Wednesday, March 29, 2023

सम्राट अशोकाचा भारत "सोने की चिड़िया"

 

 
सम्राट अशोकाचा भारत "सोने की चिड़िया"
डॉ. ह. नि. सोनकांबळे
 

सम्राट अशोक हे महान मौर्य वंशाचे कुलदीपक होते, ज्यांनी आपल्या कृतीने केवळ कुटुंब, कुळ आणि समाजालाच नव्हे तर देश आणि जगाला सत्य आणि अहिंसेचा धडा शिकवला.  मौर्य वंशातील महान सम्राट अशोकाने अखंड भारतावर राज्य केले, त्याचे साम्राज्य उत्तरेकडील हिंदुकुश पर्वतरांगापासून दक्षिणेला गोदावरी नदीपर्यंत, पूर्वेला बांगलादेशापासून ते अफगाणिस्तान, पश्चिमेला इराणपर्यंत पसरले होते.पण भारताला ‘अखंड भारत’ असे म्हणतात. आजचा संपूर्ण भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, बांगलादेश, भूतान, म्यानमार हे चक्रवर्ती सम्राट अशोकाचे राज्य होते. सम्राट अशोकाच्या काळाच "भारत सोने की चिड़िया," असे संबोधले जाते.  आज तो सोने की चिड़िया राहिला नाही.


अशोकाचा खजिना आजही लोकांसाठी एक गूढच आहे. असे म्हणतात कि, अशोकाच्या खजिन्यात 70 हजार टन सोने होते. परंतु या खजिन्याची माहिती त्याच्या 9 गुप्त हेरांकडे होती. अशोकाच्या विशाल साम्राज्याची जबाबदारी अत्यंत हुशार अशा 9 हेरांकडे देण्यात आली होती. अशोकाविषयी असेही म्हटले जाते की त्यांच्याकडे काही महारथी होते ज्यांना पारस दगडापासून सोने बनवण्याची कला ज्ञात होती.

 



त्याचप्रमाणे त्यांनी असंख्य चैत्य व विहार बांधले. अशोकाने देशाच्या विविध भागात प्रमुख महामार्ग आणि रस्त्यांवर धर्मस्तंभांची स्थापना केली. अशोकाच्या काळात अचूक नियोजन, अचूक प्रमाण, संतुलित कल्पनाशक्ती, उद्देशाचे निश्चित यश, सौंदर्यात्मक उदात्तता आणि धार्मिक प्रतीकात्मकता यामुळे स्तंभ बांधणीची कला शिखरावर पोहोचली होती. या खांबांचा वापर स्थापत्यशास्त्रीय नसून स्मारकात्मक होता.

.


अशोकाच्या धर्मप्रसारातून कलेला खूप प्रोत्साहन मिळाले. त्यांनी आपल्या धर्मग्रंथांच्या चिन्हासाठी ब्राह्मी आणि खरोष्टी या दोन लिपी वापरल्या आणि लेखनाची कला देशभर पसरली. अशोकाच्या काळात धार्मिक स्थापत्य आणि शिल्पकलेचा अभूतपूर्व विकास झाला.  त्यांनी तीन वर्षांत 84,000 स्तूप बांधले. यापैकी ऋषिपट्टन (सारनाथ) येथे त्यांनी बांधलेल्या धर्मराजिका स्तूपाचे अवशेष आजही दिसतात. बौद्ध सम्राट अशोकाने बौद्ध अनुयायांसाठी हजारो स्तूप आणि विहार बांधले. त्यांचा एक स्तूप, ग्रेट सांची स्तूप, UNECSO ने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.


सम्राट अशोकाकडून या सहा गोष्टी आपण शिकल्या पाहिजे

आत्म-सुधारणा: 


 
अशोकाच्या शिकवणुकीतून प्रकट होणारे पहिले सत्य म्हणजे आत्म-मूल्यांकनाद्वारे स्वतःला वाईटाकडून चांगल्याकडे आणि चांगल्याकडून चांगल्यामध्ये बदलण्याची क्षमता. अशोकाने आपल्या भूतकाळातील कृत्यांचे आत्ममूल्यांकन केले नसते तर त्याने आपला स्वभाव सुधारण्याचा विचार कधीच केला नसता. स्व-मूल्यांकनामध्ये त्यांचे दोष लक्षात घेणे आणि त्याच परिस्थितीत त्यांच्या प्रतिसादात तीव्र बदलांसह त्यांचे मार्ग सुधारणे समाविष्ट आहे. अशा प्रकारे, त्यांनी पूर्वी युद्धाचा प्रचार केला, परंतु बदललेल्या अशोकाने पुढे शांततेवर विश्वास ठेवला.

संवादाची नवीनतम साधने: 

 
अशोकाच्या जीवनातील आणखी एक मोठा धडा म्हणजे आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी संवादाच्या नवीनतम माध्यमांचा वापर करणे. अशोकाचे शिलालेख  केवळ त्याच्या साम्राज्याची मुख्य लिपी ब्राह्मीमध्येच कोरलेले नाहीत, तर ग्रीक, अरामी (एक प्राचीन पर्शियन लिपी) आणि वायव्य भारतातील स्थानिक लिपी खरोष्टीमध्ये देखील कोरले गेले. या सर्व शिलालेखांतून त्याने दिलेले संदेश हे संदेश जागतिक स्वरूपाचे आहेत.

परराष्ट्र धोरण: 

 
सीमेवर शांतता सुनिश्चित करण्यासाठी अशोकाच्या परराष्ट्र धोरण नीती आजही विचार करण्यास भाग पडणारी आहे. कलिंग जिंकल्यानंतर त्याने पाच ग्रीक शासकांशी संपर्क ठेवला. वाटाघाटीने शांतता प्रस्थापित करण्यासाठी असा जागतिक करार करणारा अशोक हा पहिला भारतीय शासक ठरला. अशोकाचे शेजार्‍यांसोबतचे शांततापूर्ण संबंध हे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी होते. त्यांच्यात अशोकाच्या परराष्ट्रनीतीचा प्रभाव असल्याचे दिसून येते. 

 


 


 प्राणी संरक्षण हक्क: 

 
अवांछित यज्ञांपासून प्राण्यांचे संरक्षण करण्याच्या अशोकाच्या धोरणामुळे शाकाहार हा भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याच्या दिशेने चळवळ सुरू झाली. प्राण्यांच्या अधिकाराच्या दृष्टिकोनातून, अशोकाचे धोरण जगातील पाळीव प्राणी आणि वन्यजीव संरक्षणासाठी दयाळूपणे वागण्याचा एक मैलाचा दगड आहे.

 समानता: 

 
अशोकाने एक कल्याणकारी राज्य निर्माण केले आणि आपल्या लोकसंख्येच्या कल्याणासाठी जवळजवळ पितृत्वाची आवड घेतली, त्याच्या चार दशकांच्या शासनकाळात सर्व प्रजेसाठी समान कायदे आणि शिक्षा होती. राज्याचा पैसा जलसाठ्यांच्या विकास/सुधारणेवर खर्च करण्यात आला, सावलीच्या झाडांनी नटलेले महामार्ग, विहिरी, बागा आणि प्रवाशांसाठी सार्वजनिक अतिथीगृहे बांधण्यात आली.

संयम: 

  त्यांचा सहिष्णुतेचा सल्ला एका शिलालेखात समोर येतो जेथे त्यांनी घोषित केले आहे की, 'सर्व संप्रदाय कोणत्या ना कोणत्या कारणाने आदरास पात्र आहेत. अशा प्रकारे कृती करून, एखादी व्यक्ती केवळ स्वतःच्या समुदायाची उन्नती करत नाही तर इतर लोकांच्या समुदायाची आणि सर्वसाधारणपणे मानवतेची सेवा करते.' 

 


सम्राट अशोकाची १० तत्वे

1. उदारमतवादी असणे आणि स्वार्थ टाळणे.

2. उच्च नैतिक चारित्र्य राखणे.  

3. प्रजेच्या कल्याणासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करण्यास तयार राहणे.

4. प्रामाणिक असणे आणि पूर्ण सचोटी राखणे.

5. दयाळू आणि सौम्य असणे.

6. साधे जीवन जगणे.

7. कोणत्याही प्रकारच्या द्वेषापासून मुक्त असणे.

8. अहिंसेचे पालन करणे.

9. संयम राखणे.

10. शांतता आणि सौहार्द वाढवण्यासाठी जनमताचा आदर करणे.

 

हेही वाचा 

 
आधुनिक जगाकडे बघण्याची नवी दृष्टी देणारे पुस्तक “साखळीचे स्वातंत्र्य” 

महार बटालियनचे जुने संचलन गीत आपल्याला माहीत आहे का? 

दलित कुटुंबाच्या खात्यात थेट 10 लाख  


अशोकाने कलिंगचे युद्ध जिंकल्यानंतर एका शिवलालेखातून भावी पिढीला एक संदेश दिला आहे.
आपल्या एका शिलालेखात त्यांनी असे म्हटले आहे:

“मी राजा झाल्यानंतर आठ वर्षांनी मी कलिंग  जिंकले. या युद्धात सुमारे दीड लाख लोकांना कैदी बनवले गेले. एक लाखाहून अधिक लोक मारले गेले.
यामुळे मला खूप वाईट वाटले. का? जेव्हा स्वतंत्र देश जिंकला जातो तेव्हा लाखो लोक मारले जातात आणि अनेकांना कैद केले जाते.
यामध्ये ब्राह्मण  आणि श्रमिक देखील मारले जातात. जे आपल्या नातेवाईकांवर आणि मित्रांवर खूप प्रेम करतात आणि दास आणि पूर्वजांना समर्पित आहेत,
ते युद्धात मारले गेले किंवा त्यांचे प्रियजन गमावले जातात. त्यामुळे मला पश्चाताप होत आहे.

आता मी धम्माचे पालन करायचे आणि इतरांना शिकवायचे ठरवले आहे.  माझा असा विश्वास आहे की धम्मद्वारे लोकांची मने जिंकणे हे बलाने बदला घेण्यापेक्षा चांगले आहे.
मी हा शिलालेख का लिहीत आहे. कारण, माझ्यानंतर माझी मुले-नातू यांनी अशी युद्धे करू नयेत.  

त्याऐवजी त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार कसा करता येईल याचा विचार का करावा.


Saturday, March 18, 2023

आधुनिक जगाकडे बघण्याची नवी दृष्टी देणारे पुस्तक “साखळीचे स्वातंत्र्य”

 


 आधुनिक जगाकडे बघण्याची नवी दृष्टी देणारे पुस्तक “साखळीचे स्वातंत्र्य”

डॉ. ह. नि. सोनकांबळे

 

एखादा चित्रपट पाहताना आपल्याला एखाद्या नायकाच्या एंन्ट्रीची जशी उत्सुकता असते तीच उत्सुकता या पुस्तकाच्या एका पानावरून पुढच्या पानावर जाताना आपल्या मनात निर्माण होत जाते. हे पुस्तक सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला कुठेच ब्रेक घेऊ देत नाही. सोतोशी नाकामोटो हा नायक जगासमोर तर आलाच नाही शिवाय तो पडद्यावरही येत नाही. पण एखादा चित्रपट नायकाशिवाय असेल तर याचा प्रत्यक्ष थरार वाचकाला वेगळाच अनुभव देऊन जातो. हा थरार अनुभवायचा असेल तर हे पुस्तक नक्की वाचा आणि हो यावर चर्चा करायला अजिबात विसरू नका.(तसेही तुम्ही विसरणार नाहीच म्हणा कारण हे पुस्तक तुम्हाला बोलते केल्याशिवाय राहत नाही.)



डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या “प्रॉब्लेम ऑफ दि रुपी” या ग्रंथाला या वर्षी शंभर वर्ष पुर्ण होत आहेत. हा ग्रंथ आजूनही अनेकांना लवकर समजत नाही. मलाही तो पुर्णपणे समजला नाही. कदाचीत याचे कारण मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी नाही हेही असू शकते. पण माझ्या माहितीप्रमाणे या ग्रंथावर कधीच एखादे चांगले सोप्या भाषेतले व्याख्यानही ऐकायला मिळाले नाही. पण गौरव सोमवंशी यांचे साखळीचे स्वातंत्र्य हे पुस्तक वाचल्यावर पुन्हा एकदा “प्रॉब्लेम ऑफ दि रुपी” हा ग्रंथ वाचण्याची इच्छा निर्माण झाली. कारण अर्थशास्त्रातल्या अनेक संकल्पना अगदी सोप्या भाषेत गौरव सोमवंशी यांनी समजून सांगितल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा “प्रॉब्लेम ऑफ दि रुपी” हा ग्रंथ समजायला सोपा होतो.



    खरं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना असे वाटत होते की, आपण आपल्या अर्थव्यवस्थेवरती बारकाईने लक्ष ठेवून असले पाहिजे. ति कुठे आणि कशी बदलते हे आपण समजून घेतले पाहीजे. कदाचीत हा मंत्र गौरव सोमवंशी यांना समजला असावा आणि त्यातूनच “साखळीचे स्वातंत्र्य” या पुस्तकाचा जन्म झाला असावा असे वाटते किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थीक विचारांच्या प्रभावातून एक नवी दृष्टी लेखकाला प्राप्त झाली आहे म्हणूनच जगाच्या बदलत्या अर्थव्यवस्थेला नजरकैदेत ठेवण्यात लेखक यशस्वी झाला आहे, असेही म्हणता येईल. शिवाय लेखक जगाच्या अर्थव्यवस्थेला नजरकैदेत ठेवून शांत न बसता जगाच्या अर्थव्यवस्थेकडे आणि नव तंत्रज्ञानाकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोणही वाचकांना देतो. कारण चलन म्हणजे काय?, प्राचीन चलनाची पध्दत कशी होती? इथून ते बिटकॉईन पर्यंतचा प्रवास लेखकाने अतिषय सोप्या भाषेत सांगण्याचे काम या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे. 



    मुळात कोणतेही नवे तंत्रज्ञान आले की, आपण सुरूवातीला पेक्षकाच्या भूमिकेत असतो आणि हळू हळू आपण त्याच्या जवळ जायला लागतो आणि एके दिवशी आपण त्याच्या जाळ्यात अडकतो. आजपर्यंतच्या सर्वच तंत्रज्ञानांच्या बाबतीत असेच घडल्याचा इतिहास आहे. मग ते रेडिओ, टेलिव्हीजन, संगणक असो की आपली मूलभूत गरज बनलेला मोबाईल असो. या सर्वच तंत्रज्ञानाकडे सुरूवातील आपण दुरून बघत होतो आणि आता आपण पुर्णपणे त्याच्या जाळ्यात आहोत. 


   हे सर्व तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी आपल्याला बराच काळ गेला. जोपर्यंत आपण हे तंत्रज्ञान समजून घेण्याचा आणि त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करतो तो पर्यंत जगात दुसरीकडे अनेक नव्या तंत्रज्ञानांचा जन्म होतो. पण सध्या बिटकॉइन, मेटाव्हर्स, एनएफटी वा टोकनॉमिक्स असे काही नवीनच शब्द आपल्या कानावर पडत आहेत आणि त्यावर थोडीफार चर्चा दखील आपण ऐकतोय. पण ही चर्चा किती सत्य आणि किती असत्य याचा अंदाज आपल्याला तोपर्यंत बांधता येत नाही, जापर्यंत आपण त्याचा सखोल अभ्यास करत नाही. शिवाय आपल्या अभ्यासाची साधने देखील प्रमाणीत नसल्याने तिथे देखील आपली फसगतच होते. म्हणून कोणतीही बाब पुर्णपणे आणि सत्य समजून घ्यायची असेल तर आपल्याला प्रमाणीत साधनांचा आर्थांत प्रमाणीत संदर्भाचा आधार घ्यावा लागतो.  



    बिटकॉइन, मेटाव्हर्स, एनएफटी वा टोकनॉमिक्स या नवप्रणाली समजून घेताना देखील आपली अवस्था अशीच झाली आहे. आपण प्रमाणीत साधनांचा आणि संदर्भाचा आधार न घेतल्याने या सर्वच प्रणालींच्या बाबतीत आपल्या मनात संभ्रम आहे. पण हा संभ्रम जर दुर करायचा असेल तर गौरव सोमवंशी यांनी लिहलेले साखळीचे स्वातंत्र्य हे पुस्तक एकदा नक्कीच वाचले पाहिजे. हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला आपसूकच असे वाटेल की, कोणतीही नवप्रणाली ही जगाला कवेत घेत नाही तर या नवप्रणालीच्या आधारावर आपण जगालाच कवेत घेऊ शकतो. 



    21 व्या शतकातली जगाची अर्थव्यवस्था आणि नवं तंत्रज्ञान समजून घ्यायचे असेल तर आपण व्हाट्सअप आणि फेसबुक विद्यापीठावर अवलंबून असून चालणार नाही. आपण जर या विद्यापीठावर अवलंबअून राहिलो तर आपली मोठी फसगत होवू शकते. म्हणून ज्यांना आपली फसगत टाळायची आहे आणि बिटकॉइन, मेटाव्हर्स, एनएफटी, टोकनॉक्सि, क्रिप्टोकरन्सी या नवप्रणालीसह ब्लॉकचेन समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचावेच लागेल. कारण हे पुस्तक आपल्या समज आणि गैरसमजाच्या दोन्ही बाजू अत्यंत सोप्या भाषेत दूर करते. शिवाय हे पुस्तक अर्थशास्त्र आणि समाजशास्त्राची जोड देत हे बँकिंग, शेती, वित्तपुरवठा, व्यवसाय, व्यापार अशा विविध क्षेत्रात नेमके काय बदल होत आहेत आणि भविष्यात काय बदल अपेक्षीत आहेत याचीही सखोल चर्चा करते. त्यामूळे वाचकाला जगाकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोण प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. 

blockchain technology
binance smart chain
blockchain mining blockchain technology
web 3
blockchain wallet

 

हेही वाचा :


...आणि वाजपेयींनी नेहरूंचा फोटो पुन्हा लावला. 

 

पांडुरंग वाचला पण सावित्रीमाई गेल्या!  


पं. नेहरू आणि भारताचे विज्ञान (आणखी फोटो पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा)



Monday, March 13, 2023

“कसोटी विवेकाची” पाहण्यासाठी उद्या शेवटची संधी

 


 “कसोटी विवेकाची” पाहण्यासाठी उद्या शेवटची संधी

 

 डॉ. ह. नि. सोनकांबळे

 

 टीप : दि. १४ मार्च रोजी या प्रदर्शनाचा समारोप होणार होता मात्र जनतेच्या आग्रहास्तव हे प्रदर्शन  दि. १५ मार्च २०२३ रोजी देखील सुरु असणार आहे.

 

कोणत्याही धर्माला आणि लोकांच्या धार्मीक स्वातंत्र्याला विरोध न करता लोकांना श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातील फरक सांगून अंधश्रध्देतून बाहेर काढण्यासाठी संपुर्ण आयुष्य खर्ची केलेल्या नरेंद्र दाभेळकर यांच्या संपुर्ण आयुष्याचा प्रवास हा प्रेरणादायी राहिलेला आहे. त्यांचा हा प्रवास चित्र आणि शल्पाच्या माध्यमातून नव्या पीढीसमोर मांडण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम सध्या महराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतो आहे. हाच उपक्रम सध्या छत्रपती संभाजी नगर मध्ये सुरु असून दररोज हजारो नागरीक आणि विद्यार्थी या उपक्रमाला भेट देत आहेत. 

 


 यशवंतराव चव्हाण सेंटर आणि एमजीमए विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत तथा मुंबईतील पत्रकरांची “फ्रेंन्डस ऑफ दाभोलकर परिवर्तन संस्था” निर्मीत  “कसोटी विवेकाची” या  नरेंद्र दाभोलकर यांच्या जिवणावर आधारीत चित्र आणि शिल्प प्रदर्शनाचा उद्या शेवटचा दिवस असणार आहे. याचा उद्घाटन सोहळा दि. 9 मार्च 2023 रोजी सुप्रसिध्द लेखक, नाटककार आणि दिग्दर्शक अरविंद जगताप यांच्य हस्ते पार पडला होता.  

 

 
नरेंद्र दाभोलकर यांच्या जीवनावर आधारीत “कसोटी विवेकाची” या चित्र आणि शिल्प प्रदर्शनातील सर्व कलाकृती या मुंबई येथील जेजे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत. या पुर्वी मुंबई, पुणे आणि कोल्हापूरसह अनेक शहरांत हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. दाभेलकरांच्या जिवनांविषयी व त्यांच्या अंधश्रध्दा निर्मुलनाच्या चळवळीविषयी नव्या पिढीला माहिती व्हावी हा दृष्टीकोण घेऊन संपुर्ण कलाकारांनी आपल्या कलाकृती तयार केलेल्या आहेत.
 
या उपक्रमात काय पहायला मिळेल:



या उपक्रमात नरेंद्र दाभोलकरांचा  एकुणच प्रवास चित्र आणि शिल्प रूपात मांडण्यात आला आहे. त्यांचे बालपण, शिक्षण, चळवळीकडे ते कसे आकर्षीत झाले आणि त्यांनी अंधश्रध्दा निर्मुलनाची ही चळवळ कशा प्रकारे उभी केली याचा पट या प्रदर्शनात सहज समजून घेता येणार आहे.

पुस्तक प्रदर्शन: 

 

 


 
“कसोटी विवेकाची” या  प्रदर्शनात नरेंद्र दाभोलकर लिखित सर्व पुस्तकांचे प्रदर्शनही भरवण्यात आलेले आहे. शिवाय काही पुस्तके आपल्याला विकत देखील घेता येणार आहेत.

अंधश्रध्देचे अर्थात जादूचे प्रयोग :

 


 जालना येथील शंकर बोर्डे यांचे चमत्काराचे प्रयोगही बघायला मिळणार आहेत. (हे प्रयोग पुर्ण दिवसभर असणार नाहीत. आयोजक वेळ निश्चित करून हे प्रयोग सादर करतील)

आपल्या शंकांचे निरसन:

 
श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातला फरक जाणून घेण्यासाठी किंवा आपल्याला या अनुषंगाने काही प्रश्न पडले असतील तर त्याचेही समाधान या प्रदर्शनाच्या दरम्यान तज्ञ मार्गदर्शक करणार आहेत.

भेट देण्यासाठी पत्ता : 

 
कला दिर्घा आर्ट गॅलरी,
एमजीएम क्रिकेट स्टेडियम बिल्डींग,
सेंन्ट्रल नाका रोड,
छत्रपती संभाजी नगर





दि. 9 मार्च 2023 ते दि. 15 मार्च 2023 रात्री 08:00 वाजेपर्यंत हे प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुले असणार आहे. आजपर्यत या प्रदर्शनाला अनेक नागरीकांनी आणि विद्यार्थ्यांनी भेटीर दिल्या आहेत. आपणही एकदा नक्की भेट द्या.  

 

हेही वाचा   

अनुराधाची रिक्षा : संघर्षाची साथीदार  

... आणि पं. नेहरूंनी कुंभमेळ्यात अंघोळ करण्यास नकार दिला !

पांडुरंग वाचला पण सावित्रीमाई गेल्या!  

Thursday, March 9, 2023

पांडुरंग वाचला पण सावित्रीमाई गेल्या!

 


पांडुरंग वाचला पण सावित्रीमाई गेल्या!

 

 डॉ. ह. नि. सोनकांबळे 

 

यशवंत हा महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा दत्तक मुलगा. दक्षिण आफ्रिकेत डॉकटर होता. १९९६-९७ च्या वर्षी तो पुण्याला परत आला कारण त्याला आपल्या आईची तार आली होती.  पुण्यात प्लेगने थैमान घेतले आहे अशा अवस्थेत तुझी गरज इथल्या लोकांना आहे असा संदेश यात नमूद होता. तार मिळताच यशवंत पुण्याला आला. पुण्याच्या जवळ असलेल्या हडपसर मध्ये डॉ. यशवंत फुले यांच्या सासऱ्याची जमनी होती त्या जमिनीवर सावित्रीबाई आणि यशवंत यांनी मिळून झोपड्या उभ्या केल्या आणि याच झोपडीत त्यांनी दवाखाना सुरु केला. हडपसर हा भाग तेव्हा पुण्यापासून थोडा दूर होता. लोकांना संसर्ग होऊ नये म्हणून पुण्यात पेशन्ट आणून इथे ऍडमिट केले जायचे. यशवंत ने इथे हॉस्पिटल सुरु केले. सावित्रीबाई तेव्हा घराघरात जाऊन लोकांची चौकशी कारायच्या आणि कोणी आजारी असेल तर त्याला तात्काळ यशवंतच्या दवाखान्यात ऍडमिट करायच्या.



प्लेगच्या साथीच्या काळात सवित्रीमाईंनी आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा दिली. अशातच त्यांना पांडुरंग गायकवाड या झोपडपट्टीतल्या अस्पृश्य पोराला प्लेग झाल्याचे समजले. सवित्रीमाईंनी पांडुरंगला चंदरात गुंडाळले आणि पाठीवर घेऊन साधारण ८ किलोमीटर दूर असलेला दवाखाना गाठला. त्याला चांगले उपचार मिळाले आणि पांडुरंगाचे प्राण वाचले. पण सावित्रीमाईंना मात्र यात संसर्ग झाला आणि त्या आजारी पडल्या. त्यांचा मृत्यू झाला. एका झोपडितल्या पांडुरंगाला वाचविण्यासाठी सवित्रीमाईंनी आपला प्राण त्याग केला. पुढे यशवंतलाही संसर्ग झाला आणि त्यांचाही मृत्यू झाला. 



महात्मा फुले , सावित्रीबाई फुले आणि यशवंत यांचे जीवन म्हणजे 

उपकारासाटीं बोलों हे उपाय । 


येणेंविण काय आह्मां चाड ॥1॥


बुडतां हे जन न देखवे डोळां । 


येतो कळवळा ह्मणउनि ॥2॥


तुका ह्मणे माझे देखतिल डोळे । 


भोग देते वेळे येइऩल कळों ॥3॥


संत तुकाराम काहाराजांच्या या अभंगाप्रमाणेच म्हणावे लागेल. कारण लोक दारिद्रयात, अंधश्रद्धेत, अज्ञानात असताना त्यांना कधीच बघावेसे वाटले नाहीत. त्याच्या मुक्तीचे दार उघडण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. या कर्यात त्यांनी आपल्या मुलालाही सहभागी करून घेतले आणि या सेवेतच त्यांनी आपला प्राणार्पण केले. 

 

हेही वाचा 

रिक्षाचालक अनुराधाच्या संघर्षयाची कहाणी 

... आणि पं. नेहरूंनी कुंभमेळ्यात अंघोळ करण्यास नकार दिला ! 

...आणि वाजपेयींनी नेहरूंचा फोटो पुन्हा लावला.



 अशा महान मातेचा आज स्मृती दिन त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन.

Wednesday, March 8, 2023

...आणि वाजपेयींनी नेहरूंचा फोटो पुन्हा कार्यालयात लावला.

 

 


 ...आणि  वाजपेयींनी नेहरूंचा फोटो पुन्हा कार्यालयात लावला.


डॉ. ह. नि. सोनकांबळे


प. जवाहरलाल नेहरु देशाचे पहिले पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्यासमोर देशातील आनेक समस्या आणि आव्हाने होती. नुकतीच भारताची फाळणी झाली होती, संस्थानाच्या विलीनिकरणाचा प्रश्न होता, निर्वासितांच्या समस्या होत्या, नविन निर्माण झालेल्या राष्ट्राची कायदा व सुरक्षेचा प्रश्न होता, आर्थिक मागासलेपण, सामाजिक मागासलेपण, गरीबी, बेरोजगारी, निरक्षरता, शिक्षण, आरोग्याच्या समस्या, विज्ञान तंत्रज्ञानाचा अभाव अशा कितीतरी बाहय आणि अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न त्यांच्या समोर आव्हान म्हणून उभे होते. पं. जवाहरलाल नेहरुंनी ही आव्हाने सार्थ पणे पेलली. भारताला एका वेगळया उंचीवर नेवून सोडले. परंतु आजकाल राजकारणात आलेली मंडळी हा इतिहास न वाचताच प्रश्न उपस्थित करतात की, नेहरुंनी काय केले? या  प्रश्नाचे उत्तर देताना अटल बिहारी वाजपेयीच्या जीवनातला एक किस्सा मला महत्वाचा वाटतो.

    अटलबिहारी वाजपेयी 1977 मध्ये परराष्ट्र मंत्री झाले तेव्हा, परराष्ट्र मंत्रालयात प्रवेश करताना त्यांना पूर्वी असलेले पं. नेहरु यांचे भव्य अशा स्वरुपातले तैलचित्र दिसले नाही. 

 

त्यांनी त्या सबंधी अधिकाऱ्यांना  विचारणा केली. तेव्हा अधिकाऱ्यांनी  ते तैलचित्र काढून टाकल्याचे समजले. 

 

अटलबिहारी वाजपेयी यांनी तेच तैलचित्र त्याच ठिकाणी सन्मानाने लावण्याचे आदेश दिले आणि म्हणाले, ‘आज आपण जगात मान उंच करुन चालू शकतो ते नेहरुंच्या परराष्ट्र धोरणामूळे.’ 

 


खरे तर अटल बिहारी वाजपेयी हे नेहरूंचे कट्टर विरोधक होते.  1962 च्या वेळी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान म्हणजेच नेहरूजींवर टीका करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. पण नेहरू किंवा काँग्रेस त्यांच्यावर कधीही शत्रूसारखी वागली नाही. उलट राज्यसभेची बैठक बोलावण्याची त्यांची मागणी  पं.नेहरूंनी मान्य केली. ते राज्यसभेत बोलत असताना त्यांना कोणीही अडवले नाही. नेहरूंवर टीका करत असताना ते म्हणाले कि,

अरुणाचल नेफा (आता अरुणाचल प्रदेश) मध्ये चिनी हल्ल्याचा सामना करण्यासाठी सैन्य सज्ज आहे हे पं.नेहरूंना माहीत होते का?


5 सप्टेंबर आणि 20 ऑक्टोबर रोजी चीनने हल्ला केला. मधल्या काळात भारताने तयारी का केली नाही?


नेफा येथे सीमेवर पहारा देण्यासाठी पुरेसे सैनिक का तैनात केले गेले नाहीत आणि जे तेथे होते त्यांच्याकडे आवश्यक शस्त्रे आणि इतर गोष्टी का नाहीत?


परदेशातून परतल्यानंतर नेहरूंनी चीनसोबतच्या वाढत्या तणावाबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती सर्वांना का दिली नाही..?


मला शंका आहे की सरकारला चीनचा हेतू समजला आहे, अन्यथा युद्धबंदीवर (५ सप्टेंबरनंतर) चर्चा करण्यास सहमती दिली नसती?


 

असे अनेक प्रश्न वाजपेयींनी नेहरूण सभागृहात विचारले. आज असे प्रश विचारले तर लोक देशद्रोहाचे गुन्हे दाखल करता
. पण नेहरू आणि वाजपेयी याना खऱ्याअर्थाने लोकशाही माहित होती म्हणून असा प्रकार कधीच घडला नाही. 

 

आपल्या कामाची पावती विरोधकांनीही द्यावी असा इतिहासच नेहरुंनी निर्माण केला. ज्यांना इतिहास वाचण्याची सवयच नाही त्यांना हे सर्व कळणार तरी कसे म्हणा.


अशाच प्रकारचे राजकीय किस्से वाचण्यासाठी या ब्लॉग ला फॉलो करायला विसरू नका.

लेखक , एमजीएम विद्यापीठ औरंगाबाद येथे  राज्यशास्त्र व शासन विभागात सहाय्यक प्राध्यपक आहेत.


Thursday, March 2, 2023

सादर करा १२ लाखांपर्यंतचे प्रकल्प (Project )



 सादर करा १२ लाखांपर्यंतचे प्रकल्प (Project )

 डॉ. ह. नि. सोनकांबळे

 

ICSSR हि भारतातील सामाजिक संशोधनात काम करणारी सर्वात मोठी संस्था असून या संस्थेने नुकतेच NSTC सोबत एक करार केला आहे या करारांतर्गत सामाजिक क्षेत्रात संशोधन करणाऱ्यांसाठी विविध प्रकल्प (Project) मागवले आहेत. या प्रकल्पासाठी संशोधकांना १२ लाखांपर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे.

भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद (ICSSR) आणि राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद (NSTC), तैपेई, तैवान यांनी संयुक्तपणे सामाजिक विज्ञान क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भेटी, विद्वानांची देवाणघेवाण आणि द्विपक्षीय संयुक्त प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. संशोधन प्रकल्प. या द्विपक्षीय करारांतर्गत, मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे या  क्षेत्रातील भारतीय आणि तैवानच्या संशोधकांच्या संयुक्त संशोधन प्रकल्पांसाठी अनुदानासाठी संशोधन प्रस्ताव आमंत्रित केले आहेत. यात प्रामुख्याने परस्पर महत्त्वाच्या आणि संबंध मजबूत करण्याच्या नवीन आणि उदयोन्मुख विषयांवर भर दिला जाईल.

 भारत-तैवान (ICSSR-NSTC) द्विपक्षीय सहयोगी संशोधन प्रकल्पावर भारत आणि तैवानच्या प्रकल्प यजमानांनी  (मुख्य अन्वेषक) संयुक्तपणे चर्चा केली पाहिजे आणि सादर केली पाहिजे. त्यापैकी, भारतीय यजमानांनी मार्गदर्शक तत्त्वाच्या नियमांनुसार ICSSR ला अर्ज करणे आवश्यक आहे; त्यांच्या योजनेच्या तैवानच्या यजमानाने "द्विपक्षीय कराराच्या विस्तारासाठी" " “Add-on International Cooperation Research Project". साठी NSTC ला अर्ज करणे आवश्यक आहे.

पात्रता

अर्जदारांनी एखाद्या मान्यताप्राप्त संशोधन किंवा शैक्षणिक संस्थेमध्ये संशोधन किंवा शैक्षणिक पदावर काम केले पाहिजे - एकतर सार्वजनिकरित्या अनुदानीत विद्यापीठ/कॉलेज, UGC द्वारे मान्यताप्राप्त मानली जाणारी विद्यापीठे किंवा सार्वजनिकरित्या अनुदानीत संशोधन संस्था किंवा ICSSR संशोधन संस्था. त्यांच्याकडे पीएचडी किंवा समतुल्य पात्रता देखील असणे आवश्यक आहे आणि उच्च दर्जाच्या संशोधनामध्ये स्वारस्य असणे आवश्यक आहे जे मागील अभ्यास, प्रकाशने आणि शैक्षणिक पार्श्वभूमी द्वारे स्पष्ट होऊ शकते.

सहयोगाची क्षेत्रे - Areas of Collaboration

(1) आर्थिक/वाणिज्य/व्यवस्थापन/व्यवसाय प्रशासन
(२) समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्र/ सामाजिक कार्य/ लोकसंख्या/ लिंग अभ्यास
(३) राज्यशास्त्र/आंतरराष्ट्रीय संबंध/भूगोल/सार्वजनिक प्रशासन
(४) मानसशास्त्र/शिक्षण/क्रिमिनोलॉजी/कायदा
(५) भाषाशास्त्र
(6) सांस्कृतिक अभ्यास
(7) क्षेत्र अभ्यास
(8) इतिहास
(9) बौद्ध अभ्यास

अनुदान रक्कम:

आर्थिक सहाय्य मुळात प्रत्येक बाजूच्या संशोधकांच्या गतिशीलतेसाठी उपलब्ध आहे. या अनुदानासाठी जास्तीत जास्त रु. प्रत्येक प्रकल्पासाठी 12,00,000 (रुपये फक्त बारा लाख)

अनुदानाची गतिशीलता:

भेट देणारा पक्ष आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत (आंतर-शहर) हवाई प्रवासाचा खर्च भागवेल. भेट देणार्‍या शास्त्रज्ञांच्या निवासस्थान, निवास आणि स्थानिक भूपृष्ठ वाहतुकीसाठीचा खर्च स्वीकारणारा पक्ष ठराविक दिवसांसाठी आणि दोन पक्षांनी प्रत्येक प्रकरणाच्या आधारावर ठरवल्या जाणार्‍या व्यक्तींसाठी स्थानिक आदरातिथ्य खर्चाची पूर्तता करेल..

मुख्य तारखा:

(१) अर्जाचा कालावधी: ०१ मार्च २०२३ ते १ मे २०२३

(२) पीअर-पुनरावलोकन पूर्ण करणे: ऑगस्ट २०२३

(३) निकालाची घोषणा आणि मंजुरीची तारीख: डिसेंबर २०२३

(4) संयुक्त प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा कालावधी: 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2025, 2 वर्षांचा कालावधी (प्रकल्प कालावधी)

महत्त्वाचे मुद्दे:

(1) या संयुक्त संशोधन प्रकल्पाचे स्वतंत्र पुनरावलोकन केल्यानंतर भारतीय बाजू (ICSSR) आणि तैवानच्या बाजूने (NSTC) सह-पुनरावलोकन आणि निवड केली जाईल.

(२) खालील परिस्थितीत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत:

i भारतीय मुख्य अन्वेषकांची पात्रता ICSSR च्या आवश्यकता पूर्ण करत नाही आणि तैवानचे मुख्य अन्वेषक NSTC ची आवश्यकता पूर्ण करत नाहीत;

ii मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज

iii अपूर्ण असलेले अर्ज

iv  मार्गदर्शक तत्त्वांच्या मुख्य मुद्द्यांनुसार आणि या अर्जात वर्णन केलेल्या पद्धतीनुसार सादर न केलेले अर्ज.

(३) दोन्ही पक्षांचे मुख्य अन्वेषक वार्षिक योजना अंमलबजावणी कालावधी संपण्यापूर्वी/नंतर मध्यावधी/अंतिम मुदतीचे "द्विपक्षीय करार-प्रकार विस्तार" प्रदान करतील.

(4) सहकार्याचे नियोजन करताना, दोन्ही पक्षांचे प्रमुख अन्वेषक प्रथम दोन्ही पक्षांच्या भविष्यातील बौद्धिक संपदा हक्कांच्या मालकी आणि व्यवस्थापनावर आणि दोन्ही पक्षांच्या उपलब्धींवर सहमत होतील. व्यवस्थापन आणि ऑपरेशन पद्धती आणि आवश्यक असल्यास, संबंधित प्रकल्प करारावर एकत्र स्वाक्षरी केली जाऊ शकते

अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन सादर करणे आवश्यक आहे



सर्व बाबतीत पूर्ण झालेले प्रकल्प प्रस्ताव दोन्ही प्रकारे प्राप्त झाले पाहिजेत.  भारतीय संशोधकांनी 1 मे 2023 रोजी किंवा त्यापूर्वी ICSSR कडे दिलेल्या अर्जात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (किंवा हार्ड कॉपी) अर्ज सादर केले पाहिजेत. कॉल मार्गदर्शक तत्त्वे आणि अर्जाचे स्वरूप खाली दिले आहे.

(५) संयुक्त संशोधन प्रकल्पांच्या परिणामी कोणत्याही प्रकाशनात ICSSR आणि NSTC द्वारे समर्थनाची योग्य पोचपावती केली पाहिजे.

अधिक माहितीसाठी आणि इंग्रजीतून जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

https://icssr.org/nstc-joint-call-research-2024