Showing posts with label NArendra Modi. Show all posts
Showing posts with label NArendra Modi. Show all posts

Friday, August 11, 2023

भारतीय लोकशाहीचा दर्जा पुन्हा ढासाळला - ६६ व्या क्रमांकावरून थेट ...

 


भारतीय लोकशाहीचा दर्जा पुन्हा ढासाळला - ६६ व्या क्रमांकावरून थेट ... 

डॉ. ह. नि. सोनकांबळे 



भारत देशाने इतिहासात दोन गोष्टी गमावल्या व त्या हजारो वर्षानंतर  परत पुन्हा मिळवल्या त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ‘लोकशाही’  आणि दुसरी म्हणजे ‘स्वातंत्र्य’ होय. या दोन्ही गोष्टी गमावण्यास आम्ही स्वतः जबाबदार आहोत, हे मान्यच करावे लागते. परंतु अथक परिश्रमानंतर आणि संघर्षानंतर या दोन्ही गोष्टी परत मिळवण्यात आम्हाला यश देखील मिळाले आहे. त्या पुन्हा गमावल्या जावू नयेत म्हणूनच त्याचे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. पंचाहत्तर वर्षानंतर या दोन्ही गोष्टी आमच्या हातून पुन्हा निघून जातील की काय? याची आता चिंता वाटू लागली आहे, नव्हे ही चिंता संविधानकर्त्याच्या मनात देखिल होती. म्हणूनच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर 25 नोव्हेंबर 1947 रोजी संविधान सभेतल्या भाषणात लोकशाही संबंधी बोलताना म्हणाले होते की,‘लोकशाहीप्रणीत पध्दती भारताने गमाविली, तो पुन्हा दुसऱ्यांदा ती गमावणार की काय, हे मला सांगता येत नाही. ज्या देशात लोकशाहीचा फार उपयोग करण्यात आलेला नाही. त्या देशात लोकशाही ही एक नवीन चीज मानली जाते. अशा देषांपैकीच भारत हा एक देशा आहे. अशा प्रकारच्या देशातील लोकशाही आपला कारभार चालवीत असताना, आपल्या जागेवर अधिष्टित होण्यास हुकूमशाहीला आमंत्रण देण्याची शक्यता आहे. भारतात नवोदित झालेली लोकशाही आपले बाह्यांग व्यवस्थितपणे शाबूत राखून ठेवू शकेल, परंतु ती व्यवहारात हुकूमशाहीला आपली जागा बळकाविण्यास वाव देईल, असा प्रकार घडून येणे सर्वथैव शक्य  आहे. जर निरसटपणाची जागा असेल तर ती धोक्याची होय; पण तिच्यावरुन घसरत खोल दरीत पडण्याची शक्यता त्याहूनही जास्त धोक्याची होय.’ हा बाबासाहेबांचा इशारा सार्थ ठरतो की काय? याची चिंता आता भारतीयांना सतावत आहे. 



‘इकाॅनाॅमिक इंटेलिजन्स युनिट’ या आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञांच्या संशोधन व विश्लेषण करणाऱ्या संस्थेचे २०१४ पासून ते भारत देशाने इतिहासात दोन गोष्टी गमावल्या व त्या हजारो वर्षानंतर  परत पुन्हा मिळवल्या त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ‘लोकशाही’  आणि दुसरी म्हणजे ‘स्वातंत्र्य’ होय. या दोन्ही गोष्टी गमावण्यास आम्ही स्वतः जबाबदार आहोत, हे मान्यच करावे लागते. परंतु अथक परिश्रमानंतर आणि संघर्षानंतर या दोन्ही गोष्टी परत मिळवण्यात आम्हाला यश देखील मिळाले आहे. त्या पुन्हा गमावल्या जावू नयेत म्हणूनच त्याचे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. पंचाहत्तर वर्षानंतर या दोन्ही गोष्टी आमच्या हातून पुन्हा निघून जातील की काय? याची आता चिंता वाटू लागली आहे, नव्हे ही चिंता संविधानकर्त्याच्या मनात देखिल होती. म्हणूनच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर 25 नोव्हेंबर 1947 रोजी संविधान सभेतल्या भाषणात लोकशाही संबंधी बोलताना म्हणाले होते की,‘लोकशाहीप्रणीत पध्दती भारताने गमाविली, तो पुन्हा दुसऱ्यांदा ती गमावणार की काय, हे मला सांगता येत नाही. ज्या देशात लोकशाहीचा फार उपयोग करण्यात आलेला नाही. त्या देशात लोकशाही ही एक नवीन चीज मानली जाते. अशा देषांपैकीच भारत हा एक देशा आहे. अशा प्रकारच्या देशातील लोकशाही आपला कारभार चालवीत असताना, आपल्या जागेवर अधिष्टित होण्यास हुकूमशाहीला आमंत्रण देण्याची शक्यता आहे. भारतात नवोदित झालेली लोकशाही आपले बाह्यांग व्यवस्थितपणे शाबूत राखून ठेवू शकेल, परंतु ती व्यवहारात हुकूमशाहीला आपली जागा बळकाविण्यास वाव देईल, असा प्रकार घडून येणे सर्वथैव शक्य  आहे. जर निरसटपणाची जागा असेल तर ती धोक्याची होय; पण तिच्यावरुन घसरत खोल दरीत पडण्याची शक्यता त्याहूनही जास्त धोक्याची होय.’ हा बाबासाहेबांचा इशारा सार्थ ठरतो की काय? याची चिंता आता भारतीयांना सतावत आहे. 


 ‘इकाॅनाॅमिक इंटेलिजन्स युनिट’ या आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञांच्या संशोधन व विश्लेषण करणाऱ्या संस्थेचे २०१४ पासून ते २०२३ पर्यंतचे अहवाल हेच सांगतात. या अहवालात विविध निकश लावून तयार केलेल्या यादीत २०१४ पासून भारताचे स्टॅन कशापद्धतीने घसरत गेले आहे हे लक्षात येते.  २०१४ साली भारत २४ व्य क्रमांकावर होता. २०२३ च्या अहवालात भारत थेट १०८ व्य क्रमांकावर पोहचवला आहे.

वर्ष       -            यादीतील स्थान
२०१४   -           २४


२०१६   -           ३२


२०१७   -           ४२


२०१९    -          ५१


२०२०    -         ५३


२०२२    -         ६६


२०२३    -        १०८

 हा अहवाल तयार करत असताना पूर्ण लोकशाही, सदोश लोकशाही, संमिश्र लोकशाही आणि एकाधिकारशाही अशा विविध गटात विविध देशांना  स्थान देण्यात आले आहे. यात भारताला ‘सदोश लोकशाही’ च्या गटात स्थान देण्यात आले आहे. 

Dr. Ambedkar podcast आपण खलील दिलेल्या टायटल लिंकवर क्लिक करूनही ऐकू शकता. 

Dr. Ambedkar podcast Series : देशातल्या ३६ प्लॅटफॉर्म वर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १० पैलू 

 

https://www.youtube.com/watch?v=jOGyl6ciqwE&list=PLbETIREK0N6J1m_b_LXUhyR4ENDSmQuRj

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 'ट्रेंनिग स्कुल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स' 


भारतीय लोकशाहीच्या ढासळत्या गुंणवत्तेवर भाष्य करत असताना ‘इकाॅनाॅमिक इंटेलिजन्स युनिट’ ने असे म्हटले आहे कि. "भारत हे पत्रकारांसाठीही अधिक धोकादायक ठिकाण बनले आहे, विशेषत: मध्यवर्ती राज्य छत्तीसगड आणि उत्तरेकडील जम्मू आणि काश्मीर या राज्यातील अधिकाऱ्यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्यावर मर्यादा आणल्या आहेत, अनेक वृत्तपत्रे बंद केली आहेत आणि मोबाइल इंटरनेट सेवांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवले आहे. मागील वर्षीप्रमाणे २०१७ मध्येही भारतात अनेक पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे." यात पुढे असेही म्हटले आहे कि, "पुराणमतवादी धार्मिक विचारसरणीच्या उदयाचा भारतावरही परिणाम झाला. अन्यथा धर्मनिरपेक्ष देशात उजव्या विचारसरणीच्या हिंदू शक्तींच्या बळकटीकरणामुळे अल्पसंख्याक समुदाय, विशेषत: मुस्लिम, तसेच इतर मतभेद असलेल्या लोकांच्या विरुद्ध हिंसाचार वाढला आहे. " असेही ‘इकाॅनाॅमिक इंटेलिजन्स युनिट’ ने  म्हटले आहे. 



या यादीत पूर्ण लोकशाही असलेल्या देशात खालील देशांचा समावेश करण्यात आला आहे. 



१. डेन्मार्क 


२. स्वीडन 


३. नॉर्वे 


४. स्वित्झर्लंड 


५. एस्टोनिया 


६. न्यूझीलंड 


७. बेल्जियम 


८. आयर्लंड 


९. कोस्टा रिका 


१०. फिनलंड 

 

अशाच प्रकारचे ब्लॉग वाचण्यासाठी या ब्लॉग पेज ला फॉलो करा. 



Saturday, February 25, 2023

एखाद्या जिल्ह्याचे नाव कसे बदलले जाते?

 


 एखाद्या जिल्ह्याचे नाव कसे बदलले जाते?

 

एखाद्या जिल्ह्याच, गावाचं किंवा ठिकाणाचं नाव बदण्याची कोणतीही मार्गदर्शक तरतुद भारतीय संविधानात दिसून येत नाही. परंतु भारतीय संविधानाच्या भाग 1, कलम 3 मध्ये असे म्हटले आहे की, “अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या सीमा, क्षेत्र अथवा नावे बदण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे.” अर्थात संसदेच्या परवानगीशिवाय तसे करता येत नाही. परंतु काही बाबतीत याचे अधिकार राज्यांना देखील आहेत. राज्य देखील जिल्ह्याच्या नावात बदल करू शकते. 

हेही वाचा :

सत्ता संघर्षातली १० अनुसूची काय आहे?

 उत्तराखंड- परीक्षा 'कॉपी विरोधी कायदा' कठोर शिक्षेच्या तरतुदी 

नेत्यांचे पक्षांतर - मतदारांचे, विचारधारेचेही पक्षांतर ठरते का?  


११ सप्टेंबर १९५३ रोजी गृह मंत्रालयातील तत्कालीन उपसचिव सरदार फतेह सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात काही बाबी सूचीबद्ध केल्या होत्या.  त्यात २००५ मध्ये   बदल करण्यात आला.

१. काही विशेष कारण असल्याशिवाय, लोकांना सवय झालेल्या ठिकाणाचे नाव बदलणे इष्ट नाही.

२. ऐतिहासिक संबंध असलेल्या गावांची नावे शक्यतो बदलू नयेत.

३. केवळ स्थानिक देशभक्तीच्या आधारावर किंवा भाषिक कारणास्तव बदल करता कामा नये, उदा., राष्ट्रीय नेत्यांचा आदर दाखवण्यासाठी किंवा भाषेच्या बाबतीत स्थानिक भावनांचे समाधान करण्यासाठी गावांचे नाव बदलू नये. (अपवाद तथापि, शहीदांच्या बाबतीत केले जाऊ शकते ज्याद्वारे राज्य सरकारने विनंती केली असेल आणि शहीदांच्या भूमिकेला राष्ट्रीय स्तरावर सामान्य मान्यता असेल तर, बदलू इच्छित असलेल्या जागेच्या नावात हे नाव योग्यरित्या जोडले जाऊ शकते.
 
४. नवीन नावे निवडताना, राज्यात आणि परिसरात एकाच नावाचे कोणतेही गाव किंवा शहर नाही याची काळजी घेतली पाहिजे, ज्यामुळे गोंधळ होऊ शकतो.
    
५. कोणत्याही बदलाची शिफारस करताना, राज्य सरकारने नावात बदल प्रस्तावित करण्यासाठी आणि नवीन नाव निवडण्यासाठी तपशीलवार कारणे सादर करावीत. 

परंतु केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली त्याची प्रक्रीया खालील प्रमाणे पार पाडता येते.

1. एखाद्या राज्याला जर एखाद्या जिल्ह्याचे नाव बदलायचे असेल तर तसा ठराव सुरूवातील विधानसभेत बहुमताने पास करावा लागतो.

2. पास केलेला ठराव केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठवावा लागतो. असा ठराव केंद्राकडे पाठविल्यानंतर केंद्र असे गृहीत धरते की, हा ठराव लोकांची मते लक्षात घेऊन तयार केलेला असावा. अर्थात असा ठराव घेताना राज्याने असा ठराव घेण्यापूर्वी लोकांची मते जाणून घेणे आवश्यक असते.

3. केंद्र सरकार ना हरकत देण्यापुर्वी तो प्रस्ताव पाच विभागाकडे पाठते.

 यात खालील पाच विभागाचे ना हरकतत प्रमाणपत्र घ्यावे लागते.


1. रेल्वे मंत्रालय, भारत सरकार


2. डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, भारत सरकार


3. आयबी, भारत सरकार


4. रजिस्टार जनरल सर्वे ऑफ इंडिया, भारत सरकार


5. गृह मंत्रालय, भारत सरकार (अंतीम मंजूरीसाठी)


4. त्यानंतर गृह मंत्रालयाकडून राज्यांना नाहरकत प्रमाणपत्र पाठवले जाते. 


इथे बघा : आजपर्यंत बदलण्यात आलेल्या जिल्ह्याच्या नावांची यादी