Wednesday, June 17, 2020

चीन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चष्म्यातून






चीन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चष्म्यातून  

डॉ. ह. नि. सोनकांबळे

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, चिन पंचशिलाचे पालन कधीच करणार नाही म्हणून चिनसोबत मैत्री करत असताना भारताने सावध पवित्रा घ्यावा. या दूरदृष्टीने  डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत चिन सबंधाचा विचार केला होता. आता तर "स्ट्रिंग आॅफ पर्ल्स" आणि "चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर" च्या माध्यमातून संपुर्ण भारतालाच चिनने घेरले आहे. असे असतानाही  भारताचे प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांनी  चिनचा  दौरा केला.  पं. नेहरुपासून ते आजपर्यंत भारताची भूमिका पंचशिलाप्रमाणे राहिली आहे. परंतु आता तरी भारत चिनला जशास तसे उत्तर देईल का? याकडे सगळयांचे लक्ष लागले असते. 




. खरे तर बुद्धाची भूमी हीच भारताची जागतीक ओळख असून प्राचिन काळापासून भारताचा शेजारील राष्ट्रांशी  सांस्कृतीक सबंध जोडला गेला आहे. तथागत बुद्धांनंतर फाहियान सारखे अनेक चिनी प्रवाशी भारतात आले आणि बुद्धाच्या या भुमीचा अभ्यास करुन जगभरात तथागत गौतम बुध्दच उपदेष त्यांनी पोहचवला. इतकेच काय तर नालंदा आणि तक्षशिलासारख्या विद्यापीठाचे माॅडेल जगाला देणारा भारत हा एकमेव प्राचिन देश असल्याने अनेक देशातील विद्यार्थी या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येत असत आणि या देशातील बुद्धाची शिकवण ते आपल्या मायदेशि परत गेल्यावर आपल्या देशाला देत असत. म्हणूनच आज भारताविषयी अनेक देश आदर बाळगून असतात. परंतु याचा विचार प्रकर्षाने पुढे येत नाही. आज भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी बोलायचे झाले तर केवळ आर्थीक कारणापुरते बोलले जात आहे. परंतु बुद्ध कालखंडात भारताचा व्यवहार इतर देशासोबत कसा होता याचा विचार आज होताना दिसत नाही. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी हाच धागा धरुन भारताच्या परराष्ट्र धोरणाचा विचार मांडला होता. अनेकांना असा प्रश्न्न पडतो की, परराष्ट्र धोरणाशी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा काय सबंध आहे. कारण सर्वांना आजपर्यंत भारताच्या परराष्ट्र धोरणाचे जनक पं. नेहरु आहेत हेच शिकवले गेले आहे. परंतु त्यांचे परराष्ट्र धोरण कसे चुकीच्या दिशेने जात आहे, हे सांगणारे तत्कालीन मंत्रीमंडळात एकमेव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर होते असे न्यूयाॅर्क टाइम्स ने सुद्धा स्पष्टपणाने मांडल्याचे संदर्भ आहेत. 



एकीकडे भारत स्वतंत्र होत असताना दुसरीकडे चीनमध्ये गृहयुद्ध सुरु होते हे आपल्या सर्वानाच माहित आहे. त्याचबरोबर चीन आपले वर्चस्व UNO मध्ये देखील निर्माण करू पाहत होता. जेव्हा चीन ला UNO च्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व देण्याचा विषय पुढे आला तेव्हा भारताने चीनला पाठिंबा दिला आणि चीन ला स्थायी सदस्यत्व मिळवून देण्यासाठी भारताने प्रयत्न केले. भारतामुळे चीन UNO च्या पाच प्रमुख राष्ट्रात जाऊन बसला. भारताला असे अपेक्षित होते की याचा फायदा भविष्यात कधी ना कधी आपल्याला होईल. पण अशी वेळ अजून तरी आली नाही. उलट जेव्हा कश्मीर चा विषय UNO मध्ये गेला तेव्हा चीन ने भारताच्या विरोधात नकाराधिकाराचा वापर केला.  रशियाने भारताच्या बाजूने आपली भूमिका मांडली. 



UNO मध्ये चीनला पाठींबा देत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला. ते म्हणाले की, नेहरूंनी चीनला पाठींबा देत बसू नये, चीन या उपकाराची जाणीव कधीच ठेवणार नाही. म्हणून नेहरूंनी भारताला UNO च्या सुरक्षा परिषदेत कसे स्थान मिळवता येईल याचा विचार करावा. बाबासाहेब तेव्हा जे काही सांगत होते ते भविष्यात खरे होत गेल्याचे दिसते. चीनने भारतामुळे सुरक्षपरिषदेत स्थायी सदस्यत्व मिळवले पण या उपकाराची जाणीव आजूनही चीनला नाही. भारताने स्वतःला स्थायी सदस्यत्व मिळवण्याचा विचार तेव्हा मांडला आजूनही आपण त्या ताकदीने प्रयत्न करत नाही. 

भारत चिन सबंधावर  डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विशेष लक्ष होते. त्यांनी चिनच्या आणि भारताच्या हालचाली अचूक पणे अभ्यासल्या होत्या म्हणूनच त्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. कारण भारत चिन सबंधातील महत्वाची बाब म्हणजे 1954 ला या दोन देशात पंचशील  करार करण्यात आला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्ध धम्मावर आणि पंचशीलावर अतिशय प्रेम होते तरी त्यांनी या करारावर टिका केली. कारण पंचशीलाचे आचरण चिन करत नाही असे त्यांचे म्हणने होते. हे सांगत असताना ते म्हणतात की,  आंतरराष्ट्रीय राजकारणात पंचशीलाला जागाच नसते व कम्युनिष्ठ  देशांत तर मुळीच नसते बौद्ध  धम्मात जरी पंचशिलाला महत्व असले तरी चीनच्या माओनी पंचशीलाचे आचरण आगोदर चीनमध्ये करावे. अशि  सडेतोड भूमिका घेताना बाबासाहेब दिसतात. आणि चिनपासून सावध राहण्याचा इशारा देखिल बाबासाहेब तात्कालीन परिस्थितीत देतात.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा तो इशारा 1962 पासून आजपर्यंत खरा ठरताना दिसतोय. भारताने चीनसोबत पंचशील करार करुन मैत्री केली असली तरी आजपर्यंत ही मैत्री नेहमी संशयाच्या भोवऱ्यात आडकली आहे. भारतात सत्ता बदलानंतर अनेक देशाचे दौरे करुन आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे चीनच्या दौऱ्यावरही जाऊन आले. भारत जरी नेहमी चिनसोबत मैत्रीची भाषा करत असला तरी चिनने मात्र नेहमीच भारताच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आजही ते लडाख येथील चुमार मधून, डोकलाम मधून घुसखोरी करत असताना दिसतात. भारताने आपले संपुर्ण लक्ष उत्तर भारताकडे लावून ठेवावे म्हणून ते नेहमी अशा छोटया छोटया कसरती करत असतात. आणि भारत ताठर भूमिका न घेता नेहमीच पंचशीलाचे पालन करत शांत राहण्याचे काम करत आला आहे. भारताने काही दिवसापुर्वी व्हिएतनाम मध्ये  तेल साठे शोधायला सुरुवात केली तेव्हा चिनला हे सहन झाले नाही आणि वाद होवू नयेत म्हणून येथे तेल सापडत नसल्याचे कारण पुढे करुन भारताने तिथली शोधमोहिम थांबवली. त्याच्या काही दिवसानंतर तीन बेटावरुन चिन आणि जापान मध्ये वाद सुरु झाले आणि चिनने जपानला भारतप्रमाणे वागणूक देण्याचा प्रयत्न केला मात्र जापान न डगमगता चिनच्या विरोधाला तोंड देत राहीला शेवटी चिनलाच नमते घ्यावे लागले. भारताला जर खरेच चिनला मागे टाकून जगाची महासत्ता व्हायचे असेल तर जपान प्रमाणे ताठर भूमिका घ्यावी लागणार आहे. साऱ्या भारताला सर्व बाजूने घेरण्याचे काम चिन सातत्याने करतो आहे. स्ट्रिंग आॅफ पर्ल (मोत्याची माळ), चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर  या चिनच्या नवीन नितीने श्रीलंका आणि पाकिस्तानच्या मदतीने भारताला समुद्री मार्गाने आणि pok कडून  घेरले आहे. बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, ओमन, इरान आणि खाली केनिया पर्यंत ही मोत्याची माळ पसरली आहे. 


  हेे स्ट्रिंग आॅफ पर्ल्स म्हणजे नेमके काय आहे? तर भारताच्या आजूबाजूची सर्व बेटे आपल्या ताब्यात घ्यायचे, त्याचा काही दिवस व्यापारासाठी वापर करायचा आणि तदनंतर तेथे सैनिक तळ उभे करायचे हा कार्यक्रम गेली अनेक वर्षपासून चिनने सुरु केला आहे. आज अशी सोहळा बेटे चिनच्या ताब्यात आहेत.  श्रीलंका आणि पाकिस्तानला मदतीचे आमिश दाखवून त्यांची ही बेटे चिनने ताब्यात घेतले आहेत. म्हणून भारताला केवळ उत्तर भारताकडे लक्ष केंद्रित करुन चालणार नाही. तर दक्षिण भारताच्या सिमेवर देखिल सैनिकी तळ उभे करावे लागणार आहे. सध्या भारताचा चेन्नई येथे महत्वाचा तळ उभा राहिला आहे. असे अनेक तळ भारताला उभे करावे लागणार आहेत. शिवाय चिनला जर नियंत्रणात ठेवायचे असेल तर भारताला भविष्यात जपान, अमेरिका, आॅस्ट्रेलिया आणि रशियासोबत मैत्रीपुर्ण व्यवहार वाढवावे लागणार आहेत. ज्याप्रमाणे चिन भारताला घेरतो आहे त्याचप्रमाणे आॅस्ट्रेलिया आणि जपान देखिल चिनला घेरण्याची योजना आखत आहेत या कामात त्यांना भारताची मदत हवी आहे. म्हणूनच भारताने भविष्यात पंचशिलाचा विचार न करता चिनला कसे रोखता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे. जोपर्यंत चिन पंचशिलाचे पालन करणार नाही तोपर्यंत भारताने देखिल चिनला जशास तसे उत्तर दयावे. जर भारत नेहमीच नमती भूमिका घेत राहीला तर भारताला पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, अफगाणीस्तान, चिन या सर्वच देशाला तोंड देत बसावे लागेल आणि भारताच्या चोहिकडील सिमा धोक्यात येतील.

चिनसोबत आपले वर्तन कसे असावे याचा आढावा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वेळा नेहरुंना समजावून सांगितला होता परंतु याकडे आजूनही सरकारने लक्ष दिले नाही. भारताच्या दक्षिण बाजूने गुंफलेली मोत्याची माळ (स्ट्रिंग आॅफ पर्ल) दक्षिणेकडून भारतावर कधी हल्ला करेल हे सांगता येत नाही आणि हे हल्ले कसे रोखायचे याचे नियोजन भारताकडे अद्यापतरी नाही. भारत नेहमीच परराष्ट्र धोरण आखत असताना अतिचांगुलपना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, हा अतिचांगुलपणा परराष्ट्र धोरणात काही कामाचा नसतो. चिनसोबत नेहरुंनी अतिचांगुलपना दाखवू नये हे एक दिवस महागात पडेल. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची ही दूरदृष्टी आजूनही आपण समजून घेत नाही. जोपर्यंत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे परराष्ट्र धोरण, त्यांची दूरदृष्टी आपण समजून घेत नाही. तोपर्यंत तरी आपण चिनसारख्या राष्ट्रावर  मात करुन महासत्तेचे स्वप्न बघू शकत नाही.  

ब्लॉग आवडल्यास ब्लॉग ला Follow करायला विसरू नका. 

India china war 2020, India China war 1962, India China war 1972, India china international relation, India china relations and Dr. B. R. Ambedkar, India china relations and nehru, India china relations and Narendra Modi. 

2 comments:

  1. खूप छान आहे आर्टिकल ऑल द बेस्ट....

    ReplyDelete
  2. खुपच माहीतीपूर्ण लेख. विद्यार्थाना व परराष्ट्र धोरणाचा अभ्यासकांसाठी खुप उपयुक्त लेख आहे

    ReplyDelete