सिद्धार्थ गोदाम: चळवळीचं महाकव्हरेज
@डॉ. ह. नि. सोनकांबळे
दुष्काळ पडला म्हणून आपली जनावरे विकायला घेवून जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करणारा ‘मला विकू नका’ या विशेष शो साठी मागच्या वर्षी सिद्धार्थ गोदाम यांना राष्ट्रीय पातळवरील इएनबीए पुरस्कार मिळाला. याही वर्षी पुन्हा दुसऱ्यांदा हाच पुरस्कार त्यांना ‘बेस्ट करंट अफेयर्स’ विभागातून प्रप्त झाला आणि काल पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने दिला जाणारा 2020 चा राज्यस्तरीय उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार त्यांना राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
असं म्हणतात की, ‘तुम्हाला जर जगाच्या हृदयाजवळ जायचं असेल तर पत्रकार बनने हा एकमेव मार्ग आहे.’ पण हल्ली असे खूप कमी पत्रकार आहेत जे लोकांच्या हृदयाजवळ पोहचतात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपली लेखणी झिजवतात. खरे तर पत्रकारीतेच्या अभ्यासक्रमातूनच हा धडा वगळण्यात आला आहे. पत्रकारीता म्हणजे प्युअर बिझनेस होवून बसला आहे. अभ्यासक्रमात देखिल जाहीरात कशी मिळवायची, कोणत्या बातमीला जास्त महत्व द्यायचं, पेड न्यूज कशा छापायच्या, कोणत्या बातमीतून जास्त बिझनेस मिळू शकतो, जे लोक आपल्याला जास्त बिझनेस देतात त्यांनाच कसे कव्हरेज द्यायचे, याचेच धडे प्रामुख्याने दिले जातात. परंतु अशा काळात देखिल एक दिलासादायक चित्र म्हणजे काही पत्रकार या सर्व वातारणापासून दूर आहेत. याच यादीत एक नाव घ्यावं लागेल ते म्हणजे, आयबीएन 18 लोकामत चे पत्रकार, मराठवाडा ब्युरो चिफ सिद्धार्थ गोदाम यांचं.
एरवी पत्रकारीतेचं माईक हातात घेवून लांबलचक बडबड करण्यात अनेक पत्रकारांचा वेळ जातो. परंतु ‘मी जास्त बोलण्यापेक्षा चला थेट परिस्थितीतच दाखतो’ हेच सूत्र सिद्धार्थ गोदाम यांच्या पत्रकारीतेचं राहिलं आहे आणि म्हणूनच ते आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून लोकांच्या हृदयाजवळ पोहचले. चळवळी, आंदोलने, मोर्चे, शेतकरी आत्महत्या, विद्याथ्र्यांचे प्रश्न अशा विविध प्रश्नावरचा त्यांचा अभ्यास आणि त्याचे रिपोर्टींग करण्याची शैली इतरांपेक्षा निराळीच. काही दिवसापूर्वी परभणीच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. जवळपास सर्वच वर्तमानपत्रांनी ती बातमी एक किंवा दोन काॅलमपेक्षा जास्त छापली नाही. त्यामूळे सर्वांनीच या बातमीकडे एक साधारण घटना म्हणून बघितले. परंतु याचं रिपोर्टींग जेव्हा सिद्धार्थ गोदाम यांनी न्यूज 18 लोकमत ला केलं तेव्हा यातली दाहकता शासन, प्रशासन व जनतेच्या लक्षात आली. त्या शेतकऱ्याच्या घरची परिस्थिती प्रचंड हालाखीची असल्याचे महाराष्ट्राच्या लक्षात आले. दोन्ही कानाचे आॅपरेशन झालेली शेतकऱ्याची पत्नी, कापूस वेचायला जावून शिक्षण घेणारी मूलगी आणि इतर लहान भावंडं असा त्याचा परिवार. खरे तर अशा कुटंुबांना न्याय देणारी पत्रकारीता सध्या लोप पावताना दिसते आहे.
अशाच अनेक कुटंुबातून अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ येतात. तसे तर हे विद्यापीठ ग्रामीण महाराष्ट्रातल्या शेतक$यांच्या मुलांचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. या विद्यापीठात येणारे अनेक विद्यार्थी हे शेतकरी आणि शेतमजूर कुटंुबातून येत असल्याने त्यांच्या समोर अनेक प्रश्न असतात. हे प्रश्न प्रशासनाच्या आणि शासनाच्या दरबारी मांडून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक वेळा त्यांची पत्रकारीता कामी आल्याचे पहायला मिळाले. विद्यापीठात होणारे विद्यार्थी संघटनांचे आंदोलने, त्यांच्या मागण्यांना मिळणारे यश यात सिद्धार्थ गोदाम यांच्या योगदानाला बघावंच लागतं. कारण इतर कुठल्याही बतम्यांपेक्षा त्यांचा ओढा मोर्चे, आंदोलने व चळवळीच्या बातम्या देण्यावर आणि मागण्या लाावून धरण्यावर राहिला आहे.
विद्यापीठात आणि मराठवाडयात कोणत्याही संघटनांचे मोर्चे असोत की, मागील काही वर्षापासून सुरु असलेले मराठा क्रांती मोर्चे, बहुजन क्रांती मोर्चे, ओबीसी मोर्चे व धनगर समाजाचे मोर्चे असोत या सर्वच मोर्चांना त्यांनी दिलेले कव्हरेज कुठेही एका बाजूला झुकलेले दिसले नाही. त्यांची पत्रकारीता कोणत्याही एखाद्या संघटनेला, राजकीय पक्षाला किंवा जात समुदायाला अतिरिक्त महत्व देताना दिसत नाही. कोणत्याही संघटनेपेक्षा, पक्षापेक्षा किंवा जात समुदायापेक्षा त्यांच्या मागण्या आणि सर्वच समुहाला त्याच्यापासून होणारा फायदा यावर त्यांची पत्रकरीता प्रकाश टाकताना दिसते.
खरे तर त्यांची माझी प्रत्यक्षात भेट कधी झाली नाही किंवा त्यांचा माझा परिचय देखिल नाही. परंतु खऱ्या पत्रकाराची ओळख ही त्याची लेखणी आणि त्यातून लिहली जाणारी बातमीच असते. बातमीला रंगवण्यापेक्षा त्या बातमीतले वास्तव दाखविणे आणि त्याचे योग्य परिणाम शासन आणि प्रशासनावर होणे हीच खरी पत्रकारांची ओळख असते.
सिद्धार्थ गोदाम यांनी त्यांची ओळख त्यांच्या पत्रकारीतेतून निर्माण केली आहे. म्हणूनच त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने दिला जाणारा 2020 चा राज्यस्तरीय उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यापूढेही त्यांची लेखणी समता, स्वातंत्रय, बंधुभाव आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी व त्यासाठी लढणाऱ्या चळवळींसाठी ‘महाकव्हरेज’ ठरेल यात शंकाच नाही. त्यांना हा पुरस्कार देवून मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहार संघाने एका उत्कृष्ठ, धडाडीच्या पत्रकाराचे मनोबल वाढवले त्याबददल संघाचे व पुरस्कार मिळाल्याबददल सिद्धार्थ गोदाम यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस सम्यक सदिच्छा !