Thursday, March 9, 2023

पांडुरंग वाचला पण सावित्रीमाई गेल्या!

 


पांडुरंग वाचला पण सावित्रीमाई गेल्या!

 

 डॉ. ह. नि. सोनकांबळे 

 

यशवंत हा महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा दत्तक मुलगा. दक्षिण आफ्रिकेत डॉकटर होता. १९९६-९७ च्या वर्षी तो पुण्याला परत आला कारण त्याला आपल्या आईची तार आली होती.  पुण्यात प्लेगने थैमान घेतले आहे अशा अवस्थेत तुझी गरज इथल्या लोकांना आहे असा संदेश यात नमूद होता. तार मिळताच यशवंत पुण्याला आला. पुण्याच्या जवळ असलेल्या हडपसर मध्ये डॉ. यशवंत फुले यांच्या सासऱ्याची जमनी होती त्या जमिनीवर सावित्रीबाई आणि यशवंत यांनी मिळून झोपड्या उभ्या केल्या आणि याच झोपडीत त्यांनी दवाखाना सुरु केला. हडपसर हा भाग तेव्हा पुण्यापासून थोडा दूर होता. लोकांना संसर्ग होऊ नये म्हणून पुण्यात पेशन्ट आणून इथे ऍडमिट केले जायचे. यशवंत ने इथे हॉस्पिटल सुरु केले. सावित्रीबाई तेव्हा घराघरात जाऊन लोकांची चौकशी कारायच्या आणि कोणी आजारी असेल तर त्याला तात्काळ यशवंतच्या दवाखान्यात ऍडमिट करायच्या.



प्लेगच्या साथीच्या काळात सवित्रीमाईंनी आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा दिली. अशातच त्यांना पांडुरंग गायकवाड या झोपडपट्टीतल्या अस्पृश्य पोराला प्लेग झाल्याचे समजले. सवित्रीमाईंनी पांडुरंगला चंदरात गुंडाळले आणि पाठीवर घेऊन साधारण ८ किलोमीटर दूर असलेला दवाखाना गाठला. त्याला चांगले उपचार मिळाले आणि पांडुरंगाचे प्राण वाचले. पण सावित्रीमाईंना मात्र यात संसर्ग झाला आणि त्या आजारी पडल्या. त्यांचा मृत्यू झाला. एका झोपडितल्या पांडुरंगाला वाचविण्यासाठी सवित्रीमाईंनी आपला प्राण त्याग केला. पुढे यशवंतलाही संसर्ग झाला आणि त्यांचाही मृत्यू झाला. 



महात्मा फुले , सावित्रीबाई फुले आणि यशवंत यांचे जीवन म्हणजे 

उपकारासाटीं बोलों हे उपाय । 


येणेंविण काय आह्मां चाड ॥1॥


बुडतां हे जन न देखवे डोळां । 


येतो कळवळा ह्मणउनि ॥2॥


तुका ह्मणे माझे देखतिल डोळे । 


भोग देते वेळे येइऩल कळों ॥3॥


संत तुकाराम काहाराजांच्या या अभंगाप्रमाणेच म्हणावे लागेल. कारण लोक दारिद्रयात, अंधश्रद्धेत, अज्ञानात असताना त्यांना कधीच बघावेसे वाटले नाहीत. त्याच्या मुक्तीचे दार उघडण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. या कर्यात त्यांनी आपल्या मुलालाही सहभागी करून घेतले आणि या सेवेतच त्यांनी आपला प्राणार्पण केले. 

 

हेही वाचा 

रिक्षाचालक अनुराधाच्या संघर्षयाची कहाणी 

... आणि पं. नेहरूंनी कुंभमेळ्यात अंघोळ करण्यास नकार दिला ! 

...आणि वाजपेयींनी नेहरूंचा फोटो पुन्हा लावला.



 अशा महान मातेचा आज स्मृती दिन त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन.

No comments:

Post a Comment