आधुनिक जगाकडे बघण्याची नवी दृष्टी देणारे पुस्तक “साखळीचे स्वातंत्र्य”
डॉ. ह. नि. सोनकांबळे
एखादा चित्रपट पाहताना आपल्याला एखाद्या नायकाच्या एंन्ट्रीची जशी उत्सुकता असते तीच उत्सुकता या पुस्तकाच्या एका पानावरून पुढच्या पानावर जाताना आपल्या मनात निर्माण होत जाते. हे पुस्तक सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला कुठेच ब्रेक घेऊ देत नाही. सोतोशी नाकामोटो हा नायक जगासमोर तर आलाच नाही शिवाय तो पडद्यावरही येत नाही. पण एखादा चित्रपट नायकाशिवाय असेल तर याचा प्रत्यक्ष थरार वाचकाला वेगळाच अनुभव देऊन जातो. हा थरार अनुभवायचा असेल तर हे पुस्तक नक्की वाचा आणि हो यावर चर्चा करायला अजिबात विसरू नका.(तसेही तुम्ही विसरणार नाहीच म्हणा कारण हे पुस्तक तुम्हाला बोलते केल्याशिवाय राहत नाही.)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या “प्रॉब्लेम ऑफ दि रुपी” या ग्रंथाला या वर्षी शंभर वर्ष पुर्ण होत आहेत. हा ग्रंथ आजूनही अनेकांना लवकर समजत नाही. मलाही तो पुर्णपणे समजला नाही. कदाचीत याचे कारण मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी नाही हेही असू शकते. पण माझ्या माहितीप्रमाणे या ग्रंथावर कधीच एखादे चांगले सोप्या भाषेतले व्याख्यानही ऐकायला मिळाले नाही. पण गौरव सोमवंशी यांचे साखळीचे स्वातंत्र्य हे पुस्तक वाचल्यावर पुन्हा एकदा “प्रॉब्लेम ऑफ दि रुपी” हा ग्रंथ वाचण्याची इच्छा निर्माण झाली. कारण अर्थशास्त्रातल्या अनेक संकल्पना अगदी सोप्या भाषेत गौरव सोमवंशी यांनी समजून सांगितल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा “प्रॉब्लेम ऑफ दि रुपी” हा ग्रंथ समजायला सोपा होतो.
खरं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना असे वाटत होते की, आपण आपल्या अर्थव्यवस्थेवरती बारकाईने लक्ष ठेवून असले पाहिजे. ति कुठे आणि कशी बदलते हे आपण समजून घेतले पाहीजे. कदाचीत हा मंत्र गौरव सोमवंशी यांना समजला असावा आणि त्यातूनच “साखळीचे स्वातंत्र्य” या पुस्तकाचा जन्म झाला असावा असे वाटते किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थीक विचारांच्या प्रभावातून एक नवी दृष्टी लेखकाला प्राप्त झाली आहे म्हणूनच जगाच्या बदलत्या अर्थव्यवस्थेला नजरकैदेत ठेवण्यात लेखक यशस्वी झाला आहे, असेही म्हणता येईल. शिवाय लेखक जगाच्या अर्थव्यवस्थेला नजरकैदेत ठेवून शांत न बसता जगाच्या अर्थव्यवस्थेकडे आणि नव तंत्रज्ञानाकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोणही वाचकांना देतो. कारण चलन म्हणजे काय?, प्राचीन चलनाची पध्दत कशी होती? इथून ते बिटकॉईन पर्यंतचा प्रवास लेखकाने अतिषय सोप्या भाषेत सांगण्याचे काम या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे.
मुळात कोणतेही नवे तंत्रज्ञान आले की, आपण सुरूवातीला पेक्षकाच्या भूमिकेत असतो आणि हळू हळू आपण त्याच्या जवळ जायला लागतो आणि एके दिवशी आपण त्याच्या जाळ्यात अडकतो. आजपर्यंतच्या सर्वच तंत्रज्ञानांच्या बाबतीत असेच घडल्याचा इतिहास आहे. मग ते रेडिओ, टेलिव्हीजन, संगणक असो की आपली मूलभूत गरज बनलेला मोबाईल असो. या सर्वच तंत्रज्ञानाकडे सुरूवातील आपण दुरून बघत होतो आणि आता आपण पुर्णपणे त्याच्या जाळ्यात आहोत.
हे सर्व तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी आपल्याला बराच काळ गेला. जोपर्यंत आपण हे तंत्रज्ञान समजून घेण्याचा आणि त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करतो तो पर्यंत जगात दुसरीकडे अनेक नव्या तंत्रज्ञानांचा जन्म होतो. पण सध्या बिटकॉइन, मेटाव्हर्स, एनएफटी वा टोकनॉमिक्स असे काही नवीनच शब्द आपल्या कानावर पडत आहेत आणि त्यावर थोडीफार चर्चा दखील आपण ऐकतोय. पण ही चर्चा किती सत्य आणि किती असत्य याचा अंदाज आपल्याला तोपर्यंत बांधता येत नाही, जापर्यंत आपण त्याचा सखोल अभ्यास करत नाही. शिवाय आपल्या अभ्यासाची साधने देखील प्रमाणीत नसल्याने तिथे देखील आपली फसगतच होते. म्हणून कोणतीही बाब पुर्णपणे आणि सत्य समजून घ्यायची असेल तर आपल्याला प्रमाणीत साधनांचा आर्थांत प्रमाणीत संदर्भाचा आधार घ्यावा लागतो.
बिटकॉइन, मेटाव्हर्स, एनएफटी वा टोकनॉमिक्स या नवप्रणाली समजून घेताना देखील आपली अवस्था अशीच झाली आहे. आपण प्रमाणीत साधनांचा आणि संदर्भाचा आधार न घेतल्याने या सर्वच प्रणालींच्या बाबतीत आपल्या मनात संभ्रम आहे. पण हा संभ्रम जर दुर करायचा असेल तर गौरव सोमवंशी यांनी लिहलेले साखळीचे स्वातंत्र्य हे पुस्तक एकदा नक्कीच वाचले पाहिजे. हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला आपसूकच असे वाटेल की, कोणतीही नवप्रणाली ही जगाला कवेत घेत नाही तर या नवप्रणालीच्या आधारावर आपण जगालाच कवेत घेऊ शकतो.
21 व्या शतकातली जगाची अर्थव्यवस्था आणि नवं तंत्रज्ञान समजून घ्यायचे असेल तर आपण व्हाट्सअप आणि फेसबुक विद्यापीठावर अवलंबून असून चालणार नाही. आपण जर या विद्यापीठावर अवलंबअून राहिलो तर आपली मोठी फसगत होवू शकते. म्हणून ज्यांना आपली फसगत टाळायची आहे आणि बिटकॉइन, मेटाव्हर्स, एनएफटी, टोकनॉक्सि, क्रिप्टोकरन्सी या नवप्रणालीसह ब्लॉकचेन समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचावेच लागेल. कारण हे पुस्तक आपल्या समज आणि गैरसमजाच्या दोन्ही बाजू अत्यंत सोप्या भाषेत दूर करते. शिवाय हे पुस्तक अर्थशास्त्र आणि समाजशास्त्राची जोड देत हे बँकिंग, शेती, वित्तपुरवठा, व्यवसाय, व्यापार अशा विविध क्षेत्रात नेमके काय बदल होत आहेत आणि भविष्यात काय बदल अपेक्षीत आहेत याचीही सखोल चर्चा करते. त्यामूळे वाचकाला जगाकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोण प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही.
blockchain technology
binance smart chain
blockchain mining blockchain technology
web 3
blockchain wallet
हेही वाचा :
...आणि वाजपेयींनी नेहरूंचा फोटो पुन्हा लावला.
पांडुरंग वाचला पण सावित्रीमाई गेल्या!
पं. नेहरू आणि भारताचे विज्ञान (आणखी फोटो पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा)
No comments:
Post a Comment