मुख्यमंत्र्याला पराभूत करणारा गडी
"माझे लोक विकासाने मागास आहेत विचाराने नाही!"
नुकत्याच पंजाबच्या निवडणूका पार पडल्या आणि आम आदमी पक्षाने बहुमताने सत्ता मिळवली. पण या सर्व निवडणूकांच्या धामधुमीत एक नवा चेहरा समोर आला तो म्हणजे लाभ सिंह उगोके. ज्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचा पराभव केला. आणि सर्वांनाच प्रश्न पडला की, हे लाभ सिंह उगोके आहेत तरी कोण?
शोध सुरु झाली तेव्हा असे लक्षात आले की, लाभ सिंह उगोके यांचा एक साधारण परिवार आहे आणि त्यांचे एक मोबाईल रिपेरिंगचे दुकान असून ते त्या दुकानात मोबईल दुरुस्तीचे काम करतात. शिवाय त्यांचा प्लबरींगचा डिप्लोमाही झालेला आहे. त्यांनी पंजाब पोलीस आणि आर्मीत भरती होण्याचेही प्रयत्न केले पण ते होउ शकले नाहीत. आज त्यांचे वय अवघे 35 वर्शे इतके आहे.
2013 मध्ये लाभ सिंह उगोके यांनी आम आदमी पक्षासोबत काम करायला सुरुवात केली. ते म्हणतात की, ‘मी एक कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करत होतो. मला कधी असे वाटलेही नव्हते की, मला पक्ष निवडणूकीत उतरवेल आणि मी निवडूण येईल. अनेकांचे म्हणने असे होते की, मी ज्या बरनाला जिल्हयाच्या भदौड भागातून उभा होतो. तो भाग अतिशय मागास आहे. तो पैस्यावर मतदान करतो. पण मी लोकांना हे सांगत होतो की, माझा मतदार संघ हा विकासाने जरी मागास असला तरी तो विचाराणे मागास नाही. तो विचार करुनच मतदान करेल.’ आणि झालेही तसेच.
हेही वाचा
बाबासाहेबांच्या स्पर्शाने विहिरीचे सोने झाले
दलित कुटुंबाच्या खात्यात थेट 10 लाख
या निवडणूकीत लोकांनी विचारपूर्वक मतदान केले आणि लाभ सिंह उगोके यांना थोडयाफार नाही तर प्रचंड मतांनी विजयी केले. लाभ सिंह उगोके यांनी 37,000 मतांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचा पराभव केला.
लाभ सिंह उगोके यांची आई
लाभ सिंह उगोके यांची आईएक सफाई कामगार असून ती 1996 पासून एका शाळेत सफाई कामगार म्हणून नोकरी करते. मुलगा निवडूण आल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्या नियमितपणे शाळेत आणि शाळेची साफसफाई करतात. त्यांना केवळ 1000 रुपये वेतन मिळते. त्या म्हणतात मी हा झाडू कधीच सोडणार नाही. मी माझ काम करत राहीन आणि माझा मुलगा त्याचे काम करत राहील.
लाभ सिंह उगोके यांचे वडील
लाभ सिंह उगोके यांचे वडील एक ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत. ते म्हणतात की, यापूर्वी मला असे वाटत होते की, राजकारण हे श्रीमंतासाठी आहे. पण माझया मुलाने हा पायंडा मोडीत काढला असून राजकारण हे गरीबांसाठी देखिल आहे हे दाखवून दिले आहे.
लाभ सिंह उगोके यांची पत्नी
लाभ सिंह उगोके यांची पत्नी ही कपडे षिवण्याचे काम करते. त्या म्हणतात की, माझे पती जरी आमदार झाले असले तरी मी माझे काम करत राहीन. आमचे कुटुंब एक साधारण कुटुंब असून त्यात कोणताही बदल होणार नाही.
बदल होउ शकतो. बदलाचा विचार केला पाहिजे.
सर.... 👌
ReplyDeleteखूप चांगले लिहिलेय.
सर 👌
ReplyDeleteकामात नाही तर विचारात बदल केल्यामुळे हे घडून आले. नं.1👌🌹डॉ. ह. नि. सोनकांबळे सर. असेच विचार मांडण्याची आणि ते लोकांना पटण्याच्या कामास गती येवो
ReplyDelete