Friday, April 30, 2021

चीन सध्या काय करतोय?



चीन सध्या काय करतोय? 

डॉ. ह. नि. सोनकांबळे

कोरोनाचा जन्मदाता असलेला चीन सध्या काय करतोय? हा प्रश्न सगळयांनाचा पडला असेल. नव्हे अनेक जन चिनची परिस्थिती गुगलवर सर्च करण्याचा प्रयत्न देखिल करत आहेत. आपल्याला अश्चर्य वाटेल की, चिन चा सर्व कारभार अत्यंत सुरळीत चालू असून चिनमध्ये दुसरी लाट देखिल आलेली नाही. 

कारोनावर मागच्या वर्षीच्या एप्रिल मध्येच चिनने नियंत्रण मिळवल्याने तिथे दुसरी लाट आलीच नाही आणि कारोना वुहानच्या बाहेर गेलाच नाही. असं काय केलं असेल चिनने? असा प्रश्न आता आपल्याला पडला असेल. 



चिनमध्ये सुरुवातीला केवळ 72 दिवसाचा लाॅकडाउन करण्यात आला होता. तोही काही मोजक्याच शहरात जिथे थोडेफार कारोनाचे रुग्न आढळले होते. 72 दिवसानंतर पुन्हा चिनने सर्व बाजारपेठा खुल्या केल्या आणि पुन्हा कधीच लाॅकडाउनचे नाव देखिल घेतले नाही. 

पण या 72 दिवसात चिनचे डाॅक्टर आणि सरकार मिलीट्रीच्या पोझिशन मध्ये होती. संपूर्ण चिनमधले जवळपास 20 हजार डाॅकटर एकटया वुहान मध्ये पाठविण्यात आले होते आणि ते प्रत्येक रुग्नावर 24 तास लक्ष ठेवून होते. या कामांसाठी चीनने रोबोट चाही वापर केला.



या 72 दिवसात सरकारने प्रत्येक कुटंुबावर लक्ष ठेवले होते. सरकारी यंत्रणा व खासगी मध्ये स्थापन केलेल्या ‘नेबरहुड कमीटी’ व्दारे कोण घराबाहेर पडतो? कोण कुठे  जातो? कोण आजारी आहे यावर लक्ष ठेवले जात होते. जी व्यक्ती सारखं सारखं घराबाहेर पडते त्याची नोंद सरकार दरबारी केली जात होती व त्यावर नियंत्रण ठेवले जाते होते. 

जिथे रुग्न आढळला तो परिसर तात्काळ सिल केला जात होता, कोणाच्या घरी नातेवाईक आले तर त्याची सुरुवातीला टेस्ट केली जात होती. शिवाय बाजारात गेल्यावरही त्याच्या काही टेस्ट केल्या जात होत्या. 

सरकारी यंत्रणा दिवसरात्र काम करत होती. कोणी जर कामचुकारपणा केला किंवा काही चुक केली तर त्याला लगेच शिक्षा केली जात होती. इतक्या बारकाईन चिनने प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवले होते. 

आता हे सर्व करण्यासाठी लोकसंख्या कमी असावी लागते असे जर आपलयाला वाटत असेल तर ते चूकीचे आहे. कारण चिन हा लोकसंख्येच्या बाबतीत जगातला सर्वात मोठा देश आहे. फरक फक्त एवढाच आहे की? चिनचे सरकार, नोकर, पोलीस, मिलीट्री व विशेष म्हणजे जनता हे सर्वच जबाबदारीने वागत होते. यातले काणीही चोरुन लपून फिरत नव्हते किंवा कोणतेच नियम देखिल मोडत नव्हते. त्यामूळे चिनने या महामारीवर दुसरी लाट येण्याच्या ओागदरच नियंत्रण मिळवले. आता सध्या चिन मध्ये केवळ 300 रुग्न असून यातले केवळ चार ते पाच रुग्न हे सिरियस आहेत. बाकी चिनचे सर्व व्यवहार कोरोना येण्यापूर्वी जसे होते तसेच सुरु आहेत. 

सध्या चिनने कोरोना नियंत्रणासाठी लागणारे उपकरणं बणवण्यावर भर दिला असून जगाला ही उपकरणं निर्यात करतो आहे. महत्वाचं म्हणजे चिनचा जीडीपी सद्या 18 च्या वर आहे. तर आपल्या देशाने नुकतेच वजा 7.5 जीडीपीचे बजेड सादर केले आहे. शिवाय एप्रिल 2020 पासूनच चिनमध्ये शाळा, माहाविद्यालये, दुकाने, व्यापार, व्यवसाय, दळणवळण सर्व सुरळीत चालू आहे. पहिल्या 72 दिवसानंतरच्या लाॅकडाउन नंतर चिनमध्ये आजपर्यंत कोणताही लाॅकडाउन लावला गेला नाही किंवा तिथे दुसरी लाटही आली नाही. 

त्यामूळे चिन सध्या काय करतोय? या प्रश्नाचे उत्तर गुगल देखिल चिन सध्या मजेत आहे आहे. असेच देईल.


ब्लॉग ला Foollow करायला विसरू नका. 

हेही वाचा, 

अबब, राजकारणात रोबोट


डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती वादात, ज. वि. पवार यांचा आरोप

अस्पृश्यांचा पहिला स्वातंत्र्य दिन



Google Translated, 

What is China doing right now? 

Dr. H. N. Sonakamble

What is China, the birthplace of the corona, doing right now? This question must have fallen on everyone. Many people are also trying to search Google's situation on Google.You may be surprised to know that all the affairs of China are going very smoothly and there has not been a second wave in China. 

Since China took control of Karona in April last year, there has been no second wave, and Karona has never left Wuhan. What could China have done? You may be wondering now. 



China initially had only a 72-day lockdown. He was also one of the few cities where a few Carona patients were found. After 72 days, China opened all the markets again and never mentioned the lockdown again. 

But in these 72 days, China’s doctors and government were in a military position. About 20,000 doctors from all over China were sent to Wuhan alone, monitoring each patient 24 hours a day. China used robots for this purpose.



During these 72 days, the government monitored every family. Who gets out of the house through the 'Neighborhood Committee' set up in government and private sector? Who goes where Who was sick was being monitored. Anyone who goes out of the house like this was recorded and controlled by the government. 

The area where the patient was found was immediately sealed, and if a relative came to the house, it was initially tested.Moreover, even after going to the market, some of its tests were being done. 

The government machinery was working day and night. Anyone who did wrong or did something wrong was punished immediately.So much Barkain Chin had watched every single person. 

If you think the population needs to be small to do all this now, then it is wrong.Because China is the largest country in the world in terms of population. Is that the only difference? The Chinese government, servants, police, military and especially the people were all acting responsibly. None of this went unnoticed, nor did it break any rules.So China took control of the epidemic just before the second wave. Currently, there are only 300 patients in China, of which only four to five are serious. All the rest of Chin's business is going on as it was before Corona arrived. 

China is currently focusing on manufacturing equipment for corona control and exporting it to the world. Importantly, China's GDP is currently above 18. So our country has recently presented a budget of minus 7.5 GDP. Moreover, since April 2020, schools, colleges, shops, trade, business, transportation have all been running smoothly in China. After the first 72 days of lockdown, there has been no lockdown in China to date, nor has there been a second wave. 

So what is Chin doing right now? The answer to this question is that Google is also interested in China right now. Will give the same.


Don't forget to follow the blog 

Thursday, April 29, 2021

रोबोट आता निवडणूक लढवणार ?




 रोबोट पाॅलीटीशन अॅन्ड अॅक्टिव्हीस्ट

डॉ. ह. नि. सोनकांबळे

 

रोबोट ला जात, धर्म आणि कोणत्याही भावना नसातात त्यामूळे, जातीच्या, धर्माच्या आणि भावनेच्या राजकारणाला आळा बसेल असे ‘रोबोट पाॅलीटीशन’ या संकल्पनेच्या अभ्यासकांना वाटते. पण कोणत्याही रोबोट मध्ये आगोदर प्रोग्राम फिक्स करावा लागतो. तो करत असतानाच भारतात त्याच्या डोक्यात जात आणि धर्म नावाचा ‘प्रोग्राम फिक्स केला तर .....!



गेल्या अनेक दशकापासून जगभरातील राजकारणात नव-नव्या संकल्पना अभ्यासाला आल्या आहेत. यातच भर म्हणून रोबोट पाॅलीटीशन अॅन्ड अॅक्टिव्हीस्ट नावाची सकल्पना इथून पुढे राज्यशास्त्राच्या विद्याथ्र्यांना शिकवावी लागणार आहे. कारण अनेक देशाच्या राजकाणात अशा प्रकारच्या अॅक्टिव्हिस्टची आवश्यकता जाणवू लागली आहे.



इंग्लंडमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार तेथील दोन तृतीयांश नगारीकांना असे वाटते की, येणाऱ्या विस वर्षात रोबोट संसदेत काम करतील तर 16 टक्के नागरीकांना हा बदल एक ते दोन वर्षातच दिसेल असे वाटत आहे. महत्वाचे म्हणजे या सर्वोत भाग घेतलेल्या चार पैकी एका नागरीकाला असे वाटते की, हे रोबाट त्यांच्या निवडूण दिलेल्या प्रतिनिधींपेक्षाही चांगले काम करतील. तर 16 टक्के नागरीकांना असे वाटते की, हे रोबोट कमी चूका करतील आणि चांगले निर्णय घेतील. 



हे सर्व झाले जागासाठी पण भारतात जर असे रोबाट आले तर.....? तूर्तास भारतात रोबोट पोलिटीशन्स ची आवश्यकता नसली तरी रोबोट ऍक्टिव्हिस्ट ची मात्र आवश्यकता जाणवेल आणि त्याच्याही डोक्यात जात, धर्म याला अनुसरुनच प्रोगाम फिक्स केला जाईल. यात तिळमात्र शंका नाही आणि याला रोबोट स्वतःहून विरोधही करु शकणार नाही. कारण ‘रोबोट’ हा त्याचे जास्तीचे डोके चालवत नाही. त्याच्यामध्ये जेवढा प्रोग्राम फिक्स केला जातो तेवढयाच कृती तो करत असतो. राजकारणात सध्या अशाच कार्यकर्यांची आवश्यकता भासत आहे. जो जास्तीचे डोके न वापरता आपल्या पक्षाच्या कार्यक्रमावर फोकस करेल. काय चूक? काय बरोबर? याची चर्चा त्याने कुठेही करु नये, जेवढे पक्षाने आदेश दिले आहेत तेवढेच काम करायवे. हीच आपेक्षा सर्वच पक्षश्रेष्ठींची असते. त्या दृष्टीकोणतून कार्यकत्र्यांची निवड सर्वच पक्षात केली जात आहे. 

तसं पाहिलं तर रोबोट पाॅलीटीशन अॅन्ड अॅक्टिव्हीस्ट  या तंत्रज्ञानाची कल्पना भारतातच पहिल्यादा ‘कल्पिली गेली’ असे म्हणावयास हरकत नाही. म्हणूनच काही दिवसापूर्वी एक मोठे राजकीय पुढारी असे म्हणाले होते की, ‘राजकारणात येताना आपला जास्तीचा मेंदू घरीच ठेवून यावा, त्याची राजकारणात काहीच आवश्यकता नसते.’ याचा अर्थ, कार्यकर्ता हा ‘रोबाट’ सारखा असावा असाच होतो. जो की पक्षश्रेष्ठीच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करेल. आपल्या पक्षाने घेतलेला कोणताही निर्णय बरोबर आहे की चुकीचा आहे? याचा त्यानी अजिबात विचार करु नये. पक्षाने जर त्याच्या मेमरी मध्ये एखादा निर्णय ‘बरोबर’ आहे किंवा ‘चूक’ आहे असे फिक्स केले तर, त्या निर्णयात कोणाच्याच सांगण्याहून किंवा पटवून देण्याहून त्याने बदल करु नये.

महत्वाचे म्हणजे अशा कार्यकत्र्यांला कोणत्याही भावना असणार नाहीत. याचेही परिक्षण पक्ष स्तरावर घेतले जाते. तुम्ही रजणीकांतचा ‘रोबोट’ हा चित्रपट बघितला असेल त्यात तो त्या रोबोट मघ्ये प्रचंड मेमरी आणि उर्जा भरतो पण त्यात कोणत्याही ‘संवेदना’ तो भरत नाही. त्यामूळे त्याच्यात जेवढा प्रोग्राम फिक्स करतो तेवढयाच गोष्टीवर तो काम करतो. अगदी अशाच प्रकारचे कार्यकर्ते राजकारणात घडविण्याचे काम केले जात आहे. याच संकल्पनेकडे आता ‘रोबोट पाॅलीटीकल अॅक्टिव्हीस्ट’ म्हणून बघितले जात आहे. महत्वाचे म्हणजे अशा कार्यकत्र्याकडे देशाचे नागरिकत्व आणि मतदारनाचा अधिकार असणार आहे. 

  अशा प्रकारचा रोबोट हाॅगकाॅंग च्या ‘हॅन्सन रोबोटीक्स’ या कंपनीने बनवला आहे ज्याचे नाव ‘सोफिया’ आहे. हा रोबोट नागरीकत्व मिळवणारा पहिला रोबोट ठरला आहे. 2017 मध्ये सौदी अरेबियाने या ‘हयुमनाॅइड रोबोट’ला  नागरीकत्व देवून त्यांच्या देशातल्या महिलांपेक्षाही अधिकचे अधिकार दिले आहेत. जिथे नागरीकत्वाची गोष्ट येते तिथे मतदानाच्या अधिकाराची देखिल गोष्ट येते. हा रोबोट एखाद्या पक्षाचा प्रचार देखिल करु शकतो. हा रोबोट लोकांना आकर्षीत करण्यासाठी, त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आपल्या चेह$याचे हावभाव देखिल बदलू शकतो. त्याच्याम/ये अशा प्रकारचे प्रोग्राम फिक्स करण्यात आलेले आहेत. एखाद्या पक्षाचा प्रचार, सभेचे नियोजन, भाषण, भाषणाचे लिखान आणि आवश्यकता वाटल्यास मारामारी आणि दंगली घडवणे अशा अनेक कामात हा रोबोट मदत करु शकतो. अशा प्रकाचे सर्व प्रोगाम यात फिक्स केले जावू शकतात. 

येणाऱ्या काळात अशा रोबोटची आवश्यकता अनेक पक्षांना लागणार आहे. त्यामूळे याची मागणी सर्वत्र वाढणार आहे. असे ‘रोबोट कार्यकर्ते’ जर पक्षाला मिळाले तर येणाऱ्या  काळात राजकारणातल्या चांगल्या आणि वाईट गोष्टीची चर्चा मात्र थांबणाार आहे. महत्वाचे म्हणजे याचा अनुभव गेल्या काही वर्षापासून भारताच्या राजकारकडे बघितल्यावर येवू लागला आहे. भारतात असे अनेक ‘रोबोट पाॅलीटीकल अॅक्टिव्हीस्ट’ सर्वत्र पहायला मिळत आहेत. जे की, गॅस चे भाव वाढले, पॅट्रोलचे भाव वाढले, महागाई वाढली तरी हे सर्व योग्य आहे असेच म्हणतात कारण त्यांच्यात पक्षाकडून तसा ‘प्रोग्राम फिक्स’ केलेला आहे. त्यामूळे ते त्यांचे उत्तर त्यांच्या मनाने बदलू शकत नाहीत कारण ते विचार करु शकत नाहीत किंवा ते ‘संवेदन’शून्य असल्याने त्यांच्या भावना देखिल व्यक्त करु शकत नाही. 

सौदी अरेबियाने जरी 2017 मध्ये अशा प्रकारच्या रोबोट ला नागरिकत्व दिले असले तरी यापूर्वीच भारताने अशा ‘रोबोट पाॅलीटीकल अॅक्टिव्हीस्ट’ चा अनुभव घेतलेला आहे आणि सध्याही घेत आहे. फक्त त्याचे मराठी व हिंदीतले नाव ‘भक्त’ असे ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. 

पण एक गोष्ट  मात्र नक्की आहे की, येणाऱ्या काळात अशा भक्तांची जागा रोबोट घेतील आणि भारताच्याही राजकारणात  ‘रोबोट पाॅलीटीकल अॅक्टिव्हिस्ट’ ही संकल्पना उदयास येईल. तोपर्यंत आपल्या आजूबाजूला असलेले अनेक पक्षाच्या व नेत्यांच्या भक्तांकडे लक्षपर्वक बघा ते ‘रोबोट पाॅलीटीकल अॅक्टिव्हिस्ट’ सारखेच वाटतील.


ब्लॉग ला Follow करायला विसरू नका. 

हेही वाचा; 

रिझर्व्ह बँक, लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर


....हे मुख्यमंत्री लिहणार होते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र


ग्रॅज्युएट खिचडी आणि निर्लज्ज व्यवस्था

कृपया लेख कॉपी पेस्ट करू नये. 

Friday, April 16, 2021

भारतीय संविधान - Online Test



 Click here for : Inline Test

एमपीएससी - भारतीय संविधान  (Online Test- MCQ)


Online Test ची लिंक शेवटी दिलेली आहे. 

एमपीएससी व यूपीएससीच्या धरतीवरती घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी भारतीय संविधान हा विषय पूर्व. मुख्य व मुलाखत या तिन्ही टप्प्यावर महत्त्वाचा आहे.  त्याच अनुषंगाने ही एम सी क्यू ऑनलाइन टेस्ट घेण्यात येते.

हेही वाचा; स्वातंत्र्यपूर्वीच भारतात संविधानाचे 7 मसुदे तयार होते.

हे वाचा मगच प्रश्न सोडवा. 

या टेस्टमध्ये एकूण दहा प्रश्न आहेत.

प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क देण्यात आलेले आहेत. 

कोणत्याही प्रकारची निगेटिव सिस्टीम या प्रश्नपत्रिकेत वापरण्यात आलेली नाही. 

सर्व प्रश्न सोडून झाल्यास Submit या बटनावर क्लिक करावे.

त्यानंतर View Score या बटनावर क्लिक केल्यावर आपल्याला आपले मार्क्स समजतील.

 जर आपले उत्तर चुकले असेल तर बरोबर उत्तर काय होते हे देखील समजणार आहे. 

जर काही चुकीचे प्रश्न आहेत असे वाटल्यास कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. 

आपल्या कडून आलेल्या योग्य सूचनांचे स्वागत आहे. 

जर आपल्याला आशा टेस्ट नेहमीच सोडवायच्या असतील तर या ब्लॉग पेज ला FOLLOW करा. ज्यामुळे आपल्याला नोटिफिकेशन मिळेल. 



ही टेस्ट पुर्णतः डॉ. ह. नि. सोनकांबळे व दिलीप जऊळकर लिखित " भारतीय संविधान, शासन, प्रशासन व राजकारण" या पुस्तकावर आधारित आहे. 


हे प्रश्न कोणत्याही पुस्तकातून कॉपी करण्यात आलेले नाहीत. 


आपल्याला आशा टेस्ट सोडवायला आवडतात का आवडत असल्यास ब्लॉग पेज च्या कमेंट बॉक्स मध्ये होय असे कळवा. जेणेकरून लवकरच आपल्याला आम्ही दुसऱ्या टेस्ट पाठवू. 


आमच्या स्टडी पॉईंट ला आवश्य भेट द्या। 


टेस्ट देण्यासाठी इथे क्लिक करा. Online MCQ Test -1 - Indian Constitution


धन्यवाद. 


Tuesday, April 13, 2021

यशवंतराव चव्हाण : लक्ष्मण माने यांनी खा. सुप्रियाताई सुळे यांना लिहलेल्या पत्रातून

 


यशवंतराव चव्हाण : लक्ष्मण माने यांनी  खा. सुप्रियाताई सुळे यांना लिहलेल्या पत्रातून 

डॉ. ह. नि. सोनकांबळे



महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकारणी म्हणून तर परिचित होतेच शिवाय ते एक साहित्यिक म्हणूनही परिचीत होते. असे म्हणतात की, त्यांची एक इच्छा राहून गेली आहे. ते जेव्हा दिल्लीच्या राजकारणात रमले तेव्हा त्यांच्याकडे बराचसा वेळ होता. त्या वेळेचा सदुपयोग करुन ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र लिहण्याच्या तयारीत होते. बऱ्याच साधनांची त्यांनी जमवाजमव देखील केली होती. पण ते काम त्यांना पूर्णत्वास नेता आले नाही. या सबंधीची चर्चा जेष्ट साहित्यिक ‘उपराकार’ लक्ष्मण माने यांनी खा. सुप्रियाताई सुळे यांना लिहलेल्या पत्रात आली आहे. लक्ष्मण माने यांनी यशवंतराव चव्हाण यांच्याशी झालेल्या चर्चेचा वृत्तांत या पत्रातून खा. सुप्रियाताई सुळे यांना कळवला आहे. 

लक्ष्मण माने यांच्याशी झालेल्या चर्चेत यशवंतराव चव्हाण म्हणतात, ‘लक्ष्मण, माझ्या मनात आहे. बाबासाहेबांचे चरित्र लिहावे. त्या निमित्ताने त्यांचे सारे ग्रंथही वाचून होतील. सलगपणे. साधनांची जमवाजमव करतो आहे.’ 

दुसऱ्या एका चर्चेत ते म्हणतात, ‘आपण सारे स्वातंत्र्य सैनिक देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अविरत प्रयत्न केले. ते मिळवले. पण अखंड स्वातंत्र्य मिळाले नाही. देशाचे दोन तुकडे झाले. त्यावेळी बाबासाहेबांचे कितीतरी मित्र अनुयायी त्यांना म्हणत होते. जिनांनी लढून पाकिस्तान घेतले, तुम्ही दलितस्थान का घेत नाही? या मित्रांच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाला ते बळी पडले असते तर देशचे दोन ऐवजी तीन तुकडे झाले असते. पण बाबासाहेबांनी आयुष्यात कधी असला विचार केला नाही. हे देशावर केवढे उपकार आहेत त्यांचे. तेही मोठे राष्ट्रभक्त होते. आपण त्यांना समजून घेतले नाही.. असामान्या बुद्धिमत्तेच्या पुरुषाची ओळख शाहूराजांनी, सयाजीरावांनी ठेवली, त्यांना पोटाशी धरले आणि त्यांनी देशाला घटना दिली. जाती, धर्म, पंथ भेदाभेद यापलिकडे विव्दान माणूस उभा असतो. मी हल्ली त्यांच्या जीवनचरित्रांचा अभ्यास नव्याने करतोय. त्यांचे चरित्र लिहून त्यांच्या कामाला, कार्यकर्तुत्वाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.’ 

या कामाला गती मिळावी यासाठी यशवंतराव वेळ काढून जाणीवपूर्वक प्रयत्न करत होते. अनेक लोकांसोबत चर्चा करत होते. प्रा. अरुण कांबळे यांच्याशीही त्यांनी या विषयावर चर्चा केली होती. या अनुषंगाने अशाच एका पत्रात लक्ष्मण माने यांनी उल्लेख केला आहे. 

‘प्रा. अरुण कांबळे आणि मी (लक्ष्मण माने). एकदा साहेबांना (यशवंतराव चव्हाण) भेटायला गेलो होतो. नामांतराच्या प्रश्नावरुन चर्चा निघाली होती. साहेब म्हणाले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एखादे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ मुंबईत उभा करु. बाबासाहेब मुंबईला राहिले. चैत्यभूमी येथे आहे. आयुष्यातला मोठा काळ त्यांनी या शहरात काढला. नावलौकिक मिळवला. देशाचे नेतृत्व केले. त्यांच्या इतमामाला शेभेल असे संस्थांत्मक काम करायचे राहून गेले. तुम्हा तरुण मित्रांनी आता हे काम हाती घेतले पाहिजेल आहे असे मला वाटते. अशी मोठी संस्था उभी करावी. ज्ञानार्जनाचे, ज्ञानदानाचे काम ज्या शहरात बाबासाहेबांनी केले. तेथे त्यांचे स्मारक ज्ञानमेरिटनेच होवू शकते. त्यांचे देशावर फार महान उपकार आहेत. अरुण, मला बाबा वलणकरांची सारी लिखित साधने हवी आहेत. सुरवा नाना टिपणीसांशी मी बोललो आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र मला लिहायचे आहे. साधनांची जुळवाजुळव मी करतो आहे. त्याचे असे झाले, की. डाॅ. सविता जाजोदिया आणि डाॅ. सय्यद असद अली हे दोघे नॅशनल बुक ट्रस्टच्या राष्टीय चरित्रमालेसाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक संक्षिप्त चरित्र लिहण्याची गळ घालीत होते. माझ्या मनात अनेकदा हा विचार येवून गेला होता. पण तो आज उद्या करीत हे काम रेंगाळले आहे. ते मला करायचे आहे. मी त्यांना तसा शब्द दिला आहे. अरुण, तुम्ही म्हणाल राजकारणातल्या माणसाचा शब्द, तो दिला काय नि नाही दिला काय. लोक समजून घेतात. पण हे दोघे माझ्या मागेच लागले आहेत. मी शब्दांचा फार पक्का आहे. आपल्या शब्दाची प्रतिष्ठा आपण राखली नाही तर कोण राखील? शब्द काही नुसते सुटे शब्द नसतात. त्या पाठीमागे भावना असते. शब्दांना अर्थ असतात. ते वाऱ्यावर उडून गेले तर बोलण्यात कोणता अर्थ राहील. शब्द नुसते शब्द नसतात. ते दुधारी शस्त्रासारखे आहेत. त्यामुळे शस्त्रापेक्षा मला शब्द श्रेष्ठ वाटतात. ते एकमेकाला जोडतात आणि तोडतातहीः म्हणून ते फार जपून वापरले पाहिजेत. शब्दांनी जखमा होतात. त्या विसरता येत नाही. ते शस्त्र आहे, जपूनच वापरले पाहिजे. मी डाॅ. जाजोदियांना शब्द दिलाय. तुम्ही मला मदत करायची. बाबासाहेबांच्या चरित्राचा फार गंभीरपणे अभ्यास करतो आहे. त्यांचे सारे अंक मी मिळवतो आहे. काही जुनी चरित्रे हवी आहेत. त्यांत वलणकरांचे चरित्र हवे आहे. ते तुम्ही मला मिळवून द्या.’ 

या सर्व पत्राच्या संदर्भातून ही बाब स्पष्ट होताना दिसते की, खरोखरच यशवंतराव चव्हाण डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र लिहू पाहत होते. लक्ष्मण माने, प्रा. अरुण कांबळे यांच्या सहकार्याने ते संदर्भाची जुळवाजुळव करत होते. शिवाय नॅशनल बुक ट्रस्ट च्या पदाधिकाऱ्याना त्यांनी शब्दही दिला होता. यशवंतराव चव्हाण यांच्या या बाबीवर जास्त चर्चा ऐकीवात नाही. मात्र लक्ष्मण माने यांनी ही बाब भावी पीढीच्या लक्षात आणूण देण्याचा प्रयत्न केला आहे. केळुस्कर गुरुजींनी जसे बुद्ध चरित्र लिहले कदाचित त्याच पद्धतीने यशवंतराव चव्हाण देखील बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र लिहू पाहत होते. परंतु अचानक झालेल्या त्यांच्या निधनाने त्यांचे हे कार्य राहून गेले. असेही लक्ष्मण माने यांनी लिहलेल्या पत्रातून जाणवते.


यशवंतराव चव्हाण आठवणी-आख्यायिका या पुस्तकातून साभार


कृपया ब्लॉग पेज ला FOLLOW करायला विसरू नका. 

ब्लॉग ची केवळ लिंक शेअर करावी ही विनंती. 

Saturday, April 3, 2021

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रकाशन समिती वादात - ज. वि. पवरांचा आक्षेप



डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रकाशन समिती वादात - ज. वि. पवरांचा आक्षेप 

नुकतीच 30 मार्च रोजी महाराष्ट्र शासनाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती पुनर्गठीत केली असून त्या समितीवर सध्या आक्षेपांचा पाउस पडत आहे. आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ विचारवंत व लेखक ज. वि. पवार यांनी थेट उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. 



या समतिचे सचिव पद योग्य व्यक्तीला मिळणे अपेक्षीत होते परंतु साहित्य किंवा वैचारिक क्षेत्रात कसलेच योगदान नसलेले डाॅ. कृष्णा कांबळे यांना देण्यात आले आहे. मी साहित्य, लेखन व चळवळीत दिर्घ काळ काम केले असून हे कृष्णा कांबळे कोण आहेत असा सवाल त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्याला केला आहे. 

शिवाय समितीत अशी काही नावे आहेत ज्यांची नावे मी प्रथमतः ऐकत आहे असेही ज. वि. पवार यांनी म्हटले आहे. त्यांचे आंबेडकरी चळवळ, साहित्य वा त्यांच्या चरित्राच्या अनुषंगाने काही विशेष योगदान असल्यास त्याची मला कल्पना नाही. पण आपण निवडल असल्याने आपल्याला त्याची माहिती असेलच, असल्यास ती मला देण्यात यावी असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.




शिवाय समितीच्या महत्वाच्या पदावर नियुक्त  करण्यात आलेली व्यक्ती डाॅ. कृष्णा कांबळे कोण आहेत? असा प्रश्न उपस्थित करुन त्यांच्या साहित्याबददल कोणाला काही माहिती असल्यास ती आपल्याला द्यावी असे अवाहनही पवार यांनी आपल्या पत्रात केले आहे. 

समितीतील सर्व सदस्यांपेकी आपण जेष्ठ सदस्य असताना देखील केवळ सदस्य म्हणून आपली निवड झाली आहे यावर पवार यांनी नाराजी व्यक्त करुन साहित्याच्या क्षेत्रात कसलेही योगदान नसलेल्या व्यक्तीसोबत आपल्याला काम करण्यास कोणताही रस नाही, जर आपल्याला सचिवपद दिले व समितीचे पुन्हा एकदा पुनर्गठण केले तरच आपण या समितीत काम करु असेही ज. वि. पवार यांनी म्हटले आहे. 

मागील अनेक वर्षापासून समितीचे कामकाज बंद असल्याने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित होत नाही. त्यामूळे आता समितीचे गठण झाले आहे. आता तरी बाबासाहेबांचे साहित्य वाचायला मिळेल या आपेक्षेने वाट बघणाऱ्या लोकांचा पुन्हा एकदा आपेक्षाभंग झाला आहे. 

यापूर्वी समितीच्या सचिव पदावर मा. वसंत मून, मा. दत्ता भगत, मा. अविनाश डोळस अशा अभ्यासू आणि तज्ञ व्यक्तीची निवड झाली होती. या समितीत मात्र सचिव तर सोडाच अनेक सदस्य हे आंबेडकरी चळवळीत, साहित्यात व वैचारिक क्षेत्रात कसल्याही प्रकारचे योगदान नसलेले लोक निवडण्यात आले आहेत. त्यामूळे ही समिती केवळ नावापूरतीच असल्याचे दिसते आहे. आंबेडकरी चळवळीतील लोकांनी या समितीच्या पुर्नगठणाची मागणी लावून धरली तरच भविष्यात चांगले साहित्य प्रकाशित होईल अन्यथा ही समिती केवळ नावापूरतीच राहील.


विनंती : 

आपल्याला माझे लेख / ब्लॉग आवडत असल्यास वर उजव्या बाजूला असलेल्या Follow या बटनावर click करायला विसरू नका. 

टीप: लेखातील कोणताही मजकूर कोठेही कॉपी पेस्ट करू नये. शेअर करावासा वाटल्यास केवळ लिंक शेअर करावी. 

Thursday, April 1, 2021

रिझर्व बँक, लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर



रिझर्व बँक, लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. ह. नि. सोनकांबळे

 

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स’ मधून अर्थशास्त्राचे धडे गिरवले.  आज  तिच संस्था बाबासाहेबांच्या अर्थनितीचे धडे विद्यार्थ्यांना देत आहे. आजपर्यत अनेक भारतीय लोक देश-परदेशात जाऊन शिक्षण घेऊन आले.  मात्र  कोणीच आपला वेगळा ठसा येथे उमटवू शकला नाही.  आपण ज्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेतो ती संस्था काही दिवसानंतर आपल्याला ओेळखतही नाही.  मात्र  जगाच्या पाठीवर असे खूप कमी लोक असतात जे आपला ठसा वर्षानुवर्षे उमटवून ठेवतात. त्यात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव भारतीय आहेत.  जगातील सर्वश्रेष्ठ विद्वान अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची गणना केली जाते. ज्या ‘लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स’ मध्ये बाबासाहेब शिकले त्या संस्थेने आपल्या क्लेमेंट हाऊस मध्ये  बाबासाहेबांचा पुतळा बसवला आहे. क्लेमेंट हाऊस मध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूचे दोने दरवाजे उघडून आत गेल्यावर दर्शनी भागात हा पुतळा ठेवण्यात आला असून, आजपर्यत अनेक भारतीयांनी या स्कूलला भेेट, दिली आहे.  या स्कुलचे उपाध्यक्ष प्रा. निकोलो ड्रिक्स यांनी बाबासाहेबांचा परीचय करुन देणारे एक पत्र बाजूच्या भिंतीवर बसवले असून बाबासाहेबांचे एक मोठे रंगीत तैलचित्रही येथे लावण्यात आले आहे.



ज्या शिक्षण संस्थेत आपण शिकतो आणि त्याच शिक्षण संस्थेकडून आपल्या स्मरणार्थ, गौरवार्थ पुतळा बसवला जातो. असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जगाच्या पाठीवर कदाचित एकमेव विद्वान विद्यार्थी असावेत.  ज्या ज्या शिक्षण संस्थेमध्ये डाॅ.  बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले त्या सर्व संस्थांमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव चालू आहेच; शिवाय अनेक संस्थांमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शिकले नसले तरी त्यांच्या  विचारांपासून त्या संस्था अलिप्त राहू शकल्या नाहीत.  भारताच्या मध्यप्रदेशातील ‘महू’ सारख्या एका खेडेगावात जन्माला आलेले बाबासाहेब आज विव्दतेच्या जोरावर जगभर पोहचले आहेत. डाॅ.  बाबासाहेब आंबेडकरांची अर्थनिती हीच जगाला तारु शकते, हेच सांगण्याचा प्रयत्न ‘लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स’ने केला आहे. नव्हे जगभरातील राज्यकत्र्यांसाठी व विद्वानांसाठी हा एक नवा संदेश  या स्कूलने डाॅ.  बाबासाहेब आंबंेडकरांचा पुतळा उभा करुन दिला आहे.  म्हणनूच भारताचे अर्थतज्ञ तथा अर्थषास्त्राचे नोबेल पारितोषिक विजेते डाॅ. अमर्त्य सेन म्हणाले होते की,  ‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या अर्थशास्त्राचे जनक आहेत.’ याच ‘लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स’ने ‘डाॅ. बी. आर. आंबेडकर रिसर्च सेंटर’ ची स्थापना केली असून या संेंटरच्या माधमातून बाबासाहेबांचे आर्थिक विचार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचण्याचे कार्य अनेक आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या आणि व्याख्यानाच्या मध्यमातून चालू ठेवले आहे.



भारतीय रिझर्व बॅंकेच्या स्थापनेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा होता हे अनेक भारतीयांना ठाऊक नसावे आणि असले तरी ते सांगण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. त्यांच्या विचारावरच आधारीत या बॅंकेची स्थापना झाली असे अनेक ब्रिटीश अभ्यासकांचे मत आहे, आणि ते सत्य आहे. कारण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तात्कालीन कालखंडातील एकमेव अर्थतज्ञ होते. ‘हिल्टन यंग’ कमिशन ‘राॅयल कमिशन आॅन इंडियन करन्सी अॅन्ड फायनान्स’ या नावाने जेव्हा भारतात आले तेंव्हा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या द प्राॅब्लेम आॅफ द रुपीः इट्स ओरीजन अॅन्ड इट्स सोल्युन या पुस्तकाचा अभ्यास करुन; त्यांनी 1934 चा आर बी आय अॅक्ट पास केला. तेंव्हा त्या कमिशनसोबत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी चर्चा करुन या बँकेची गरज, कामाची पद्धती आणि त्याचे स्वरुप या विशयाची साक्ष दिली होती. त्यांनी त्यावेळी महत्वाची तीन पुस्तके लिहली होती. ज्या पुस्तकात भारतीय रिझर्व बॅंकेचा पाया आहे. 

1. अॅडमिनिस्ट्रेशन अॅन्ड फायनान्स आॅफ द इस्ट इंडिया कंपनी

2. द इव्हॅल्युशन आॅफ प्रोव्हेषियल फायनान्स इन ब्रिटीश इंडिया

3.द प्राॅब्लेम आॅफ द रुपीः इट्स ओरीजन अॅन्ड इट्स सोल्युशन

या तीन ग्रंथाचा आधार हिल्टन यंग कमिशनला झाला. या कमिशनने बाबासाहेबांचे सर्व  मुद्दे विचारात घेऊन ‘ रिझर्व्ह बँक’ची स्थापना केली. मात्र  भारतीयांना याची  किंचितही जाणीव नाही.  आणि जर या नेभळट सरकारला याची खरोखरच जाणीव  असती तर आज प्रत्येक भारतीय चलनावर फक्त बाबासाहेबांचाच फोटो असता. भारताच्या जनतेला जरी याचा विसर पडला असला तरी ज्या ‘लंडन स्कूल आॅफ  इकाॅनाॅमिक्स' मध्ये बाबासाहेबांनी अर्थशस्त्राचे शिक्षण घेतले ती संस्था मात्र  बाबासाहेबांच्या अर्थनितीला विसरली नाही. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श  डोळयासमोर ठेवून या स्कूलमधून आज अनेक अर्थतज्ज्ञ बाहेर पडत आहेत. जागतिक बाजारपेठेत आज दिवसेंदिवस रुपयाची किमत ढासाळताना दिसत आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थनितीचा विसर इथल्या राज्यकत्र्याना झाला खरा, पण याचे परिणाम आज संपूर्ण भारतीयांना भोगावे लागत आहेत. जर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार भारतीय राज्यकर्त्यांना विचारात घेतले  असते,  तर भारत आज नक्कीच जगाची  आर्थिक महासत्ता म्हणून पुढे आला असता.  याची जाणीव ‘लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स’ या संस्थेला झाली  असावी म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थनितीचे धडे गिरविण्याचे कार्य  या स्कूलने आपल्या हाती घेतले आहे. दरवर्षी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती लंडन स्कुल आॅफ इकाॅनाॅमिक्स मध्ये साजरी करण्यात येते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध पैलूवर व कार्यावर चर्चासत्राचे आयोजनही करण्यात येते. याच स्कूलच्या मिस संतोश दास एका जयंती प्रसंगी बोलताना म्हणाल्या होत्या की, डाॅ. बाबासाहेब अंाबेडकरांनी समता आणि न्यायासाठी भारतात उभारलेल्या लढयाचे पडसात आज संपुर्ण जगावर पडत आहेत. हा मानवाधिकाराचा विशय असून आज संपुर्ण जगभरात या विशयावर सखोल अशी चर्चा केली जावू लागली आहे. मानवाधिकाराचा विषय आज प्रत्येेकाच्याच जिव्हळयाचा झाला आहे. लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स मधील एशिया संशोधन केंद्राच्या सह संचालीका डाॅ. रुथू कुट्टूमुरी म्हणतात, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा समता आणि न्यायाचा लढा हा केवळ दलितांसाठी नव्हता तर तो सर्वांसाठी लढलेला सर्वसमावेशक लढा होता. तर लंडन स्कुल आॅफ इकाॅनाॅमिक्स मधील मानववंशस्त्राच्या सहाय्यक प्राध्यापिका डाॅ. अल्फा शहा म्हणतात, ‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी तात्कालीन परिस्थितीत घेतलेल्या अनेक निर्णयामुळे आज अनेकांना आपले आर्थिक जीवन सुधारता आले आहे. याचे संपुर्ण श्रेय त्यांना दिले जाते यात तिळमात्र शंका नाही.’

अषी अनेक चचासत्रे दरवर्शी या स्कुल मध्ये भरवली जातात. याची साधी बातमीही एखादया वर्तमानपत्रातून भारतीयांना वाचावयास मिळत नाही. आज संपुर्ण जगाचे लक्ष डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचाराकडे लागलेले असताना भारतातील नेते मंडळी महासत्तेच्या हाका मारत आहेत आणि सामान्य जनतेला महासत्तेचे स्वप्न दाखवत आहेत. परंतु डाॅ.  बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जोपर्यंत भारत स्वीकारणार नाही तोपर्यत भारत  महासत्ता होणार नाही. हे सूर्यप्रकाशाइतकेच शास्वत सत्य आहे आणि ते एक दिवस भारताला स्वीकारावे लागणार आहे.


विनंती : 

आपल्याला माझे लेख / ब्लॉग आवडत असल्यास वर उजव्या बाजूला असलेल्या Follow या बटनावर click करायला विसरू नका. 

टीप: लेखातील कोणताही मजकूर कोठेही कॉपी पेस्ट करू नये. शेअर करावासा वाटल्यास केवळ लिंक शेअर करावी.