Monday, March 13, 2023

“कसोटी विवेकाची” पाहण्यासाठी उद्या शेवटची संधी

 


 “कसोटी विवेकाची” पाहण्यासाठी उद्या शेवटची संधी

 

 डॉ. ह. नि. सोनकांबळे

 

 टीप : दि. १४ मार्च रोजी या प्रदर्शनाचा समारोप होणार होता मात्र जनतेच्या आग्रहास्तव हे प्रदर्शन  दि. १५ मार्च २०२३ रोजी देखील सुरु असणार आहे.

 

कोणत्याही धर्माला आणि लोकांच्या धार्मीक स्वातंत्र्याला विरोध न करता लोकांना श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातील फरक सांगून अंधश्रध्देतून बाहेर काढण्यासाठी संपुर्ण आयुष्य खर्ची केलेल्या नरेंद्र दाभेळकर यांच्या संपुर्ण आयुष्याचा प्रवास हा प्रेरणादायी राहिलेला आहे. त्यांचा हा प्रवास चित्र आणि शल्पाच्या माध्यमातून नव्या पीढीसमोर मांडण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम सध्या महराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतो आहे. हाच उपक्रम सध्या छत्रपती संभाजी नगर मध्ये सुरु असून दररोज हजारो नागरीक आणि विद्यार्थी या उपक्रमाला भेट देत आहेत. 

 


 यशवंतराव चव्हाण सेंटर आणि एमजीमए विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत तथा मुंबईतील पत्रकरांची “फ्रेंन्डस ऑफ दाभोलकर परिवर्तन संस्था” निर्मीत  “कसोटी विवेकाची” या  नरेंद्र दाभोलकर यांच्या जिवणावर आधारीत चित्र आणि शिल्प प्रदर्शनाचा उद्या शेवटचा दिवस असणार आहे. याचा उद्घाटन सोहळा दि. 9 मार्च 2023 रोजी सुप्रसिध्द लेखक, नाटककार आणि दिग्दर्शक अरविंद जगताप यांच्य हस्ते पार पडला होता.  

 

 
नरेंद्र दाभोलकर यांच्या जीवनावर आधारीत “कसोटी विवेकाची” या चित्र आणि शिल्प प्रदर्शनातील सर्व कलाकृती या मुंबई येथील जेजे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत. या पुर्वी मुंबई, पुणे आणि कोल्हापूरसह अनेक शहरांत हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. दाभेलकरांच्या जिवनांविषयी व त्यांच्या अंधश्रध्दा निर्मुलनाच्या चळवळीविषयी नव्या पिढीला माहिती व्हावी हा दृष्टीकोण घेऊन संपुर्ण कलाकारांनी आपल्या कलाकृती तयार केलेल्या आहेत.
 
या उपक्रमात काय पहायला मिळेल:



या उपक्रमात नरेंद्र दाभोलकरांचा  एकुणच प्रवास चित्र आणि शिल्प रूपात मांडण्यात आला आहे. त्यांचे बालपण, शिक्षण, चळवळीकडे ते कसे आकर्षीत झाले आणि त्यांनी अंधश्रध्दा निर्मुलनाची ही चळवळ कशा प्रकारे उभी केली याचा पट या प्रदर्शनात सहज समजून घेता येणार आहे.

पुस्तक प्रदर्शन: 

 

 


 
“कसोटी विवेकाची” या  प्रदर्शनात नरेंद्र दाभोलकर लिखित सर्व पुस्तकांचे प्रदर्शनही भरवण्यात आलेले आहे. शिवाय काही पुस्तके आपल्याला विकत देखील घेता येणार आहेत.

अंधश्रध्देचे अर्थात जादूचे प्रयोग :

 


 जालना येथील शंकर बोर्डे यांचे चमत्काराचे प्रयोगही बघायला मिळणार आहेत. (हे प्रयोग पुर्ण दिवसभर असणार नाहीत. आयोजक वेळ निश्चित करून हे प्रयोग सादर करतील)

आपल्या शंकांचे निरसन:

 
श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातला फरक जाणून घेण्यासाठी किंवा आपल्याला या अनुषंगाने काही प्रश्न पडले असतील तर त्याचेही समाधान या प्रदर्शनाच्या दरम्यान तज्ञ मार्गदर्शक करणार आहेत.

भेट देण्यासाठी पत्ता : 

 
कला दिर्घा आर्ट गॅलरी,
एमजीएम क्रिकेट स्टेडियम बिल्डींग,
सेंन्ट्रल नाका रोड,
छत्रपती संभाजी नगर





दि. 9 मार्च 2023 ते दि. 15 मार्च 2023 रात्री 08:00 वाजेपर्यंत हे प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुले असणार आहे. आजपर्यत या प्रदर्शनाला अनेक नागरीकांनी आणि विद्यार्थ्यांनी भेटीर दिल्या आहेत. आपणही एकदा नक्की भेट द्या.  

 

हेही वाचा   

अनुराधाची रिक्षा : संघर्षाची साथीदार  

... आणि पं. नेहरूंनी कुंभमेळ्यात अंघोळ करण्यास नकार दिला !

पांडुरंग वाचला पण सावित्रीमाई गेल्या!  

No comments:

Post a Comment