मराठा आरक्षण: चुका राज्यकर्त्यांच्या दोष संविधानाला
डॉ. ह. नि. सोनकांबळे
मराठा समाजातल्या विचारवंतांनी पुढे यावे आणि दोष कोणाचा आहे यावर प्रबोधन करावे. तरच संविधान विरोधकांचे मनसुबे उधळले जातील.
भविष्यात राज्यकरर्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करुन लोक संविधानालाच दोष देत बसतील आणि चांगल्या संविधानाला देखिल लोक वाईट आहे असे म्हणतील. नेते मात्र निर्दोष आणि मोकाट फिरतील. असे होणार आहे हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना आगोदरच माहित होते. म्हणूनच त्यांनी संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणात असा इशारा दिला होता की,
आज देशभरात हेच दिसून येत आहे. लोक संविधान वाईट आहे असेच म्हणू लागले आहेत आणि चुका करणाऱ्या आपल्या नेत्याला मात्र निर्दोष सोडून देत आहेत. नुकतेच मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर प्रतिक्रयांचा पाउस पडू लागला आहे. यात अनेकांनी राज्यकत्र्यांना दोषींच्या पिंजऱ्यात उभे केले आहे परंतु त्यांचा आवाज कमी पडतो आहे.
मात्र दुसरीकडे संविधानाला दोषींच्या पिंजऱ्या उभे करणाऱ्यांचा आवाज मात्र दिवसेंदिवस मोठा होत चालला आहे. सर्व दोष संविधानाचा आहे. आम्हाला जर हे संविधान आरक्षण देवू शकत नसेल तर आम्ही संविधानच बदलू, आमचा संविधानावरचा विश्वास उडत चालला आहे. असेच बोलले जात आहे. मात्र आपण हे का तपासून पाहत नाही की, आपण ज्यांना आपले लोकप्रतिनिधी म्हणून निवडूण दिले आहे, त्यांच्या चुकांमूळे आज आपल्यावर अशी वेळ आली आहे.
एक साधं गणीत असं आहे की, जर संविधान 50 टक्क्याहून अधिक आरक्षण देवू शकत नसेल आणि एखाद्या सरकारने दिले तर ते टिकणार नाही. असे असताना
याचं सरळ गणीत हे आहे की, त्या राज्यकत्र्यांनी ते टिकवून ठेवलं. आज महाराष्ट्रात आजपर्यंत 19 पैकी 13 मुख्यमंत्री मराठा समाजाचे होवून गेले शिवाय सध्या राज्यात जवळपास 169 आमदार तर 24 खासदार हे मराठा आहेत. असे असताना देखिल हे आरक्षण टिकू शकले नाही.
कारण मराठा आरक्षणाची मागणी, पाठपुरावा आणि लढाई योग्य मार्गाने झाली नाही. मूळात जर राज्याच्या विधानसभेत आणि लोकसभेत जर एकाच जातीचे एवढे लोकप्रतिनिधी असताना लाखोंच्या संख्येने मोर्चे काढावे लागले. यामूळे हेच सिद्ध होते की, हे निवडलेले लोकप्रतिनिधी निवडताना मराठा समाजाकडून काही तरी चूक झाली आहे. कारण यातले कोणीही मराठा समाजाच्या हाकेला ‘ओ’ देणारे नाहीत. किंवा ते केवळ प्रतिष्ठेसाठी, स्वसंपत्तीच्या संरक्षणासाठी आणि शासनाच्या पैशावर मजा करण्यासाठी निवडूण आलेले आहेत. त्यांचे आपल्या काय, कोणत्याच समाजाशी काही देणे घेणे नाही.
जर काही देणे असते तर 24 पैकी एखाद्या खासदाराने लोकसभेत मराठा आरक्षण विधेयक मांडले असते. व जसे आर्थिक निकषांवर 10 टक्के आरक्षण तसेच मराठा समाजाचाही विचार करावा असे म्हटले असते. परंतु असे 24 पैकी एकाही खासदाराने म्हटले नाही. किंवा राज्याच्या विधानसभेतील 169 पैकी एकाही आमदाराने किंवा मंत्र्याने याचा निषेध म्हणून आजपर्यंत राजिनामाही दिला नाही. यातून हे स्पष्ट होते की, यांना कोणालाही मराठा आरक्षणाविषयी काही देणे घेणे नाही.
कारण त्यांना हा वर्ग सहज मिळाला आहे. जो संविधान बदलण्याची भाषा करतो आहे. याची जाणीव अनेक मराठा अभ्यासकांच्या गटाला झाली, परंतु ते देखिल या मोठया गटाला समजावून सांगण्यात कमी पडत आहेत. कारण जवळपास सर्वच मराठा लोकप्रतिनिधी हे त्यांच्या विरोधी मताचे आहेत.
यातून खरा पिळला जातो आहे तो आरक्षणाची खरी गरज असलेला मराठा समाज. जो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे डोळे लावून बसला होता. परंतु त्यांनी याचा अभ्यास केला पाहिजे की, नेमकं आपल्याला साथ कोणी दिली नाही. संविधानाने की लोकप्रतिनिधींनी? याचे उत्तर शोधून याचा विचार केला पाहिजे की? ज्याने आपल्याला साथ दिली नाही त्यांना आगोदर बदलावे लागेल. परंतु इथेही लोकप्रतिनिधींचाच विजय होईल आणि ते लोकांना हे पटवून देतील की, संविधानाने अडचणी निर्माण केल्या आहेत. चला ते आगोदर बदलू.
लोक देखिल त्यांचे पुन्हा ऐकतील आणि लोकप्रतिनिधींऐवजी संविधान बदलण्याच्या लढाईत सामिल होतील. असे करण्यापूर्वी त्यांना जगभरातल्या संविधानाचा अभ्यास करावा आणि ठरवावं की, खरोखर कोणतंही संविधान वाईट असतं की, त्याला राबविणारे लोक वाईट असतात. अमेरीकेत केवळ 50 पानांचे संविधान आहे, इंग्लंड मध्ये तर लिखित संविधानच नाही. पण या दोन्ही राष्ट्रांचा कारभार व्यवस्थित चालतो कारण त्याला राबविणारे लोक अर्थात निवडूण दिलेले लोकप्रतिनिधी चांगले आहेत. म्हणून त्यांना संविधान चांगले की, वाईट यावर चर्चा करायला वेळच नसतो. त्यांना माहित आहे, जर लोकप्रतिनिधी चांगले असतील तर संविधान कसेही असले तरी काही हरकत नाही. कारभार चांगलाच होत असतो. आपण असा विचार कधीच करत नाही. आपल्या जातीचा नेता आपल्याला नेहमी चांगलाच वाटत असतो. त्याने आपले कितीही वाटोळे केले तरीही आपल्याला काहीच वाटत नाही. परंतु दुस$या जातीचा चांगला माणूच लोकप्रतिनिधी म्हणून निवडूण द्यायचा नाही. ते म्हणतात ना, ‘नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे.’
म्हणून मित्रांनो आपण सर्वांनी मिळून विचार केला पाहिजे,
आणि मगच कोणत्या लाढाईत सामिल व्हायचे ठरवले पाहिजे. अन्यथा अपणच आपल्या हातून आपला सर्वनाश ओढवून घेणार आहोत हे मात्र नक्की!