Thursday, April 6, 2023

केसांची निर्यात - भारत जगात पहिल्या क्रमांकावर

केसांची निर्यात - भारत जगात पहिल्या क्रमांकावर 

डॉ. ह. नि. सोनकांबळे

 

विनंती - ब्लॉग पेज ला फॉलो करायला विसरू नका.

 
आपल्या गावात केसांवर – काटे, फुगे, पिना, टिकल्या विकणारे रोजच पहायला मिळतात. विशेषत: ग्रामीण भागातील स्त्रिया आपल्या रोजच्या विंचरण्याच्या केसातून अशा वस्तू खरेदी करतात. आता तर केसांवर भांडे आणि इतरही महत्वाच्या घरगुती वस्तु मिळतात. या वस्तू विकत घेतांना आपण त्या विक्रेत्यांना कधीच विचारत नाही की, हे केस किती रूपये किलो ने विकले जातात? पण या केंसांची किंमत आणि जगभरातील मार्केटचा विचार केला तर तुम्ही थक्क व्हाल.  



केसांची निर्यात करणारा भारत हा जगातला पहिल्या क्रमांकाचा देश आहे. अनेक वर्षापासून जगभरात भारतीय केसांची प्रचंड मागणी राहील आहे. दरवर्षी जवळपास 165 मिलियन डॉलरच्या केसांची निर्यात भारतातून होते. या सर्व रकमेचा आकडा जर भारतीय रूपयांमध्ये बघितला तर 13,56,08,55,000.00 इतका होतो. भारताबरोबरच इतरही देश केसांची निर्यात करतात. परंतु भारतातून सर्वात जास्त केसांची निर्यात केली जाते.
आता आपल्याला प्रश्न पडला असेल की, भारतच केसांच्या निर्यातीत पहिल्या क्रमांकावर कसा काय? याचे साधे उत्तर आहे की, भारतात अशा काही धार्मिक प्रथा आणि परंपरा आहेत त्यात केसांचे दान केले जाते किंवा केस देवाला अर्पण केले जातात. 



भारतात अनेक वर्षापासून केशवपनाची प्रथा चालू होती असे आपण ऐकले असेल किंवा वाचलेही असेल. शिवाय तिरूपती बालाजी मंदिरात अनेक भक्त देवाला केस दान करतात. तुम्ही जर तिरूपतीला कधी गेलात तर तुम्हाला असे हजारो लोक देवाला केस दान करताना दिसतील. इतके लोक केस दान करणारे असताना देखील तिथे रस्त्यावर किंवा कच­यात कुठेही केस आढळून येत नाहीत. मग साधा प्रश्न पडतो की, हे केस नेमके जातात तरी कुठे?
याचे साधे सरळ उत्तर आहे या सर्व केसांची भारतातून मोठ्या प्रमाणात निर्यात होते आणि हे केस लाखोंच्या भावाने परदेशात विकले जातात. 



भारता बरोबरच इतरही काही देश असे आहेत जे केसांची निर्यात करतात. त्या देशांचा क्रमांक अनुक्रमे खालील प्रमाणे लागतो. 


केसांची निर्यात करणारे भारतातील प्रमुख देश – 2021


खालील आकडे दशलक्ष युस डॉलरमध्ये आहेत.(in million U.S. dollars)


1. भारत - 165 (in million U.S. dollars)

2. हाँग काँग – 4.1
3. पाकिस्तान – 2.2
4. ब्राझील – 2.1
5. अमेरिका – 0.92
6. इंडोनेशिया – 0.8
7. व्हिएतनाम – 0.66
8. चिन – 0.53
9. जापान – 0.51
10. नेदरलँड - 0.41

भारतातून होणा­या केसांच्या निर्यातीत आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या प्रमुख राज्यातून जास्त केसांची निर्यात केली जाते. 



भारतात दोन प्रकारचे केसा गोळा केले जातात एक रेमी आणि दुसरे नॉन रेमी केस. रेमी केस हे सर्वोत्तम आणि चागल्या दर्जाचे केस असतात जे मंदिरामधून गोळा केले जातात जिथे लोक धार्मिक भावनेतून देवाला किंवा देवीला केस दान करतात. ज्याचा उपयोग विग साठी किंवा इतर प्रकारच्या केस रचनेसाठी करतात तर नॉन रेमी केस हे खेड्यापाडयातून कच­याच्या रूपात जमा केले जातात. 


काही दिवसांपूर्वी भारत सरकारने केंसांच्या निर्यातिवर बंधने घालून दिली आहेत. पुर्वी केसांची निर्यात करण्याकरीता कोणतीही बंधने नव्हती मात्र आता निर्यातदाराला वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यरित असलेल्या डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड कडून परवानगी किंवा परवाना घ्यावा लागतो. 

 

हेही वाचा 

सम्राट अशोकाचा भारत "सोने की चिड़िया" 

 

...आणि वाजपेयींनी नेहरूंचा फोटो पुन्हा कार्यालयात लावला.  

 

... आणि पं. नेहरूंनी कुंभमेळ्यात अंघोळ करण्यास नकार दिला !  


No comments:

Post a Comment