मराठवाड्याच्या भविष्याचा वेध: राष्ट्रीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन!
मराठवाडा हा केवळ भौगोलिक प्रदेश नसून तो समृद्ध ऐतिहासिक वारसा, सामाजिक चळवळी आणि अफाट संघर्षाची भूमी आहे. मात्र, आजही या प्रदेशाला पाणीटंचाई, कृषी संकट आणि विकासाच्या असंतुलनासारख्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय गोलमेज परिषदेच्या माध्यमातून मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचा एक नवा आराखडा तयार केला जाणार आहे.
परिषदेचा मुख्य विषय:
Reimagining Future Vision of Marathwada).
या परिषदेत सहभागी का व्हावे?
ही परिषद केवळ चर्चेसाठी नसून मराठवाड्याच्या विविध समस्यांवर ठोस उपाय शोधण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. खालील मुख्य विषयांवर (Sub-themes) आधारित संशोधक आणि तज्ञ आपले विचार मांडतील:
राजकारण आणि सुशासन: जलकारण, स्थानिक स्वराज्य संस्था आणि धोरणात्मक अंमलबजावणी.
कृषी अर्थव्यवस्था: शेतकरी आत्महत्या, ग्रामीण स्थलांतर आणि शाश्वत उपजीविका.
सामाजिक विषमता आणि आरोग्य: जातीवर आधारित राजकारण, महिलांवरील हिंसाचार आणि कुपोषण.
अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधा: प्रादेशिक असमतोल आणि औद्योगिक विकास.
वारसा आणि संस्कृती: अजिंठा-वेरूळ पर्यटन, समुदाय-आधारित पर्यटन आणि सार्वजनिक इतिहास.
मानसिक आरोग्य आणि सामाजिक लवचिकता: दुष्काळाचा मानसिक परिणाम आणि समुदायाची प्रतिकारशक्ती.
हवामान बदल: वारंवार येणारा दुष्काळ आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम.
मराठवाड्यातील इतर अनेक महत्वाचे प्रश्न
महत्त्वाचे तपशील आणि तारखा
परिषद दिनांक: २७ आणि २८ मार्च २०२६.
स्थळ: एमजीएम विद्यापीठ, एन-६, सिडको, छत्रपती संभाजीनगर.
संशोधन सारांश (Abstract) सादर करण्याची शेवटची तारीख: १० मार्च २०२६.
पूर्ण शोधनिबंध (Full Paper) सादर करण्याची शेवटची तारीख: १८ मार्च २०२६.
नोंदणी शुल्क (Registration Fee)
सहभागी होणाऱ्यांसाठी शुल्काचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे:
| प्रवर्ग | शोधनिबंध सादरीकरण आणि प्रतिनिधी शुल्क | केवळ सहभाग शुल्क |
| व्यावसायिक (Professionals) | २,००० रुपये | १,५०० रुपये |
| शिक्षक (Faculty) | १,५०० रुपये | १,००० रुपये |
| संशोधक (Research Scholars) | १,२०० रुपये | ८०० रुपये |
| विद्यार्थी (Students) | ८०० रुपये | ७०० रुपये |
(नोंदणी शुल्कामध्ये कॉन्फरन्स किट, प्रमाणपत्र, चहा, नाश्ता आणि दुपारच्या जेवणाचा समावेश आहे).
सहभागी कसे व्हावे?
या परिषदेत सहभागी होण्यासाठी तुम्ही खालील लिंकवर जाऊन तुमची नोंदणी करू शकता:
संशोधन निबंध पाठवण्यासाठी ईमेल: ncioss@mgmu.ac.in.
मराठवाड्याच्या उज्वल भविष्यासाठी आणि या मातीचा आवाज धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण या परिषदेत सामील होऊया. तुमच्या संशोधनातून आणि चर्चेतून मिळणारे निष्कर्ष थेट सरकारला धोरण निर्मितीसाठी सादर केले जातील.
अधिक माहितीसाठी संपर्क: ९४०३९७३०२३ | ९५५२१३३३७४



No comments:
Post a Comment