भारतीय लोकशाहीच्या मूल्यमापणाची चौकट व विरोधाभास
Thursday, March 31, 2022
भारतीय लोकशाहीच्या मूल्यमापणाची चौकट व विरोधाभास
Saturday, March 19, 2022
मुख्यमंत्र्याला पराभूत करणारा गडी
मुख्यमंत्र्याला पराभूत करणारा गडी
"माझे लोक विकासाने मागास आहेत विचाराने नाही!"
नुकत्याच पंजाबच्या निवडणूका पार पडल्या आणि आम आदमी पक्षाने बहुमताने सत्ता मिळवली. पण या सर्व निवडणूकांच्या धामधुमीत एक नवा चेहरा समोर आला तो म्हणजे लाभ सिंह उगोके. ज्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचा पराभव केला. आणि सर्वांनाच प्रश्न पडला की, हे लाभ सिंह उगोके आहेत तरी कोण?
शोध सुरु झाली तेव्हा असे लक्षात आले की, लाभ सिंह उगोके यांचा एक साधारण परिवार आहे आणि त्यांचे एक मोबाईल रिपेरिंगचे दुकान असून ते त्या दुकानात मोबईल दुरुस्तीचे काम करतात. शिवाय त्यांचा प्लबरींगचा डिप्लोमाही झालेला आहे. त्यांनी पंजाब पोलीस आणि आर्मीत भरती होण्याचेही प्रयत्न केले पण ते होउ शकले नाहीत. आज त्यांचे वय अवघे 35 वर्शे इतके आहे.
2013 मध्ये लाभ सिंह उगोके यांनी आम आदमी पक्षासोबत काम करायला सुरुवात केली. ते म्हणतात की, ‘मी एक कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करत होतो. मला कधी असे वाटलेही नव्हते की, मला पक्ष निवडणूकीत उतरवेल आणि मी निवडूण येईल. अनेकांचे म्हणने असे होते की, मी ज्या बरनाला जिल्हयाच्या भदौड भागातून उभा होतो. तो भाग अतिशय मागास आहे. तो पैस्यावर मतदान करतो. पण मी लोकांना हे सांगत होतो की, माझा मतदार संघ हा विकासाने जरी मागास असला तरी तो विचाराणे मागास नाही. तो विचार करुनच मतदान करेल.’ आणि झालेही तसेच.
हेही वाचा
बाबासाहेबांच्या स्पर्शाने विहिरीचे सोने झाले
दलित कुटुंबाच्या खात्यात थेट 10 लाख
या निवडणूकीत लोकांनी विचारपूर्वक मतदान केले आणि लाभ सिंह उगोके यांना थोडयाफार नाही तर प्रचंड मतांनी विजयी केले. लाभ सिंह उगोके यांनी 37,000 मतांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचा पराभव केला.
लाभ सिंह उगोके यांची आई
लाभ सिंह उगोके यांची आईएक सफाई कामगार असून ती 1996 पासून एका शाळेत सफाई कामगार म्हणून नोकरी करते. मुलगा निवडूण आल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्या नियमितपणे शाळेत आणि शाळेची साफसफाई करतात. त्यांना केवळ 1000 रुपये वेतन मिळते. त्या म्हणतात मी हा झाडू कधीच सोडणार नाही. मी माझ काम करत राहीन आणि माझा मुलगा त्याचे काम करत राहील.
लाभ सिंह उगोके यांचे वडील
लाभ सिंह उगोके यांचे वडील एक ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत. ते म्हणतात की, यापूर्वी मला असे वाटत होते की, राजकारण हे श्रीमंतासाठी आहे. पण माझया मुलाने हा पायंडा मोडीत काढला असून राजकारण हे गरीबांसाठी देखिल आहे हे दाखवून दिले आहे.
लाभ सिंह उगोके यांची पत्नी
लाभ सिंह उगोके यांची पत्नी ही कपडे षिवण्याचे काम करते. त्या म्हणतात की, माझे पती जरी आमदार झाले असले तरी मी माझे काम करत राहीन. आमचे कुटुंब एक साधारण कुटुंब असून त्यात कोणताही बदल होणार नाही.
बदल होउ शकतो. बदलाचा विचार केला पाहिजे.
डॉ. ह. नि. सोनकांबळे
Saturday, March 5, 2022
"कडूतात्या"चे तुफान
कडूतात्याचे तुफान
"मी आंधळा असून सुद्धा,समाजातला अंधार मला दिसतोय, तुम्हला डोळे असूनही का दिसत नाही."
कडूतात्या
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतीक कार्य संचालनालयाने औरंगाबाद येथे आयोजीत केलेल्या 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय स्पर्धेत 2 मार्च रोजी ‘कडूतात्या‘ हे नाटक पाहण्यात आलं. 40 हून अधिक पात्र असलेल्या या दोन अंकी नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन गणेश सुभाषराव मुंढे यांनी केले असून योगेश मच्छिंद्र घुगे यांची निर्मिती आहे.
एकुणच हे नाटक एका ग्रामीण कथेवर आधारलेले आहे. नाटकाच्या उपशीषर्शकातच हे नाटक सामाजिक आणि विनोदी असल्याचे लेखकाने सांगून टाकले आहे. त्यामूळे हे नाटक ‘म्हातारपण आणि बालपण‘ हे सारखंच असतं याची जाणीव ठेवून मांडण्यात आले आहे. नाटकात असलेले संवाद हे अस्सल ग्रामीण असल्याने शहरातील लोकांना ते सहजासहजी रुचणारे नाही. पण ग्रामीण वास्तव मांडत असताना शहरी भाषेचा आव आणून ते मांडताही येत नाही हे सर्वच लेखकांना महित असतं. उदा. फॅंड्री या चित्रपटात जब्याचे नाव बदलून ‘जॅब’ असं ठेवलं असतं तर ग्रामीण भागातला जब्या आपल्या लक्षातच आला नसता. उगीच शहरी भागातील लोकांना आपल्या भाषेबद्दल काय वाटतं याचा विचार लेखकाने कधीच करु नये आणि तो करण्याचा प्रयत्न कडूतात्याच्या लेखकानेही केला नाही. त्यामूळेच संपूर्ण सभागृहाने कडूतात्या डोक्यावर घेतला.
म्हातारपण आणि त्यात दृष्टी जाणे या दोन्ही समस्येवर मात करुन ग्रामीण भागात जीवन जगणाऱ्या 'कडूतात्या'चे दुःख लेखकाने कधी विनोदी तर कधी गंभीर स्वरुपात मांडले आहे. 'कडूतात्या' म्हातारा जरी असला तरी कडूतात्याचा आवाज म्हणजे एक तुफान असल्याचे जाणवते. शिवाय ग्रामीण भागात शौचालयाच्या असलेल्या अडचणी आणि त्यात दृष्टी नसलेला 'कडूतात्या' आपले ‘टंबरेल’ घेउन गावातल्या उकंडयावर बसतो आणि त्याची तक्रार घेउन उकंडयाची मालकीन तात्याच्या सुनकडे येते. हे चित्र शहरी भागातील लोकांना उमजणारे नसले तरी हे वास्तव आहे . हे ग्रामीण भागात फिरल्याशिवाय समजत नाही. असं म्हणतात की म्हातारपण नशिबाला येऊ नये आणि आलं तर काय होतं. हे दाखवत असताना नाटकात एक दोन ठिकाणी कडूतात्याचे धोतर सुटलेले दाखवले आहे. हे वास्तव शहरातले लोक नाकारतात. कारण त्यांचे म्हतारे हे वृद्धाश्रमात असतात. पण ग्रामीण भागात म्हताऱ्याची म्हातारी आणि चांगली असली तर सून या दोघीच म्हातारपण करतात. त्यामुळे ग्रामीण भागात हे चित्र पाहायला मिळत. सरकारने हागणदारी मुक्तीची घोषणा केली असली तरी ती 100 टक्के झाली नाही हे मान्यच करावं लागतं. हि योजना आजून कडूतात्यापर्यंत पोहचली नाही. हे सांगण्याचे कामही लेखकाने केले आहे. कडूतात्याची भूमिका ही स्वतः लेखकाने साकारलेली असल्याने आणि नाटकाचा नायक कडूतात्याचे असल्याने नाटक पूर्णपणे त्याच्या भोवतीच फिरते.
हे नाटक दोन अंकी असले तरी हे पात्र कडूतात्या हे पत्र साकारत असताना या पत्रातली ग्रामीण ऊर्जा तब्बल दोन तास आपल्यातली कुठेच कमी पडू दिली नाही. खरे तर इतक्या स्पिडने हे पात्र साकारत असताना इतकी उर्जा टिकवून ठेवणे कोणत्याही कलाकारासाठी जीकरीचेच असते.
कडूतात्याच्या पत्नीची भूमिका साकारणारी रुकमा हीने आपल्या भूमिकेचा कुठेही तोल जाउ दिला नाही. खरे कौतुक तर कडूतात्याच्या सुनेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे केले पाहिजे. ग्रामीण सूनेची भूमिका साकारत असतानाच अभिनयाबरोबरच अस्सल ग्रामीण भागातला आवाज सभागृहात घुमताना आपण एका खेडेगावातच आहोत असेच वाटते.
नाटकातल्या सरपंचाच्या भूमिकेला देखिल अस्सल ग्रामीण लहेजा देण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. ‘असेच निवडूण येत रहा आणि एक एक वावर इकत रहा’ असे पंच मारुन ग्रामीण भागातल्या राजकारणाचे वास्तव इथे मांडण्याचे प्रयत्न लेखकाने केले आहेत. शिवाय ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत पन्नास-पन्नास रुपयाला मत विकले जाते. " एवढया पैशात तर कोणी उसात देखिल खुरपायला जात नाही". या कडूतात्याच्या संवादातून आवल्याला संविधानाने दिलेल्या मताच्या मूल्यावर कठोर प्रहार करण्याचे काम देखिल लेखकाने केले आहे.
नाटकात वापरलेली अंध व्यक्तीची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराने केलेल्या अभिनयाकडे बघितल्यावर असे वाटते की तो खरोखच अंध आहे. असे एकुण चाळीस पात्र एकत्रीत आणून या नाटकाला उभारण्याचे काम गणेश मुंडे आणि योगेश घुगे यांनी केले आहे. त्यामूळे ते कौतुकास पात्रच आहेत.
नाटकात अशा अनेक जमेच्या बाजू असल्या तरी नाटकातील पात्रांची संख्या जास्त असल्याने संपूर्ण नाटकात बराच गोंधळ झाल्याचे वाटते. या गोंधळामुळे आणि साउंड सिस्टिम चांगली नसल्याने चांगले सवाद प्रेक्षकापर्यंत पोहचले नाहीत.(हा दोष आयोजकांचा आहे. शासनाने थोडे चांगले पैसे दिले असते तर चांगली साउंड सिस्टम आणि चांगले सभागृह मिळाले असते) नाटकात डॉक्टरने केलेली भूमिका अतिरेकी वाटते तर नाटकात पात्रांची संख्या जास्त असल्याने अनेकांना संवादच नाहीत. ग्रामीण भागात असलेली लव्ह स्टोरी लेखकाने दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांच्यातील संवादाची प्रेक्षक वाट पाहताना दिसतात मात्र शेवटपर्यंत त्यांच्यात कोणताच संवाद होत नाही पण त्यांच्या हालचालीवर प्रेक्षक लक्ष ठेवून असल्याचे जाणवते. नाटकात "माझा झुला तुला घे तुझा झुला मला दे" हे गाणे आधूनमधून वापरण्यात आले आहे त्याचा एक दोन ठिकाणी ताळमेळ लागलेला दिसत नाही. पण यात वापरण्यात आलेले अभंग, गझल आणि याला सोबत असलेली ढोलकी आणि पेटीची साथ प्रेक्षकांना टाळया वाजवायला भाग पाडते. महत्वाचे म्हणजे या नाटकात आधुनमधून मंचावर येणारी हालगी नाटकातील पात्रांना आणि प्रेक्षकांना ठेका तर धरायला लावते.
नाटकात आधुनमधून लिंक तुटल्याारखी वाटते पण पुन्हा लिंक जोडण्यासाठी लेखकाने आणि सर्वच कलाकारांनी प्रचंड मेहनत केलेली दिसते. नाटकात आलेले संवाद शहरी भागातील लोकांना पटत नसले तरी त्या संवादाशिवाय ग्रामीण भागातले जीवन आणि त्यांचे प्रश्न मांडलेच जावू शकत नाहीत. अगदी नामदेव ढसाळांना देखिल ते टाळता आले नाही आणि वास्तवाचे भान ठेवून लिहनाऱ्या कोणत्याही लेखकाला ते टाळता येणारही नाही.
डॉ. ह. नि. सोनकांबळे
(मी समीक्षक नाही, पण प्रेक्षक म्हणून मला काय वाटले हे लिहण्याचा प्रयत्न मी केला आहे.)
तुम्हाला हे नाटक कसे वाटले ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.