Sunday, July 19, 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द भांडार थक्क करणारे!






साधारणतः ज्या व्यक्तीला 1000 शब्द येतात त्या व्यक्तीला थोर विचारवंत असे आजही समजले जाते. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे तर 8500 शब्दांचे भांडार होते. म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारीक उंची किती प्रचंड होती हे यावरून लक्षात येईल. हि उंची मोजता मोजता अनेकांचे आयुष्य संपले आहे आणि अजूनही अनेकांचे संपणार आहे यात शंकाच नाही. 


अवघ्या वयाच्या 26 व्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिका हादरवून सोडली होती आणि जगातल्या अनेक समाजशात्रज्ञांना घाम फोडला होता. आपल्यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या अनेक शात्रज्ञांचे सिद्धांत त्यांनी खोडून काढले आणि अमेरिकेला नव्या ज्ञानाच्या प्रकाशझोतात आणले.



अशा या प्रचंड ज्ञानसागरावर अनेक विद्यापीठे वेगवेगळ्या पद्धतीने संशोधन करत आहेत. काही वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राने एक आगळे वेगळे संशोधन केले आहे. या केंद्राने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनात व भाषणात वापरलेल्या इंग्रजी शब्दांचा शोध घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेले वेगेवगळे इंग्रजी शब्द शोधले तर त्याची संख्या 8500 इतकी निघाली. 


साधारणपणे उत्कृष्ट इंग्रजी वाचणे आणि लिहणे यासाठी 500 ते 600 शब्दांची आवश्यकता असते आणि जर तुम्हाला कोणत्याही भाषेतले 1000 शब्द येत असतील तर तुम्हाला त्या भाषेतला थोर विचारवंत असे समजले जाते. इथे तर 8500 शब्द आहेत अशा व्यक्तीला नेमके काय म्हणायचे हा प्रश्न येणाऱ्या काळात जगलाही पडू शकतो. 



डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लेखन आणि भाषणे करत असताना काही काही वेळेस इंग्रजीची दोन - तीन शब्द एकत्र करून एक शब्द बनवले आहेत तर काही शब्दाचे अर्थ डिक्शनरी मध्ये देखील सापडत नाहीत असा या केंद्राच्या अभ्यासकांचा दावा आहे. तर जगातल्या अनेक धर्मग्रंथातून व अनेक भाषेतून त्यांनी विविध शब्दांना जन्म देखील दिला असल्याचे दिसते. 



या 8500 शब्दांना लवकरच डिक्शनरीबद्ध केले जाणार असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे. या संशोधनात प्रसिद्ध विचारवंत व अभ्यासक डॉ. कृष्णा किरवले यांचा सिंहाचा वाटा आहे. 


तर मित्रहो आपण 1000 शब्द येणाऱ्या व्यक्तीला थोर विचारवंत संबोधतो तर आता तुम्हीच ठरवा 8500 शब्द भांडार असलेल्या या महान व्यक्तीला काय म्हणायचे? तुम्हीच ठरवा आणि मला पण कंमेन्ट बॉक्स मध्ये सागा. 

अशाच नवनवीन माहितीकरिता या पेज ला Follow करायला विसरू नका. 

Thursday, July 16, 2020

राजकीय आरक्षण ? ऍड. बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका




राजकीय आरक्षण असावे कि नसावे? या प्रश्नावर काही दिवसांपूर्वी ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी चर्चेला सुरुवात केली होती. आरक्षित जागेवरून निवडून येणारे लोक बिनकामाचे असतात अर्थात एका सर्वे नुसार "निकम्मे" असतात असंही म्हटलं आहे. नेमकं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना यातून काय अपेक्षित होतं आणि आणि त्यांनी सुरुवातीला स्वतंत्र मतदार संघ व पुणे करारांतर आरक्षित जागा यावर समाधान का मानलं? हे देखील बघणे आवश्यक आहे. 

1909 च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यानुसार भारतात राजकीय आरक्षणाला सुरुवात झाली. सुरुवातीला मुस्लिमांना व पुढे शीख समुदायाला याचा लाभ मिळाला. जेव्हा या समुदायाच्या स्वतंत्र मतदार संघाला मान्यता देण्यात आली तेव्हा भारतातील कोणत्याही समुदायाने याचा विरोध केला नाही. 1916 व पुढे 1924 च्या बेळगावच्या अधिवेशनापर्यंत देखील या बाबतीत काँग्रेस अर्थात गांधीजींनी ब्र शब्ध देखील काढला नाही. 

पण जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत यावर घमासान चर्चा करून अस्पृश्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ मंजूर करून घेतले तेव्हा मात्र संपूर्ण काँग्रेस त्यांच्या विरोधात गेली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाचे तुकडे करायला निघाले आहेत अशी टीका त्यांच्यावर केली. 

या पूर्वी मुस्लिमांना मात्र असा विरोध झाला नाही. कारण, 1906 ला जरी मुस्लिम लीग स्थापन झाली असली तरी आणि 1920 च्या आंदोलनात फूट पडून 1923 ला "काँग्रेस खिलाफत स्वराज पार्टी" ची स्थापना झाली असली तरी या दोघांनाही एकत्र आणण्यात बॅ. जिना यांचा महत्वाचा वाटा होता. शेवटी मुस्लिम आपल्या सोबतच राहणार आहेत या कारणावरून मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदार संघाला काँग्रेस ने कधीच विरोध केला नाही. 

पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वतंत्र मतदार संघ मिळाले तर ते देशात एक पर्यायी सरकार बनवण्याची हिम्मत कधीही करू शकतात हि बाब लक्षात आल्याने प्राणपणाने विरोध झाल्याचे  स्पष्ट दिसते. म्हणूनच गांधीजींनी प्राणांतिक उपोषण केले आणि स्वतंत्र मतदार संघ डावलून राखीव जागांची तरतूद करावी अशी योजना पुढे केली. शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नाईलाजास्तव पुणे करारावर सही करावी लागली. 

पुढे आरक्षणाची तरतूद स्वतंत्र भारताच्या संविधानात कलम 330 व 332 मध्ये आल्याचे दिसते. या कलमात स्पष्टपणे असे हटले आहे की, 
कलम 330 नुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरीता त्या त्या राज्यातील लोकसंख्येच्या प्रामाणानुसार लोकसभेमध्ये जागा राखीव ठेवण्यात येतील.  तर कलम 332 मध्ये हीच तरतूद राज्याच्या विधानसभांच्या बाबतीत आहे. पण या आरक्षणाचा कालखंड कलम 334 मध्ये वेळोवळी केलेल्या बदला नुसार असेल. अर्थात सुरुवातीला हे केवळ 10 वर्षासाठी होते. पण संसदेने 334 मध्ये वेळोवेळो बदल करून ती 10 - 10 वर्षानी वाढवत आणली आहे. 

महत्वाचे म्हणजे ही मुदत वाढवा असे एकही निवेदन सासदेकडे देण्यात आलेले नाही. उलट  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या आरक्षणाला विरोध करण्यात आला होता. त्या विरोधात ७, ८ व ९ नोव्हेंबर १९५९ ला झालेल्या बैठकीत राजकीय आरक्षणाविरुद्ध या पार्टी ने ठराव देखील संमत केला होता. पण राजकीय पक्षांना अशी भीती आहे की,
जर राजकीय आरक्षण संपुष्टात आले तर  पक्षाला आपली वोट बँक शाबूत ठेवण्यासाठी प्रत्येक समूहाला आवश्यक त्या जागा द्याव्या लागतील जो देणार नाही त्याची वोट बँक राहणार नाही. हि भीती प्रत्येक पक्षाच्या मनात आहे म्हणून मागणी नसताना हे आरक्षण वाढविले जात आहे. 



डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र तथा ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचे वडील सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनीसुद्धा राखीव जागेवर निवडणूक लढवण्यासाठी नकार दिला होता. 


आंध्रप्रदेशतले एक सदस्य नागप्पा यांनी 25 ऑगस्ट 1940 रोजी एक निवेदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिले होते. त्यात त्यांनी हे आरक्षण किमान 150 वर्ष असावे किंवा जोपर्यंत सामाजिक समता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत असावे अशी मागणी केली होती. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अशी आशा होती की, राजकीय आरक्षणाची आवश्यकता ज्यास्त दिवस असणार नाही. कारण हा देश लवकरच सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित करेल आणि आरक्षण संपुष्टात आणेल. पण तसे झाले नाही तर हे आरक्षण पुढे 10 - 10 वर्षांनी वाढवावे असे त्यांना वाटत होते.  आरक्षणाच्या पाठीमागे त्यांचा केवळ प्रतिनिधित्व एवढाच हेतू नव्हता तर  वेगळा उद्देश देखील होता. सर्वच समूहाच्या लोकांना शासन व्यवस्थेचा भाग होता यावे आणि सर्वच समूहांनी एकमय होऊन देशाचा कारभार करावा जेणेकरून हा देश लवकरच "एक राष्ट्र" म्हणून उदयास येईल अशी त्यांना अपेक्षा होती. पण याचा अर्थ कोणीही समजून घेतला नाही. 

या राजकीय आरक्षणाचा लाभ घेऊन अनेक राजकीय पक्षांनी आपली वोट बँक तयार केल्याचे चित्र आहे. म्हणूनच कोणतीही मागणी नसताना हे आरक्षण वाढविले जात आहे तर सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाची मागणी असताना व त्याचा प्रचंड बॅकलॉक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जर खरोखरच या समूहाचा विकास व्हावा या हेतूने राजकीय आरक्षण वाढविले जात असेल तर सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण देखील त्याच आत्मीयतेने भरले गेले पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. 

आपल्याला हवा तसा व्यक्ती पकडायच आणि त्याला आरक्षित जागेवर उभं करायचं, निवडूनही आणायचं पण समाजासाठी काहीच काम करू द्यायचं नाही जेणेकरून तो मोठा होईल. हि रणनीती गेली 65 वर्षांपासून चालविली जात आहे. म्हणूनच कोणत्याही अनुसूचित जाती व जमातीच्या नेत्याला त्याचा त्याचा सुरक्षित मतदार संघ देखील राहिलेला नाही. प्रत्येक वेळी असा बकरा शोधला जातो, जो कि आपल्या इशाऱ्यावर चालेल. यामुळे या दोन्ही समूहात कधीही स्वाभिमानी नेतृत्व उदयास आलेले दिसत नाही. भलेही आरक्षित जागेवर निवडून येणाऱ्यांची संख्या शातकाहून अधिक असली तरी. 

म्हणूनच एका सर्वे मध्ये असे नमूद केले आहे की, आरक्षित जागेवर निवडून येणारे नेते "निकम्मे" सिद्ध होत आहेत. त्यामुळेच ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांना देखील असे मतदार संघ आता नको आहेत. त्याऐवजी स्वाभिमानी राजकारणाची मोट आपण बांधावी असे त्यांना वाटते. 

डॉ. ह. नि. सोनकांबळे
औरंगाबाद 

Sunday, July 12, 2020

अखेर : कोरोनाची लस बनवण्यात रशिया यशश्वि



जगभरातील लोक आपण कोरोनातून कधी मुक्त होणार या चिंतेत असतानाच रशियातून एक महत्वाची बातमी आली आहे. कोरोनावर पहिली यशाश्वि लस बनविण्यात रशियाने बाजी मारली आहे. 




या लसीच्या सर्व चाचण्या यशाश्वि झाल्याचा दावाही संशोधकांनी केला असून ज्या स्वयंसेवकावर याचा प्रयोग करण्यात आला होता त्या स्वयंसेवकांना  
डिश्चार्ज देखील देण्यात आला आहे. 



या संबंधीची माहिती वदीम तारासोव या अधिकाऱ्याने दिली आहे.  ते इंस्टीट्यूट फॉर ट्रान्सलेशन मेडिसिन अँड बायोटेक्नोलॉजीचे अधिकारी आहेत. 


  वदीम तारासोव असे म्हणाले की, सेचेनोव विद्यापीठाने  18 जूनला या लसीची चाचणी सुरू केली होती. त्यानंतरच्या सर्व चाचण्या देखील यशस्वी झाल्या असून स्वयंसेवकांना डिशचार्ज देखील देण्यात आला आहे. 


सेचेनोव विद्यापीठाच्या इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल पैरासिटोलॉजी, ट्रॉपिकल अँड वेक्टर-बॉर्न डिजीजचे प्रमुख अलेक्जेंडर लुकाशेव यांनी देखील या लशीच्या सर्व चाचण्या यशाश्वि झाल्या असून लवकरच हि लस बाजारात येईल असे म्हटले असल्याचा दावा अनेक 
इंग्रजी वर्तमानपत्रांनी केला आहे. 


जर हि लस लवकर बाजारात आली तर अनेक देशांची काळजी मिटणार असून लाकरच जग कोरोनापासून मुक्त देखील होणार आहे. त्यामुळे या सर्व संशोधकांचे अभिनंदन तर केलेच पाहिजे.

Tuesday, June 30, 2020

रोमँटिक हिटलर




कट्टर धार्मिक, हिंसक, क्रूर अशी कायम ओळख आपल्या मनात निर्माण करणारा हिटलर अतिषय भित्रा, प्रेमळ, कवी मनाचा "रोमँटिक" होता असे म्हटले तर लोक आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत.




 पण हे खरे आहे की, तारुण्याच्या काळात हिटलर नेमका असाच होता. ऐन तारुण्यात तो स्टेफन नावाच्या तरुणीवर एकतर्फी प्रेम करायचा. हिंदी चित्रपटातील नायकाने आपल्या प्रेयसीच्या घराच्या भोवती चकरा माराव्यात तसा तो नेहमी तिच्या भोवती फिरायचा. 



1969 च्या "प्यार हि प्यार" चित्रपटात धर्मेंद्र जसा वैजयंतीमाला ला पाहून म्हणतो की, मै कहीं कवी ना बन जाऊ तेरे प्यार मे ए कविता, किंवा "बॉबी" चित्रपटात ऋषी कपूर डिंपल कापडियाला म्हणतो, मै शायर तो नहीं... अगदी तशीच अवस्था या हिटलरची स्टेफन ला बघून झाली होती. 



तो तिच्यावर एवढे प्रेम करायचा कि त्याने नंतर तिच्यावर कविताही केल्या. पण प्रेमळ असलेला हिटलर भित्राही होता. त्यांनी तिच्यावर लिहलेली एकही कविता तिच्यापर्यंत पोहचवली नाही. त्याचे प्रेम शेवटपर्यंत एकतर्फी राहिले. 


तो जितका प्रेमळ होता तितकाच तो विश्वासूही होता. पुढे ब्राऊन नावाच्या तरुणीशी त्याचे 10 वर्ष प्रेम संबंध राहिले. त्याने तिला लग्नाचे आश्वासनही दिले होते. पण तसा काही योग येतच नव्हता. जेव्हा त्याला असे कळले की, आपले आयुष्य आता संपणार आहे त्याच्या एक दिवस आगोदर त्याने ब्राऊनशी विवाह केला आणि तिला दिलेला शब्दही पाळला. 


1919 मध्ये केवळ 111 लोकांच्या समोर हिटलरने पहिले 30 मिनिटांचे भाषण केले आणि त्याला त्यांच्यातले नेतृत्वगुण समजले. अशा या हिटलरने जगाला मोठे हादरे दिले. हिटलर ची सुरुवातीची ओळख नंतरच्या काळात मात्र राहिली नाही. 

Friday, June 26, 2020

"जातीसाठी माती" न खाणारा राजा





"जातीसाठी माती" न खाणारा राजा
डॉ. ह. नि. सोनकांबळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकवेळेस गांधीजींना म्हणाले हिते कि, गांधीजी लेखणीच्या एका फाटकाऱ्याने कोणताही समाज बदलता येत नाही.  (प्रा. डॉ. श्रीराम निकम लिखित "गांधी-आंबेडकर अस्पृश्यता मुक्ती संघर्ष" या पुस्तकात या घटनेचे वर्णन खूप विस्ताराने आले आहे. ) कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहास डोळ्यांनी बघितला होता आणि त्याचे चिंतनही केले होते. कितीही कडक कायदे केले तरी लोक जातीसाठी माती खतातच हे त्यांना माहीतच होते. पण शाहू महाराज हे जातीसाठी माती खाणारे राजे नाहीत हि बाबच शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मैत्री घनिष्ठ करत गेली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर शाहू महाराजांनी 1919 ला केलेला अस्पृश्यता बंदीचा कायदा होता. हा कायदा होऊनही सार्वजनिक विहिरीचे पाणी बाटवले म्हणून "गंगाराम कांबळे" यांना मारहाण झाली. पण शाहू महाराजांनी जातीसाठी माती कधीच खाल्ली नाही. ज्या लोकांनी गंगाराम कांबळे यांना मारहाण केली त्या लोकांना दरबारात पकडून आणले आणि त्यांना चाबकाने सोलून काढले. 

गंगाराम कांबळे याला बोलावून घेतले आणि त्याला व्यवसाय करण्याचा सल्ला शाहू महाराजांनी दिला. आज जे लोक तुला अस्पृश्य समजत आहेत तेच लोक उद्या तुझ्या हॉटेल ला येऊन तुझ्या हातचा चहा पितील. असा ठाम विश्वास त्यांनी गंगाराम कांबळे यांना दिला. 

Advt.


शाहू महाराजांनी त्यांना सहकार्य केले, प्रेरणा दिली. एवढेच नाही तर ते फेरफटका मारायला गेल्यावर त्या हॉटेल मध्ये जाऊन आपल्या सोबत फिरणाऱ्या इतर जातीच्या लोकांना सोबत घेऊन त्या हॉटेल वर बसून चहा पिऊ लागले. हि घटना इतिहासात जरी शाहू महाराजांनी अस्पृश्यांना व्यवसाय सुरु करुन दिले एवढ्यापुरती मर्यादित नाही किंवा अस्पृश्याच्या हातचा चहा शाहू महाराज पित असत एवढयापूरतीही मर्यादित नाही. 

हि घटना आपल्याला राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा देते. शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे सारख्या प्रवाहाच्या बाहेरच्या व्यक्तीला प्रवाहात आणले. जो पर्यंत प्रत्येक व्यक्ती प्रवाहात येत नाही तोपर्यंत या देशाचे आपल्याला राष्ट्र उभे करता येणार नाही याची जणीव शाहू महाराजांना होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील हाच मुद्दा उपस्थित करून या देशाला "राष्ट्र" म्हणता येणार नाही असे स्पष्ट पणे सांगितले होते. कारण हा देश जाती जाती मध्ये विभागलेला असून प्रत्येक एक जात हि स्वतःला "राष्ट्र" समजते, त्यामुळे ते कधीच एक होऊ शकत नाहीत. तर, जो पर्यंत लोक एकमय होत नाहीत तोपर्यंत आपल्याला कोणत्याही देशाला राष्ट्र म्हणता येणार नाही असे महात्मा फुले म्हणतात.

भारतातील लोकांना एकमय होऊ न देण्यासाठी "जात" आडवी येते त्यामुळे तीला कायमचे नष्ट करणे आवश्यक आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाटते. जातीला संपवायचे असेल तर आपापसात व्यवहार होणे तितकेच आवश्यक आहे याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही ते सांगतात. शाहू महाराजांनी 1917 ला आंतरजातीय विवाहाचा कायदा करून आणि गंगाराम कांबळे यांना हॉटेलचा व्यवसाय सुरु करण्याची प्रेरणा देऊन जाती-जाती मधील व्यवहारालाच प्रोत्साहन दिले. महात्मा फुले ज्यापद्धतीने सांगतात की, लोक एकमय झाले पाहिजेत, त्याच दिशेने शाहू महाराज पावले टाकताना दिसतात. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्या कृतिकार्यक्रमाला पुढे घेऊन जातात आणि आपल्याला या देशाचे "राष्ट्र" निर्माण करायचे आहे असे पुढच्या पिढीला सांगतात. 

पण आजही असे अनेक लोक आहेत जे फुले, शाहू आणि आंबेडकरांचा हा विचार सोडून जातीसाठी माती खायला निघतात. पण त्यांनी किमान, "जातीसाठी माती खावी पण कुठली खावी याचेही भान ठेवावे."

हेही वाचा 




T to translated by Google for English reader. 

King who does not eat "soil for caste"
Dr. H. N. Sonakamble

Dr. Babasaheb Ambed Ambedkar kar once said to Gandhiji that no society can be changed by a single piece of Gandhiji's writing.(This incident is described in great detail in the book "Gandhi-Ambedkar Untouchability Liberation Struggle" written by Prof. Dr. Shriram Nikam.) Because Dr.Babasaheb Ambedkar had seen history with his own eyes and had also thought about it. No matter how strict the laws were, they knew that people were only cultivating the soil for the caste. But Shahu Maharaj is not a king who eats soil for the sake of caste. Babasaheb Ambedkar's friendship grew closer. 

Dr. In front of Babasaheb Ambedkar, Shahu Maharaj's Untouchability Act of 1919 was a law. Despite this law, "Gangaram Kamble" was beaten up for distributing water from public wells. But Shahu Maharaj never ate soil for caste.The people who had beaten Gangaram Kamble were caught in the court and whipped. 

Gangaram Kamble called him and Shahu Maharaj advised him to do business. The same people who consider you untouchable today will come to your hotel tomorrow and drink your handful of tea.He gave such firm faith to Gangaram Kamble. 

Shahu Maharaj supported and inspired him. Not only that, when he went for a walk, he went to the hotel and sat down at the hotel and drank tea with the people of other castes who were walking with him.This incident is not limited to the history in which Shahu Maharaj started a business for the untouchables or the tea in the hands of the untouchables was drunk by Shahu Maharaj. 

This incident inspires us to build a nation.Shahu Maharaj brought an out-of-stream person like Gangaram Kamble into the stream. Shahu Maharaj was aware that we cannot build a nation of this country unless every person comes into the stream. Dr. Babasaheb Ambedkar also raised the same issue and made it clear that this country cannot be called a "nation". Because this country is divided into castes and each caste considers itself a "nation", so they can never be one.So, Mahatma Phule says that no country can be called a nation unless the people are united.

The "caste" is horizontal in order to prevent the people of India from uniting, so it needs to be eradicated forever.Babasaheb Ambedkar thinks. He also said that if caste is to be eradicated, it is necessary to make efforts for mutual treatment. Shahu Maharaj encouraged inter-caste marriage by enacting the Inter-caste Marriage Act in 1917 and inspiring Gangaram Kamble to start a hotel business. Shahu Maharaj is seen taking steps in the same direction as Mahatma Phule says that people should be united.Next Dr. Babasaheb Ambedkar takes the work of both of them forward and tells the next generation that we want to create a "nation" of this country. 

But even today, there are many people who abandon the idea of ​​Phule, Shahu and Ambedkar and go out to eat soil for the sake of caste. But he should at least say, "Eat soil for caste but also be aware of what to eat."



Friday, June 19, 2020

"मिलिंद विद्यापीठ" का झाले नाही ?





सर सय्यद अहमद खान यांनी 1875  ला स्थापन केलेल्या मुस्लिम अँग्लो ओरियन्टल कॉलेज चे रूपांतर 1920 मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठात झाले. तर अँनि बेझन्ट व मदन मोहन मालवीय यांनी 1898 मध्ये स्थापन केलेल्या सेंट्रल हिंदू महाविद्यालयाचे रूपांतर नंतर हिंदू बनारस विद्यापीठात झाले. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन संस्थेचे किंवा मिलींद महाविद्यालयाचे रूपांतर नंतर मिलिंद विद्यापीठात होऊ शकले नाही. 

एकीकडे मुस्लिम विद्यापीठ तर दुसरीकडे हिंदू विद्यापीठाची स्थापना होत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या लोकांचा विचार करत होते. जर शैक्षणिक संस्था अशा धर्माच्या नावावर उभ्या राहत असतील तर भारतातल्या लोकांचे काय होईल हि चिंता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होती. भारतातील "लोक" आणि त्यांचे कल्याण हा विषय त्यांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू होता. म्हणून त्यांनी "लोक" हि संकल्पना लक्षात घेऊन "पीपल्स" एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. कदाचित बाबासाहेबांना या देशात कोणत्याही धर्माच्या नावाने शिक्षण संस्था असाव्यात हि संकल्पनाच मान्य नसावी म्हणूनच त्यांनी भविष्यात "पीपल्स युनिव्हर्सिटी" स्थापन व्हाव्यात या दृष्टीकोनातून संस्था स्थापन केल्या. या देशाच्या भूमीत जे विद्वान लोक जन्माला आले त्यांची नावे विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना असावीत असे त्यांना वाटत होते. म्हणूनच त्यांनी विद्वान असलेल्या राजा मिलिंद चे नाव महाविद्यालयाला दिले. कोणत्याही संस्था, विद्यापीठे जातीच्या आणि धर्माच्या नावाने न ओळखता त्यातील शिक्षकांच्या  आणि विद्यार्थ्यांच्या नावाने ओळखली जावीत असा त्यांचा निश्चय होता. त्यासाठीच त्यांनी आपल्या संस्थेला नागसेन आणि मिलिंद या गुरु शिष्याचा वारसा सांगितला. इथून पुढेही हा वारसा निर्माण होत राहील हीच त्यांची अपेक्षा होती. 

खरे तर आजपर्यंत हे संस्थान एक मोठे विद्यापीठ होणे अपेक्षित होते पण ते झाले नाही. त्यानंतर अनेक संस्था उदयास आल्या आणि त्यांची विद्यापीठे निर्माण झाली पण संस्थेच्या ट्रस्टींनी त्या दृष्टीने पाऊले टाकली नाहीत. आजही संस्थेचा मालक कोण? यावर वाद सुरू आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळातही या संस्थेची वाटचाल कशी राहील हा चिंतेचा विषय आहे. 

मुळात या संस्थेचा वारस कोण? यावर मोठे वाद सुरु आहेत. अनेकांचे म्हणणे असे आहे की, " माझ्या संस्थेवर माझ्या रक्ताचा कोणीही वारस असणार नाही." अशी अपेक्षा बाबासाहेबांची होती.  याच वाक्यावरून  ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांना दूर ठेवण्यात येत आहे. मुळात प्रश्न असा आहे की,  "जर उद्या एखाद्याला  संस्थेचा सदस्य म्हणून नेमायचे असेल तर त्याच्याकडून बॉण्ड वर असे लिहून घ्यायचे का कि, "मी बाबासाहेबांच्या रक्ताचा वारस नाही." असा कोणता अनुयायी असेल की तो असे लिहून देईल. आणि असे लिहून देणारा संस्थेचा काय विकास करू शकेल. त्यामुळे अशा बाबींचा अडथळा पुढे न करता सरळ ऍड. बाळासाहेब आंबेडकरांचा मार्ग मोकळा करून संस्थेचा ताबा त्यांना देण्यात यावा व सर्व सदस्यांनी या संस्थेच्या विकासाचा श्वास मोकळा करावा. 

महाराष्ट्राच्या विकासात या संस्थेचे योगदान सुरुवातीपासूनच मोठे राहिलेले आहे. त्यामुळे असे अनेक हात आहेत की ते या संस्थेच्या मदतीस धावून येतील. महाराष्ट्रातील लोक, राज्यसरकार आणि केंद्रसरकार यातील कोणीही या संस्थेच्या विकासास अडथळा निर्माण करणार नाही. आजपर्यंत सरकारची भूमिका देखील सकारात्मक राहिलेली आहे. अनेक लोक या संस्थेला मदत करायला तयार आहेत. मागे 12 जानेवारी 2017 ला माझी भेट मा. खा. सुप्रिया ताई सुळे यांच्यासोबत झाली होती. संस्थेच्या बाबतीत त्यांनी सहज विचारलं. विद्यार्थ्यांची कशी सोय आहे हे हि विचारलं. वसतिगृहाची अवस्था बिकट आहे, खूप पडझड झाली आहे. यावर चर्चा झाली. मला वाटलं सहज विचारलं असेल. पुढे दोन दिवसानंतर म्हणजेच 14 जानेवारी 2017 ला त्यांनी मिलिंद कॅम्पस चा दौरा केला आणि वसतिगृहाची पाहणी केली. वसतिगृहाची अवस्था बघून विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांच्या लक्षात आले. संस्थेत वाद सुरू असल्याने वसतीगृहाचा विकास करता येत नाही हि बाब लक्षात घेऊन  त्यांनी "यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान" कडून दीड कोटी ची मदत जाहीर केली. पुढे तोच प्रश्न मध्ये आला संस्थेचा वाद. 

असे किती तरी लोक आहेत जे या संस्थेचा विकास करू पाहत आहेत पण जोपर्यंत संस्थेचा वाद संपुष्टात येणार नाही तो पर्यंत विकासाचा रथ अडून राहणार आहे. त्यामुळे ज्या लोकांना केंद्र म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हि संस्था उभी केली त्याच लोकांनी आता नव्याने काही पाऊले उचलने आवश्यक आहे. जोपर्यंत एखादी खंबीर व्यक्ती इथे येणार नाही तोपर्यंत लोकांचं अर्थात "मिलिंद विद्यापीठ" स्थापन होणार नाही. 

Wednesday, June 17, 2020

चीन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चष्म्यातून






चीन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चष्म्यातून  

डॉ. ह. नि. सोनकांबळे

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, चिन पंचशिलाचे पालन कधीच करणार नाही म्हणून चिनसोबत मैत्री करत असताना भारताने सावध पवित्रा घ्यावा. या दूरदृष्टीने  डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत चिन सबंधाचा विचार केला होता. आता तर "स्ट्रिंग आॅफ पर्ल्स" आणि "चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर" च्या माध्यमातून संपुर्ण भारतालाच चिनने घेरले आहे. असे असतानाही  भारताचे प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांनी  चिनचा  दौरा केला.  पं. नेहरुपासून ते आजपर्यंत भारताची भूमिका पंचशिलाप्रमाणे राहिली आहे. परंतु आता तरी भारत चिनला जशास तसे उत्तर देईल का? याकडे सगळयांचे लक्ष लागले असते. 




. खरे तर बुद्धाची भूमी हीच भारताची जागतीक ओळख असून प्राचिन काळापासून भारताचा शेजारील राष्ट्रांशी  सांस्कृतीक सबंध जोडला गेला आहे. तथागत बुद्धांनंतर फाहियान सारखे अनेक चिनी प्रवाशी भारतात आले आणि बुद्धाच्या या भुमीचा अभ्यास करुन जगभरात तथागत गौतम बुध्दच उपदेष त्यांनी पोहचवला. इतकेच काय तर नालंदा आणि तक्षशिलासारख्या विद्यापीठाचे माॅडेल जगाला देणारा भारत हा एकमेव प्राचिन देश असल्याने अनेक देशातील विद्यार्थी या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येत असत आणि या देशातील बुद्धाची शिकवण ते आपल्या मायदेशि परत गेल्यावर आपल्या देशाला देत असत. म्हणूनच आज भारताविषयी अनेक देश आदर बाळगून असतात. परंतु याचा विचार प्रकर्षाने पुढे येत नाही. आज भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी बोलायचे झाले तर केवळ आर्थीक कारणापुरते बोलले जात आहे. परंतु बुद्ध कालखंडात भारताचा व्यवहार इतर देशासोबत कसा होता याचा विचार आज होताना दिसत नाही. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी हाच धागा धरुन भारताच्या परराष्ट्र धोरणाचा विचार मांडला होता. अनेकांना असा प्रश्न्न पडतो की, परराष्ट्र धोरणाशी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा काय सबंध आहे. कारण सर्वांना आजपर्यंत भारताच्या परराष्ट्र धोरणाचे जनक पं. नेहरु आहेत हेच शिकवले गेले आहे. परंतु त्यांचे परराष्ट्र धोरण कसे चुकीच्या दिशेने जात आहे, हे सांगणारे तत्कालीन मंत्रीमंडळात एकमेव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर होते असे न्यूयाॅर्क टाइम्स ने सुद्धा स्पष्टपणाने मांडल्याचे संदर्भ आहेत. 



एकीकडे भारत स्वतंत्र होत असताना दुसरीकडे चीनमध्ये गृहयुद्ध सुरु होते हे आपल्या सर्वानाच माहित आहे. त्याचबरोबर चीन आपले वर्चस्व UNO मध्ये देखील निर्माण करू पाहत होता. जेव्हा चीन ला UNO च्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व देण्याचा विषय पुढे आला तेव्हा भारताने चीनला पाठिंबा दिला आणि चीन ला स्थायी सदस्यत्व मिळवून देण्यासाठी भारताने प्रयत्न केले. भारतामुळे चीन UNO च्या पाच प्रमुख राष्ट्रात जाऊन बसला. भारताला असे अपेक्षित होते की याचा फायदा भविष्यात कधी ना कधी आपल्याला होईल. पण अशी वेळ अजून तरी आली नाही. उलट जेव्हा कश्मीर चा विषय UNO मध्ये गेला तेव्हा चीन ने भारताच्या विरोधात नकाराधिकाराचा वापर केला.  रशियाने भारताच्या बाजूने आपली भूमिका मांडली. 



UNO मध्ये चीनला पाठींबा देत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला. ते म्हणाले की, नेहरूंनी चीनला पाठींबा देत बसू नये, चीन या उपकाराची जाणीव कधीच ठेवणार नाही. म्हणून नेहरूंनी भारताला UNO च्या सुरक्षा परिषदेत कसे स्थान मिळवता येईल याचा विचार करावा. बाबासाहेब तेव्हा जे काही सांगत होते ते भविष्यात खरे होत गेल्याचे दिसते. चीनने भारतामुळे सुरक्षपरिषदेत स्थायी सदस्यत्व मिळवले पण या उपकाराची जाणीव आजूनही चीनला नाही. भारताने स्वतःला स्थायी सदस्यत्व मिळवण्याचा विचार तेव्हा मांडला आजूनही आपण त्या ताकदीने प्रयत्न करत नाही. 

भारत चिन सबंधावर  डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विशेष लक्ष होते. त्यांनी चिनच्या आणि भारताच्या हालचाली अचूक पणे अभ्यासल्या होत्या म्हणूनच त्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. कारण भारत चिन सबंधातील महत्वाची बाब म्हणजे 1954 ला या दोन देशात पंचशील  करार करण्यात आला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्ध धम्मावर आणि पंचशीलावर अतिशय प्रेम होते तरी त्यांनी या करारावर टिका केली. कारण पंचशीलाचे आचरण चिन करत नाही असे त्यांचे म्हणने होते. हे सांगत असताना ते म्हणतात की,  आंतरराष्ट्रीय राजकारणात पंचशीलाला जागाच नसते व कम्युनिष्ठ  देशांत तर मुळीच नसते बौद्ध  धम्मात जरी पंचशिलाला महत्व असले तरी चीनच्या माओनी पंचशीलाचे आचरण आगोदर चीनमध्ये करावे. अशि  सडेतोड भूमिका घेताना बाबासाहेब दिसतात. आणि चिनपासून सावध राहण्याचा इशारा देखिल बाबासाहेब तात्कालीन परिस्थितीत देतात.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा तो इशारा 1962 पासून आजपर्यंत खरा ठरताना दिसतोय. भारताने चीनसोबत पंचशील करार करुन मैत्री केली असली तरी आजपर्यंत ही मैत्री नेहमी संशयाच्या भोवऱ्यात आडकली आहे. भारतात सत्ता बदलानंतर अनेक देशाचे दौरे करुन आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे चीनच्या दौऱ्यावरही जाऊन आले. भारत जरी नेहमी चिनसोबत मैत्रीची भाषा करत असला तरी चिनने मात्र नेहमीच भारताच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आजही ते लडाख येथील चुमार मधून, डोकलाम मधून घुसखोरी करत असताना दिसतात. भारताने आपले संपुर्ण लक्ष उत्तर भारताकडे लावून ठेवावे म्हणून ते नेहमी अशा छोटया छोटया कसरती करत असतात. आणि भारत ताठर भूमिका न घेता नेहमीच पंचशीलाचे पालन करत शांत राहण्याचे काम करत आला आहे. भारताने काही दिवसापुर्वी व्हिएतनाम मध्ये  तेल साठे शोधायला सुरुवात केली तेव्हा चिनला हे सहन झाले नाही आणि वाद होवू नयेत म्हणून येथे तेल सापडत नसल्याचे कारण पुढे करुन भारताने तिथली शोधमोहिम थांबवली. त्याच्या काही दिवसानंतर तीन बेटावरुन चिन आणि जापान मध्ये वाद सुरु झाले आणि चिनने जपानला भारतप्रमाणे वागणूक देण्याचा प्रयत्न केला मात्र जापान न डगमगता चिनच्या विरोधाला तोंड देत राहीला शेवटी चिनलाच नमते घ्यावे लागले. भारताला जर खरेच चिनला मागे टाकून जगाची महासत्ता व्हायचे असेल तर जपान प्रमाणे ताठर भूमिका घ्यावी लागणार आहे. साऱ्या भारताला सर्व बाजूने घेरण्याचे काम चिन सातत्याने करतो आहे. स्ट्रिंग आॅफ पर्ल (मोत्याची माळ), चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर  या चिनच्या नवीन नितीने श्रीलंका आणि पाकिस्तानच्या मदतीने भारताला समुद्री मार्गाने आणि pok कडून  घेरले आहे. बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, ओमन, इरान आणि खाली केनिया पर्यंत ही मोत्याची माळ पसरली आहे. 


  हेे स्ट्रिंग आॅफ पर्ल्स म्हणजे नेमके काय आहे? तर भारताच्या आजूबाजूची सर्व बेटे आपल्या ताब्यात घ्यायचे, त्याचा काही दिवस व्यापारासाठी वापर करायचा आणि तदनंतर तेथे सैनिक तळ उभे करायचे हा कार्यक्रम गेली अनेक वर्षपासून चिनने सुरु केला आहे. आज अशी सोहळा बेटे चिनच्या ताब्यात आहेत.  श्रीलंका आणि पाकिस्तानला मदतीचे आमिश दाखवून त्यांची ही बेटे चिनने ताब्यात घेतले आहेत. म्हणून भारताला केवळ उत्तर भारताकडे लक्ष केंद्रित करुन चालणार नाही. तर दक्षिण भारताच्या सिमेवर देखिल सैनिकी तळ उभे करावे लागणार आहे. सध्या भारताचा चेन्नई येथे महत्वाचा तळ उभा राहिला आहे. असे अनेक तळ भारताला उभे करावे लागणार आहेत. शिवाय चिनला जर नियंत्रणात ठेवायचे असेल तर भारताला भविष्यात जपान, अमेरिका, आॅस्ट्रेलिया आणि रशियासोबत मैत्रीपुर्ण व्यवहार वाढवावे लागणार आहेत. ज्याप्रमाणे चिन भारताला घेरतो आहे त्याचप्रमाणे आॅस्ट्रेलिया आणि जपान देखिल चिनला घेरण्याची योजना आखत आहेत या कामात त्यांना भारताची मदत हवी आहे. म्हणूनच भारताने भविष्यात पंचशिलाचा विचार न करता चिनला कसे रोखता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे. जोपर्यंत चिन पंचशिलाचे पालन करणार नाही तोपर्यंत भारताने देखिल चिनला जशास तसे उत्तर दयावे. जर भारत नेहमीच नमती भूमिका घेत राहीला तर भारताला पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, अफगाणीस्तान, चिन या सर्वच देशाला तोंड देत बसावे लागेल आणि भारताच्या चोहिकडील सिमा धोक्यात येतील.

चिनसोबत आपले वर्तन कसे असावे याचा आढावा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वेळा नेहरुंना समजावून सांगितला होता परंतु याकडे आजूनही सरकारने लक्ष दिले नाही. भारताच्या दक्षिण बाजूने गुंफलेली मोत्याची माळ (स्ट्रिंग आॅफ पर्ल) दक्षिणेकडून भारतावर कधी हल्ला करेल हे सांगता येत नाही आणि हे हल्ले कसे रोखायचे याचे नियोजन भारताकडे अद्यापतरी नाही. भारत नेहमीच परराष्ट्र धोरण आखत असताना अतिचांगुलपना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, हा अतिचांगुलपणा परराष्ट्र धोरणात काही कामाचा नसतो. चिनसोबत नेहरुंनी अतिचांगुलपना दाखवू नये हे एक दिवस महागात पडेल. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची ही दूरदृष्टी आजूनही आपण समजून घेत नाही. जोपर्यंत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे परराष्ट्र धोरण, त्यांची दूरदृष्टी आपण समजून घेत नाही. तोपर्यंत तरी आपण चिनसारख्या राष्ट्रावर  मात करुन महासत्तेचे स्वप्न बघू शकत नाही.  

ब्लॉग आवडल्यास ब्लॉग ला Follow करायला विसरू नका. 

India china war 2020, India China war 1962, India China war 1972, India china international relation, India china relations and Dr. B. R. Ambedkar, India china relations and nehru, India china relations and Narendra Modi. 

Monday, June 15, 2020

बेबी को "जात" पसंद है।



कोणताही व्हायरस, कोणतंही महायुद्ध किंवा कोणतंही नैसर्गिक संकट भारत या देशाचे काहीही बिघडवू शकत नाही. पण आम्ही स्वतः या देशाला, देशाच्या एकतेला संपवणारा शत्रू हजारो वर्षापासून आमच्या सडक्या मेंदूत आणि आमच्या खानदानी परंपरेनुसार घरातच पाळून ठेवलाय. यात सुशिक्षित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जात हिच आता त्यांची प्रेरणा बनत चालली आहे. अशा लोकांच्या मेंदूत हा शत्रू 24 तास कार्यरत असतो तर काहींच्या गरजेनुसार जागा होतो. पण काही लोक असेही आहेत की त्यांनी हा शत्रू कायमचा तर काहींनी वेळेनुसार संपवण्याचा प्रयत्नही केला आहे. 


भारत हि खरी तर संतांची आणि महंतांची भूमी आहे. पण त्यांची परंपरा चालू राहिली नाही आज त्यांच्याऐवजी सोशल मीडियावर "संता- बंता" च्या जोड्या जन्माला आल्या आणि समाज सुधारणेचे अखंड, काव्य, गाथा निर्माण करण्याऐवजी सामाजिक तेढ निर्माण करणारे पांचट जोक निर्माण करू लागल्या. काही काही लोकांनी तर पायात पैंजण बांधून टिक टॉक वर छम छम करायला सुरुवात केली. (यावरून असंच वाटतं की TiK-Tok ला मराठीत "छम-छम म्हणायला हरकत नाही.) आणि हेच संता- बंता "नाचे" झाले आणि जात नावाचा शत्रू घेऊन सोशल मीडियावर नाचू लागले. याना बघणारे लोक, लाईक करणारे लोक इतके हुशार असतात की, ते दिवसभर त्यावरच असतात आणि स्वतःला राजदरबारात बसल्याचा फील आणून या सर्वांना नाचताना बघतात. याना असं वाटतं की, हे सर्व "नाचे" आपण ठेवलेलेच आहेत. ते त्यांना दिवसभर एक बोटाने डिवचू डिवचू नाचवतात. आवडला नसला कि त्याच बोटाने टच करून पुढे सरकवतात. इतकं एक बरं आहे की, ते त्यांच्या दरबारात फेटे उडवू शकत नाहीत, शिट्या वाजवू शकत नाहीत आणि पैसे उधळू शकत नाहीत. पण हा प्रकार असाच राहिला तर आपल्या "जातीच्या" "नाच्यावर" ते नक्की हे सर्व करतील. कारण जातीचा अभिमान बाळगून "छम-छम" केलं की तो त्या जातीचा "छम-छम स्टार" होतो आणि त्या जातीच्या ग्रुप मध्ये तो इतका व्हायरल होतो की, ज्यांचा जाताभिमान झोपला होता तो लगेच जागा होतो. हा जागा झालेला जाताभिमान समाजात सुसाट तेढ निर्माण करत सुटतो. सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की हा स्टार   "बेबी को बेस पसंद है" या गाण्यावर नाचत आहे पण पुढे ती "बेबी को "जात" पसंद है! या गाण्यावर नाचताना दिसतो.


मग याला आवरता आवरता शासन, प्रशासन, प्रबोधनकार, सामाजिक चळवळीतील लोक आणि कितीतरी चांगले लोक कामाला लागतात. पण या "छम-छम स्टार" ने एवढी घाण करून ठेवलेली असते आणि ती इतक्या लोकांनी खाल्लेली असते की लोक मानसिकसंतुलन गमावून बसलेले असतात. याना आवरता आवरता आपली अनेक वर्षे निघून गेली आहेत. पण यातून बरे होण्याचे प्रमाण बऱ्यापैकी आहे कारण त्या त्या समाजात अनेक डॉकटर निर्माण होत आहेत आणि समाजाला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण काही लोक इंजेक्शन च्या भीतीने त्यांच्या जवळ येत नाहीत तर काहीजण गोळ्या खिडकीतून फेकुन देत आहेत. त्यामुळे या आजारातून बरे होण्याच्या प्रमाणात अतिशय मंद गतीने प्रगती होत आहे. 


पण यातूंन लोक नक्कीच बरे होतील असा आशावाद डॉ. बसवेश्वर महाराज, डॉ. संत तुकाराम महाराज, डॉ. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. राजर्षी शाहू महाराज, डॉ. प्रबोधनकार ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक तज्ञ डॉकटरांनी व्यक्त केला होता. त्यांच्या या आशवादास त्यांच्या विचारांवर आणि मार्गदर्शनावर काम करणाऱ्या अनेकांनी हे काम चालू ठेवले आहे. पण देशाची लोकसंख्या ज्यास्त असल्यामुळे त्यांना शोधून काढून त्यांच्यावर विलाज करणे इतके दिवस अवघड जात होते पण आता tik tok अर्थात छम छम मुळे थोडे  सोप्पे झाले आहे. त्यांचा विलाज करण्यासाठी त्यांना आगोदर विजेचे शॉक द्यावे लागतील का याच्यावर शासन आणि पोलीस यंत्रणा येणाऱ्या काळात नक्कीच विचार करेल. पण प्रश्न असा आहे की शासन आणि पोलीस यंत्रणेतील असे मानसिक आजाराने ग्रस्त असणारे आगोदर शोधून बाहेर काढावे लागतील. त्यांचा आगोदर बंदोबस्त करावा लागेल. त्यामुळे सरकार समोर हे एक मोठे आव्हान आहे. पण अशा लोकांना शोधणं आता काही अवघड काम नाही. एखादा व्यक्ती आरोपी आहे असे सर्वाना माहित असताना जर त्याची बाजू घेऊन तुमच्या एरियातला खासदार, आमदार, मंत्री, नगरसेवक,  इतर राजकारणी किंवा शासन आणि प्रशासनातील एखादा कर्मचारी अधिकारी  पुढे आला तर त्याची नोंद यात करायची आणि त्याला सुरुवातीला उपरोक्त डॉकटरांनी सांगितलेले प्राथमिक औषधे द्यायची.सहा महिन्यात तो बरा नाही झाला तर त्याच्या घरच्यांना सांगून घरीच निगराणीखाली ठेवण्याचा सल्ला द्यायचा. 


हे असे रोगी जोपर्यंत निट होत नाहीत तो पर्यंत आपल्याला 24 तास काम करावे लागेल. तेव्हाच कुठे आपला देश भविष्यात एक राष्ट्र म्हणून पुढे येईल. तेव्हा मित्रहो आजपासून सुरुवात करा आपल्या शेजारी,  परिवारात, मित्र परिवारात असा कोणी "छम-छम स्टार" असेल तर त्याला डॉ. बसवेश्वर महाराज, डॉ. संत तुकाराम महाराज, डॉ. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. राजर्षी शाहू महाराज, डॉ. प्रबोधनकार ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आणि अशा तज्ञ डॉक्टरांच्या पुस्तकाची रोज एक एक पाने सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशी तीन वेळ चघळायला द्या. यातून त्यांच्या मेंदूला पोषक तत्वे भेटतील आणि रोगी लवकर बरा होईल. पालकांना आणि कुटुंब प्रमुखांना विनंती करा की, त्यांच्या कुटुंबात जर कोणी असा "छम-छम स्टार" असेल तर त्याच्या पायातले पैंजण काढून फेकून द्या. या पैंजनाच्या ओझ्याने मुलांच्या टाचा दुखतात आणि त्याच्या वेदना चेतापेशी द्वारे मेंदूपर्यंत जातात आणि मेंदू खराब होतो. तेव्हा आजच आपल्या मुलावर लक्ष ठेवा त्याच्या मोबाईल मध्ये असलेले Tik-tok अर्थात छम-छम चे ऍप डिलीट करा. याने तुमचं लेकरू बिघडत चाललं आहे आणि ते देशाला बिघडवत आहे. लक्षात ठेवा मोबाईल बिघडला तर दुसरा घेता येईल किंवा त्याला दुरुस्त करता येईल. पण लेकरू बिघडलं तर....! आणि देशच बिघडला तर....दुसरा देश?


ज्यांना जात पसंद नाही त्यांनी शेअर करा, कमेंट करा. आपल्या एका शेअर ने कोणाचे तरी प्राण वाचू शकतात, कुटुंब सुधारू शकते. चला तर उपरोक्त डॉक्टरांचे हे  अभियान राबवू या जातीच्या मानसिक रुग्णांना बरे करूया. 

#माझा भारत - जातमुक्त भारत 

डॉ. ह. नि. सोनकांबळे

टीप: जे खरोखरच आपली कला सादर करतात तेच खरे स्टार आहेत. बाकी सर्व छम छम आहे. 

#tiktok #Castefreeindia #castefreemaharashtra #annihilationofcaste #mahatmabhaveshwar #chatrapatishivajimaharaj #mahatmaphule #rajarsgishaumaharaj #drbabasahebambedkar 

Wednesday, June 10, 2020

ये दाग अच्छे नहीं है। : मा. शरद पवार साहेबांना अनावृत्त पत्र - डॉ. ह. नि. सोनकांबळे





प्रति, 
मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब, 
अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, 
महाराष्ट्र. 


सस्नेह जय भीम,

आपला पक्ष 21 वर्षाचा झाला त्याबद्दल सुरुवातीलाच आपल्याला भरभरून शुभेच्छा देतो. या पक्षाचा आणि पक्षाच्या नेत्यांचा इतिहास येणाऱ्या काळात लिहला जाईल. मागच्या 21 वर्षात पक्षाने काय गमावले आणि काय कमावले याचे चिंतन झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थातच जे चांगलं काम आहे त्याचं कौतुक या इतिहासात नक्कीच असेल. पण जे वाईट केलं त्याची चर्चाही या इतिहासाचा दुसरा भाग असेल. कार्यकर्त्याने लोककल्याणाची कामे करावीत आणि आपल्या नेत्याला अमर करावे ही आपेक्षा सर्वच नेत्यांची असते. पण कार्यकर्त्याने गुन्हे करावेत आणि त्यातून साहेबांनी आम्हाला सोडवावे हि अपेक्षा कार्यकर्त्यांची असते. त्याशिवाय त्यांना डेरिंगबाज नेता बनता येत नाही. आणि सर्रास आजकाल सत्तेचा उपयोग आपल्या कार्यकर्त्यांना गुन्ह्यातून मुक्त  करण्यासाठी केला जातो. यातून न्यायल्याबाहेर एक "न्यायव्यवस्था" निर्माण होत चालली आहे. पोलीस स्टेशन वर दबाव, अन्यायग्रस्ताचे दमन, गरिबांची लूट, पक्षाच्या नावावर खंडणी आणि प्रचंड भ्रष्टाचार यासाठी संवैधानिक शक्तीचा वापर सर्रास चालू आहे. कोणतेही सरकार आले की, त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते मोकाट सुटतातच कारण त्यांचा कोणीतरी भाऊ, दादा, साहेब, बॉस हा या सत्तेचा भाग असतो आणि तो पोलीस पाटलापासून ते एसपी पर्यंत सर्वाना सांभाळून घेतो. एखादा अधिकारी इमानदारीने काम करत असेल आणि तो भाऊ, दादा, साहेब आणि बॉस ला जुमानत नसेल तर हे भाऊ सरळ त्या अधिकाऱ्याला "मोठ्या साहेबांना सांगू का? तुझी बदली करतो दोन दिवसात" अशा धमक्या देतात. असे कितीतरी प्रकरण साहेबांचे नाव सांगून खाली चालू असतात याची खबरही "वरच्या साहेबांना" नसते. पण इतिहास मात्र याच्या नोंदी विसरत नाही. तो कुठे ना कुठे याची नोंद ठेवत असतो. म्हणूनच येणाऱ्या काळात कोणीही नेहरू, आंबेडकर होणार नाहीत कारण त्यांची एक "ब्लॅक हिस्ट्री" लिहली जात आहे. या इतिहासाचे लेखन आपल्याला थांबता येईल का? कि दिवसेंदिवस याला कार्यकर्त्यांकडून काही पाने जोडली जातील.

      कोणाचीही नोंद इतिहासात "ब्लॅक हिस्ट्री" म्हणून होऊ नये. कारण आयुष्यात सर्व काही चांगलं केलेलं असताना नकळत अशा  गोष्टी  घडतात आणि त्यातून आपण पुरते बदनाम होतो. एका बाजूला चांगल्या कार्याचा इतिहास लिहला जात असताना दुसऱ्या बाजूला कोणीतरी काळा इतिहास देखील लिहायला बसलेलं असतं. त्यांना असे काही संदर्भ मिळत जतात कि ते प्रत्येक गोष्टीला "काळा" रंग देत जातात आणि हा इतिहास एवढा लोकप्रिय होतो की, लोक त्याला आवडीने वाचतात देखील. या ब्लॅक हिस्ट्री पुढे चांगला इतिहास कधीच प्रकाशझोतात येत नाही. आपल्याकडे महाराष्ट्रातला जनसमूह सध्या या दोन्ही बाजूनी पाहतो आहे.

महाराष्ट्राल्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट गोष्टीला. राज्यात होणाऱ्या प्रत्येक सत्ता बदलला, इतकेच नव्हे तर, शिक्षण, समाज, अर्थ, राजकारण या किंवा अशा कोणत्याही क्षेत्रात घडणाऱ्या (चांगल्या आणि वाईट) घटनेच्या पाठीमागे नेहमीच एका व्यक्तीचा हात असतो. ती व्यक्ती म्हणजे "शरद पवार." हे सूत्र लोकांनी पाठच करून ठेवलं आहे. आपला चेहरा लोकांच्या नजरेत जितका पुरोगामी आहे तितकाच प्रतिगामी देखील बनत चालला आहे.  हा चेहरा प्रतिगामी आणि विशेषतः दलित विरोधी आहे. नामांतराच्या लढ्यापासून ते खैरलांजी प्रकरणापर्यंत, या दोन्ही चेहऱ्यांना दोन्ही गटांनी जिवंत ठेवलं आहे. अर्थातच त्यासाठी आपला पक्ष, काही नेते व काही कार्यकर्ते देखील जबादार आहेत हे विसरून चालणार नाही. (काही चांगल्या नेत्यामुळे व कार्यकर्त्यामुळे आपला पुरोगामी चेहरा टिकून आहे.) जेव्हा मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झाला तेव्हा आपल्यावर गाणी लिहली गेली, आपले सत्कार झाले नव्हे समाजातला एक मोठा गट आपल्याशी जोडला गेला. पण जेव्हा जेव्हा प्रतिगामी लोकांचे समर्थन आपल्या पक्षाकडून, कार्यकर्त्यांकडून केले गेले  तेव्हा तेव्हा आंबेडकरी समाज आपल्यापासून दुरही गेला. अनेक प्रकरणात आपल्यातील काही नेत्याचं आणि कार्यकर्त्यांचं प्रतिगामी लोंकाना पाठबळ देखील मिळत गेलं. जेव्हा खैरलांजी सारख्या गावाला आपल्या पक्षाच्या सत्ता काळात "तंटामुक्त गाव" पुरस्कार दिला गेला तेव्हा आणि अशा अनेक घटनांत आपल्यावर प्रतिगामीत्वाचे स्टॅम्पच मारले गेले आणि पुरोगामीत्वाच्या चेहऱ्यावर प्रतिगामीत्वाचे न मिटणारे डाग लागले. 

हे डाग नागपूरचं बनसोड  प्रकरण असो की लासुर आणि परळीत (सामाजिक न्याय मंत्र्यांच्या जिल्ह्यात) घडणाऱ्या घटना असोत अशा अनेक घटनांमध्ये ते डाग इतके घट्ट होत चाललेत कि, त्यांना कोणतेही डिटर्जेन्ट धुऊन काढू शकत नाही. त्यामुळे हे निश्चित आहे की, आपल्या  पश्चात आपले दोन इतिहास लिहले जातील एका इतिहासात आपण इतके पुरोगामी असू कि त्याचा कोणी विचारही केला नसेल पण एका इतिहासात इतके प्रतिगामी असाल कि त्या इतिहासात 100 वर्षाची आर एस एस देखील फिकी पडलेली असेल. कारण महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक दलित अत्याचाराच्या पाठीमागे आणि आरोपीला वाचविण्यात आपल्या पक्षातील लोकांचा  कसा हात होता हे लोकांना थेट वाचायला मिळेल. जे लोक पुरोगामीत्वाचा इतिहास लिहतील ते काही काळानंतर थकतील कारण त्यांच्या पुस्तकांना मिळणारा वाचक वर्ग हा अत्यंत कमी असेल. ज्यांना गुन्हेगारीतून वाचवलं, ज्यांना रस्त्यावरचं उचलून आमदार केलं ते लोक फक्त काही पुस्तके विकत घेतील. ते वाचणार देखील नाहीत. पण प्रतिगामित्वाचा इतिहास लिहणारे लोक काही थकणार नाहीत कारण त्याचा वाचक वर्ग भरपूर असेल. ते वाचतील आणि येणाऱ्या पिढ्यांना ते इतिहास समजावून देखील सांगतील. त्यामुळे इतिहासात आपली नोंद जितकी प्रतिगामी म्हणून असेल तितकी पुरोगामी असणार नाही आणि आपले कार्यकर्ते ठेवणार देखील नाहीत. कारण जवळपास नव्वद टक्के कार्यकर्ते सध्याच्या काळात असे आहेत की, ज्यांना निष्ठेशी नाही तर सत्तेशी देणे घेणे आहे. (याचा अनुभव 2019 च्या निवडणुकीत आपल्या सर्वानाच आला आहे.) 

मुळ मुद्दा असा आहे की हे सगळं का होत चाललं आहे आणि हे डाग घट्ट का होत चालले आहेत. जेव्हा नामांतराचा लढा पेटला तेव्हा तो 17 वर्ष चालला हा लढा चालू राहण्याच्या पाठीमागे आपला हात आहे, खैरलांजी ला तंटामुक्त गाव पुरस्कार देण्यात आपला हात आहे, भांडऱ्याच्या पोट निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात दिलेला उमेदवार देखील खैरलांजी प्रकरणातील आरोपीचा नातेवाईक होता, तो उमेदवार देखील आपणच दिला. अकोल्यात 2014 व 2019 या दोन्ही निवडणुकीतील पराभवाला देखील आपली रणनीती होती, बीजेपी च्या काळात जे मोर्चे एकमेकांच्या विरोधात निघाले त्यात आपला हात आहे किंवा आज चालू असलेल्या बनसोड प्रकरणावर आपणच पडदा टाकण्याचे काम करत आहात. कारण त्यात आपल्याच सत्तेत असलेल्या एका मंत्र्यांच्या नातेवाईकांचा हात आहे. असे कितीतरी आरोप आपल्यावर केले जात आहेत आणि ते लोकांना सहज पटत देखील आहेत. त्यामुळे हे डाग दिवसेंदिवस घट्ट होत चालले आहेत. ज्याला पुसने आपल्यालाच काय आपल्या पूर्ण पक्षाच्या यंत्रणेला देखील भविष्यात शक्य होणार नाही. 

आज महाराष्ट्रात आपली सत्ता आहे नव्हे मुख्यमंत्री म्हणून आपलाच अदृश्य चेहरा लोकांना दिसतो आहे. त्यामुळे सद्याच्या सर्व फेसबुक पोष्ट जरी चेक केल्या किंवा सहज सर्वे जरी केला तरी उद्धव ठाकरे यांच्यावर कोणीही आरोप करत नाही किंवा त्यांना दोष देखील देत नाही. कारण महाराष्ट्रात घडणाऱ्या सर्व अत्याचाराच्या पाठीमागे आणि त्यातील आरोपीना वाचविण्याच्या पाठीमागे आपण आणि आपलं मंत्रिमंडळ आहे. हा मुद्दा लोकांच्या मनात ठासून भरलेला आहे. लासुर, बीड आणि नागपूर प्रकरणानंतर लोक स्पष्टपणे सांगतायत कि आम्हाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडून वेगळ्या आपेक्षा होत्या. यांच्यापेक्षा तर बीजेपी सरकार चांगलं होत. कारण यातल्या कुठल्याच प्रकरणावर कोणताच निर्णय सरकारने अद्याप घेतलेला नाही आणि पोलीस यंत्रणेला घेऊ दिलेला नाही. 

या सर्व घटनांचे डाग ना उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर असतील ना गृहमत्र्याच्या. हे सर्व डाग थेट पक्ष प्रमुख म्हणून आपल्या चेहऱ्यावर असतील. कारण महाराष्ट्र आपल्यात आजही अदृश्य मुख्यमंत्री पाहतो आहे आणि घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या पाठीमागे आपलाच हात आहे असेच लोक समजत आहेत. लोकांच्या या भावनांची जेव्हा इतिहासात नोंद होईल तेव्हा प्रतिगामीत्वाचं पारडं निश्चितच जड असेल. तेव्हा माझी आपल्याला अशी विनंती राहील कि, तुमचं सरकार आहे (मला आजूनही माझं वाटलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अपवाद वगळता) किमान तोपर्यंत तरी असे डाग आपल्या पुरोगामी चेहऱ्यावर लागू नयेत याची काळजी घ्यावी. लासुर, बीड आणि नागपूर अशा घटना किमान आपण हयात आहात तोपर्यंत तरी घडणार नाहीत आणि घडल्याचं तर आपण प्रत्यक्ष लक्ष घालून आरोपीवर कार्यवाही करण्यासाठी संबंधित यंत्रणेला भाग पडावे तेव्हाच कुठे हे डाग पुसले जातील आणि आपला एक वेगळा इतिहास लिहला जाईल. कारण कोणाच्याही इतिहासासाठी हे डाग चांगले नसतात. ज्याचा संदर्भ म्हणून उपयोग केला जाईल आणि एका न घडलेल्या "ब्लॅक हिस्ट्री" चा जन्म होईल. या इतिहासात आपले नाव असणार नाही याची काळजी आतापासूनच घेतलेली बरी. 

आपल्या पक्षाचा 21 वा वर्धापन दिन, त्यानिमित्ताने पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा! आपल्या ध्येय धोरणामुळे महाराष्ट्राला सोन्याचे दिवस येवो. महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजूर, स्त्रिया, सुशिक्षित बेरोजगार यांनाही चागले दिवस येवो आणि हा महाराष्ट्र आपल्या नेतृत्वात अन्याय आणि अत्याचारमुक्त होओ आणि याचा नवा इतिहास आपल्या नावाने लिहला जाओ. हीच अपेक्षा. 

Thursday, June 4, 2020

कार्यकर्त्यांचं लॉकडाऊन - डॉ. ह. नि. सोनकांबळे



आपला नेता निवडून यावा या साठी जीवाचं रान करून प्रचार करणाऱ्या, नवस बोलणाऱ्या, माय-बापानं सांगितलेलं काम सोडून सोशल मीडियावर आपल्या नेत्यांचा तुफान प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्याला या लॉकडाऊन च्या काळात आपल्या त्याच नेत्यांचा एक फोन तरी आला आहे का? माझा कार्यकर्ता या काळात त्याच्या घरची चूल कशी पेटवत असेल. त्याची आई, त्याचा बाप, त्याची बायको, त्याचे लेकरं या काळात जिवंत आहेत का? त्याची बायको आणि आई चुलीकडे बघून काय विचार करत असतील? याचा विचार तरी कोणत्या नेत्याच्या मनात आला आहे का? आला असेल तर त्यांनी एखादा फोन अशा कार्यकर्त्याना या अडीच महिन्याच्या काळात केला आहे का? जर केला असेल, तुमच्या चुलीची काळजी त्यांनी या काळात घेतली असेल तर तोच तुमचा खरा नेता आहे. जर आला नसेल तर आजच सावध व्हा आणि पोटा पाण्याचा काही तरी धंदा करता येतो का ते बघा. 

काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचं दुःख मांडणार भाषण केलं होत. त्यात त्यांनी कार्यकर्त्याना, त्याच्या आई, वडील, बायको या सर्वांना सावध केलं होतं. ते म्हणाले होते की, दिवसभर जर तुमचा पोरगा एखाद्या पक्षाचा झेंडा घेऊन फिरत असेल आणि रात्री तो रिकाम्या हाताने घरी परत येत असेल तर त्याच्या आईला, वडिलांना, बायकोला काय वाटत असेल? माझ्या पक्षात काम करणारा पोरगा आता रिकाम्या हाताने कधीच घरी परत जाणार नाही. जर तो माझ्यासाठी दिवसरात्र एक करत असेल तर त्याची चूल पेटविण्याची जबाबदारी राज ठाकरेंची असेल. 

याचा अन्वयार्थ असा होता की, जर तुम्ही एखाद्या पक्षाला, नेत्याला वेळ देत असेल तर त्यांनी तुमच्या चुलीची जबाबदारी घेतली पाहिजे. पण असं होत नाही. या लॉकडाऊनच्या काळात सामान्य मातदारापर्यंत तर सोडाच पण किमान आपल्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या कार्यकर्त्यापर्यंत या नेत्यांची मदत नाही तर नाही पण ख्याती खुशालीची रेंज तरी पोहचायला हवी होती. आता वेळ मिळाला नाही हे काही कारण असू शकत नाही. कारण या काळात तुमच्या नेत्याकडे काहीच काम नव्हते. ते नाही का, एक केंद्रीय मंत्री घरी बसून भाजी नीट करत होते. त्यांच्या इतका वेळ तर नक्कीच तुमच्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार आणि खासदारांकडे असणारच असणार. मग एक रिंग वाजायला काहीच हरकत नव्हती.

खरं तर अनेक नेत्यांनी या लॉकडाऊन च्या काळात स्वतःला लॉक करून घेतलं आहे. ते कोणाच्याही सम्पर्कात येत नाहीत. कारण त्यांना माहित आहे निवडणूका होऊन आजून एक वर्षही पूर्ण झालं नाही आणि पुढच्या चार वर्षात हे सगळं विसरलं जाईल. जर समजा निवडणूका आता दोन तीन महिन्यांनी असत्या तर नेते एक तर तुमच्या घरून हलले नसते किंवा तुमची सर्व व्यवस्था त्यांनी फार्म हाऊस वर केली असती. पण ते म्हणतात ना "गरज सरो आणि वैद्य मरो" तशीच अवस्था आज कार्यकर्त्यांची झाली आहे.

 काही कार्यकर्त्यांनी साहेबांनी दिलेली पाकिटे, आणि 15 दिवसाचं रेशन (जे कि सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी वाटण्यात आलं होतं. एकदा फोटो काढून झाले की ते दुसऱ्या वेळेस वाटले देखील नाहीत. करणं फोटोच इतके काढलेत कि तेच आजून अपलोड करायचे संपले नाहीत) यावर देखील भागवलं आहे आणि त्यालाच ते मदत म्हणून बसले आहेत. पण त्या कार्यकर्त्याला हे कोण समजावून सांगायचं कि ती मदत नव्हती तर "लोकांना वाटून शिल्लक राहिलेलं, साहेब म्हणाले घेऊन जा तू पण एखाद" पण साहेबांनी तुला पर्मनंट रेशन मिळावं याची काही व्यवस्था केली आहे का? तर अजिबात नाही. तुझी तशी व्यवस्था केली तर तू नाही का "आत्मनिर्भर" होणार आणि मग साहेबांच्या प्रचारापासून दूर जाणार. 

एक कार्यकर्ता सांगत होता, निवडणुकीच्या काळात  साहेबांकडून जेवणाबरोबर रिचार्ज देखील यायचं पण आता काहीच येत नाही. एके  साहेबांनी गरिबांना रेशन वाटायसाठी बोलावलं पण साहेबांना कोण सांगणार कि, तुमचा हा कार्यकर्ताच त्याचा पहिला लाभार्ती आहे. मी पण मग असाच दोन पाकिटे रेशनची माझ्याच घरी टाकले. आता तेही संपत आले. साहेबांना दिसत नसेल का माझी गरिबी. 

दुसरा एक जण म्हणाला, जेव्हा निवडणुकीचा प्रचार करत होतो तेव्हा भाऊ जवळ घेऊन, खांद्यावर हात ठेवून विचारायचे" घरी सर्व बरं आहे ना, काही लागलं तर सांगत चल" दिवसातून भाऊ दोन ते तीन वेळेस फोन करायचे. तेव्हा वाटायचं "आपल्याला अच्छे दिन" आले. पण आता लॉकडाऊन सुरु होऊन अडीच महिने झाले. भाऊंचा साधा मेसेज देखील नाही आणि मी केलेल्या मेसेज ला भाऊ उत्तर देखील देत नाहीत. 

तिसरा एक म्हणत होता, वडील सुरुवातीपासून याच पक्षात काम करतात. म्हणून मीही बी ए ला असताना त्यांच्या सम्पर्कात आलो. निवडणुकीच्या काळात वडील एखादी ( भाड्याची) गाडी घेऊन त्यावर झेंडा लावून प्रचार करत फिरायचे. मलाही थर्ड इयर ला गेल्यावर तसेच फिरावं वाटलं. मलाही तेव्हा पाहिल्यांदाच मतदान आलं होतं आणि कॉलेज मध्ये राज्यशास्त्राच्या सरांनी लोकशाही, मतदानाचा अधिकार थोडाफार शिकवला होतं. म्हणून मीही जोशात प्रचाराला लागलो. मार्च-एप्रिल याच निवडणुकीच्या धामधुमीत गेला आणि बी. ए. केव्हा नापास झालो कळलंच नाही. कार्ट नापास झालं म्हणून वडील खूप रागावले. घरी बसून विषय काढतो म्हणून सांगितलं पण घरी काही अभ्यास होत नव्हता. गावात नुसत्या राजकारणाच्या गप्पा सुरु राहायच्या त्यात मी तर प्रत्यक्ष प्रचारात काम केलं होतं. एक दोन वेळेला साहेबांनी खांद्यावर हात टाकला होता आणि ते फोटो माझ्याकडे होते. लोक मला साहेबांच्या जवळचा समजायचे. या धुंदीत असेच तीन चार वर्षे निघून गेले. बी. ए. चा अभ्यास घरी बसून काही होत नव्हता. शेवटी इंग्रजीचा पेपर कसा तरी काढला पण तोपर्यंत घरच्यांनी मुलगी बघायला सुरुवात केली होती. लग्न झालं अन गावातच राहिलो. नेहमी वाटायचं माझा बाप आणि मी दोघेही पक्षात काम करतो. साहेबांची चांगली ओळख देखील आहे. आपलं काम होईल कुठे ना कुठे. पण काही झालं नाही. साहेब तिन वेळेस आमदार होऊन आता या वेळेस खासदार झालेत. त्यांचा मुलगा माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. पण तो या वर्षी आमदार झाला. माझा बाप आणि मी दोघेही आहोत तिथेच आहोत. या लॉकडाऊन च्या काळात ना साहेबांचा फोन ना पक्षाचा. 

रोज हे ऐकतोय, चर्चा करतोय. मन सुन्न होत आहे. वाटतं यावर खूप लिहावं. पण वाटतं जाऊ द्या कोण वाचणार आहे आणि कोण इतका विचार करणार आहे. आज सांगितलं तरी उद्या तेच होणार आहे. 

दरम्यान एकाने मला कार्यकर्त्यांची व्याख्या विचारली, तू राज्यशास्त्रात पीएच. डी. झाला. पुस्तकात कार्यकर्त्यांची व्याख्या काय केलेली आहे. काही वेळ मला असं वाटलं की, हिवाळ्यात खूप थंडी आहे म्हणून मी पांघरून झोपलोय पण कुणी तरी अंगावरची चादर ओढून थंडगार पाणी माझ्या तोंडावर फेकलंय. कारण आजपर्यंत मी कार्यकर्त्यांची व्याख्या कुठेच वाचली नव्हती. मलाही गरज वाटली नाही व्याख्या तयार करायची. कारण मला असं वाटायचं की पक्षात कोणीच कार्यकर्ता नसतो सर्व नेतेच असतात छोटे किंवा मोठे. पण या सर्व चर्चा ऐकल्या तेव्हा शेवटी या व्याख्येवर येऊन पोहचलोय. कार्यकर्ता म्हणजे आशेवर जगणारा एक सैनिक आहे. जो साहेबांना गड जिकुंन देतो आणि शहीद होतो. पण शाहिद झाल्यावरही त्याचा फोटो कधीच साहेबांच्या घरात, कार्यालयात किंवा साहेब जग सोडून गेल्यावर त्याच्या फोटो खाली देखील नसतो. 

अनेक जुन्या आणि आणि नवीन कार्यकर्त्याबोरोबर चर्चा चालू आहे. अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांचे किस्से ऐकायला मिळत आहेत. असं वाटतं त्याचं एक चांगला पुस्तक होईल आणि किमान त्या नेत्यांच्या जयंत्या साजऱ्या करणाऱ्या आजच्या कार्यकर्त्याना तरी "प्रॅक्टिकल राजकारण" कळेल. 

तुम्ही देखील अशा चर्चा करा आणि समजून घ्या "कार्यकर्त्यांचं लॉकडाऊन". 

Saturday, May 16, 2020

सोशल जस्टीस इन ट्रॅफीक जॅम




डॉ. ह. नि. सोनकांबळे


राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा. धनंजय मुढे यांनी परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना क्रिमिलेअर (लोकसत्ता च्या बातमी वरून, GR मध्ये उल्लेख नाही) ची अट लागू केली आहे. या निर्णयाच्या समर्थनार्थ आणि विरोधात दोन गट निर्माण झाले आहेत. समर्थनार्थ नसलेला गट नक्कीच या निर्णयाच्या विरोधात आहे हे वेगळं सांगायला नको. कारण त्यांच्या मुलांना आता परदेशात शिक्षणासाठी स्वखर्चाने जावे लागणार आहे. तर जे गरीब अर्थात जे BPL मध्ये आहेत त्यांची मुले आता सहज परदेशात शिक्षणासाठी जाणार आहेत तेही शासनाच्या पैशाच्या आधारावर. आजपर्यंत हे विद्यार्थी साधे नांदेड, औरंगाबाद, जळगाव किंवा इतर कुठल्याही ग्रामीण विद्यापीठात शिक्षणासाठी जाऊ शकत नव्हते ते थेट परदेशात जातील.

पण जो वर्ग या निर्णयाला विरोध करतो आहे. तो वर्ग मात्र नाराज आहे कारण त्यांच्या खिशातला (अर्थात साठवून ठेवलेला) पैसा आता मुलांना परदेशात शिक्षणासाठी खर्च करावा लागणार आहे. जे त्यांना मुळीच आवडणार (झेपणार नाही असे नाही.) नाही. कारण त्या पैशात आणखी एखादी गाडी किंवा एखादा फ्लॅट घेता येऊ शकतो. कदाचित याच नियोजनही झालेलं असेल.

आजपर्यंत एखादी अशी योजना आली की ती झोपडीत पोहचतच नाही. एखादा असा विद्यार्थी असतो जो मोठ्या संघर्षाने हि योजना मिळवतो पण शेवटी वशिल्यात कमीच पडतो. अन्यथा सर्व योजना APL धारकच खाऊन घेतात. मागच्या वेळेस नाही का त्या मंत्र्यांच्या मुलीने या शिष्यवृत्तीतून परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा प्रयत्न केला होता अगदी तसा. मग कसं काय झोपडीतलं लेकरू परदेशात जाईल.

मागच्या दोन तीन वर्षात किती विद्यार्थी असे आहेत की जे BPL मध्ये आहेत आणि परदेशात शिक्षणासाठी गेलेले आहेत.  या निर्णयामुळे BPL च्या विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. जर आपल्याला असे वाटत असेल की, कोणताही BPL धारक परदेशात गेला नाही पाहिजे तर आंदोलनाला तयार राहा.

मोठे वशिले, मोठे श्रीमंत लोकच आजपर्यंत याचा लाभ घेत आलेले आहेत. एका प्राध्यापकांच्या 3 मुलांनी फेलोशिप घेतली ज्यांचे उत्पन्न वर्षाला 22 ते 25 लाख आहे. कदाचीय त्यांनी नियमाचे पालन केले असते तर सामाजिक न्यायाचा प्रवाह खाली तिघांकडे आला असता पण तो प्राध्यापक मोहोदयांच्या घरीच आडला. आणि हेच प्राध्यापक महोदय भाषण ठोकून सांगत होते की, गरिबांच्या मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे, बाबसाहेबांसारखं परदेशात गेलं पाहिजे. कसे जातील हो सर, जर त्यांचा प्रवाहच आपण अडवला असेल तर. सामाजिक नायाच्या नावावर सर्व काही येत आणि श्रीमंतांच्या ट्रॅफीक मध्ये ते जॅम होऊन जातं. गरिबांची सायकल शेवटी पायवटेनेच ढकलावी लागते. ती वाटेतच पम्चर होते, तिची चैन पडते, चालवणाऱ्याचे पायही थकतात आणि शेवटी तो त्याच पायवाटेवर निपचित पडतो. त्या मार्गाने कधीच श्रीमंतांची गाडी जात नाही आणि कोणताही श्रीमंत त्याच्यावर दया दाखवून त्याला गाडीत बसवून विद्यापीठात घेऊन जात नाही.



मा. सामाजिक नाय मंत्री धनंजय मुंढे यांनी या गरिबांची सायकल सुसाट वेगाने धावेल यासाठी स्वतंत्र रस्ता तयार केला. पण तिथेही त्याचे वरिष्ठ बांधव (जे बाबासाहेबांमुळे शिकले, श्रीमंत झाले आणि गडयात फिरू लागले) काटे टाकून सायकल पमचर करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अनेक दिवसांपासून हि सायकल सामाजिक न्यायाच्या ट्रॅफीक मध्ये अडकली होती जिला रस्ताच नव्हता ती सुसाट निघतेय याचा आनंद आम्हाला होणे अपेक्षित होते. पण कसा काय होईल गरीब, शोषित, वंचित घटकांचे अश्रू पुसण्यासाठी समाजात बाबासाहेब जन्मालाच आले नाहीत. जे आमच्या बोटाला धरून विद्यापीठात घेऊन जातील.



असो मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व मा. धनंजय मुंढे साहेबांचे खूप खूप अभिनंदन आणि विरोधकांच्या आंदोलनाला झोपडपट्टी वाशियांच्या खूप खुप शुभेच्छा! 

टीप: या निर्णयाच्या विरोधात आंदोलनासाठी गरज भासल्यास आम्हा झोपडपट्टी वाशियांना नक्की बोलवा कारण आंदोलनात आमचीच ज्यास्त गरज असते. आंदोलन करणे AC वाल्यांचे काम नाही. 




Monday, April 13, 2020

अख्ख जग "जय भीम" मय



https://youtu.be/WCow6OwS9TM
लिंक वर जाऊन व्हिडीओ पहा.

डॉ. ह. नि. सोनकांबळे 
फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे अभ्यासक. 

 लंडन, टोरंटो, कॅलिफोर्निया, जापान, नाॅर्थ अमेरिका, नेदरलॅंड, युके, पाकिस्तान, कॅनडा, ग्रेट ब्रिटन, न्युयाॅर्क, जर्मनी, डेन्मार्क, बेल्जीएम, स्विडन, नाॅर्वे अषा अनेक देशांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते पण याच्या बातम्या कधीच भारतात येत नाहीत. 


डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो की आणखी कोणता उत्सव असो, तो साजरा करत असताना त्यांचे एक वाक्य नेहमी डोळयासमोर येते. ‘You can hate me, you can oppose me, but you can not ignore me.’ त्यांचे  हे वाक्य आज खरे होताना दिसते आहे.  असे जरी असले तरी आज जगभरातले लोक व विद्यार्थी त्यांना आदर्श मानत आहेत. ही एकप्रकारे आनंदाची बाब आहे. 

1913 ला जेव्हा ते परदेषात शिक्षणासाठी गले तेव्हाच त्यांनी त्यांच्या वैश्विकरणाचा  पाया घातला होता आणि याच पायावर आज खूप मोठी इमारत उभी राहिली आहे. ज्या कोलंबिया विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतले त्याचा संपुर्ण इतिहास भारतातील आंबेडकरी अनुयायांना तसेच जगभरातील विव्दानांना माहित झाला आहे. याच विद्यापीठात ‘लेहमन’ नावाच्या एका ग्रंथालायात कार्ल मार्क्क्स सह अमेेरिकेच्या सहा राष्ट्राध्यक्षांनी आणि अनेक विव्दानांनी अभ्यास केला. त्याच ग्रंथालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर देखिल अभ्यासाला बसत असत. या ग्रंथालयात अभ्यास करुन अनेकांनी उच्च पदे भूशविली मात्र यापैकी कोणाचाही पुतळा या ग्रंथालयात दिसत नाही एकमात्र केवळ डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचाच पुतळा या ग्रंथालयात बसविण्यात आला असून पुतळयाच्या बाजूलाच भारतीय संविधान, भारत सरकारने तयार केलेले डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे पोश्टाचे तिकिट व त्यांच्या जीवनासबंधीची बराचसा दस्ताएैवज ठेवला आहे. याच विद्यापीठाच्या ‘कोलंबिया लाॅ स्कुल’ मध्ये 14 एप्रिल 2010 ला डाॅ. बी. आर. आंबेडकर रिसर्च सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. अनेक देषातील विद्यार्थी इथे येवून विविध देषातील संविधानाचा अभ्यास करत असतात. 


दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टोरंटो येथील ‘सायमन फ्रेजर’ या विद्यापीठात ‘डब्लू सी बेन्नेटो’ नावाचे एक सुंदर ग्रंथालय आहे. या ग्रंथालयाच्या चैथ्या मजल्यावर एका मोठया मोकळया जागेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात आला असून या ग्रंथालयाच्या सातव्या मजल्यावर त्यांच्या पुस्तकासाठी स्वतंत्र दालन देखिल तयार करण्यात आले आहे. तसेच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीसांठी या विद्यापीठात एकुण तेरा पुरस्कार दिले जातात त्यात सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात उत्कृश्ट कार्य करनाऱ्या एका विद्याथ्र्याला ‘डाॅ. बी. आर. आंबेडकर हयुमॅनिटेरिअन अवार्ड’ नावाचा पुरस्कार देखिल दिला जातो. 


‘लंडन स्कुल आॅफ इकाॅनाॅमिक्स’ मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्राचे धडे गिरवले. हे स्कुल देखिल त्यांना विसरु शकले नाही. या स्कुलच्या ‘क्लेमेंट हाऊस’ मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि एक सुंदर तैलचित्र दर्षनी भागात बसविल्याचे आढळून येते. शिवाय 1973 सालीच या स्कुलचे अध्यद्क्ष आॅथर जाॅन यांनी तेथील ग्रंथपाल क्लार्के, भारताचे तात्कालीन उच्चायुक्त एम. रसगोत्रा आणि लंडन येथिल सर वाल्टर अॅडम्स, डाॅ. एच सद्दातिस्सा यांच्या उपस्थितीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक तैलचित्र या स्कुलच्या दर्षनी भागात लावल्याचे दिसून येते. दरवर्शी त्यांच्या विचारावर आधारीत अनेक चर्चासत्राचे आयोजन देखिल करण्यात येते. 


ज्या देषात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले शिक्षण पुर्ण केले त्याच देशात गौरव होत आहे असे नाही तर इतरही अनेक देशामध्ये त्यांच्या नावाचा गौरव चालूच असतो त्यातलेच एक युरोपातले ‘हंगेरी’ हे राज्य आहे. या राज्यात ‘रोमा आणि जिप्सी’ या दोन प्रमुख आदिवासी जमाती राहतात. त्यांच्या उद्धरासाठी डाॅ. आंबेडकरांची चळवळ ‘द डॅक आणि सोरायसीय’ या दोघांनी उभी केली आहे. ते 2005 ते 2007 च्या दरम्यान भारतात आले होते इथल्या चळवळींचा आणि डाॅ. आंबेडकरांच्या दलितोद्धाराचाअभ्यास त्यांनी इथे केला आणि त्यांनी हंगेरीत जावून ‘जयभीम नेटवर्क’ नावाचे एक संघटन उभे केले. याच संघटनेच्या माध्यमातून  त्यांनी ‘द आंबेडकर स्कुल्स’ नावाच्या शाळा देखिल सुरु केल्या आहेत. आज त्यांचे हे संघटन या आदिवासी जमातींच्या उद्धारासाठी कार्य करत आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिका, संघटीत व्हा आणि संघर्श करा हा मुलमंत्र घेवून हे सर्व लोक काम करत आहेत. अनेकांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली आहे. 


इतकेच नाही तर दक्षिण आफ्रिकेत देखिल डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहचले आहेत. 2008 साली दक्षिण आफ्रिकेचे राश्ट्रा/यक्ष ‘थाबो एम्बकी’ यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना डाॅ. आंबेडकरांच्या अर्थषास्त्राचे संदर्भ देवून दक्षिण आफ्रिकेला आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या विचारांची कशी गरज आहे हे पटवून दिले होते हे भाषण  भारतातील अनेक इंग्रजी वर्तमानपत्रात देखिल छापून आले होते. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या षैक्षणिक क्षेत्रात देखिल डाॅ. आंबेडकरांचे नाव एक चर्चेचा विशय ठरले आहे. म्हणूनच ज्या जोहान्सबर्ग विद्यापीठात नेल्सन मंडेला यांचे शिक्षण झाले त्या विद्यापीठात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ‘आंबेडकर मंडेला’ दिवस साजरा केला जातो.


पाकिस्तानसारखे कट्टर धार्मिक राष्ट्र देखिल डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना विसरु शकले नाही. त्यांच्या 116 व्या जयंतीनिमित्त लाहोर, कराची आणि सिंध पाकिस्तान मध्ये विविध चर्चासत्राचे आणि जयंतीचे आयोजन केले होते. तर लाहोर स्थित ‘सर गंगाराम हेरिटेज फाउंडेशन’ गेल्या आठ वर्शापासून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची पेरणी पाकिस्तानत करत आहे. 


जर्मनिच्या बाॅन विद्यापीठात संस्कृत भाषेचा अभ्यासक्रम सुरु करण्यात यावा म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी विशेष प्रयत्न केले होते आणि प्रवेशासाठीही त्यांनी अर्ज केला होता. त्यांच्या या स्मृती या विद्यापीठाने आजही जपल्या आहेत. तर त्यांच्या शोषणमुक्तीच्या लढयाची प्रेरण घेवून ‘दलित साॅलिडरिटी नेटवर्क’ अनेक देशात काम करत आहे. त्यांनी तयार केलेल्या ‘द आंबेडकर प्रिन्सिपल्स’ ला ब्रिटीश संसदेने 2007 साली मान्यता देखिल दिली असून अनेक आंतरराश्ट्रीय कंपन्यांना हे प्रिन्सिपल्स लागू करण्यात आले आहेत. 


कॅनडा मध्य्ये याॅर्क नावाचे एक मोठे विद्यापीठ आहे. विद्यापीठात 55 हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर, सात हजार 
प्राध्यापक या विद्यापीठात काम करतात, शिवाय 5462 विद्यार्थी विविध 157 देषातून या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत. या विद्यापीठात जवळपास 5 हजार विविध प्रकारचे कोर्सेस चालतात. या विद्यापीठातून शिक्षण घेवून बाहेर पडलेले 283,000 पेक्षा जास्त विद्यार्थी विविध देशातील सर्वोच्च पदावर काम करतात.  या भव्य विद्यापीठात एकुण पाच ग्रंथालय आहेत. त्यातलेच एक स्काॅट लायब्ररी नावाचे सर्वात मोठे ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात डिसेंबर 2015 मध्ये
एक सोहळा पार पडला तो सोहळा होता डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा अनावरनाचा.


लंडन, टोरंटो, कॅलिफोर्निया, जापान, नाॅर्थ अमेरिका, नेदरलॅंड, युके, पाकिस्तान, कॅनडा, ग्रेट ब्रिटन, न्युयाॅर्क, जर्मनी, डेन्मार्क, बेल्जीएम, स्विडन, नाॅर्वे अषा अनेक देषात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पोहचले आहेत. ज्यांना जातीपुरते मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला गेला तेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आज संपुर्ण जगाचे वैचारीक नेतृत्व करीत आहेत. 




(लंडन स्कुल आॅफ इकाॅनाॅमिक्सच्या ग्रंथालयात 1973 साली बसविण्यात आलेले डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र. या प्रसंगी डावीकडून प्रा. आॅथर जाॅन (अ/यक्ष), मि. डी. ए. क्लार्के (ग्रंथपाल) मि. एम. रसगोत्रा (भारताचे उच्चायुक्त), सर वाल्टर अॅडम्स, डाॅ. एच. सद्दातिस्सा (प्रमुख लंडन बु/द विहार))



कोलंबिया विद्यापीठाच्या लेहमन ग्रंथालयात बसविण्यात आलेला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, प्रसंगी माईसाहेब आबेडकर, अॅनस्ली एम्ब्री. 



(सइमन  फ्रेजर विद्यापीठाच्या डब्लू ए सी बेन्नेट्टो ग्रंथालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दर वर्शी साजरी केली जाते. सर्व कर्मचारी या जयंतीसाठी उपस्थित असतात. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची 120 वी जयंती साजरी करताना विद्यापीठाचे व ग्रंथालयाचे कर्मचारी )


दक्षिण आफ्रिकेतील विठवाॅटर्सरॅंड या वि़द्यापीठात ‘आंबेडकर.मंडेला दिवस’ साजरा करण्यात आला 


कॅनडा येथील याॅर्क विद्यापीठाच्या स्काॅट लायब्ररी म/ये बसविण्यात आलेला पुतळा.