Monday, February 27, 2023

पं. नेहरू आणि भारताचे विज्ञान (आणखी फोटो पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा)

 


 नेहरू आणि भारताचे विज्ञान 

 

भारतातील भूक, गरिबी, वेडेपणा,  निरक्षरता आणि अंधश्रद्धा केवळ विज्ञानाच्या आधारावरच सोडवल्या जाऊ शकतात.  

-जवाहरलाल नेहरू

 

 1958 साली नेहरुंनी देशाचे विज्ञान धोरण जाहीर केले आणि देशात विज्ञान संस्थांचे जाळे उभे करायला सुरुवात केली. आयआयटी, आयआयएम, अभियांत्रीकी, नॅशनल इन्स्टिीटयुट आॅफ टेक्नाॅलाॅजी अशा शैक्षणीक संस्था स्थापन करण्यावर भर दिला. हे करत असताना त्यांनी होमी भाभा, शांतीस्वरुप भटनागर, विक्रम सारारभाई, सतीश धवन अशा लोकांना सोबत घेतले. नेहरुंनी देशाच्या आर्थीक विकासाला चालना मिळावी म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संख्याशास्त्रज्ञ डाॅ. पी. सी. महालनोबीस यांना सोबत घेवून ‘नियोजन मंडळ’ स्थापन केले.

संरक्षण उपकरणांच्या उत्पादनात भारताची क्षमता वाढवण्यासाठीही त्यांनी पावले उचलली जेणेकरून भारत हळूहळू स्वयंपूर्ण होऊ शकेल. क्षेपणास्त्रे, शस्त्रास्त्रे, स्फोटके आणि इतर संरक्षण-संबंधित यादीच्या निर्मितीमध्ये संशोधनासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था  (DRDO-)  १९५८ मध्ये स्थापन करण्यात  आली. भारत हे अणुऊर्जेचे महत्त्व ओळखणाऱ्या पहिल्या राष्ट्रांपैकी एक होते. नेहरूंना खात्री होती की अणुऊर्जा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात जागतिक क्रांती घडवून आणेल, शिवाय देशाच्या संरक्षण क्षमतेवर परिणाम करेल. म्हणूनच 1948 मध्ये अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली.

नेहरू यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री के.डी. मालवीय यांच्या धोरणांना नेहरूंनी सातत्याने पाठिंबा दिला म्हणूनच भारतातील संसाधनाच्या शोधासाठी तेल आणि नैसर्गिक वायू आयोगाची (ONGC) स्थापना करत असताना त्यांनी मालवीय यांचे कौतुक केले आणि या कार्यास आपल्या सरकारचा पाठिंबा दिला. त्यानंतर एका एकापाठोपाठ एक वैज्ञानिक संस्था, म्हणजे अणुऊर्जा विभाग (DAE- १९५४), भाभा अणु संशोधन केंद्र (BARC - १९५४), भौतिक संशोधन प्रयोगशाळा (PRL - १९४७)  अशा विविध संस्था स्थापन केल्या आणि भारताला विज्ञान यौगकडे आणून सोडले.

हेही वाचा :

 ... आणि पं. नेहरूंनी कुंभमेळ्यात अंघोळ करण्यास नकार दिला ! 

 नेत्यांचे पक्षांतर - मतदारांचे, विचारधारेचेही पक्षांतर ठरते का?  

भारतीय लोकशाहीच्या मूल्यमापणाची चौकट व विरोधाभास  

 
नेहरूंच्या विज्ञानातील योगदानाला अधोरेखित करणारे काही छायाचित्रे 

 

जवाहरलाल नेहरू इंडियन सायन्स काँग्रेस, लखनौ, ३ जानेवारी १९४९ ला संबोधित करताना. 
(Credit: Wikimedia Commons) 
 

 समरेंद्र कुमार मित्रा भारतीय सांख्यिकी संस्था, कोलकाता येथे  
जवाहरलाल नेहरूंना 953 च्या सुमारास भारतातील पहिल्या  
स्वदेशी संगणकाचे प्रात्यक्षिक दाखवताना 
(Credit:  AlokeKumarBose,
CC BY-SA 4.0 Wikimedia Commons)  
 

 10 एप्रिल 1954 : विक्रम साराभाई आणि जवाहरलाल नेहरू 
यांनी भौतिक संशोधन प्रयोगशाळेच्या कॅम्पसमधील 
पहिल्या इमारतीचे उद्घाटन केले.



भौतिकशास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकटरामन आणि नेहरू 

 

जवाहरलाल नेहरू आणि त्यांची कन्या इंदिरा गांधी  

अल्बर्ट आइनस्टाइन यांची भेट घेताना

जवाहरलाल नेहरू यांना 

अल्बर्ट आइनस्टाइन यांनी एक पत्रही लिहले होते





 


2 comments: