिंग देखिल करत असतात. त्यामूळे त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात येत नाही.
परंतु जे लाचखोर अधिकारी व कार्मचारी उपरोक्त नियमानुसार लाच घेत नाहीत त्यांच्यावर मात्र थेट निलंबनाची कार्यवाही करण्यात येते. त्यामूळे अशा लोकांना मात्र धोका आहे.
या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कार्यवाही व्हावी हा उद्देश या ब्लाॅगचा अजीबात नाही. तर आपल्यावर निलंबनाची किंवा इतर कोणतीही कार्यवाही होवू नये असे वाटत असेल तर सरकारी नियमानुसार म्हणजेच वरिष्ठांना, पालकमंत्रयांना, नेत्यांना हप्ते देवून किंवा विविध पक्षाला पार्टी फंड देवून भ्रष्टाचार करावा हे सांगण्यासाठी आहे. ज्या अधिका$यांना एसीबी ने पकडूनही त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही झाली नाही असे अधिकारी जर आपल्या आजूबाजूला राहत असतील किंवा आपण त्यांना ओळखत असाल तर त्यांचे मार्गदर्शन सातत्याने घेत रहा.
घरी रहा, सुरक्षीत रहा, काळजी घ्या आणि बिनधास्त भ्रष्टाचार करा. सरकार आपल्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे.
दुनिया की कोईभी ACB तुम्हारा कुछ नहीं बिघाड सकती!
हेही वाचा
तांडवी राजकारणातला सायलेंट नेता
मराठा आरक्षण: चुका राज्यकर्त्यांच्या दोष संविधानाला
खूप सखोल अभ्यास 👌👌👌
ReplyDelete