रिझर्व बँक, लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. ह. नि. सोनकांबळे
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स’ मधून अर्थशास्त्राचे धडे गिरवले. आज तिच संस्था बाबासाहेबांच्या अर्थनितीचे धडे विद्यार्थ्यांना देत आहे. आजपर्यत अनेक भारतीय लोक देश-परदेशात जाऊन शिक्षण घेऊन आले. मात्र कोणीच आपला वेगळा ठसा येथे उमटवू शकला नाही. आपण ज्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेतो ती संस्था काही दिवसानंतर आपल्याला ओेळखतही नाही. मात्र जगाच्या पाठीवर असे खूप कमी लोक असतात जे आपला ठसा वर्षानुवर्षे उमटवून ठेवतात. त्यात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव भारतीय आहेत. जगातील सर्वश्रेष्ठ विद्वान अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची गणना केली जाते. ज्या ‘लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स’ मध्ये बाबासाहेब शिकले त्या संस्थेने आपल्या क्लेमेंट हाऊस मध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवला आहे. क्लेमेंट हाऊस मध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूचे दोने दरवाजे उघडून आत गेल्यावर दर्शनी भागात हा पुतळा ठेवण्यात आला असून, आजपर्यत अनेक भारतीयांनी या स्कूलला भेेट, दिली आहे. या स्कुलचे उपाध्यक्ष प्रा. निकोलो ड्रिक्स यांनी बाबासाहेबांचा परीचय करुन देणारे एक पत्र बाजूच्या भिंतीवर बसवले असून बाबासाहेबांचे एक मोठे रंगीत तैलचित्रही येथे लावण्यात आले आहे.
ज्या शिक्षण संस्थेत आपण शिकतो आणि त्याच शिक्षण संस्थेकडून आपल्या स्मरणार्थ, गौरवार्थ पुतळा बसवला जातो. असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जगाच्या पाठीवर कदाचित एकमेव विद्वान विद्यार्थी असावेत. ज्या ज्या शिक्षण संस्थेमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले त्या सर्व संस्थांमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव चालू आहेच; शिवाय अनेक संस्थांमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शिकले नसले तरी त्यांच्या विचारांपासून त्या संस्था अलिप्त राहू शकल्या नाहीत. भारताच्या मध्यप्रदेशातील ‘महू’ सारख्या एका खेडेगावात जन्माला आलेले बाबासाहेब आज विव्दतेच्या जोरावर जगभर पोहचले आहेत. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची अर्थनिती हीच जगाला तारु शकते, हेच सांगण्याचा प्रयत्न ‘लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स’ने केला आहे. नव्हे जगभरातील राज्यकत्र्यांसाठी व विद्वानांसाठी हा एक नवा संदेश या स्कूलने डाॅ. बाबासाहेब आंबंेडकरांचा पुतळा उभा करुन दिला आहे. म्हणनूच भारताचे अर्थतज्ञ तथा अर्थषास्त्राचे नोबेल पारितोषिक विजेते डाॅ. अमर्त्य सेन म्हणाले होते की, ‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या अर्थशास्त्राचे जनक आहेत.’ याच ‘लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स’ने ‘डाॅ. बी. आर. आंबेडकर रिसर्च सेंटर’ ची स्थापना केली असून या संेंटरच्या माधमातून बाबासाहेबांचे आर्थिक विचार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचण्याचे कार्य अनेक आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या आणि व्याख्यानाच्या मध्यमातून चालू ठेवले आहे.
भारतीय रिझर्व बॅंकेच्या स्थापनेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा होता हे अनेक भारतीयांना ठाऊक नसावे आणि असले तरी ते सांगण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. त्यांच्या विचारावरच आधारीत या बॅंकेची स्थापना झाली असे अनेक ब्रिटीश अभ्यासकांचे मत आहे, आणि ते सत्य आहे. कारण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तात्कालीन कालखंडातील एकमेव अर्थतज्ञ होते. ‘हिल्टन यंग’ कमिशन ‘राॅयल कमिशन आॅन इंडियन करन्सी अॅन्ड फायनान्स’ या नावाने जेव्हा भारतात आले तेंव्हा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या द प्राॅब्लेम आॅफ द रुपीः इट्स ओरीजन अॅन्ड इट्स सोल्युशन या पुस्तकाचा अभ्यास करुन; त्यांनी 1934 चा आर बी आय अॅक्ट पास केला. तेंव्हा त्या कमिशनसोबत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी चर्चा करुन या बँकेची गरज, कामाची पद्धती आणि त्याचे स्वरुप या विशयाची साक्ष दिली होती. त्यांनी त्यावेळी महत्वाची तीन पुस्तके लिहली होती. ज्या पुस्तकात भारतीय रिझर्व बॅंकेचा पाया आहे.
1. अॅडमिनिस्ट्रेशन अॅन्ड फायनान्स आॅफ द इस्ट इंडिया कंपनी
2. द इव्हॅल्युशन आॅफ प्रोव्हेषियल फायनान्स इन ब्रिटीश इंडिया
3.द प्राॅब्लेम आॅफ द रुपीः इट्स ओरीजन अॅन्ड इट्स सोल्युशन
या तीन ग्रंथाचा आधार हिल्टन यंग कमिशनला झाला. या कमिशनने बाबासाहेबांचे सर्व मुद्दे विचारात घेऊन ‘ रिझर्व्ह बँक’ची स्थापना केली. मात्र भारतीयांना याची किंचितही जाणीव नाही. आणि जर या नेभळट सरकारला याची खरोखरच जाणीव असती तर आज प्रत्येक भारतीय चलनावर फक्त बाबासाहेबांचाच फोटो असता. भारताच्या जनतेला जरी याचा विसर पडला असला तरी ज्या ‘लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स' मध्ये बाबासाहेबांनी अर्थशस्त्राचे शिक्षण घेतले ती संस्था मात्र बाबासाहेबांच्या अर्थनितीला विसरली नाही. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळयासमोर ठेवून या स्कूलमधून आज अनेक अर्थतज्ज्ञ बाहेर पडत आहेत. जागतिक बाजारपेठेत आज दिवसेंदिवस रुपयाची किमत ढासाळताना दिसत आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थनितीचा विसर इथल्या राज्यकत्र्याना झाला खरा, पण याचे परिणाम आज संपूर्ण भारतीयांना भोगावे लागत आहेत. जर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार भारतीय राज्यकर्त्यांना विचारात घेतले असते, तर भारत आज नक्कीच जगाची आर्थिक महासत्ता म्हणून पुढे आला असता. याची जाणीव ‘लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स’ या संस्थेला झाली असावी म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थनितीचे धडे गिरविण्याचे कार्य या स्कूलने आपल्या हाती घेतले आहे. दरवर्षी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती लंडन स्कुल आॅफ इकाॅनाॅमिक्स मध्ये साजरी करण्यात येते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध पैलूवर व कार्यावर चर्चासत्राचे आयोजनही करण्यात येते. याच स्कूलच्या मिस संतोश दास एका जयंती प्रसंगी बोलताना म्हणाल्या होत्या की, डाॅ. बाबासाहेब अंाबेडकरांनी समता आणि न्यायासाठी भारतात उभारलेल्या लढयाचे पडसात आज संपुर्ण जगावर पडत आहेत. हा मानवाधिकाराचा विशय असून आज संपुर्ण जगभरात या विशयावर सखोल अशी चर्चा केली जावू लागली आहे. मानवाधिकाराचा विषय आज प्रत्येेकाच्याच जिव्हळयाचा झाला आहे. लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स मधील एशिया संशोधन केंद्राच्या सह संचालीका डाॅ. रुथू कुट्टूमुरी म्हणतात, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा समता आणि न्यायाचा लढा हा केवळ दलितांसाठी नव्हता तर तो सर्वांसाठी लढलेला सर्वसमावेशक लढा होता. तर लंडन स्कुल आॅफ इकाॅनाॅमिक्स मधील मानववंशस्त्राच्या सहाय्यक प्राध्यापिका डाॅ. अल्फा शहा म्हणतात, ‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी तात्कालीन परिस्थितीत घेतलेल्या अनेक निर्णयामुळे आज अनेकांना आपले आर्थिक जीवन सुधारता आले आहे. याचे संपुर्ण श्रेय त्यांना दिले जाते यात तिळमात्र शंका नाही.’
अषी अनेक चचासत्रे दरवर्शी या स्कुल मध्ये भरवली जातात. याची साधी बातमीही एखादया वर्तमानपत्रातून भारतीयांना वाचावयास मिळत नाही. आज संपुर्ण जगाचे लक्ष डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचाराकडे लागलेले असताना भारतातील नेते मंडळी महासत्तेच्या हाका मारत आहेत आणि सामान्य जनतेला महासत्तेचे स्वप्न दाखवत आहेत. परंतु डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जोपर्यंत भारत स्वीकारणार नाही तोपर्यत भारत महासत्ता होणार नाही. हे सूर्यप्रकाशाइतकेच शास्वत सत्य आहे आणि ते एक दिवस भारताला स्वीकारावे लागणार आहे.
विनंती :
आपल्याला माझे लेख / ब्लॉग आवडत असल्यास वर उजव्या बाजूला असलेल्या Follow या बटनावर click करायला विसरू नका.
टीप: लेखातील कोणताही मजकूर कोठेही कॉपी पेस्ट करू नये. शेअर करावासा वाटल्यास केवळ लिंक शेअर करावी.
बाबासाहेबांच्या विचाराचे गाढे अभ्यासक डॉ.ह. नि.सोनकांबळे सर यांचे विचार खरोखरच प्रेरणादायी तर आहेतच पण देशाला प्रगती कडे वाटचाल करायला लावणारे आहेत. ज्यांना बाबासाहेब माहित नाहीत, त्यांनी सरांच्या विविध लेखातून ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यांच्या विचारांची पेरणी करावी. जोपर्यंत आपण सत्य स्वीकारत नाही, तोपर्यंत देश महासतेकडे वाटचाल करू शकणार नाही. हे लक्षात घेतले पाहिजे.
ReplyDeleteखूप छान माहिती
ReplyDeleteब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.
Deleteयेणाऱ्या काळात असेच ब्लॉग वाचण्यासाठी ब्लॉग पेज ला follow कराल हीच अपेक्षा!
धन्यवाद
👌👌👌👌
ReplyDeleteब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.
Deleteयेणाऱ्या काळात असेच ब्लॉग वाचण्यासाठी ब्लॉग पेज ला follow कराल हीच अपेक्षा!
धन्यवाद
उत्तम माहिती सर्वांना दिली,अशा अभ्यासकाची आज नितांत गरज आहे
Deleteछान मांडणी केली सर
ReplyDeleteब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.
Deleteयेणाऱ्या काळात असेच ब्लॉग वाचण्यासाठी ब्लॉग पेज ला follow कराल हीच अपेक्षा!
धन्यवाद
Khup chan mhitey aahe sir....
ReplyDelete..
...aasach aajun khi mhit aasnar tr....pls....patva.... जनेकडून....aapn aamhala mhit padnar...aashey khi gosti che mhit nasnar aashey..mhitey.... धन्यवाद..🙏
ब्लॉग ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले खुप खूप आभार.
Deleteयेणाऱ्या काळात असेच ब्लॉग वाचण्यासाठी ब्लॉग पेज ला follow कराल हीच अपेक्षा!
धन्यवाद