Friday, June 23, 2023

बबल्या ईकस केसावर फुगे

  



                     बबल्या 

                            ईकस केसावर फुगे

              


 पर्यावरणाच्या दृष्टीकोणातुन टाकाऊ पदार्थाची पुनर्निमिती आणि पुनर्वापार म्हणूनही अनेक देश केसांच्या व्यवसायाकडे बघत आहेत. 2022 या आर्थिक वर्षात भारतातुन 770.70 दशलक्ष युएस डॉलर किंमतीच्या केसांची निर्यात केली गेली असून भारत हा केसांची निर्यात करणारा जगातला पहिल्या क्रमांकाचा देश आहे.      

Advt.

 
भारत हा केसांवर प्रेम करणा­या लोकांचा देश आहे. ये रेशमी जुल्फें पासून ते बाला- बाला पर्यंत अनेक गाणी आणि कथा भारतीयांनी लिहल्याचे ज्ञात आहे. डोक्यावर केस असणे म्हणजे सौंदर्याचं प्रतिक जरी मानलं जात असलं तरी, टक्कल पडणं म्हणजे विद्वान असल्याची ओळख असंण असंही म्हटलं जातं. केसांवर अनेक अभ्यासकांनी आपापली मते मांडून ठेवली आहेत. ना. सी. फडके यांचा काळे केस हा धडा तर चक्क आपल्या अभ्यासक्रमातच आहे तर वामान दादा कर्डक यांनी आपल्या एका कवितेतजेव्हा केस हे माझे गळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागलेअसे म्हटले आहे

 

आजही केसांवर लिहणारे आणि आवडीने वाचणारे आणि ऐकणारे काही कमी नाहीत. काही दिवसांपूर्वीच खानदेशातल्या अहिराणी भाषेतलं मनी माय बबल्या ईकस केसावर फुगेहे गाणं युट्युब ला धुमाकुळ घालून गेलं. खरं तर बबल्या हा केसांचा व्यवसाय करणा­यांचा एक प्रतिनिधी आहे. आपल्याला जरी हा व्यवसाय छोटा वाटत असला तरी भारत हा केसांचा व्यवसाय करणारा जगातला पहिल्या क्रमांकाचा देश आहे


 

हे वाचून आपल्याला अश्चर्य वाटत असेल. कारण आपल्या गावाकडे तर केसावर फुगे, पिना, बंम्बई मिठाई अशा अनेक वस्तु आपण सहज विकत घेतो. आता तर केसांवर चक्क घरगुती भांडी आणि बकेट सारख्या वस्तुही मिळत आहेत. परंतु हे सर्व आपण आजवर पाहत आलोय किंवा केसांच्या या अर्थव्यवस्थेचा भागही होत आलो आहे. पण याच्या मुळाशी कधी आपण जाऊन पाहत नाही. आपण मुठभर केस देऊन एखादी वस्तु घेतो पण या केसांचे पुढे काय होते? पण अर्श्चर्याची बाब म्हणजे आपले केस बाजाराज चार हजार  ते पंचवीस हजार किलोने विकले जातात

 

याचे महत्वाचे कारण म्हणजे भारतीय लोकांच्या केसांवर परदेशी पाहुणे देखील फिदा असतात. म्हणुनच की काय, भारताच्या केसांना जगभरातुन मागणी असते. याचाच एक भाग म्हणून 2022 या आर्थिक वर्षात भारतातुन 770.70 दशलक्ष युएस डॉलर किंमतीच्या केसांची निर्यात केली गेली आहे. 

 


भारतातुन निर्यातीसाठी दोन प्रकारचे केस जमा केले जातात. एक रेमी केस आणि दुसरे नॉन रेमी केस. रेमी केस हे सर्वोत्तम आणि चांगल्या दर्जाचे केस असतात ज्याला बाजारात चांगला भाव मिळतो तर नॉन रेमी केस हे केसावर पिना, फुगे अशा वस्तु विकुन जमा केले जातात किंवा त्याला कच­याच्या रूपातले केस असेही म्हटले जाते

 

भारताततुन या दोन्ही प्रकारच्या केसांची निर्यांत मोठ्या प्रमाणात होते. रेमी केस भारतातल्या अनेक मंदिरातुन जमा केले जातात. तुम्ही जर कधी तिरूपतीच्या मंदीरात गेला असाल तर तिथे भक्तीभावाने लोक देवाला केसा अर्पण करताना दिसतात. परंतु हजारो लोक दररोज केस दान करताना दिसत असले तरी तिथे कधीच कुठल्या रस्त्यावर एकही केस आढळत नाही किंवा कोणाच्या जेवनातही केस अढळत नाहीत. मग हे केस नेमके जातात कुठे तर हे सर्व केस रेमी केस म्हणून जमा केले जातात आणि याची मोठ्या प्रमाणात परदेशात निर्यात केली जाते. या केसांना जगभरातुन मोठी मागणी आहे. या केसांचा वापर विग बनविण्यासाठी किंवा विविध प्रकारच्या केसरचना तयार करण्यासाठी केला जातो. अशा केसांची भारतीय बाजारात किंमत 10 हजार रूपये किलो पासून ते थेट 25 हजार रूपये किलो पर्यंत आहे

 

रेमी केसांपेक्षा नॉन रेमी केसांची किंमत बाजारात कमी असते कारण या केसांना व्यवस्थीत करण्यासाठी केमीकलचा वापर केला जातो आणि त्याच्यामुळे याची चमक कमी होते. म्हणून याची बाजारात किंमत घटते तरी पण अशा केसंाना देखील बाजारात 4 हजार ते 8 हजार प्रति किलो मागे भाव मिळतो

 

                केसांचे अभ्यासक निकि विल्सन यांच्या टीम ने जर्नल ऑफ रिमॅन्युफॅक्चरींग या  मध्ये असे म्हटले आहे की, केसांचा उद्योग हा जागतीक स्तरावर झपाट्याने वाढणारा उद्योग आहे. म्हणूनच या उद्योगात अनेक देशांनी आपली गंुतवणूक वाढवली आहे.

 

                भारतापाठोपाठ हाँग-काँग, पाकिस्तान, ब्राझील, अमेरिका, इंडिोनेशीया, व्हिएतनाम, चिन, जापान आणि नेदरलँड या देशांनीही केसांचे उद्योग वाढवलेले पहायला मिळतात. भारतातुन होणा­या केसांच्या निर्यातीत आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांचा वाटा मोठा असल्याचेही म्हटले जाते. तर चिन हा केसांवर प्रक्रिया करणारा सर्वात मोठा देश असून चिन सर्वात जास्त आयात करणारा देश आहे. पर्यावरणाच्या दृष्टीकोणातुन टाकाऊ पदार्थाची पुनर्निमिती आणि पुनर्वापार म्हणूनही अनेक देश या व्यवसायाकडे बघत आहेत

 

                केसांचा वाढता व्यवसाय लक्षात घेता काही दिवसापूर्वी भारत सरकारने केसांच्या निर्यातीवर बंधने घालून दिली आहेत. पुर्वी केसांची निर्यात करण्याकरिता कोणतीही बंधने नव्हती मात्र आता निर्यातदाराला वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेट कडून परवानगी घ्यावी लागते

 

डॉ. . नि. सोनकांबळे

सहाय्यक प्राध्यापक,

राज्यशास्त्र विभाग,

एमजीएम विद्यापीठ, औरंगाबाद

 

Monday, June 19, 2023

बेदखलांची दखल घेणारी - बेदखल


 बेदखलांची दखल घेणारी - बेदखल

डॉ. ह. नि. सोनकांबळे

 

आजच बातमी वाचली, पदव्युत्तर शिक्षण घेतलेला वेठबिगार मालकाने साखळदंडाने बांधून ठेवला. कोंडबा हाटकर यांची कादंबरी वाचून सीएचबी धारकांची अवस्था देखील अशीच आहे यावर शिक्कामोर्तब होत. कोंडबा हाटकर बोलतोय बाकीचे बोलत नाहीत एवढाच फरक.  


    तसं पाहिलं तर माझं चरित्र, कांदबरी, कथा आणि कवितांचं वाचन फारच कमी आहे. मला यातलं कोणतंही साहित्य जास्त आवडत नाही. पण काही मोजक्या लोकांचे चरित्र आणि काही कादंब­ऱ्या वाचण्यात आल्या आहेत. सहसा चळवळीत काम करणा­ऱ्या  लोकांनी लिहिलेले आणि चळवळीसाठी पुर्णवेळ देऊन लिहणा­ऱ्या लोकांच्या साहित्याकडे मी दुर्लक्ष करत नाही. याचाच एक भाग म्हणून चळवळीत काम करणारा आणि चळवळीसाठी लिहिणारा लेखक म्हणून परिचित असलेले कोंडबा हाटकर यांची बेदखल  कादंबरी वाचण्यासाठी हातात घेतली.



    कोंडबा हटकर यांनी आतापर्यंत अनेक वर्तमानपत्रातून वैचारिक लेखन केले आहे. मला असे वाटत होते की, कोंडबा हटकर यांच्या हातुन एखादं वैचारिक पुस्तक लिहिलं जाईल परंतु अचानक त्यांची कादंबरी प्रकाशित करून त्यांनी माझ्यासह अनेकांना धक्का दिला. कारण वैचिारिक लेखन करत असताना अचानक कादंबरीकडे हा तरूण कसा काय वळला याचं उत्तरच सापडत नव्हतं. पण बेदखल जेव्हा वाचून पुर्ण झाली तेव्हा असं लक्षात आलं की, चळवळ आणि जगणं या दोन्हींच्या मध्यभागी असलेली मनातली खद-खद कुठे तरी बाहेर काढायची होती आणि याचं माध्यम म्हणून त्यांनी कादंबरी लेखणाचा प्रपंच केला.

    तसं पाहिलं तर ही कादंबरी रमेश वाघमारे नावाच्या एका सीएचबी प्राध्यापकाच्या भोवती फिरते. तोच या कादंबरीचा नायक आहे. इतर सर्व पात्रं ही रमेशच्या अवती भवतीची असली तरी कादंबरी वाचताना असं लक्षात येतं की, ही सर्व पात्रे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील असून त्यांची नावे बदलण्यात आली आहेत.

    रमेश वाघमारेच्या आयुष्याचा आणि संघर्षाचा पट उलघडत असताना लेखकाने दोन अंगाने हा पट उलगडला आहे. एक तर रमेश वाघमारे या नावाने आणि दुसरा स्व कथनाने. या दोन्ही माध्यमातून त्यांनी रमेशच्या आयुष्याचा संघर्ष मांडला आहे. रमेश या कादंबरीचा नायक असला तरी हा नायक महाराष्ट्रातल्या प्रत्येक सीएचबी धारकाचा प्रतिनिधी आहे असेच म्हणावे लागते. कारण सीएचबीच्या धोरणाने रमेश सारख्या अनेकांना संघर्षाच्या वाटेवर तर आणलेच परंतु त्यांचे आयुष्य बर्बाद होईल अशी व्यवस्थाच निर्माण केली. 
 
ADVT

 

    शिक्षण वाघीनिचे दुध आहे असे म्हटले जाते परंतु आम्ही ज्या शिक्षणाला वाघीन समजुन तिचे दुथ पित आलो ती खरेच वाघीन होती का असा प्रश्न ही कादंबरी वाचल्यानंतर प्रत्येक सीएचबी धारकाणे स्वत:ला विचारला पाहिजे, अशा अवस्थेत ही कादंबरी वाचकाला घेऊन जाते आणि आपण स्वत: पेटुन उठलं पाहिजे याची जाणीवही करून देते. अनेकांनाच नव्हे तर सर्वच सीएचबी धारकांना हे सीएचबीचे धोरण चुकीचे आणि आयुष्याची राखरांगोळी करणारे आहे असे वाटत असले तरी याच्या विरोधा कोणीही बोलत नाही कारण या वर्षी सीएचबीच्या विरोधात संघर्ष केला तर पुढच्या वर्षी सीएचबी देखील मिळेल की नाही याची भिती प्रत्येक सीएचबी धारकाच्या मनात असते आणि आहे. ती भिती काढणारी चळवळ मात्र कोणीही उभी करत नाही आणि ति होणारही नाही. त्याची कारणे वेगवेगळी आहेत.

    बेदखल कादंबरीने सीएचबी धारकांच्या चळवळीचाही वेध काही प्रमाणात घेतला आहे, काही प्रमाणात म्हणण्यापेक्षा त्या चळवळीचे प्रमाणच तेवढे आहे असे म्हणायला देखील हरकत नाही. ही चळवळी पावसाळ्यात उगवलेच्या छत्रीप्रमाणे आहे असते की, काय? असाही प्रश्न ही कादंबरी वाचताना पडतो कारण अनेक चळवळी उभ्या राहिल्या आणि त्या पावसाळा संपला की, नष्टही झाल्या. अतिषय तुटपुंज्या वेतनात सीएचबी धारक उद्याच्या आशेवर जगताना दिसतो आहे. काही काही जन तर सीएचबी तत्वावरच सेवानिवृत्त झाल्याच्या नोंदी लेखकाने या कादंबरीत घेतल्या आहेत. सीएचबी वर कोणी 14 वर्ष कोणी 18 वर्ष तर कोणी 20 वर्षाहुन अधिक काम केले आहे. लॉकडाऊनच्या काळात तर सीएचबी धारकाचे वेतनच बंद होते अशा अवस्थेत अनेक प्राध्यापक हे आपल्या विद्यार्थ्यांच्या शेतातच कामाला होते. ही आवस्था बघुन लेखकाने ही व्यवस्थाच निर्लज्ज आहे आणि आपण या व्यवस्थेचे गुलाम आहोत असे सांगून यातून मुक्तीचा मार्ग आपल्याकाडे आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

    मुळात महाविद्यालयात तासिका कोण घेतं? नॅकचे सर्व कामे कोण करतं? अॅडमिशन प्रक्रियेत कोण असतं? पुर्णवेळ कार्यरत असलेल्या शिक्षकांचे तास देखील कोण घेतं? या सर्व प्रश्नांची उत्तर मात्र एकच आहे ते म्हणजे सीएचबी धारक प्राध्यापक. मुळात सीएचबी धारक प्राध्यापक म्हणजे एक प्ररकारचा चतुर्थश्रेणी कर्मचारी असतो जो पुर्णवेळ प्राध्यापकाच्या हाताखाली कामाला दिलेला असतो अशीच अवस्था सीएचबी धारकांची झालेली आहे.
 
त्याचे आपमानास्पत जगणे केवळ महाविद्यालयातच नाही तर समाजात देखील आहे हे सांगत असताना नायकाच्या कुटंुबातील, गावातील, समाजातील आणि लग्न जुळवतानाचे अनेक संवाद या कादंबरीत आणले आहेत.

आपला मुलगा आज ना उद्या प्राध्यापक होईल हे स्वप्न डोळ्यात घेऊन जगणारे आई वडील आणि त्यांना समाजातुन विचारले जाणारे प्रश्न हे भयानक वास्तव या कादंबरीत मांडले गेले आहे परंतु हे वाचून तरी आपण जागे होणार आहोत का? हा प्रश्न शिल्लकच राहतो.

महाराष्ट्राच्या बाहेर सीएचबीचे धोरण नाही. शिवाय अनेक राज्यात भरती प्रक्रिया देखील शासन स्तरावरून केंद्रिय पध्दतीने राबविली जाते. मध्यप्रदेश, बिहार अशा राज्यात देखील प्राध्यापक भरती ही आयोगामार्फत केली जाते. महाराष्ट्रात त्याची मागणीही काही दिवस सुरू राहिली आणि नंतर शांत झाली.

सीएचबीच्या धोरणाने महाराष्ट्राच्या उच्चशिक्षीतांच्या पिढ्या बर्बाद केल्या आता नवीन शैक्षणीक धोरण किती पिढ्या बबार्द करणार आहे हे निश्चित सांगता येत नाही. कारण पुन्हा परदेशी विद्यापीठे बाजारात येणार आहेत आणि शिक्षणाचे शेअर मार्केट होणार आहे. या आव्हांनाना आपण एक सीएचबी धारक म्हणून कसे पेलणार आहोत हे आजून तरी निश्चित नाही.

कोंडबा हटकर यांनी बेदखल या कादंबरीच्या माध्यमातुन कोणते प्रश्न निर्माण झाले आणि आमच्या पिढ्या कशा बर्बाद झाल्या याची दखल घेतली आहे परंतु हे वाचून हे निश्चत केले पाहिजे की नवीन शैक्षणिक धोरण आल्यानंतर सीएचबी धारकांचे काय? याचा विचार केला पाहिजे. इतकंच नाही तर जे पर्मनंट प्राध्यापक आहेत त्यांनीही हा विचार केला पाहिजे की, महाविद्यालयांची संख्या कमी होणार आहे म्हणजे काय? आणि महाविद्यालयांचे क्लस्टर होणार आहे म्हणजे काय? येणा­ऱ्या दहा वर्षात सर्वच प्राध्यापकांची आवस्था सीएचबी धारकांसारखी होणार आहे. हे विसरता कामा नये. 2036 मध्ये पुन्हा एक कादंबरी "पर्मनंट प्राध्यापकांची परवड" या शिर्षकाखाली कोणीतरी नक्कीच लिहील. तुर्तास पर्मनंट प्राध्यापकांनी बेदखल वाचून सीएचबी धारकांची तरी परवड थांबवावी अशी आशा आहे. 
 
हेही पुस्तके वाचा  
 
 


कोंडबा हाटकर यांची बेदखल हि कादंबरी मागविण्यासाठी 9552133951 / 80555 55500  या  नं वर संपर्क साधा.

 

डॉ. ह. नि. सोनकांबळे
सहाय्यक प्राध्यापक,
राज्यशास्त्र विभाग,
एमजीएम विद्यापीठ, औरंगाबाद


Monday, April 10, 2023

आंबेडकरी चळवळ इतकी मनोरंजक आहे का?


 

आंबेडकरी चळवळ इतकी मनोरंजक आहे का?

डॉ. ह. नि. सोनकांबळे

 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने निलेश कराळे आणि विठ्ठल कांगणे या दोन कॉमेडी शिक्षकांची मागाणी भाषणांसाठी वाढत चालली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दिवसेंदिवस मनोरंजनाकडे वळत चालली आहे याचे हे द्योतक आहे. पण खरोखरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती इतकी मनोरंजक आहे का? याचा विचार आपण सर्वांनी करणे गरजेचे आहे. 

 
    2014 मध्ये एका कार्यक्रमात अरुधती रॉय असं म्हणाल्या होत्या की, ‘आम्हाला डॉ. आंबेडकर गांभीर्याने समजून घेण्याची गरज आहे.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही मनोरंजन नाही तर ती शोषीत, वंचीत समुहाच्या न्यायाची लढाई आहे आणि कोणतीही लढाई लढत असताना आपण जर विनोद करत बसलो तर त्या लढाईचे परिणाम काय होतील यावर जास्त सांगण्याची गरज नाही. 

 
    मागे काही दिवसांपूर्वी विद्रोही मराठी साहित्य सम्मेलनातही गर्दी जमवण्यासाठी आयोजकांनी निलेश कराळे यांना सम्मेलनाचे स्वागत अध्यक्ष केले आणि त्यातल्या एका विचारमंचाला “फुले-शाहू- आंबेडकर” विचारमंच असे नाव दिले. माझ्या दृष्टीकोणातुन हा फुले शाहू आंबेडकरांचा आणि त्यांच्या चळवळीचा फार मोठा अपमान आहे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पट्टे बापूराव, दिलीप कुमार अशा मनोरंजन करणा­या लोकांना साधे जवळही थांबू दिले नाही. त्यांच्याच नावावर आज मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. विद्रोही मराठी साहित्य सम्मेलन तरी गांभीर्याने घेतले जात असावे असे मला इतके दिवस वाटत होते पण विद्रोह देखील मनोरंजनाकडे वळला आहे असेच सध्या तरी दिसते आहे. 

 
    निलेश कराळे कोण? याचा शोध घेतल्यावर माझ्या असे लक्षात आले की, त्यांनी “बुलेट चालू घडामोडी” नावाचा एक महान ग्रंथ लिहला आहे आणि तो ग्रंथ विद्रोही मराठी साहित्यिकांना एवढा आवडला की बस्स…! त्यांना त्यांनी फुले-शाहू-आंबडकरी चळवळीचा नयक ठरवून टाकले. आज तेच आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या स्टेजवरून लोकांचे मनोरंजन करू लागले आहेत. 

 
    बे डोंमड्याहो, काचा-कचा, डुक­याहो, रान डुकरीन, कचकन, बुडया-टकल्या, साल्या, देऊ काय कोपच्यात, जा ना मरून, लिचोंड, ढस, धुस, फुससस, वानर तोंडया, बदमास लोकहो, भिकारवाडा, मारन भोकनेवा, पोट्टी जाते पोट्यासोबत फिरायले या आणि अशा अनेक शब्दातला निलेश कराळे यांचा विद्रोह कदाचित विद्रोही साहित्यिकांना जास्त आवडला असावा. तोच विद्रोह आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती मंडळाला देखील आवडू लागला आहे. म्हणूनच की काय त्यांच्या तारखा देखील मिळणे सध्या कठीण झाले आहे. 

 
    तुम्ही जर या चळवळीतले दुसरे भाष्यकार बघितले तर त्यांचे नाव आहे विठ्ठल कांगणे, सध्या तेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध ठिकाणी चळवळीचे भाष्यकार म्हणून बोलू लागले आहेत. ते बोलणारच कारण जयंती समितीचा आग्रह आहे की, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. आणि मग ते मार्गदर्शन करायला येतात. तुम्ही जर यांचे नाव युटयुब ला सर्च करायला गेलात आणि विठ्ठल कांगणे असं सर्च केलं तर पुढचे शब्द फुल्ल, मोक्कार कॉमेडी असं आपोआप येतो. 

 
    ये दलिंदरा, बब्या, गौतमी पाटल, तु निराधार बायांच्या घरी बसतो, तोंडावर उलटी झापड देईन, क्लास करता करता पोरगी पटली, तुया बापाला आधी हाणलं पाहिजे, मग तु अंडरविअर विक अशे अनेक शब्द यांच्या तोंडून सातत्याने येतात. ही भाषा ऐकणारा आणि त्यांचे अनुकरण करणारा यांचा एक मोठा वैचारिक चाहता वर्ग आपल्याला पहावयास मिळतो. त्यामुळे या वर्गाची मागणी पुर्ण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा मंच सध्या यांच्यासोबत शेअर केला जातोय. 

 
    लोक येतात, ऐकतात, पोट धरून हसतात आणि अशा पध्दतीने मग जगातल्या सर्वात महान विव्दान व्यक्तीची जयंती साजरी केली जाते आणि आम्ही कोणीच काही बालत नाही. आता वेळ आली आहे हे सर्व थांबवण्याची.

 
जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक दोन फोटो सोडले तर कुठेच हसताना दिसत नाहीत, कुठेच एखाद्या भाषणात जोक सांगताना दिसत नाहीत. किंवा कुठेच मनोरंजन करतानाही आढळत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नावच इतकं सिरियस आहे की, हे नाव घेतांना मोठ मोठे विव्दान माणसांचे चेहरे गंभीर रूप धारण करतात. पण हे गांभीर्य मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणाऱ्यांना  आणि त्यांचे अनुयायी म्हणून घेणाऱ्यांनाच सध्या राहिले नाही.
पण आपण जर खरेच स्वत:ला डॉ. बाबासाहेब आंबेडरांचे अनुयायी किंवा वारस म्हणून घेत असू तर आपण हे सर्व थांबवले पाहिजे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर गांभीर्याने समजून घेतले पाहिजेत. अन्यथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानेही बाजारात विनोद/जोक यायला वेळ लागणार नाही. 

 
    तेव्हा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की, आपल्याला असे कार्यक्रम  जे  लोक आयोजित करत आहेत त्यांना थांबवा, त्यांना ही चळवळ किती सिरियस आहे हे सांगा. समाजाचा पैसा आणि वेळ यात व्यर्थ जातोय हेही पटवून सांगा. वाटलं तर जयंती क करू नका पण पण जयंतीच्या नावावर होणारा हा तमशा थांबवा अशी हात जोडून विनंती करा आणि ऐकतच नसतील तर ………! पुढचा निर्णय तुम्हीच घ्या. 

 

कारण महामानवांची जयंती महामानवांची जयंती वाटली पाहिजे. तिचा एक वेगळाच थाट असला पाहिजे. केवळ गर्दी जमवण्याच्या नावाखाली उद्या तमाशे होऊ देऊ नका.   

 

 हेही वाचा

सम्राट अशोकाचा भारत "सोने की चिड़िया"  

 

रिझर्व बँक, लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर  

जागतिक चर्चाविश्वात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर 

 

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि LIC चे राष्ट्रीयकरण  

 

अमेरिका-इंग्लंड-भारतीय संविधान आणि स्त्रिया  

 

स्वातंत्र्यापुर्वीच संविधानाचे 7 मसुदे तयार होते?  


Thursday, April 6, 2023

केसांची निर्यात - भारत जगात पहिल्या क्रमांकावर

केसांची निर्यात - भारत जगात पहिल्या क्रमांकावर 

डॉ. ह. नि. सोनकांबळे

 

विनंती - ब्लॉग पेज ला फॉलो करायला विसरू नका.

 
आपल्या गावात केसांवर – काटे, फुगे, पिना, टिकल्या विकणारे रोजच पहायला मिळतात. विशेषत: ग्रामीण भागातील स्त्रिया आपल्या रोजच्या विंचरण्याच्या केसातून अशा वस्तू खरेदी करतात. आता तर केसांवर भांडे आणि इतरही महत्वाच्या घरगुती वस्तु मिळतात. या वस्तू विकत घेतांना आपण त्या विक्रेत्यांना कधीच विचारत नाही की, हे केस किती रूपये किलो ने विकले जातात? पण या केंसांची किंमत आणि जगभरातील मार्केटचा विचार केला तर तुम्ही थक्क व्हाल.  



केसांची निर्यात करणारा भारत हा जगातला पहिल्या क्रमांकाचा देश आहे. अनेक वर्षापासून जगभरात भारतीय केसांची प्रचंड मागणी राहील आहे. दरवर्षी जवळपास 165 मिलियन डॉलरच्या केसांची निर्यात भारतातून होते. या सर्व रकमेचा आकडा जर भारतीय रूपयांमध्ये बघितला तर 13,56,08,55,000.00 इतका होतो. भारताबरोबरच इतरही देश केसांची निर्यात करतात. परंतु भारतातून सर्वात जास्त केसांची निर्यात केली जाते.
आता आपल्याला प्रश्न पडला असेल की, भारतच केसांच्या निर्यातीत पहिल्या क्रमांकावर कसा काय? याचे साधे उत्तर आहे की, भारतात अशा काही धार्मिक प्रथा आणि परंपरा आहेत त्यात केसांचे दान केले जाते किंवा केस देवाला अर्पण केले जातात. 



भारतात अनेक वर्षापासून केशवपनाची प्रथा चालू होती असे आपण ऐकले असेल किंवा वाचलेही असेल. शिवाय तिरूपती बालाजी मंदिरात अनेक भक्त देवाला केस दान करतात. तुम्ही जर तिरूपतीला कधी गेलात तर तुम्हाला असे हजारो लोक देवाला केस दान करताना दिसतील. इतके लोक केस दान करणारे असताना देखील तिथे रस्त्यावर किंवा कच­यात कुठेही केस आढळून येत नाहीत. मग साधा प्रश्न पडतो की, हे केस नेमके जातात तरी कुठे?
याचे साधे सरळ उत्तर आहे या सर्व केसांची भारतातून मोठ्या प्रमाणात निर्यात होते आणि हे केस लाखोंच्या भावाने परदेशात विकले जातात. 



भारता बरोबरच इतरही काही देश असे आहेत जे केसांची निर्यात करतात. त्या देशांचा क्रमांक अनुक्रमे खालील प्रमाणे लागतो. 


केसांची निर्यात करणारे भारतातील प्रमुख देश – 2021


खालील आकडे दशलक्ष युस डॉलरमध्ये आहेत.(in million U.S. dollars)


1. भारत - 165 (in million U.S. dollars)

2. हाँग काँग – 4.1
3. पाकिस्तान – 2.2
4. ब्राझील – 2.1
5. अमेरिका – 0.92
6. इंडोनेशिया – 0.8
7. व्हिएतनाम – 0.66
8. चिन – 0.53
9. जापान – 0.51
10. नेदरलँड - 0.41

भारतातून होणा­या केसांच्या निर्यातीत आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या प्रमुख राज्यातून जास्त केसांची निर्यात केली जाते. 



भारतात दोन प्रकारचे केसा गोळा केले जातात एक रेमी आणि दुसरे नॉन रेमी केस. रेमी केस हे सर्वोत्तम आणि चागल्या दर्जाचे केस असतात जे मंदिरामधून गोळा केले जातात जिथे लोक धार्मिक भावनेतून देवाला किंवा देवीला केस दान करतात. ज्याचा उपयोग विग साठी किंवा इतर प्रकारच्या केस रचनेसाठी करतात तर नॉन रेमी केस हे खेड्यापाडयातून कच­याच्या रूपात जमा केले जातात. 


काही दिवसांपूर्वी भारत सरकारने केंसांच्या निर्यातिवर बंधने घालून दिली आहेत. पुर्वी केसांची निर्यात करण्याकरीता कोणतीही बंधने नव्हती मात्र आता निर्यातदाराला वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यरित असलेल्या डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड कडून परवानगी किंवा परवाना घ्यावा लागतो. 

 

हेही वाचा 

सम्राट अशोकाचा भारत "सोने की चिड़िया" 

 

...आणि वाजपेयींनी नेहरूंचा फोटो पुन्हा कार्यालयात लावला.  

 

... आणि पं. नेहरूंनी कुंभमेळ्यात अंघोळ करण्यास नकार दिला !  


Saturday, April 1, 2023

ambedkar podcast Series : देशातल्या ३६ प्लॅटफॉर्म वर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १० पैलू

 
 
 
ambedkar podcast Series : देशातल्या ३६ प्लॅटफॉर्म वर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १० पैलू 
 

 यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने एका नवीन उपक्रमाची सुरूवाम करण्यात आली आहे. या मध्ये छत्रपती शिवाजी महराज, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी या पाच महापुरूषांचे ििवचार नवीन पिढीपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोहोचवण्यासाठी ऑडिओ पॉडकास्ट सिरीजची निर्मिती करण्यात आली आहे. ही ऑडिओ पॉडकास्ट सिरीत श्रोतावर्गाला आवडत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महापुरूषांचे विचार युवा पिढी पर्यंत पोहचवण्याचा चव्हाण सेंटरचा मानस सफल होताना दिसतो आहे. 


    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट नवीन विषयांसह डॉ. ह. नि. सोनकांबळे यांनी उलगडून सांगितला आहे. त्यांचे विचार 10 एपिसोडच्या माध्यमातून ऐकायला मिळतील. 


    हे सर्व एपिसोड
Apple Podcast, Google Podcast, Amazone Music, Gaana.com, Savan.com, Spotify यशवंतराव चव्हाण सेंटरची वेबसाईट/ फेसबुक पेज/ इन्स्टाग्राम/ व्टिटर यांसह 36 हून अधिक प्लॅटफॉर्म वर ऐकायला मिळतील. 


    ambedkar podcast आपण खलील दिलेल्या टायटल लिंकवर क्लिक करूनही ऐकू शकता.

इथे क्लिक करा :

 

1. इथे क्लिक करा : भारताचे परराष्ट्र धोरण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

 

2. इथे क्लिक करा : स्वातंत्र्यपूर्वीचे सात संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

 

3. इथे क्लिक करा :शेती आणि आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

 

4. इथे क्लिक करा :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान सभेत प्रवेश 

 

5.इथे क्लिक करा :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 'ट्रेंनिग स्कुल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स' 

 

6. इथे क्लिक करा :इन्शुरन्सचे राष्ट्रीयीकरण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

 

7. इथे क्लिक करा :आरक्षण : एक सकारात्मक कृती राष्ट्रनिर्मितीसाठी 

 

8. इथे क्लिक करा :ब्रिटिश पार्लमेंटचे 'द आंबेडकर प्रिन्सिपल्स 

 

 

 

 ambedkar podcast