सामाजिक न्याय विभागाला महापुरुषांच्या जयंतीचाही विसर
डॉ. ह. नि. सोनकांबळे
काल परदेशातून एका मित्राचा फोन आला, म्हणाला, महाराष्ट्र शासनाने महापुरुषांच्या जयंत्यावर बंदी आणली की काय? मी म्हटलं नाही रे. तर म्हणाला, संकेतस्थळावर कोणत्याही महापुरुषांच्या जयंतीचा फोटो दिसत नाही.
लागलीच संकेतस्थळावर जाऊन बघितलं तर खरंच तिथे काहीच नाही.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सामाजिक न्याय हे महत्वाचे खाते धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आले. हे खाते त्यांच्याकडे देण्यामागचा उददेश बोलून दाखवत असताना शरद पवार म्हणाले होते की, ते खूप अॅक्टीव्ह असल्याने तेच हे खाते चांगले सांभाळू शकतील. या खात्याचा पदभार स्विकारल्यानंतर धनंजय मुुंडे यांनी काही महिने आपल्या कार्याचा ‘कार्यअहवाल’ देखिल शरद पवार, सुप्रिया सुळे यांना सादर केला आणि हा अॅक्टीव्हनेस काही दिवसातच बंद सुद्धा झाला. आता तुम्ही म्हणाल या नंतर कोरोना आला आणि धनंजय मुंडे यांनाही झाला. पण प्रश्न असा आहे की, काय त्यांच्या संकेतस्थळालाही कोरोना झाला होता का? कारण त्यानंतर हे संकेतस्थळ ऍक्टिव्ह झालेच नाही.
महत्वाची गोष्ट म्हणजे या खात्याच्या संकेतस्थळावर गेल्यावर आपल्याला असे दिसेल की मा. धनंजय मुंडे खरंेच किती अॅक्टीव्ह आहेत. या खात्याचा पदभार सांभाळल्यानंतर त्यांनी आपले सर्वांचे फाटो तत्काळ अपलोड करुन घेतले. यात मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, स्वतः धनंजय मुंडे, राज्यमंत्री म्हणून असलेले विश्वजीत कदम आणि या खात्याचे प्रधान सचिव श्याम तांगडे यांच्या फोटोचा समावेश आहे. परंतु नंतर या संकेतस्थळावर 2019 पासून ना डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा फोटो आला ना इतर कोणत्या महापुुरुषाच्या
आपण जर या संकेस्थळावर जाउन पाहिले तर असे दिसेल की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 127 व्या जयंतीचे फोटो इथे देण्यात आलेले आहेत. तेही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या काळातले आहेत. त्यानंतर या खात्याने कोणतेही फोटो अपलोड केलेले नाहीत. या संकेतस्थळावर गेल्यावर असे दिसते की, त्यानंतर या खात्याने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच साजरी केली नाही की काय?
खरे तर या खात्याचे सकेतस्थळ महाराष्ट्रातच नाही तर भारतासह जगभरातील अनेक लोक हाताळत असतात, या संकेस्थळाला भेटही देत असतात. परंतु या मंत्र्यांना याचे काहीही सोयरसुतक नाही.
या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर आपल्याला असे दिसेल की, इथे 127 व्या जयंतीचे काही फोटो आहेत तर देवेंद्र फडणविस यांच्या काळातलाच पुरस्कार वितरणाचा एक 3 मिनीटाचा व्हिडीओ इथे आहे. या व्यतिरिक्त इथे काहीही नाही. हो पण जयंतीच्या नावाने मात्र या खात्याने 2 कोटीहून (यात विविध प्रसारमा/यमांना दिलेल्या जाहीरातींचाही खर्चाचा समावेश आहे) अधिक खर्च केला आहे. परंतु याच जयंतीचे दोन फोटो टाकायला धनंजय मुंडे विसरले आहेत.
शरद पवार यांनी निवडलेल्या या अॅक्टिव्ह मंत्र्यांला समजून घ्यायचे असेल तर सामाजिक न्याय विभागाच्या या संकेतस्थळाला एकदा नक्की भेट द्या. किंवा या ब्लाॅग पेज वर येणारी विशेष लेखमाला नक्की वाचा.
वास्तव जाणून घेण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या खालील संकेतस्थळाला भेट द्या.
No comments:
Post a Comment